भार...एक Guilt

Bhaar Guilt



मेघा buliding च्या गेट जवळ उतरली आणि रीक्षा वाल्याला पैसे दिले.. सगळे समान रिक्षा मधून काढले ,सोबत भाज्या आठवडा भर पुरतील अश्या ,फळ, संपलेला किराणा ,तिची पर्स आणि तिचा टिफिन ची वेगळी बॅग घेऊन बाजूला झाली, तोच रिक्षा निघाली.. तिला आता निदान ह्या सगळ्या पिशव्या गेट च्या आतमध्ये watchman पर्यंत घेऊन जायच्या होत्या.. मग तिने त्या ओढत ताणात एक एक करून अगदी सांभाळत वाचवत आत आणून ठेवत आणि मग दुसरी घेऊन येत होती..बंद रुतले होते तिला त्या पिशव्यांचे तरी ती कचरली नाही, त्यात एक बॅग हापूस ची होती..तिने ती खूप जपून आणली होती..सगळ्या बॅग मोजल्या आणि तशी तिने रामराव ला आवाज दिला आणि तिथे असलेली एक खुर्चीवर बसली ,तिथे असलेले sanitizer हाताला चोळले आणि बाजूचा फॅन चालू केला तसे तिला बरे वाटले, तिने सोबत आणलेले पाणी पिले आणि अभय ला फोन लावून कळवले.
"मी आले आहे खाली ,सगळे समान आणले आहे ,भाजीच्या दोन बॅग, आंब्याची एक, माझी पर्स एक, आणि डब्याची अश्या बऱ्याच ओझ्याची उचल करायची आहे ,तू येशील का कारण रामराव काका दिसत नाहीत कुठे खूप हाक मारल्या पण आवाज नाही आला त्यांचा.. आणि ते नाही म्हटले तर आपल्यालाच घेऊन जाव्या लागतील बघ आता ,ये लवकर तू मी काही समान घेऊन येते ,तू काही जड जड समान घे.."

तिने फोन वर कळवले आणि अभय ही tv बघत बसलेला लगेच एका फोन वर तडक धावत खाली आला, तो दिसताच तिने त्या जड बॅग कडे इशारा केला , "pls त्या तू घेशील ना,मी खूप थकले रे, आता जरा ही त्राण शिल्लक नाही माझ्यात.. नाहीतर असू दे तू ही थकला असशील ,काका आल्यावर फोन करून त्यांना ह्या बॅग आणायला सांगू आपण.."

"नको मी घेऊ शकतो फार काही जड नाहीत त्या माझ्यासाठी,तू बरेच ओझे घेऊन आली इतक्या लांबून मग मी थोडे घेतले तर काही होणार नाही मला, तसा ही मी आराम करून बसलो होतो तुझीच वाट बघत,चहा ठेवला आणि तुझा तितक्यात फोन आला ,तोपर्यंत मी छान फ्रेश झालोच होतो अग,आता फुल्ल energy आली आहे "

ती, "मी लगेच स्वयंपाक करते तुला भूक लागली असेल,ना !! "

"तू आधी चल तर ,बाकी बघू तू ही खूप दमली आहेस अग आज, ऑफिस हून बाजारात जाण्याने,मग आंब्यासाठी पुन्हा फळ बाजारात गेलीस,त्यात ती गर्दी ,तुला सगळे समान सांभाळता सांभाळता चांगलीच कसरत झाली हे नक्कीच " तो

"चल हळूहळू घेऊ म्हणजे हे समान जड वाटणार नाही,काही इथे ठेऊन पुन्हा खाली येऊ..पण एक सोबत घेऊन गेलो तर दमायला होईल तुला ही आणि मला ही " ती

दारात येताच तिने चावी काढली आणि तसे एक एक समान आता घेतले, आणि पुन्हा फॅन खाली जाऊन बसली, आणि डोळे मिटले..तसा तो आत गेला आणि त्याने तिला पाणी आणून दिले.. एकीकडे चहा गरम केला आणि तिच्या समोर ठेवला..

ती ,"ह्याची गरज नव्हती, मी केलाच असता, तू नको करत जाऊस रे हे ,मला खूप guilty वाटते, नवऱ्याने हे असे काम करणे आणि मी आयते महाराणी सारखे त्याच्या हातून घेणे मला कधीच नाही पटत."

