भैरव-एक वादळं (भाग -3)

एक थरार.

भैरव - भाग- ३रा 
सारंग चव्हाण
Kolhapur.

सर्जा आणि हरीभाऊ यांना त्यांच्याबरोबर जाण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. एक तर हे भयानक जंगल आणि दुसर म्हणजे सात ते आठ बंदुकधारी माणस जी पेहरावावरुन  एकदम खतरनाक वाटत होतीत. दोघपण आतून घाबरून गेली होती पण तस चेहऱ्यावर खोटं धाडस दाखवत चालु लागले. थोड्या अंतरावर चालून गेल्यावर एकजणाने हरिभाऊला थांबण्याचा इशारा केला आणि फक्त सर्जाला घेवुन चारजण पुढ चालले आणि हरीभाऊ जवळ बाकिचे लोक थांबले. आता सर्जा आणि हरीभाऊचा धीर सुटला, सर्जा म्हणाला, " ए मला एकट्याला कुठ घेवून जाताय? हरीभाऊला का थांबवलाय? ए सोडा मला." पण त्यांना त्याच्या ओरडण्याशी काही सोयरसुतक नव्हत, इकड हरीभाऊ पाण्याबाहेर पडलेल्या माशासारखा तळमळत होता," ए काय करतायसा तुम्ही? सर्जाला कुठ नेलाय आणि मला का थांबवलया इथ?"
त्यातला एकजण गरजला," ए गुमान उभा रहा, नायतर ढगात धाडीन, लय बोलु नको."
हरीभाऊ भीतीन गळपटला.
इकड सर्जाला घेवून ते चारजण पुढ चालत होते, थोड अंतर चालून गेल्यावर सर्जाला पुढ एक मंदीर दिसल आणि त्यान ओळखल की हे तामजाईदेवीच मंदीर आहे. एवढ्यात सर्जाच्या डोक्याला बंदूक लावून एका दगडावर बसायचा इशारा केला आणि दरडावुन विचारल," कोण आहेस तु काय करायला आलाय इकड? खर बोल पोलीसाचा खबऱ्या आहे का तु? बोल नायतर मेंदू बाहेर काढीन."
सर्जा म्हणाला," नाही नाही आम्ही खबरी नाही,आम्ही वेगळ्याच कामासाठी आलोय."
तो म्हणाला,"काय काम बोल लवकर?"
सर्जा म्हणाला,"आम्ही आमचा जोडीदार भैरवला सांगावा द्यायला आलोय."
तो म्हणाला," भैरव,तुला कसा माहीत? आणि कसला सांगावा?"
सर्जा आनंदाने म्हणाला," तुम्ही ओळखताय का भैरवला? कुठ आहे तो?"
हा प्रश्न ऐकून त्याने एकजणाला इशारा केला आणि तो माणूस थोडा बाजुला जावुन परत आला.पाठोपाठ एक दणकट आणि राखट माणूस येताना दिसला,थोडा जवळ येताच सर्जान ओळखल की अरे हा आपला भैरव आहे. एखादा वाघासारखी चाल दिसत होती त्याची आणि तो होताच वाघासारखा.
 सर्जा दगडावरुन उठून उभा राहिला,भैरवने पण जवळ आल्यावर सर्जाला ओळखला,आणि दोघ एकमेकांकडे धावले.
दोघांनी एकमेकाला मीठी मारली आणि दोघांच्यासुद्धा डोळ्यातुन पाणी आल. दोन बालमित्र खुप काळानंतर भेटले होते.
सर्जा म्हणाला," भैरवा काय झालास र गड्या,काय होतास आणि आता कुठ येवून राहिलायस?"
भैरव म्हणाला," सर्जा तुला सगळ माहीती आहे काय काय झाल ते,मला इथ राहिल्याशिवाय  पर्याय नाही आणि दुसर कायतरी खास कारण आहे त्यामागच."
सर्जा म्हणाला," ही माणस तुझ्याबरोबरची आहेत काय?"
भैरव म्हणाला," हो हीपण परिस्थितीमुळे मजबूर आहेत, यातली बरीचजण भरपूर शाळा शिकलेली सुद्धा आहेत,
पण तु काय सांगावा घेऊन आलायस आणि एकटाच कसा आलास?"
सर्जा म्हणाला," आर एकटा कुठ? हरीभाऊ आहे की तुझ्या माणसानी त्याला धरून ठेवलाय माग आणि मला घेऊन आल्यात इकड."
एवढ्यात बाकीचे लोक हरीभाऊला घेवून हजर झालेत.
भैरव म्हणाला," बंदूकीच्या गोळीचा आवाज ऐकला आणि आम्ही सावध झालो आणि कोण आलय हे बघायला मीच सांगितल होत."
हरीभाऊ भैरवला पाहून खुश झाला आणि आता सुटलो म्हणून त्याने सुस्कारा सोडला. पुढे जावुन त्याने भैरवला मीठी मारली,कधीकाळी एकमेकांशिवाय एक क्षण ना राहणारे तीन मित्र आज कितीतरी काळानंतर एकत्र आले होते, वातावरण खुपच भावूक झाल होत.
वाघासारख्या काळजाच्या भैरवला असा भावूक झालेला बघून त्याचे साथीदार अचंबित झाले होते. हरीभाऊ म्हणाला ," काय लेका आम्हाला विसरलास का? कसा आहेस तु?"
