भगवा

A Historical Poem .

"जन्मला पुत्र शिवनेरीवरी
शिवबा तो जिजाऊचा
नव्हे साऱ्या महाराष्ट्राचा...


स्मरुणी त्या
\"भगव्या\" ध्वजाला..
चेतविली रणी त्याने
क्रांतीची अग्नीज्वाला..

पडला, झडला
कधी न रडला...
स्वराज्यासाठी फक्त
झोकून लढला...

बांधुनी तोरण
स्वराज्याचे दारी..
रोविला \"भगवा\"
रायगडावरी...

स्वराज्याचे सुराज्य करून
मान त्याने वाढविला...
महाराष्ट्राच्या अस्मितेवर
\"भगवा\" त्याने फडकविला....
\"भगवा\" त्याने फडकविला....!!!"


प्रणाम त्या जिजाऊला
जिने शिवबाला घडविला..
प्रणाम त्या शिवबाला
ज्याने महाराष्ट्र घडविला..

अन्
प्रणाम त्या \"भगव्या\"ध्वजाला
ज्याने सोनेरी इतिहास घडविला..!! 

-कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे