भ भ भिशीचा भाग १
©® सौ. हेमा पाटील.
भिशी म्हणजे काय हे सर्वश्रुत आहे.
" काय म्हणता? माहित नाही? कुठल्या जगात वावरता राव? बरं बरं. सांगते थोडक्यात इस्कटून...
" काय म्हणता? माहित नाही? कुठल्या जगात वावरता राव? बरं बरं. सांगते थोडक्यात इस्कटून...
" तर...या महिला दर महिन्याला ठराविक रक्कम गोळा करतात. एकूण पंधरा, वीस किंवा यापेक्षा अधिक ही महिला सदस्य असतात. दर महिन्याला दहा तारखेच्या आत सर्वांनी पैसे जमा करायचे आणि दहा तारखेला किंवा त्यादरम्यान सर्वांना जमेल त्यादिवशी ही भिशी फोडायची असते. शक्यतो गेल्या महिन्यात ज्यांना भिशी लागलेली असते त्यांच्या घरी या महिन्याची भिशी फोडायची असा सर्वमान्य ठराव असतो.
त्याच महिलेच्या घरी का भिशी फोडायची? असा बाळबोध प्रश्न तुम्हांला पडू शकतो. कुठेतरी बसून चिठ्ठ्या टाकायच्या आणि ज्या महिलेचे चिठ्ठीत नाव येईल तिच्याकडे जमलेले पैसे सुपुर्द करायचे. हाय काय अन् नाय काय असे वाटले ना? एवढे सहजपणे घेऊ नका राव हे भिशी प्रकरण."
" काय म्हणता? त्यात काय एवढे? आपलेच तर पैसे जमा झालेले असतात. आपण जेव्हा बॅंकेत आपले पैसे काढायला जातो तेव्हा स्लीप भरतो आणि पैसे काढून आणतो. नाही तर एटीएम मशीन द्वारे काढतो. मग इथे काय वेगळे आहे?"
" अहो, आज माझ्यासमोर बोललात, दुसऱ्या कुठल्या बाई समोर बोलू नका. ते फार मोठे प्रकरण असते. भिशी पार्टी हे प्रकरण दिसते तेवढे साधे नाही. भिशी म्हणजे चिठ्ठी टाकून ज्याला लागलीय त्या व्यक्तीला पैसे देऊन टाकणे एवढेच नसते."
"मग काय असते? काय काहीही फेकता? आमच्या पुरुषांचेही फंड असतात म्हंटले."
" फेकते? तुमची पुरुषांची गोष्ट वेगळी हो.तुमचे फंड लाखात असतात, पण महिलांच्या भिशी पार्टीची मजा त्यात नाही. चला तर मग. उद्याच्या भिशी पार्टीला मी तुम्हांला घेऊन जाते, पण तुम्हांला नाटक करावे लागेल. कॅटरिंगवाला बनून तुम्हांला यावे लागेल."

" नको नको. त्यापेक्षा तुमच्या लेखणीद्वारेच मला इथे बसून तिथे काय घडते ते दाखवा. जसे संजयने आंधळ्या धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर चाललेले युद्ध दाखवले तसे."
" माझ्या लेखणीवर तुमचा तेवढा विश्वास आहे? मग होऊनच जाऊद्या."
तर स्थळ आहे नीताचे घर....
" मावशी, आज जायची अजिबात गडबड करायची नाही. भांडी घासताना तो वरच्या कप्प्यातला काचेचा बाऊल आणि ग्लासेस सुद्धा हात फिरवून ठेवा. सोफा आणि टिव्ही युनिट व्यवस्थित पुसून घ्या. आठवते ना, मागच्या वेळी टिव्ही युनिटच्या कोपऱ्यात त्या शैलाला एक जळमट दिसले होते तर त्यावर ती कशी रिॲक्ट झाली होती ते?"

" हो ताई , आता घर म्हंटले की एखादे जळमट असायचंच. त्यात एवढा कलकलाट करण्यासारखं काय होतं? तिच्या घरी पण मीच कामाला जाते. तिथे मी फक्त भांडी घासते. झाडूपोछा करणारी दुसरी बाई आहे. मला दिसतं ना तिच्या किचनमध्ये किती जळमटं लोंबकळत असतात ते."
" हो का? मग हे तेव्हा का सांगितले नाही तुम्ही? तुम्ही होता ना तेव्हा इथेच? तिचा कलकलाट ऐकून सगळ्याजणी कशा खुसुपुसु गालातल्या गालात हसत होत्या. माझ्या भिशी पार्टीचे तीन तेरा वाजवले तिने." नीता म्हणाली.
" असं कसं सांगणार ताई? ती बाई आधी किती भांडकुदळ आहे माहीत नाही का तुम्हांला? मला कामावरुन काढून टाकलं असतं. एकवेळ त्याचं काही वाटलं नसतं मला, पण तिथं सगळ्यांसमोर माझ्या झिंज्या धरुन मला लोळवलं असतं तिनं. लय डेंजर बाई आहे ती." मावशी म्हणाल्या.
" बरं आता पुन्हा तसे काही घडायला नको. तुम्ही सगळी साफसफाई व्यवस्थित करुन घ्या. संध्याकाळी बरोबर चार वाजता परत या. वेळ करु नका. त्यांना पाचचे टायमिंग दिले आहे." नीता म्हणाली.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

आता नीताच्या घरी भिशी पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे हे तयारीवरुन सुज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच. आता प्रत्यक्ष भिशी पार्टी सुरू झाल्यावर काय होते याचा ऑंखो देखा हाल पहाण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा