भैरव-एक वादळं (भाग -11)

एक थरार.

भैरव- एक वादळ (भाग- ११ वा)
सारंग चव्हाण
कोल्हापूर

भैरवला विचार करत करत कधी डोळा लागला समजल पण नाही आणि बघता बघता दिवस उजाडला. भैरवच्या डोळ्यावर सुर्याची किरण पडली आणि तो खाडकण उठून बसला. नाना आणि बाकीची मंडळी उठुन आपापल्या कामाला लागली होती. भैरवनेसुद्धा जास्त वेळ ना लावता आपल आवरल. आजचा दिवस त्यांच्यासाठी ऐतिहासिक होता कारण जर ठरल्याप्रमाणे सगळ पार पडल तर ते मिळणार यश खुप मोठ होत.  सगळेजण आपल्याला बंदुका आणि काडतुस घेवून तयार होतीच पण प्रत्येकाकडे एक एक तलवारसुद्धा होती कारण बंदुकीत काही बिघाड  झाला तर तलवारीन निदान जीव तरी वाचवता येईल.
नाना भैरवला म्हणाला," भैरव शत्रू लय ताकतीचा आन  चलाख हाय, सावध ऱ्हायाला पायजे."
भैरव म्हणाला," नाना आर शत्रू जेवढा मोठा तेवढा पराक्रम बी मोठाच  असतोय बघ, हार झाली तरीबी नाव निघतय माग."
नाना म्हणाला," पर भैरव या लडाईत आमास्नी हारुन चालायच नाय, पोरीच्या जीवाचा सवाल हाय."
भैरव म्हणाला,"व्हय  नाना हा सवाल मला सोडवायचाच हाय आणि आस लय सवाल हाईत  त्याच जवाब मला मिळवायच हाईत."
नाना म्हणाला," व्हय मिळतील तुला सगळ्या सवालाच जबाव."               
आणि त्यानी घोड्यांना टाच मारली आणि त्यांची घोडदौड सुरु झाली. काम खुप जिकिरीच होत कारण दोनदोन शत्रूचा सामना करायचा होता आणि शत्रू तर असे की एक चुक झाली तर सगळ संपणार होत. त्यामुळे सगळेजण काही चुक होता कामा नये याच विचारात होते.
वाट सुद्धा बिकट होती आणि त्यापेक्षा बिकट होत त्या वाटेवर असणाऱ्या आदिवासी वस्ती ओलांडून पुढ जाण. कारण ते इतके क्रूर होते की भीतीलापण क्षणभर भीती वाटावी. संद्याकाळ व्हायच्या आधी आदीवासी इलाख्यात पोहोचण गरजेच होत कारण रात्रीच्या अंधारातच त्याना चकवा देवुन पुढ जाता येण शक्य होत. घोडीसुद्धा सावध पाऊल टाकत चालत होती. हिंस्त्र श्वापदांची भीती होतीच कारण कोणत्या झुडपातुन काय समोर येवून उभा ठाकेल याची काही शाश्वती नव्हती. पण भैरवला फक्त आपल ध्येय दिसत होत जे या जंगलाच्या पलिकडल्या बाजूला कैद होत.
आणि हा असा प्रवास चालु असताना दिवस कधी मावळु लागला समजलच नाही. आदिवासी वस्ती लवकरात लवकर गाठण गरजेच होत, कारण जर त्यांच्या इलाख्यात   दिवसाउजेडी सापडल तर त्याच आयुष्य संपल्यात जमा होत.पण लवकरच आदिवासी वस्ती जवळ असल्याचे वेध लागले कारण त्यांचे विशिष्ट आवाज काढत इशारा करण्याचा आवाज कानावर पडू लागला आणि सगळेजण सावध झाले कारण आदिवासी नेहमीच सावध असतात हे त्याना माहीत होत. कधी कुठून एखादा बाण येईल आणि टाळु भेदत आरपार जाईल याचा थांगपत्ता सुद्धा लागायचा नाही म्हणून घोडी तिथ उभा करुन पुढील बेत पुन्हा एकदा समजावून घेण्यासाठी सगळे एकत्र जमले.   
                            
