भरती- ओहोटी- भाग दोन

अबोली साडी मोजकिच ज्वेलरी घातलेली लांबसडक केसांमध्ये अबोलीचा गजरा घातलेली सुमित्रा, ते सावळे रूप. एक लखलखणारी वीज तर दुसरे शांत सावळे सौंदर्य.. कितीतरी वेळ सतीश दुरून पहात होते. अबोली वरून नजर हटतच नव्हती. घरी आल्यावर ही मनात आंदोलन चालले होते.
----------------------------------------
भरती-ओहटी ? भाग दोन

सतीश------
रात्रीचे दोन वाजलेत पण, डोळ्यात झोप नाही. आताशा बऱ्याचदा असे होत असे...
. उठून पाणी प्यायले .आज मॉल मध्ये अचानक भेटलेली सुमित्रा सारखी आठवत होती.
पॅथॉलॉजी त रिपोर्ट घ्यायला आलेली, घाबरलेली...
नंतर हॉस्पिटलच्या कॅरिडॉर मध्ये जाताना बऱ्याचदा भेटलेली .
सतीश ना आठवले ---एकदा अचानक फॅमिली फ्रेंड सुभेदार कडे बर्थडे पार्टी मध्ये पाहिलेली सुमित्रा..
सतीश ची बायको उषा, मिसेस सुभेदार, व सुमित्रा. तिघी बोलत होत्या.
भडक निळ्या साडीतली, भरपूर दागिने, पोनीटेल घातलेली, बायको उषा, तर --अबोली साडी मोजकिच ज्वेलरी घातलेली लांबसडक केसांमध्ये अबोलीचा गजरा घातलेली सुमित्रा, ते सावळे रूप.
एक लखलखणारी वीज तर दुसरे शांत सावळे सौंदर्य..
कितीतरी वेळ सतीश दुरून पहात होते. अबोली वरून नजर हटतच नव्हती. घरी आल्यावर ही मनात आंदोलन चालले होते.

उषा, त्यांची सहचरी, सतीश च्या ताईच्या नात्यातली, ताई व आईने पसंत केलेली. सतीश ने लग्नाविषयी फारसा विचारही केला नव्हता नुकतेच त्यांनी "एमडी इन पॅथॉलॉजी" चा कोर्स पूर्ण केला होता व स्वतःची पॅथॉलॉजी सुरू केली होती.
. बाबा नव्हते व आईची तब्येत नरम गरम असायची. सर्वांच्या पसंतीनी उषा त्याच्या जीवनात लक्ष्मीच्या पावलाने आली.
. उषाने त्याचा संसार व्यवस्थित केला त्यांचे सर्व मित्र नेहमीचच उषा ची स्तुती करत. मुलेही नीट मार्गी लागली .
सर्व कसे सरळ रेषेत नीट चालले होते आणि--- अचानक, एखाद्यासुखद वादळासारखी
सुमित्रा समोर आली .

उषा तिच्या संसारात रमलेली होती,सतीश च्या मनाची आंदोलने तिला जाणवली ही नाही.
सतीश ने कामाचा व्याप वाढवून स्वतला कामात जुंपुन घेतले .

अचानक एका लग्नसमारंभाला परगावी गेलेली उषा मोबाईलवर बोलत बोलत रस्त्याने जात असताना एका जीपने धडक दिल्याने पडली व तिथेच गेली...

उषाच्या अशा अचानक जाण्याने सतीश चे जगच बदलले, एकट्याला घर खायला उठे. पॅथॉलॉजी चे काम खूप होते पण आता पूर्वीसारखा उत्साह वाटेना, कामात मन एकाग्र होत नव्हते, उषाच्या अभावी त्यांना अगदीच एकटं वाटू लागले तब्येत ही ढासळू लागली‌.
मुलगा व सून अमरावतीला येण्याचा आग्रह करू लागले पण, एवढा पॅथॉलॉजी चा व्याप वाइंड अप करणे सहज शक्य नव्हते.
या सर्वात एक वर्ष निघून गेले. शेवटी सतीश अमरावतीला मुलाकडे शिफ्ट झाले.

सुरुवातीचे काही दिवस मुलगा व सून त्यांना वेळ देत असत. त्यांच्याकडे लक्षही खूप देत असत पण ते दोघेही नोकरी करत असल्याने, लवकरच आपणच आपले साथी हे सतीश ना जाणवले.
सकाळ संध्याकाळ बाहेर फिरणे, टीव्ही व कम्प्युटर वर बसून वेळ घालवणे असे केले पण त्यातही फार रस वाटेना आपण इथे येण्याचा निर्णय उगाचच घेतला असे त्यांना वाटू लागले.
अशा मनाच्या नाजूक अवस्थेत असताना सुमित्रा अचानक समोर आली, जणू-- जुन्या डायरीत लपवलेले मोरपीस अचानक हाती यावे नी त्याच्या स्पर्शाने रोमांचित व्हावे.
अशा मानसिक अवस्थेत मोरपिसाचा स्पर्श अनुभवत ते झोपी गेले.

क्रमशः.
--------------------------------------
सौ.प्रतिभा परांजपे

🎭 Series Post

View all