भरती-ओहटी

अशोक च्या तब्येतीत अप डाउन होतच होते .नोकरी संभाळून अशोक ची तब्येत संभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच होती. अशोक ची तब्येत थोडी स्थिरावली व ते कामावर जाऊ लागले त्याच सुमारास सुमित्रा ची मैत्रीण रेखा कडे तिच्या नातवाच्या वाढदिवसा चे बोलावणे आले .अशोक च्या आग्रहा मुळे‌ सुमित्रा एकटीच पार्टी ला गेली. तिथेच तिने मिसेस सतीश ना प्रथम पाहिले डार्क निळ्या साडीतली गोरी घारी, केसांचा पोनी टेल, मॉर्डन छान,ही उषा लिमये रेखाने ओळख करून दिली. पार्टीमध्ये थोडाच वेळ थांबून सुमित्रा घरी गेली. तिला शंका होती किअशोक ने परत ड्रिंक घ्यायला सुरुवात केली असावी ,कारण त्यांची तब्येत परत डाऊन व्हायला लागली. -------------------------------
*भरती -ओहोटी?* भाग 1

दुपारच्या वेळी सुमित्रा चा नुकताच डोळा लागला होता, तेवढ्यात " आजी,"उठ न आपल्या ला सिनेमा ला जायचं आहे न ,मग उठ ना", छोट्या संकेत ने सुमित्रा ला हलवून जागे केले.
"हो रे उठते, "म्हणत सुमित्रा ने कूस बदलली
आई उठा न"अटपा लौकर शो तीन ला सुरू होतो . अर्चना,तिची सून घाई करु लागली
.अग तुम्ही दोघं च जा न ,मी राहिन घरी संकेत ला पण पाहिन.

\"नाही हं आई आपणं सर्व जाऊ,\" म्हणत आशीष तिचा मुलगा आत आला,बरं बाबा चलते,म्हणत, सुमित्रा ने तोंड धुतले , साडी बदलली तो पर्यंत अर्चना ने चहा दिला, आशीष ने कार बाहेर काढली.

सिनेमा मल्टिप्लेक्स मॉल मधे होता.सिनेमा सुरु होऊन थोडावेळ होतो तोच, संकेत ने "बाबा सूंs लागली" म्हणून ,आशिष ला उठवले, आशिष त्याला घेऊन गेला,परत येऊन थोडा वेळ झाला तशी , भूक लागली सुरू झाल .
बाहेरून चिप्स,पापकार्न आणलें ते संपले,आता संकेत ची परत चुळबुळ सुरु झाली तो सिनेमा ला कंटाळला.
त्याचा घरी चलण्याचा हट्ट सुरू झाला. अर्चना ने त्याला मांडीवर घेऊन झोपवंण्याचा बराच प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. सुमित्रा ने आशिष ला सुचवलं मी आणि संकेत बाहेर मॉल मधे फिरतो सिनेमा एक दीड तासांत संपेल च.
बरेच नाही हो करत आशिष हो म्हणाला संकेत ला घेऊन सुमित्रा बाहेर आली.

. बाहेर येतात संकेत शांत झाला. सुमित्रा त्याला बाहेरची दुकाने दाखवू लागली. तिथून मगदुसऱ्या मजल्यावर एस्केलेटर वरून गेले, त्या धावत्या पाय्हर्या वर चढताना संकेतला खूप मज्जा येत होती.
सुमित्रा ला सुरुवातीला थोडी भीती वाटत होती पण मsग तिला ही मजा येऊ लागली. तिसऱ्या मजल्यावर बरेच खेळ होते, बाईक कार वर फिरणे झाले.
आता मात्र संकेत ची स्वारी जाम खुश होती. खाली उतरायलाच तयार नव्हती.
"आपण आईसक्रीम खायचे का? असे विचारताच ,आजी मला चॉकलेट वाले, तुला कोणते हवे करत गाडी वरुन खाली उतरला...

आईस्क्रीम खाऊन होताच दोघेजण कपड्यांच्या स्टॅन्ड कडे गेले. एक ड्रेस संकेत करता व एक सलवार-कमीज अर्चना करता पहात असताना मागून. " हॅलो तुम्ही इथे ?असा घोगरा पुरुषी आवाज कानावर आला.

