Best Wishes For New Born Baby Girl

Best Wishes For New Born Baby Girl In Marathi

best wishes for new born baby girl in marathi ★ नवजात बाळाच्या जन्माबद्दल शुभेच्छा संदेश ★
मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा Congratulations For Baby Girl In Marathi, New Baby Born Wishes In Marathi, 


लक्ष्मीच्या पावलाने लेक घरी आली, म्हणजे सगळ्या नातेवाईकांकडून आई-बाबांकडून आणि जिवलगांकडून शुभेच्छा तर हव्याच ना !
तर मुलीच्या जन्माचा स्वागत करूया काही रंगतदार शुभेच्छांसोबत !! खालचे शुभेच्छा संदेश खास तुमच्या घरी आलेल्या गोंडस परीसाठी
Wishes For New Born Baby Girl In Marathi
मित्र-मैत्रिणी ,दादा वहिनी, यांच्याकडून भाचीसाठी
आजी आजोबा नाना नानी यांच्याकडून नातीसाठी
आई-बाबांकडून लेकीसाठी आणि अशाच प्रत्येक नात्याला आपला हक्क दाखवण्यासाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी ह्या शुभेच्छा !!


तिच्या येण्याने आले उधाण आनंदाचे,
मुलगी म्हणजे प्रतीक समृद्धीचे .
जगा आनंद मनमुराद कर सोहळे अपार,
जन्म मुलीचा मित्रा आहे लक्षण भाग्याचे.
कन्यारत्न प्राप्त झाले त्याबद्दल या मित्राकडून /मैत्रीणीकडून लक्ष लक्ष शुभेच्छा !


आज तुझ्या घरी म्हणे लक्ष्मी आली,
देवाने जणू आनंदाची तिजोरी खुली केली !
जगात सखी ही तुझा आरसा असेल,
तू जिथे नसशील तिथे ही पडसावली असेल!
तिचे येणे तुझ्यासाठी नवा जन्म ठरो
तुझ्या या गोंडस परीला शत आयुष्य मिळो
तूझ्या घरी एका गोंडस परिचे आगमन झाले त्याबद्दल खूप खूप
शुभेच्छा सखी !!मुलगी म्हणजे देवा घरची गोड भेट,
चालण्या-बोलण्या ,हसण्यातून हृदयाला भिडते थेट!
माझ्या ओंजळीत हे सुख दिले त्याबद्दल नियतीचे आभार,
तिच्या येण्याने जे सुख मिळाले त्याचा करतो दोन्ही हातांनी स्वीकार!
नवीन पिल्लूला खूप खूप वेलकम आणि तिच्या आईला धन्यवाद एका मुलीचा बाबा होण्याचं भाग्य जिच्यामुळे मिळालं !
#Its Baby Girl


तुमच्या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !


कधी कधी लेक म्हणजे,
ओठांवर यांना कळत आलेलं स्मित हास्य
कधी कधी लेक म्हणजे
नदीसारखा अवखळ खळखळून हसणं
ती असताना काय काय
ते तर बोटावर मोजता येणार नाही
पण कधी कधी लेक म्हणजे,
काहीच नसताना देखील खूप काही असणं
नवीन परिचे खूप खूप स्वागत आणि आभाळभर प्रेम !!
तुम्हा दोघांनाही कन्यारत्न प्राप्त झाले त्याबद्दल हार्दिक अभिनंदन !!

परमेश्वराने तुमच्या आयुष्यात आनंदाची तिजोरी म्हणून लेक पाठवली आहे, दोघांनाही घरी लक्ष्मी येण्याच्या आनंदाच्या मन भरून शुभेच्छा !!


