भैय्या या सैय्या?

त्याच्या मनात प्रेम पण तिच्या मनात काय❓



आज काॅलेजचा पहिला दिवस .. आपला बंडू सकाळीच उठून मस्त नवीन कपडे घालून फाॅग पर्फ्यूमचा फवारा मारून नटून थटून काॅलेजला जाण्यासाठी तयार होऊन मोरूची वाट बघत नाक्यावर उभा होता .. समोरून गुप्तांचा राजू आला .." क्या बंडू भाय क्या चल रहा है .. "


"अपने यहाॅ ते सिर्फ फाॅग चल रहा है राजू भाय ..."


याच्याशी बोलून काही फायदा नाही अशा अर्थाने राजू तोंड वाकड करून गेला ..


"च्यायला , हा मोऱ्या कुठे उलथला .. आज पहिल्याच दिवशी लेट होणार काॅलेजला या मूर्खामुळे .. कधीचा वाट बघतोय .. साहेब कधी उगवतात काय माहीत ..आला एकदाचा .."


"साॅरी साॅरी साॅरी ... खुपच लेट झाला ना .. अरे यार .. पेट्रोल भरायला गेलेलो .. खुप मोठी लाईन लागलेली पेट्रोल साठी सकाळी सकाळी .."
मोरू बोलला..


"ओये चल आता आधीच खुप उशीर झालाय .. नंतर बडबड करत बस ..." बंडू म्हणाला ..


एकदाचे दोघे काॅलेजला पोहचले .. बाईक पार्क करून काॅलेजमध्ये एंट्री केली ..


"वाॅव .. किती भारी वाटतं ना रे मोऱ्या काॅलेज .. "


"होना बंडू .. काॅलेज पण भारी आणि काॅलेजच्या पोरी पण भारी आहेत .." मोरू इकडेतिकडे हिरवळ बघत म्हणाला ..


"तु ना साल्या ,सुधरू नकोस .. आधीची गोष्ट वेगळी होती .. हे सिनियर काॅलेज आहे .. असं काही करू नकोस की नजरेत येशील .. "
बंडू म्हणाला ..


दोघे त्यांचा वर्ग शोधत होत चालले होते .. तेवढ्यात समोरून एक मुलगी धावत आली आणि बंडूला धडकली .. काही करायच्या आत बंडू त्या मुलीसकट जमिनीवर पडला .. बंडू जमिनीवर आणि मुलगी त्याच्या अंगावर .. असे पडल्यामुळे त्या मुलीचा चेहरा बंडूच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता .. आपले बंडूशेठ तर कधीच हिरोईनच्या डोळ्यात हरवून गेले होते ..


"साॅरी .. आपको लगा तो नही ना .." ती साऊथ इंडियन टोन मध्ये बोलली ..


"आय ॲम ॲालराईट .. "असं म्हणत बंडू उभा राहिला ..

"माय नेम इज गायत्री .. फर्स्ट ईयर B .SC . "

"What is your name ? "


"His name is बंडू .. "मोऱ्या पचकला ..


"मोऱ्या ?" बंडूने राग दिला..


"माय नेम इज चेतन .. बंडू म्हणाला .." ( त्याच ॲाफिशियल नाव चेतन आहे बरं का )

"I am also studying in F.Y . B. SC .."


"ओह .. ये बोहत अच्छी बात है .. हम लोग सेम क्लास में .. "

"चेट्टन , फ्रेंड्स ?? "गायत्रीने स्वत: मैत्रीचा हात पुढे केला ..


बंडू के मन मे लड्डू फूटा ?

"येस,शुअर .. व्हाय नाॅट" म्हणत बंडूने देखील तिचा मैत्री प्रस्ताव स्वीकारला ..


आता या तिघांची तिकडीच बनली .. जिकडे जातील तिथे एकत्रच .. लेक्चर , लायब्ररी , कॅन्टीन ..

एकमेकांना अभ्यासात मदत करायची .. नोट्स पूर्ण करायचे ..
एकमेकांची प्राॅक्सी लावायची ..
अशा रितीने त्यांची मैत्री बहरत होती ..


गायत्री बंडू उर्फ चेतन ला लाडाने मेरा प्यारा चेट्टन म्हणायची ..

बंडूला मनातल्या मनात फार आनंद व्हायचा .. पण दाखवू शकत नव्हता .. गायत्रीला काय वाटेल .. त्याला तिच्या बद्दल फीलिंग्स होत्या पण तिने समजून न घेता मैत्री पण तोडली तर काय होईल .. हा विचार करून तो गप्प बसायचा आणि आपल्या भावना मनातच लपवायचा ..