सुमित्रा ने मागे वळून पाहिलं. क्षणभर नजर समोरच्या चेहऱ्यावर स्थिरावली, मग-- ओळख जाणवताच नजर नकळत खाली झुकली,
ते सतीश होते.
\"तुम्ही इथे तिने प्रतिप्रश्न केला\"?
हो ,आताशा मी इथे अमरावती तच राहतो .माझा मुलगा, सून इथे असतात त्यांच्यातच राहतो मी.
तुम्ही इथे,?? मी-- माझ्या मुलाकडे सुट्ट्यांमध्ये राहायला आले आहे.
कशा आहात?
मी?- ठीक.
"तुम्ही?"
मी बरा आहे. वेळ जात नसल्याने बऱ्याचदा इथे फिरायला येतो काही आवडले तर घरच्यांसाठी नेतो.

"तुम्ही अजून इंदौर ला च असता का "?सतीश ने सुमित्रा ला विचारले.
हो-- माझी मुलगी आहे ना तिची सोबत असते
"अरे हो-- तुमच्या मिस्टरांच्या डेथचे कळले बरेच दिवस आजारी होते ना ते."
हं --सुमित्रा ला अशोक ची आठवण आली क्षणभरात तिचा चेहरा दुखावलेला झाला पण लगेच तिने स्वतःला सावरले, तीन वर्ष झाली.
माझ्या मिसेस उषा--, ती ही अचानक एक्सीडेंट मध्ये गेली नी सर्वच बदलले.
तेवढ्यात सुमित्रा चा मोबाईल वाजला. एक मिनिट हं म्हणत तिने फोन रिसिव्ह केला.
"हेलो ---आई ,आई कुठे आहात तुम्ही? सिनेमा संपला आम्ही बाहेरच येतो आहोत.
हो हो --आम्हीही ही येतो.

बरंय निघते मी , तिने सतीश ना निरोप दिला.

घरी परतताना संकेत ची बडबड सुरू होती.
आजीबरोबर बरीच मज्जा केलेली दिसते. "याने त्रास तर नाही ना दिला आई"? अर्चना ने विचारले .
नाही ग मजेत होता तो.

रात्री सुमित्रा फक्त कॉफी पिऊन झोपायला खोलीत आली. झोप येत नव्हती ,डोक्यात नुसते विचारच चालू होते.
सतीश आज आज अचानक असे भेटतील असे स्वप्नातही वाटले नव्हते.

गतकाळ डोळ्यासमोरून जाऊ लागला.
सुमित्रा चे अशोक शी लग्न झाले तेव्हा ते एसबीआय बँकेत नोकरीला होते. सुमित्रा ची पण नोकरी होतीच.
दोनच मुले सर्वकाही छान छान चालले होते पुढे अशोक ना प्रमोशन मिळत गेले पद प्रतिष्ठा, पैसा येत गेला तशा, रईसी सवयी लागत गेल्या. सुरुवातीला फक्त पार्टीज मध्ये ड्रिंक घेणारे अशोक हळूहळू रेग्युलर घेऊ लागले.

मॅनेजर ची पोस्ट मिळाली तेव्हा मुलीचे लग्न झाले, दोन वर्षाने मुलालाही नोकरी लागली. आता जबाबदाऱ्या कमी होत गेल्या, पैसा ही भरपूर मिळत होता तसे अशोकचे व्यसन ही वाढत गेले.
सुमित्रा ने समजवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी जे नको व्हायला तेच झाले. एक दिवस अचानक अशोक ची तब्येत बिघडली, दवाखान्यात ऍडमिट करावे लागले. सर्व टेस्ट झाल्या. सुमित्रा ची खूप धावपळ होत होती.
टेस्ट रिपोर्ट घेण्याकरता ती हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या पॅथॉलॉजी मध्ये गेली असता तिथे, प्रथमच सतीश भेटले. त्यांनीच सुमित्रा ला सर्व टेस्ट रिपोर्ट दिले. रिपोर्ट पॉझिटिव्ह पाहून सुमित्राला चक्कर आली. सतीशने तिला खुर्चीवर बसवून पाणी प्यायला दिले.
थोडे बरे वाटल्यावर त्यांना थँक्स म्हणत ती दवाखान्यात आली.