थँक्यू बाळा माझ्या आयुष्यात येण्यासाठी ,लोकांसाठी मुलगी म्हणजे काय मला नाही माहिती पण माझ्यासाठी माझी मुलगी म्हणजे मला या जगात आई म्हणून एक नवा जन्म देणारी , माझ्या आयुष्यात मातृत्वाला जागा देणारी, लोक परक्याचं धन म्हणत असले तरी माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई असणारी, म्हणे लेक घरी भाग्य लक्ष्मी आणि बरच काही घेऊन येते पण माझ्या आयुष्यात तुझे येणे म्हणजे #समाधान
आणि हे समाधान इतर कुठल्याच गोष्टीत मला कधीच लाभलं नसतं.
याची मुरड्या परिचय मी मनापासून स्वागत करते बाप्पा खूप खूप धन्यवाद माझ्या आयुष्यात माझी पडसावली असणारी कुणीतरी पाठवल्याबद्दल #मुलगी झाली हो
बरसू दे बाप्पा अशाच रिमझिम आनंदाच्या सरी
माझ्या लेकीच्या येण्याने झाले मी आनंदात बावरी
तुझ्या आईकडून या पहिल्या शुभेच्छा आणि भरपूर सारे प्रेम बाळा #आमचं पहिलं कन्यारत्न #तुझी आई★बापासाठी लेक म्हणजे दुसरी आईच..‌. मला बाबा म्हणून नवी ओळख देण्यासाठी या तान्हुल्या बाळाचे खूप खूप आभार !!!
आमच्या सौभाग्यवतींचे त्यापेक्षा जास्त आभार की ह्या भाग्यलक्ष्मी ला आमच्या दोन्ही हातांवर तिने टेकवलं... हीच येणं म्हणजे आयुष्याच्या कुठल्याही संकटाला निर्भीडपणे सामोरे जाण्याचं बळ होय.
माझ्या लेकीसाठी प्रत्येक आनंद अगदी आकाशातल्या चांदण्यांसारखा तोडून तिच्यासमोर उभा करेन .... आजा आजीने सांगितलेल्या चंद्र तारांवर बसलेल्या पऱ्यांच्या गोष्टी ऐकल्या होत्या आणि प्रत्यक्षात ती परी पाहायला मिळाली... आमच्या घरी कन्यारत्न आले.
★बाबांकडून खूप खूप सारे प्रेम परी... माझ्या आयुष्यात इंद्रधनुसारखे रंग भरण्यासाठी मी कायम तुझा ऋणी असेल
#तुझा बाबा★

जिचे असणे स्वर्गातल्या अप्सरांना लाजवणारे
जिचे असणे आभाळातल्या तारकांना खेळ भासवणारे
जिचे असणे वाळवंटातही चिंब भिजवणारे
वेळे अगोदर बागेतल्या कळ्यांनाही हसवणारे
अशा लेकीचं आगमन तुमच्या घरी झालं खरंच भाग्यवान आहात लेकीच्या जन्माबद्दल खूप खूप अभिनंदन आणि या नव्या जीवाला पृथ्वीतलावर सारं काही मिळो ह्या सदिच्छा
Congratulations For Baby Girl

प्रिय मित्रा,,मला तुझ्यावर विश्वास आहे की देवाने जी मुलगी रुपी मोठी जबाबदारी तुझ्यावर टाकली आहे ती तू यशस्वीपणे पार पाडशील.
आणि प्रत्यक्ष युनिव्हर्सने तुला दिलेल्या गुडलक ला चांगला सांभाळशील .
तुझ्या मित्राच्या शुभेच्छा नेहमी तुझ्या सोबत असतील तुझ्या घरी आलेल्या नवीन कन्येला माझे खूप खूप आशीर्वाद
आणि तुला लेकीच्या जन्माच्या खूप खूप शुभेच्छा !
Congratulations For New Born Baby Girl


घरी आलेल्या नवीन छोट्या छोट्या पावलांना
चॉकलेट गोळ्या बिस्किट आणि भरपूर साऱ्या प्रेमाची भेट देणार आहोत
लक्ष्मीच्या रूपाने आलेल्या समृद्धीच्या संधीचं आम्ही सोनं करणार आहोत
काका काकू कडून घरी आलेल्या लेकीचा खूप खूप स्वागत आणि दादा वहिनींना लेकीच्या जन्माबद्दल शुभेच्छा
#घरी कन्यारत्न आले हो


इवल्या-इवल्या पावलांनी आमच्या अंगणी आली आहेस
अगदी काही क्षणात साऱ्यांपेक्षा प्रिय झाली आहेस
उगीच म्हणतात लोक लेक परक्याच धन
तुला पाहिल्यापासून तर तू आमच्या हक्काची झाली आहेस
तुझ्या हक्काच्या घरात तुझं खूप खूप स्वागत !!
आणि या भल्या मोठ्या जगात तुझ्या अस्तित्वाचे नवे रंग भरण्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा
#लेक_ आली_ लक्ष्मीच्या _पावलानं