असं करता करता फेब्रुवारी महिना आला .. यांची मैत्री अजूनच घट्ट झाली .. एकमेकांच्या घरीदेखील त्यांची मैत्री माहीत होती .. बंडू आणि मोरूच्या भरवशावर. गायत्रीचे आईवडील बिनधास्त रहात होते .. कारण बंडू आणि मोरू तिची खुप काळजी घ्यायचे ..


व्हॅलेंटाईन डे जवळ आला होता ..मोरू बंडूच्या मागे लागला होता , आतातरी तिला तुझ्या भावना सांग .. किती दिवस मनात झुरत राहणारेस .. तुझं प्रेम व्यक्त कर .. ती घेईल समजून ..


हो नाही करता शेवटी बंडूने मनाची तयारी करून ठरवलं .. या व्हॅलेंटाईनला तिला मनातलं सांगायचं ...

पण मोठा ट्विस्ट तर पुढे आहे ..


गायत्रीने बंडूला काॅल केला आणि म्हणाली ," मेरा प्यारा चेट्टन ( साऊथ इंडियन टोनमध्ये ) १४ तारीख को सीसीडीमें आओ , मोरू को लेके आओ , मुझे तुमसे बोहत जरुरी बात करनी है .. "

बंडू के मन में लड्डू फूटां ????


बंडू वेड्या सारखा व्हॅलेंटाईन डेची वाट बघत होता .. फायनली तो सुवर्ण दिवस आला .. १४ फेब्रुवारी ला बंडू मोरूला घेऊन सीसीडी मध्ये गेला .. पण तिथे गेल्यावर त्याला ४४० व्होल्टचा शाॅक बसला ..


समोर गायत्री एकी मुलाच्या हातात हात घालून गप्पा मारत बसली होती .. बंडूच्या डोळ्यात पाणी तरळलं .. त्याने हलकेच डोळे पुसले .. तेवढ्यात गायत्रीचं त्यांच्याकडे लक्ष गेले


"मेरा प्यारा चेट्टन!" , तिने जोरात हाक मारली ..


"हायला , ही काय डोक्यावर पडली काय रे ..त्या सोंडक्याच्या हातात हात घालून बसलीये आणि तुला प्यारा चेतन म्हणतेय .. "मोरू वैतागून बोलला ..


"चेतन नाही रे चेट्टन ," अशा सिरीयस प्रसंगी पण बंडूला विनोद सुचला ?


"हा तेच ते चेट्टन काय आणि चेतन काय .. "शेवटी एकचं ना .. मोरू बोलला ..


गायत्रीने येऊन बंडूचा हात धरून त्याला घेऊन गेली आणि म्हणाली .. "चेट्टन ये मेरा बाॅयफ्रेंड है अंकित .. ये भी महाराष्ट्रीयन है .. और मेरे अम्मा अप्पा को पसंद भी है .."


"अंकित ये मेरा फ्रेंड और मेरा प्यारा चेट्टन है .. इसका नाम चेतन है .. और ये मोरू है .."


अंकीत ने हाय केलं ..


गायत्रीच्या या बोलण्यावर बंडू आणि मोरू एकमेकांकडे आश्चर्याने बघायला लागले ..


मोरूला रहावलं नाही .. तो बोललाच शेवटी ..

"गायत्री , तुमको चेतन बोलनेको आता है तो फिर क्यू चेट्टन बोलती थी .."


गायत्री जोरजोराने हसायला लागली .. मोरू आणि बंडू ही वेडी झाली का या आविर्भावात तिच्याकडे बघायला लागले ..


"अरे मै तुमको प्यारा चेट्टन बोलती है .. मतलब हमारे मल्याळममें बडे भाई को चेट्टन बोलते है .. मेरे लिए तुम मेरे बडे भाई जैसे हो .. इसलिए मेरे अम्मा अप्पा भी तुम पे विश्वास करते है .. "


मोरूला मात्र हे ऐकून हसू आवरेना .. बंडूचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला


अंकितने मोरू आणि बंडूचे आभार मानले .. माझ्या गर्लफ्रेंडला बहिणीसारखे सांभाळले तुम्ही ..

मोरू लगेच म्हणाला , "हे तर आमचं कर्तव्यचं होतं .. हो की नाही रे चेट्टन .."


बंडूने फक्त मान डोलावली ..?


अशा प्रकारे बिचाऱ्या बंडूचं सैय्या बनायचे स्वप्न भंगले आणि तो भैय्या बनला...


                                .......✒️© माधवी