अशोक च्या आजारा चे निदान लिव्हर कॅन्सर निघाले .डॉक्टरांनी औषधांचा मारा केला व पथ्य सांगितले थोडे बरे वाटल्यावर घरी आणले.
यांना दारू पासून दूर ठेवा असे सांगितले. मधून मधून अशोक ना दवाखान्यात न्यावे लागे . तिथे बऱ्याचदा सतीश भेटत हळूहळू ओळख वाढली. कधीकधी सतीश न दिसले तर तिला चुकल्या सारखं वाटत राही. पुढे अशोकची तब्येत थोडी स्थिरावली व दवाखान्याचे चक्कर ही कमी झाले तरीही मधुन मधुन दवाखान्यात जावेच लागे. अशाच वेळेस एकदा दवाखान्यात शिरताना तिला जाणवले की तिची नजर तिच्याही नकळत सतीश ना शोधते आहे हे जाणवताच सुमित्रा दचकली.
अशोक च्या तब्येतीत अप डाउन होतच होते .नोकरी संभाळून अशोक ची तब्येत संभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच होती. अशोक ची तब्येत थोडी स्थिरावली व ते कामावर जाऊ लागले.

त्याच सुमारास सुमित्रा ची मैत्रीण रेखा कडे तिच्या नातवाच्या वाढदिवसा चे बोलावणे आले .
अशोक च्या आग्रहा मुळे‌ सुमित्रा एकटीच पार्टी ला गेली.

मिसेस सतीश ना तिथे प्रथम पाहिले डार्क निळ्या साडीतली गोरी घारी, केसांचा पोनी टेल, मॉर्डन छान,
ही उषा लिमये रेखाने ओळख करून दिली. पार्टीमध्ये थोडाच वेळ थांबून सुमित्रा घरी गेली. तिला शंका होती किअशोक ने परत ड्रिंक घ्यायला सुरुवात केली असावी ,कारण त्यांची तब्येत
परत डाऊन व्हायला लागली.

नौकरी करणे सुमित्रा लाआता अशक्य वाटू लागले कारण प्रायव्हेट जॉब मध्ये सुट्ट्या किती मिळणार तेव्हा, आता नौकरी सोडावी असा निर्णय तिने घेतला.
नोकरीला राजीनामा दिल्याने आता, सुमित्रा पूर्णवेळ घरीच असे.
पण अशोक तब्येत सुधारण्याऐवजी खालावत चालली होती.
असेच आणखीन सहा महिने गेले आणि एक दिवस अशोक ना परत दवाखान्यात ऍडमिट करावे लागले .

सुमित्रा ने मुलांना बोलावून घेतले अशोक ची तडफड तिला पाहवत नव्हती रात्र रात्र जागून काढली. एक दिवस अशोक तिला सोडून गेले .

या धक्क्यातून सावरायला तिला मुलीने संपदा ने मदत केली नोकरी ही सोडली व अशोक ही गेले, नुसते रिकामपण. कसा घालवायचा दिवस. एकटेपण खायला उठत असे. एकाच गावात घर असल्याने मुलगी एक दिवस आड भेटून जात असे. मुलाचा ही फोन येत असे.

घराचा हॉल प्ले स्कूल ला द्यावा असे सुमित्रा ने ठरवले. नर्सरी स्कूल सुरू झाल्याने घर आता गजबजलेले असायचे. काही दिवसांनी सुमित्रा ने पण स्कूल ला वेळ द्यायला सुरुवात केली त्यामुळे तिचे एकटेपण काही अंशी दूर झाले .

आत्ता समर वेकेशन असल्याने ती मुलाकडे अमरावतीला राहायला आली होती.
आज अचानक सतीश भेटले विचार करता करता तिचा डोळा लागला.

क्रमशः
-------------------------------

🎭 Series Post

View all