भैरवी ..3

आपण एकदाच प्रेम करतो ,उधळून टाकतो आपलं आयुष्य ..पुन्हा दुसऱ्यांत गुंतणं होत नाही .. ईतका समजुतदारपणा दाखवेल जान्हवी..?नितांत सुंदर कथा वाचा..


भैरवी - भाग नं 3
"असं का वाटतं तुला मी निभावू शकणार नाही ..?"
जान्हवी मी सांगत्ये ते ऐकशील ,प्रेमात आंधळे झालाय तुम्ही असं समजलं तरी बालिश नक्कीच नाही तुम्ही ...स्वतःचं अस्तित्व विसरून एकमेकांचे होता ते खरं प्रेम ..काही नियम नसतात,मोजमाप नसतं कसल्या अपेक्षा नसतात समोरचा आहे तसं त्याला स्विकारणं हे खरं प्रेम .. सध्या तुझा काय प्राँब्लेम आहे सांगू ..? तू गृहीत धरायला लागलीयस त्याला ...पैसे मिळवणं ,तुमचं भविष्य सिक्युअर करणं हा मुद्दा आधी कधी होता तुमच्यात ...? आणि प्रतिष्ठित आहेत माणसं ती ...बसून खाल्लं
तरी पुढच्या दोन पिढ्यांची बेजमी आहे ...मग तुला कसली भीती वाटतीय ...?"
" वेळ देत नाहीये मला तो ...कुठे तरी दुसरी कडे गुंतलाय का अशी सारखी शंका येते ...खूप पाँप्युलर आहे ...त्याची इमेज चांगली असली तरी वाहवत जाणं होऊ शकतं ...कीती तरी सुंदर स्त्रिया फँन असतील ,आहेतच ...मी insecure फील करतेय ..."
"हा कळीचा मुद्दाय ...तुला विश्वास ठेवावा वाटत नाही त्याच्यावर ...? तशी शंका त्यानंही घेतली तुझ्या बाबतीत तर ...? नाटकांत कामं करतीयस ,कीती जण येतात संपर्कात तुझ्या ..दिसायला सुंदर आहेसच कोणीही फीदा होईल तुझ्यावर ...माझ्या माहीती प्रमाणे घायाळांची संख्या वाढतीच आहे ...मग त्यानं ही अविश्वास दाखवावा का तुझ्यावर ...?"
"नाही तसं नाही ,.पण आपण एकदाच प्रेम करतो ,उधळून टाकतो आपलं आयुष्य ..पुन्हा दुसऱ्यांत गुंतणं होत नाही .. "
" हेच मला सांगायचंय तुला की तू स्वतःचाच विचार करतीयस पुन्हा ..तो ही तितकाच गुंतलाय तुझ्यात हे लक्षातच येत नाहीये तुझ्या ...भावना व्यक्त करणं जमत नाहीये त्याला ,तू गैरसमज करून घेतीयस ..काहीही कारण नसतांना ..."
"तूला आठवतं काँलेजच्या नाटकांच्या तालमीं वेळी तुला सोडायला आणि घ्यायला यायचा सौमित्र ...सगळ्यां समोर म्हणालीस येत जाऊ नकोस तालमींना सौमित्र ,मी विसरते स्वतःला ...लक्ष लागत नाही ...चुकते सारखी ..."
त्या नंतर तो कधीही आत आला नाही .. कीती वेळ बाहेर उभारलेला असायचा ....तुझी तालीम लवकर सुटली तर तुला वाट पहायला लावायला नको म्हणून २/२तास आधी यायचा ... कीती वेळा मी आग्रह करायचे चल आत म्हणून ...मला म्हणायचा तीला सांगू नकोस मी वाट पहातोय म्हणून ... सावकाश होऊ देत सगळं ...तीचं नाटक जीव की प्राण आहे तीच्या साठी ....जगु देत प्रत्येक क्षण ..."तुझी काळजी त्याच्या डोळ्यात दिसायची ...तुला पर्वा नसायची पण ,..काय झालं थांबला म्हणून ...?निभावू देत की प्रेम आहे तर असं म्हणायचीस ...."
"खरं सांगतीयस..?"
"अगदी .. तुझं त्याच्या आयुष्यात असणं हेच त्याचं साध्य आहे ...कोसळेल तो ...जीवापाड प्रेम केलंय त्यानं तुझ्यावर अव्हेरु नकोस ते ..."
" बरं मी निघते ,खूप उशीर झालाय गं ..आत्ता सौमित्र ही सोडणार नाही मला ...एकटीलाच जावं लागेल ...."
" म्हणजे ..?"
"मी आणि सौमित्र एकत्र आलोय जानू .. खाली वाट पहातोय तो ..."
" असला प्रेमळ प्रियकर मिळायला नशीब लागतं ... "
"तुम्ही दोघं मेंटल केस आहात ...स्क्रू सारखे टाईट करावे लागतात तुमचे ..."पण एवढं करून मला कोणी काही देत नाही ."
"काय देऊ बोल ?"
" जादूकी झप्पी बस्स बाकी कुछ नही ..जा आता ,..आणखीन कीती वाट पहायला लावणार आहेस सौमित्रला ...?" "मी सांगते काका ,काकूंना तू काळजी करु नकोस ईथली ..."
"असं का वागलास सौमित्र ...?मला कल्पनाही दिली नाहीस काही ... दुष्ट आहेस अगदी ..."
"तू रागावलीस की सुंदर दिसतेस ...तो नखरा ,ते चवताळून अंगावर येणं हवहवंस वाटतं .. तो चान्स कसा सोडू ...?"
" लाँग ड्राइव्ह ला जायचं ...?"
" कुठे जाऊ या ...?"
"नेशील तिथे.."
"आणि फसवलं तर तुला ...?"
"नाही होणार तसं ..."
" सकाळी तर वेगळं म्हणत होतीस ..."
" जाऊ देत ना रे आता " "माफ भी करदो "
" ईतक्या स्वस्तात सोडू ...?"
" चल काहीतरीच .."
"अरे तुझ्या recording चं काय झालं ..?"
"कुछ हुवा नहीं ...मी आधीच नाही म्हणून सांगितलं होतं त्यांना...कुठलं टुकार गाणं ,माझ्या कडून नुसतं गाऊन घेणार होते ...माझ्या नावाचा उपयोग भाचीचं फालतू गाणं प्रमोट करायसाठी वापरणार होते ..."पैसे हवे तेवढे मोजायला तयार होते ...खर तर तुझ्या साठी ती आँफर स्विकारणार होतो ..तुझा विश्वास उडत चालला होता ना माझ्या वरचा ...सिद्ध करावं स्वतःला असं वाटलं ...."
" रडवणार आहेस मला आता ,चुकले ना मी कबूल करतेय ..." "माझ्या पासून लपवून का ठेवलंस .." "तुला वेळ दिला तेवढा ...नक्की तू माझ्यासाठी थांबणार असशील तर तो निर्णय सर्वस्वी तुझा असणार होता ...तुझी द्विधा मनःस्थिती मला नको होती ...."
"ईतकं सगळं झालं माझा विचार एकदाही केला नाहीस...?"
" करतोय ना ..! जरा सगळं वसूल करावं म्हणतोय ...."
" चल काहीतरीच ..."
© लीना राजीव .o

🎭 Series Post

View all