मैत्रीच्या पलीकडे भाग तीन

Story of three friends. About their friendship their bond . Their complicated relation problem they face .

गौरी  - " happy birthday snehal . बरोबर बारा वाजले आहेत आणि पहिले wish मी केले तुला.   "

स्नेहल - " thank you . दोघांना पण. " 

गौरी - " अच्छा म्हणजे अभिषेक ने तुला माझ्यासोबत wish केला आहे. "

स्नेहल - " हो आणि अंकितचा फोन वेटिंग ला येऊन गेला आणि त्यांनी मेसेज केलाय. " 

गौरी - " अंकित चा फोन मला येतोय. तू बोल अभिषेक सोबत मी बघते अंकित काय म्हणतोय ते. " 

अंकित - " स्नेहल कडे फोन दे दोन मिनिट. " 

गौरी - " ती अभिषेक सोबत बोलत आहे तिने  तुझा मेसेज पाहिला आहे. " 

अंकित - " बरं ठीक आहे. उद्याचा काय प्लॅन मग. " 

गौरी - " खूप प्लॅन केले होते पण उद्या पहिला पेपर आहे. आपली मैत्री झाल्यापासून स्नेहल चा पहिलाच वाढदिवस होता खूप प्लॅन केले होते पण नेमकी परीक्षा आणि तोही पहिलाच पेपर आलाय . सो आता परीक्षा संपल्यावर करूयात काहीतरी मोठा प्लान" 

अंकित - " Done ." 

       दुसर्‍या दिवशी सकाळीच अभिषेक मुंबई वरून स्नेहल ला भेटण्यासाठी आला होता. कॅन्टीनमध्ये वाढदिवस साजरा करून सगळे पेपर ला गेले. परीक्षा चालू असल्यामुळे अभिषेक पण थांबला नाही, मुंबईला निघून गेला. एकापाठोपाठ एक सगळे पेपर संपले. शेवटचा पेपर च्या दिवशी ठरल्याप्रमाणे पेपर संपल्यावर चहा च्या कट्ट्यावर भेटली.

अंकित - " पहिल्या वर्षाची फायनल एक्झाम संपली आपली. " 

गौरी - " हो ना. वाटत पण नाही एक वर्ष झालं. " 

अंकित - " मला तर आजही आपली पहिली भेट आठवते. " 

स्नेहल - " अच्छा... सांग बरं काय घडलं होतं त्यादिवशी ते. "

अंकित - " तू ब्लॅक कलरचा टीशर्ट आणि जीन्स घातली होती आणि गौरी ने रेड कलरचा ड्रेस घातला होता. दोघी एकत्रच कॉलेजमध्ये आला होतात. गेटमधून आत मध्ये आल्यावर तुम्ही माझ्याकडे पाहिलं काहीतरी एकमेकींन सोबत बोलून माझ्याकडे आलात आणि मला विचारलं होतं फर्स्ट इयर ना ?"

स्नेहल - " आणि तू हो बोलला.  आणि आम्हाला पण विचारलं तुम्ही पण फर्स्ट ना ? चला एकत्र क्लासला जाऊ" 

गौरी - " त्या दिवसापासून आपण रोज एकत्रच क्लासमध्ये जातो. " 

अंकित - " दिवस किती पटकन संपले ना वाटलं पण नाही एक वर्ष झालं संपलं . "

स्नेहल - " आता नवीन बॅच येईल म्हणजे आपण सिनियर होणार. आपण त्यांना फ्रेशर्स पार्टी देणार. " 

गौरी - " आपली फ्रेशर्स पार्टी आठवते का ?? " 

अंकित - " मी तर तो दिवस विसरूच शकत नाही. " 

स्नेहल - " पूर्णवेळ सुरभी तुझ्याकडेच बघत होती. आणि जाताना तिने चक्क तुला प्रपोज केलं होतं. " 

गौरी - " खरंच अंकित तुझा चेहरा बघण्यासारखा झाला होता. " 

अंकित - " तिथून कसा सटकलो ते माझं मला माहिती. " 

स्नेहल - " true love. अजून पण सुरभी फक्त अंकित कडेच बघते. " 

गौरी - " अंकित कर ना तिचा विचार बिचारी एक वर्षापासून तुझ्या मागे आहे. " 

अंकित - " तुम्ही दोघी माझी मजा घेत आहे ना . "

स्नेहल - " नाही. आम्ही तर तुला सिरीयसली  विचार कर असं सांगतोय. बिचारी तुझ्या सोबत बोलण्यासाठी ती आमच्याकडे किती वेळा तरी आली होती."

अंकित - " बस झालं सुरभी पुराण. "

गौरी - " बरं ठीक आहे. "

स्नेहल - " रात्रीचा काय प्लान ? "

अंकित - " शिवसागर ला जेवण करून नंतर आइस्क्रिम खाऊ आणि नंतर हर्ष ची कॉफी "

गौरी - " आपण आपलं फर्स्ट लेक्चर बंक केलं होतं त्यावेळी हर्ष ला गेलो होतो. " 

स्नेहल - " आपल्या कॉलेजचे सगळेजणच लेक्चर बंक करून तिथे जातात. " 

अंकित - " उद्याचा काय प्लॅन. " 

स्नेहल - " मी मुंबईला चालले आहेत. " 

गौरी - " माझा विशेष काही प्लॅन नाहीये. " 

अंकित - " मी तुला सकाळी फोन करतो. "

गौरी  - " बरं चला निघुयात आता .रात्री शिवसागर मध्ये भेटूयात . " 

रात्री तिघेजण जेवणासाठी शिवसागर मध्ये भेटतात. त्यांच्या  प्लान प्रमाणे जेवण करून आईस्क्रीम खाऊन नंतर ते कॉफी घेण्यासाठी हर्ष वरती जातात. पूर्णवेळ ते गेलेल्या वर्षाच्या आठवणीन बद्दलच बोलत होते.