आई-बाबा होण्याची खर तर वाटत होती भीती
तिचं बोट मोठी तालावर आणि सारी चिंता झाली रीती
तू तिला झोप तुझ्या अगदी शृंगारा सारखं
आणि मी दाखवेल जगाला कॉलर टाईप करून मला बाबा होण्याचा अभिमान किती !
मुलीच्या जन्माबद्दल खूप खूप अभिनंदन


लोक म्हणतील पप्पा ची परी म्हणून नखरे करायचे नाही
तू बिलकुल ऐकायचं नाही
लोक म्हणतील राजकुमारी सारखे नखरे युगायुगांआधी व्हायचे आता तसली प्रथा नाही
तू बिलकुल ऐकायचं नाही
लोक म्हणतील चांदीचा चमच घेऊन आली आहेस का
तू बिलकुल ऐकायचं नाही
माझ्या घरी तुझं येणं म्हणजे जबाबदारी नाही तर भाग्य समजतो मी
तुला पृथ्वीवर पाठवण्यासाठी देवाने माझं घर निवडलं याला सौभाग्य समजतो मी
तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा माझ्या गरजांच्या आधी ठेवावे एवढा विश्वास देतो आणि तुला तळहाताच्या फोडा सारखा जपेल असं वचन देतो
आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सोनेरी अक्षरांनी लिहिलेला दिवस आहे बाळा आणि या खास दिवसाचा एक मात्र कारण म्हणजे तुझं येणं माझ्या आयुष्यात तुझं खुल्या हृदयान स्वागत.
#बाबांकडून _लेकीच्या _जन्माचे _स्वागत

मुलगी जन्माला येण्यासाठी खरंच भाग्य लागतं
तिचा सांभाळ होणार नाही असं घर देवबाप्पा तिच्यासाठी कधीच निवडत नसतो
आयुष्याच्या साऱ्या समस्यांना पार करून तुम्ही लेकीच्या जन्माचा स्वागत कराल हे माहिती आहे त्याला म्हणून ही जबाबदारी तुम्हाला दिली आहे
दादा आणि वहिनी दोघांनाही लेकीच्या जन्माबद्दल खूप खूप शुभेच्छा
Congratulations For New Born Baby Girl


माझ्या लेकीला म्हणे आज लेक झाली आहे
फार वर्षांपूर्वी माझ्यावर आली होती ती जबाबदारी तिच्यावर आली आहे
हिच्या रूपानं तू आईचा सुख अनुभव
आई म्हणून पुन्हा या जगाला नवीन डोळ्यांनी बघ
लेकीचा जन्म तुझ्यासाठी अनुभवांची तिजोरी ठरो
जितका आनंद तू मला दिला इतकाच आनंद
ही छोटीशी परी तुझ्या आयुष्यात भरो
या आजी कडून छोट्याशा नातीला आकाशातल्या तारकां इतकं प्रेम
आणि तिच्या आईला डिंकाचा लाडू सोबत मुलीच्या जन्माचे खूप खूप अभिनंदन !!
#आजीकडून _नातीच्या _जन्माचे _स्वागत


तुमच्या आयुष्यात आलेल्या नवीन पाहुणीला,
मामा मामी कडून भरपूर सारं प्रेम
आणि जावई बुवा व ताईला लेकीच्या जन्माबद्दल खूप खूप अभिनंदन
Congratulations For New Born Baby Girl


मावशी म्हणजे अगदी आईसारखी असते
पण फक्त बोलायचं म्हणून तिच्याशी नाळ नसते
तुझ्या घरी ताई कन्यारत्न आले आहे
प्रेमात माझा वाटा असेल तशी जबाबदारीतही भागीदारी असेल
या छोट्याशा चिमुरडीला मावशीकडून पहिला पापा आणि गुलाबी गुलाबाच्या पाकळ्यांसारखी अलगद मिठी
तुला आणि जिजूंना लेकीच्या जन्माबद्दल खूप खूप शुभेच्छा !!


लाडक्या मैत्रिणीला मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन !!
तुम्हाला मावशी म्हणून घेण्याचा सौभाग्य तुमच्यामुळे मिळालं म्हणून मायलेकींचे खूप खूप आभार.
# मावशी कडून शुभेच्छा

तुझ्या अंगणात आली आहे खरोखरची लक्ष्मी
तुळशीभोवती घिरड्या घालेल, काही दिवसात हि चिऊताई
सगळ्या घरात नुसती तिच्या पैंजणांची छम छम असेल
ती असताना तुझ्या घरात कसलीच उणीव नसेल
लेकीच्या जन्माबद्दल खूप खूप शुभेच्छा !!


