मैत्रीच्या पलीकडे भाग दोन

Story of three friends . About their friendship beyond limits. Bond they share. Problems they face. Their complicated relation.

             स्नेहल आणि गौरी रात्री अभ्यास करत बसले असताना गौरीला एका नंबर वरून मेसेज येतो : ' मला तु खूप आवडते, माझ्याशी मैत्री करशील ना. '
       गौरी त्या मेसेज कडे दुर्लक्ष करते आणि परत अभ्यासाला सुरुवात करते. परत त्याच नंबर वरून मेसेज येतो. असं चार-पाच मेसेज आल्यावर गौरी स्नेहल ला सांगते.
   
गौरी - " स्नेहल बघ ना कोणी तरी मेसेज करून त्रास देत आहे. तुझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये चेक कर ना कोणाचा नंबर आहे ते. " 

स्नेहल - " बघू दे नंबर. " 

स्नेहल तिची कॉन्टॅक्ट लिस्ट चेक करते पण तिच्याकडेही तो नंबर सेव नव्हता. 

स्नेहल - " आपण फोन करून बघू यात का कोणाचा नंबर आहे ते. " 

गौरी - " जाऊदेत सोड कोणी तरी टाईमपास करत असेल आपल्या फ्रेंड सर्कल पैकीच कोणीतरी असेल. " 

दोघी तो विषय तिथेच सोडून देऊन परत अभ्यासाला सुरुवात करतात . थोड्यावेळाने गौरी झोपून जाते. नेहमीप्रमाणे रात्री अंकित चा गौरीला फोन येतो

अंकित - " हॅलो गौरी काय करत आहेस झालं का तुमचं जेवण? " 

स्नेहल - " हो झालं माझं जेवण तुझं. " 

अंकित - " गौरीचा फोन तुझ्याकडे कसं काय आणि गौरी कुठे आहे ? " 

स्नेहल - " ती झोपली आहे. सकाळी लवकर उठणार आहे ती अभ्यासासाठी." 

अंकित - " बर ठीक आहे तुझं काय चालू आहे ? "

स्नेहल - " काही नाही अभ्यास करत बसले होते. तू काय करत आहेस ? "

अंकित - " मी पण वाचत बसलो होतो. उद्या कॉलेजला येणार आहे ना. "

स्नेहल - " हो येणार आहे. भेटू मग उद्या कॉलेजमध्ये आता मी पण झोपणार आहे. बाय गुड नाईट. "  

अंकित - " गुड नाईट " 

दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर परत गौरीला त्याच नंबर वरून मेसेज येतो :  '  gauri you are looking beautiful in this white top and blue denim ' 

गौरी तो मेसेज स्नेहल आणि अंकित ला दाखवते. 

स्नेहल - " कोणालातरी खूप मस्ती आलीये बघावं लागते त्याच्याकडे " 

अंकित - " मला नंबर दे मी बघतो. " 

अंकित त्या नंबर वर फोन करतो पण कोणीही फोन उचलत नाही आणि मेसेज येतो. : ' मला भेटायची एवढी घाई झाली आहे का ? ' 

स्नेहल - " आपल्या कॉलेज मधला असं कोणी करणार नाही असं वाटतंय. "

अंकित - " एक काम कर त्याला संध्याकाळी कुठेतरी भेटायला बोललो मी जाऊन बघतो. "

 गौरी त्या नंबरला मेसेज करून संध्याकाळी सात वाजता वैशाली हॉटेल मध्ये बोलवते. 

गौरी - " इथं परीक्षा जवळ आली आहे आणि कोणाला असला टाइमपास सुचत आहे. "

स्नेहल - " बघू  कोण आहे ते. बघतेच आज त्याच्याकडे परत माझ्या मैत्रिणीला त्रास देण्याची त्याची हिंमत होणार नाही. " 

ठरल्याप्रमाणे गौरी संध्याकाळी सात वाजता वैशाली हॉटेल मध्ये जाते. अंकित आणि स्नेहल तिच्या बाजूच्या टेबलवर जाऊन बसतात. 
   तेवढ्यात परत गौरीला मेसेज येतो : ' तू तुझ्या सोबत स्नेहल आणि अजून एका मित्राला घेऊन आलीस ना. ' 

गौरी त्या नंबरला रिप्लाय देते : ' तुझ्यात हिम्मत असेल तर समोर ये. मी दोन मिनिट वाट बघेल नाहीतर मी निघून जाईल आणि हा नंबर पोलिसात देईल. ' 

गौरीने तसा मेसेज केल्यावर काहीच वेळामध्ये तिच्यासमोर एक मुलगा येऊन बसतो. 

गौरी - " Adv Yash Gaikwad ?? "

अंकित - " कोण आहे हा ? "

गौरी - " स्नेहल चा स्कूल फ्रेंड आहे. " 

स्नेहल - " अरे पण तू गौरीला का मेसेज करून त्रास देत होतास आणि तुझ्याकडे तिचा नंबर कसा. " 

अंकित - " तू गौरी ला कस काय ओळखतो ?" 

यश - " मागच्या दोन महिन्यापूर्वी गौरी स्नेहल सोबत नाशिकला आली होती. मी स्नेहलच्या शेजारीच राहतो. त्यामुळे  आमची ओळख झाली. मी तिला फेसबुक वर ती रिक्वेस्ट पाठवली होती पण तिने ती एक्सेप्ट नाही गेली. म्हणून स्नेहलच्या आईकडून मी गौरी चा नंबर घेतला. " 

स्नेहल - " आईने तुला नंबर कसं काय दिला. " 

यश - " मी काकूंना सांगितलं स्नेहल चा बर्थडे आहे तर मला तिला सरप्राईज द्यायचं आहे त्यासाठी मला गौरी चा नंबर द्या. आणि मी काही गौरीला त्रास देण्यासाठी हे सगळं नव्हतो करत.  "
 
अंकित - " इथे जर दुसरा कोणी मुलगा असता तर त्याचा मी काय केलं असतं हे मी सांगू शकत नाही. गौरी आणि स्नेहल या दोघींकडे कोणी वाकडी नजर टाकलेली किंवा त्यांना कोणी त्रास दिलेला मी खपवून घेणार नाही. " 

यश - " मित्रा शांत हो. वैशाली मध्ये आलोच आहे तर मस्त मसाला डोसा खाऊया ." 

थोडा वेळामध्ये चौघेही तिथून बाहेर पडतात. गौरी आणि यश दोघे बोलत बोलत पुढे जातात. 

   गौरी आणि यशच बोलणं वाढलं होतं . 
स्नेहल - " गौरी तुझ्या मध्ये आणि यश मध्ये काही चालू आहे का ? " 

गौरी - " नाही. We are just friends. जसा अंकित तसाच यश. परीक्षा एवढी जवळ आली असताना मला असलं काही सुचणार नाही तुला माहिती आहे " 
 स्नेहल - " मी जस्ट विचारलं.  अंकित आपला खूप जवळचा मित्र आहे. तुझ्यासाठी यश, अंकित एवढा जवळच आहे का ? " 

गौरी - " स्नेहल काय चालू आहे तुझं. यश माझा चांगला मित्र आहे त्यापेक्षा काही नाही. " 

अंकितचा ही लक्षात येत होतं गौरी आणि यश यांच्यामध्ये चांगलीच मैत्री झाली होती ते. त्याला कळालं होतो की गौरी च्या स्पेशल फ्रेंड च्या लिस्ट मध्ये आता यश पण ॲड झाला होता ते.