बेत पनीर चिल्लीचा

My Failed Cooking Experiment
एक दिवस अचानक आई मला बोलली
मोठी झालीस आता थोडा तरी स्वयंपाक शिक..
रोज रोज करायची गरज नाहीं
कर सवडीने, only once in a week...

आईचे ऐकून वाट धरली
 अन रस्ता हुडकला किचनचा...
टिपिकल कूकिंग खूपच बोरिंग
बेत माझा पनीर चिल्लीचा...

पनीरवर पहिला चाकूचा वर
केले मोठे मोठे तुकडे..
घेतली हाती ढोबळी मिरची आणि कांदे 
आकार झाले त्याचे वाकडे तिकडे..

टाकली फोडणी एकदाची
 पनीर शिजण्याची वाट पाहिली....
उघडून बघता थोड्या वेळाने दिसली 
सोया सॉस आणि मसाल्याची आली कढई वर जाळी...

पाहता माझे पराक्रम
आईचे हात कपाळावर आले...
माझ्या नसत्या उद्योगाचे कंत्राट
आता दादाच्या माथी आले...

माझ्या डोळी आली आसवे 
स्वतःच्या हाताने पुसली..
आईचा फटका पडू नये म्हणून
मीही दादाच्या मदतीला सरसावली...

पाहता माझे उद्योग सारे 
दादा जरा वैतागला...
"तुझं तू निस्तर"
असे बोलून निघून गेला...

पुन्हा चिरली शिमला मिरची
पहिल्यापेक्षा कमी वाकडी...
New edition म्हणून टाकली
कोवळी हिरवी ताजी काकडी...

आई बोलली होती फक्त तुझ्यासाठीच कर
आम्हाला पनीर चिल्ली खायची नाहीं..
पण दुसरे काही करण्याचा
आईला चान्सच मिळाला नाहीं...

थोडीशी करायची हो "पनीर चिल्ली"
आई करण्या आधीच होती बोलली...
पण ती इतकी झाली कि
चक्क दोन दिवस पुरली....

©®ऋचा निलिमा