बेत असा होता की नाना आणि काही निवडक माणस आदिवासी वस्तीच्या काही अंतर दुरवर जंगलात मोठा जाळ करुन आदिवासी लोकांच लक्ष तिकड वेधुन घेणार होते आणि आदिवासी तो जाळ विझवायला गेले की इकड भैरव आणि काही थोडके साथीदार ती वस्ती पार करुन पुढे जाणार होते.
ठरल तर मग, नाना आणि साथीदार दबक्या पावलांनी वस्तीच्या जवळ जावु लागले. वातावरण एकदम शांत होत फक्त रातकिड्यांचाच काय तो आवाज येत होता आणि पायाखाली झाडांचा पाला कर्रकर्र असा आवाज करत होता त्यामुळे घाईघाईने  पाऊल टाकून जमणार नव्हत.म्हणुन त्यांना तिथ पोहोचायला वेळ लागणार होता आणि इकड भैरव त्यांच्या जाळ करण्याची वाट बघत होता. त्याला समजत नव्हत की एवढा वेळ का लागतोय?
काही बरवाईट तर नसेल ना घडल अशी शंकेची पाल मनात चुकचुकत होती. पण धीर सोडून चालणार नव्हत. अजुन थोडी वाट बघु आणि मग काय ते ठरवु असा विचार भैरवने केला.
एव्हाना इकड नाना आणि साथीदार हव्या त्या ठिकाणी पोहोचले होते.त्याना जाळ करायचा होता पण आग जंगलाला आगपण लागु नये याची काळजी घ्यायची होती. त्यामुळे त्यानी आधी झाड कमी असणार ठिकाण शोधल होत. आणि त्याठिकाणी वाळलेनी लाकड आणि वाळका पाला आणून साठवला आणि त्याच्या आजूबाजूला असणारा पाला काढुन आग लागायची शक्यता कमी केली.     
सगळ ठीक झालय का याची खातरजमा करुन नानाने आग आगपेटीतुन काडी बाहेर काढली आणि पेटवुन ती त्या ढीगाऱ्यात घातली.वाळलेल्या पाल्यामुळे आग बघता बघता आग भडकली आणि ज्वाळा दिसु लागल्या. नाना आणि साथीदार सुरक्षित ठिकाणी लपून आदिवासी कधी येतात हे बघत होते. थोड्याच वेळात काही माणस तिथ येताना त्यांना दिसली आणि नाना आणि साथीदार तिथून हळूहळू निसटले. इकड भैरवल वाट बघत थांबलेला कारण नानाने सांगितल्यावरच  भैरवला पुढ जायच होत. एवढ्यात नाना आणि साथीदार आल्याची चाहुल भैरवला लागली.
नाना आला आणि म्हणाला," भैरव काम फत्ते झालया तुमी निगा आता."
हे ऐकताच भैरवन घोड्याला टाच मारली.
त्याच्या पाठोपाठ बाकीचे निवडक साथीदार निघाले. आदिवासी इकड जाळ विझवण्यासाठी गोळा झाले आणि भैरवचा मार्ग मोकळा झाला. सगळ ठरवल्याप्रमाणे झाल आणि या संधीचा लाभ घेत भैरव साथीदारासहीत तिथून पुढे जाण्यात यशस्वी झाला. नाना आणि बाकी साथीदार यांनी आपाआपल्या घोड्यावरुन परतीचा मार्ग धरला. पण आदिवासी बायकांनी भैरव आणि साथीदाराना वस्तीजवळुन जाताना पाहिलच आणि त्यांना समजल की कोणीतरी बाहेरची माणस आपल्या आसपास आहेत. त्यांनी ही खबर आदिवासी पुरुषांना दिली लगेचच त्यानी दिवट्या आणि आपली हत्यारे बाहेर काढली. आता ते त्यांच्या मागावर पाठोपाठ येत होते. भैरवसुद्धा सावध असायचा त्याच्या लक्षात आल की दिवट्या घेवून आदिवासी पाठलाग करत आहेत.
त्याना सापडुन चालणार नाही हे भैरव जाणून होता. पण ही वाट भैरवसाठी नवीन होती आणि आदिवासीच्या पायाखालची होती. त्यामुळे सापडण्याची शक्यता जास्त होती. बघता बघता दिवटे जवळजवळ येताना दिसु लागले तशी सगळ्यांची काळजी वाढली. दिवटे घेवून येणारे आदिवासी वायुवेगाने पुढे सरकत होते. भैरवपुढे खुप मोठे आव्हान होते ते म्हणजे पुढचा रस्ता शोधत या आदिवासींची  दिशाभूल करणे.  बघता बघता आदिवासी हाकेच्या अंतरावर येवुन पोहोचले आणि एका क्षणात एक बाण  भैरवच्या दिशेने आला  आणि डाव्या हातात घुसला.                   
सणकण कळ मेंदवापर्यंत गेली आणि भैरव खाली कोसळला बाकी साथीदारांना कळत नव्हत काय कराव कारण पाठीमागुन आलेल्या आदिवासींच्या हातात सापडलो तर जीव तर जाणारच होता पण त्याशिवाय सगळ्या मेहनतीवर पाणी फिरणार होत. हे त्याना माहीत होत. भैरवला एका झाडाला टेकुन बसवल आणि त्याच्या हातात घुसलेला बाण उपसुन काढला तर भसाभसा रक्त वाहु लागल एकजणान फेटा फाडून त्याच्या हाताला गुंडाळला मग जरा रक्त वहायच कमी आल.  आता जवळ असलेल्या बंदुकानी गोळ्या झाडायला चालू केल पण अंधारामुळे अचुक नेम लागत नव्हता आणि यांच्यावर जास्त काडतुस वाया घालवूनपण चालणार नव्हत. मग कराव तरी काय हा विचार करत असताना आदिवासीनी याना चारीबाजुनी कधी घेरल हे यांना समजल पण नाही. आता करायच काय हेच समजत नव्हत. आता यातुन सुटका होणार तरी कशी? हा प्रश्न भैरवसह सगळ्यांना पडला होता.

क्रमशः

श्री सारंग शहाजीराव चव्हाण
कोल्हापूर 
९९७५२८८८३५ 
 
फोटो सौजन्य: गूगलबाबा.
(कृपया शेअर करताना लेखकाच्या नावासहीत शेअर करावे ही नम्र विनंती)

🎭 Series Post

View all