तो, "त्यात काय तू ही माझे 100 पट करते तेव्हा कुठे मी त्याचे रिटर्न म्हणून किंवा प्रेम म्हणून ,किंवा माझी guilt म्हणून मी हे करत असतो असे समज तू ,ज्याने मला बरे वाटते.."

ती, " मला gulity वाटते हे मी समजू शकते ,पण तुला का guilty वाटते, कोणते असे guilt आहे की ज्यामुळे तू हे रिटर्न करत असतोस, आणि तू हे ह्या आधी नाही बोललास ते कधी. "

तो.." तू म्हणालीस guilty आणि मला काही आठवले ,आईचा एक शब्द आठवला जो ती एकदा खूप काकुळतीला येऊन म्हणाली होती..!
/तुला कधी तरी मनाला वाटेल की आपण आईला मदत केली नाही, आणि तेव्हा तेव्हा तुझे मन तुला खत राहील, तेव्हा तुला जाणीव होईल , आणि व्हावी की एका नौकरी करणाऱ्या आणि घर सांभाळणाऱ्या स्त्रीला किती डोंगर पेलवावे लागतात ते... तू आठवण करशील आणि तेव्हा मी कदाचीत असेल ,नसेल ही..हो पण जरा ही जाणीव शिल्लक असेल तेव्हा त्याची फेड करायला तुला संधी नाही मिळणार, लाख प्रयत्न केले तरी ...तेव्हा फक्त तू ह्याचे रिटर्न तुझ्या बायकोच्या पदरी पाड..आईला नाही तर नाही पण तिला हे सुख मिळू दे...कोणा एकीला जरी हे देऊ शकलास ना तर त्यात जे सुख आणि समाधान तिच्या चेहऱ्यावर बघशील तेव्हा तू खरा पुरूष म्हणवशील ..तुला ते मला मदत न केल्याचं guilt खाणार / आणि ते शब्द नेहमी मला अस्वथ करत असतात..."

ती, "तू असा ही वागत होतास, तू खरे जरी सांगत असलास तरी मला पटत नाही ,तू तसा नाहीच मुळी ,तू तर मला किती हातभार लावतोस प्रत्येक कामात "

तो ,"तुला जेव्हा इतकी धडपड करताना पहातो तेव्हा मनात नेहमी एक विचार येतो, की माझी आई ती पण ह्याच धडपडीने सगळा व्याप सांभाळत होती, तिचा ही हाच मार्ग असायचा, रोज दोन वजनदार बॅग घेऊन येणार, आली की जरा ही निवांत न बसता ,तोंडावरून पाणी मारून,तिचा चहा ठेवणार,एकीकडे भाज्या निवडणार, एकीकडे मसाले तयार करत माझा अभ्यास घेणार... देवापुढे दिवा न विसरता लागणार, तर स्वयंपाक झाल्यावर सगळ्यांना वाढणार, ते झाले की भांडी आणि मग कुठे निवांत झोपायला जाणार... सकाळी त्याच वेगात उठणार.. सगळ्यासाठी चहा ,मग जेवण, सगळ्यांचे डबे, bottle, आणि बाकी इतर बडदास्त ठेवत..तिने मात्र कधीच गरम नाष्टा ना कधी गरम चहा घेतला नाही,तिला मी कायम दुर्लक्षित समजत होतो, तिने करत रहायचे आणि आम्ही तिच्या कडून करून घ्यायचे हेच समीकरण माहीत होते..तिला ही मदत हवी होती, एक मदतीचा हात हवा होता..हे कळत नव्हते तेव्हा ठीक होते..पण कळायला लागले तरी मी कधी तिला मदत नाही केली...ह्याच अश्या ओझ्याच्या बॅग तीच एकटी उचलून घेऊन येत, ती घेऊन येताना दिसली आणि तिने मदतीला हाक मारली तरी मी पळ काढत होतो... माझ्यासाठी खास उलटा प्रवास करून ती आंबे घेऊन येत..पण तिने कधी स्वतःसाठी त्यातला एक ही आंबा खाल्ला नाही.. तिला मी समजू शकलोच नाही ,हे guilt खात असते सतत.."

त्याला रडू आले होते,आईची आठवण आली होती पण आता फोन ही करू शकत नव्हता ,कारण ती खूप दूर गेली होती..

तिने त्याला सावरले ,तसा त्याच्या मनातील भार हलका झाला होता.. वेळी आईला ही हाच आधार द्यायला हवा होता.. म्हणजे हा भार मला आयुष्यभर पेलवावा नसता लागला..