भैरव म्हणाला," गाव सोडून डोंगरदऱ्यामध्ये या जंगलात राहतोय कसा असणार र हरी?"
हरी म्हणाला," तु गावतन गेलास आणि गावात काय राहील नाही भैरवा, सावकाराला जास्तच जोर चढला तुला गावाबाहेर काढल्यावर."
भैरव म्हणाला," आई आणि आबा कस आहेत र हरी? खुप आठवण येतीय पण काय करणार आतातरी गावात नाही येउ शकत पण एकदा का माझ काम पुर झालकी गावात येणार आणि मग बघतो सावकाराला."
हरी म्हणाला," भैरवा ती दोघ बरी आहेत,तु काळजी नको करु आम्ही आहे त्यांच्याबरोबर."
सर्जा म्हणाला," भैरवा तुझ इथ काय काम आहे ते विचारणार नाही आम्ही,पण एक वाईट बातमी आहे."
भैरव सर्जाच्या जवळ येत म्हणाला," काय झाल सर्जा? सावकारान काय केल का अजुन, बोल लवकर काय ते?"
सर्जा बोलला," मंजुळा".आणि सर्जा बोलायचा थांबला.
तसा भैरव बेचैन होवून बोलला," सर्जा लेका बोल काय झाल मंजुळाच?"
एवढ्यात  हरीभाऊ म्हणाला,' मंजुळाला डाकुंनी पळवून नेलय."
भैरवच्या मस्तकात ठिणगी पेटली, रागाने लालबुंद  होवून तो गरजला," हरी काय झाल?सगळ सांग लवकर मला."
भैरवचा रुद्रवतार पाहून हरीला बोलायला सुचेना.
सर्जा पुढ होवून म्हणाला," सावकाराने ठरलेली खंडणी दिली नाही म्हणून तिला नेलीया आणि आत दुप्पट  खंडणी देवून सोडवून ने म्हणून सांगितलय, खर सावकाराला अस वाटतय की खंडणी देवून पण ते पोरीला सोडतील का नाही याचा नेम नाही."
हरीभाऊ  म्हणाला," सावकार म्हणतोय भैरवला काय हव ते देतो म्हणून सांगा खर माझ्या पोरीला सोडवुन आणायला सांगा."
भैरव कडाडला," आर हाड म्हणाव त्या सावकाराला,मला काय देणार तो,आज मी इथ आहे त्याला कारण तोच आहे,त्याला सांगा मी आणिन तुझ्या पोरीला मला काय नको तुझ, भैरव पैश्यासाठी काम करत नाही, एकटा जावून सोडवून आणतो तिला."
त्याने आपल्या घोड्याला शिटी वाजवुन बोलावल, बंदूक आणि काडतुस बरोबर घेतल आणि घोड्यावर स्वार झाला.
तो आपल्या माणसांना म्हणाला," या दोघांना सुरक्षित जागी नेवून सोडून या,मी जातोय मंजुळाला सोडवायला."
त्यातला  वयाने मोठा आणि अनुभवी असणारा "नाना" भैरवला म्हणाला," भैरव अशी डोक्यात राख नको घालुन घेवु,शांत हो असा एकटा जाण बरोबर नाही."
 भैरव रागाने फणफणत होता जणु काळभैरवच घोड्यावर स्वार झाला असल्यासारखा भासत होता.
भैरव रागातच बोलला," भैरव आहे मी एकटा असलो तरी फिकीर नाही,कोणाची हिम्मत झाली तिला घेऊन जायची त्याची छाती फोडल्याशिवाय मला चैन नाही मिळणार."
त्यावर नाना म्हणाला," आर भैरव अशान आपल्या आजवरच्या मेहनतीवर पाणी फिरल, ज्यासाठी सगळ्या जगापास्न लांब राहुन दिवस काढल त्याची माती नको व्हायला,घाई बरी नव्ह विचार करून काय  तरी करायला पाहिजे."
भैरव हळूहळू भानावर आला आणि त्याला आपल धेय्य लक्षात आल.
नाना म्हणाला," या दोघांना सोडून या र."
जाताजाता सर्जा आणि हरीभाऊने भैरवला मिठी मारून निरोप घेतला.
भैरव त्यांना म्हणाला," सर्जा आणि हरी काळजी घ्या आपली आणि माझ्या आई आबाची, आणि सावकाराला सांगा हा भैरव जीवंत आहे तोवर मंजुळाला काही होणार नाही,तिला सोडवली नाही तर बापू शिंद्यांची  अवलाद नाही हा भैरव."
ते दोघे परतीच्या वाटेला लागले आणि इकड भैरव आणि नानाचा बेत ठरत होता पुढ काय आणि कस करायच?

क्रमशः

श्री सारंग शहाजीराव चव्हाण.
(पुनाळकर )कोल्हापूर.
९९७५२८८८३५.
(copyright act नुसार सर्व हक्क राखीव आहेत,तरी शेअर करताना लेखकाच्या नावासहित शेअर करणे बंधनकारक आहे याची नोंद घ्यावी.)

फोटो सौजन्य: गूगलबाबा.

🎭 Series Post

View all