माझी छोटीशी लेक कधी मोठी झाली कळलत नाही
आता तर दाराशी आली होती आईच्या कुशीत
मला फार मायेची ऊब मिळायची तिच्या प्रेमळ मिठीत
दिवसा मागून दिवस गेले कधी कळलच नाही
एक राजकुमार आला घोड्यावर बसून अनं घेऊन गेला माझी परी
आज म्हणे त्या परी च्या घरी पुन्हा एक छोटी परी आली आहे
माझी छोटीशी लेक म्हणे आता आई झाली आहे
तुझ्या या वेडसर बाबा कडून तुम्हा मायलेकीं ना भरपूर साऱ्या आशीर्वाद.
आणि नन्ह्या परीला नानूंकडून भरपूर सारं प्रेम.
#आजोबांकडून _नातीच्या _जन्माचे _स्वागत


मला मामा म्हणवून घेण्यासाठी ,,
एवढी सुंदर भाची दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार ताई !
आता माझं घर फक्त माझं न राहून कुणाच्यातरी मामाच घर असेल,, लाल लाल एचडी थांब ना जरा मामाच्या गावाला येऊ दे ना जरा हे गाणं बोबड्या बोलात म्हणून दाखवणारी नन्ही परी असेल हे सगळं माझ्यासाठी खूप खूप सुखदायी आहे.
माझ्या भाचीला मामा कडून खूप सारे प्रेम आणि
तुला आणि जिजूंना लेकीच्या जन्माबद्दल खूप खूप शुभेच्छा.
best wishes for new born baby girl

माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून एवढी गोंडस नात देण्यासाठी खूप खूप आभार सुनबाई पण बरं का आजी आजोबांचा व्याज असतात नातवंड त्यांना जपा भरपूर सारा आनंद आणि प्रेम द्या
लेकीच्या जन्माबद्दल तुझे फार फार अभिनंदन ,, जशी तू आमच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी आली तशी तुझी लेक तुझ्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो
#आजोबांकडून _नातीच्या _जन्माचे _स्वागत

तुमच्या अंगणी फुललेल्या छोट्याशा कळीला
सुखाची प्रत्येक सावली लाभो
तिच्या मनातली प्रत्येक इच्छा ओठांवर
येण्याअगोदर पूर्ण होवो
सूर्यासारखे प्रकार तेज आणि चंद्रासारखी शितल काया असो नवी चमचमणाऱ्या चांदण्यासारखं दीर्घायुष्य असो
आपल्या साऱ्यांच्या आयुष्यात आलेल्या या नाजूक सोनपाकळीला भरपूर सारे प्रेम आणि तुम्हा दोघांना लेकीच्या जन्मासाठी खूप खूप शुभेच्छा !!
#मित्र परिवाराकडून लेकीच्या जन्माचं स्वागत


तुझ्या येण्याने तुझ्या आई बाबांना नवी ओळख मिळाली आहे बाळा
तुझं येणं आमच्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद आहे आमच्या छोट्याशा आयुष्यात तुझ खूप खूप स्वागत
#आई-बाबांकडून शुभेच्छा


जेव्हा तुला धन हवे असेल तेव्हा ही तुझी लेक,
विश्वासाच्या घागरीतून सोन्याच्या नाण्यांची बरसात करो
जेव्हा बुद्धीची पराकाष्टा होईल तेव्हा हीच लेक, सरस्वतीचा अवतार ठरो
संकटांना घाबरशील तू जेव्हा तेव्हा हीच लेक दुर्गेचा शृंगार ठरो
कयामतीच्या हर संकटाला पार करणे हीच लेक,
कालीचा झंकार ठरो
लेकीच्या जन्माच्या खूप खूप शुभेच्छा
Congratulations For New Born Baby Girl


तुम्हाला ह्या शुभेच्छा नक्की आवडल्या असतील हीच अपेक्षा.
ह्या शुभेच्छा होत्या तुमच्या घरी नुकत्याच जन्मलेल्या लेकीच्या जन्माच्या स्वागतासाठी Marathi wishes for new born baby by Anjali Autkar, newborn baby girl wishes in Marathi, best wishes for new born baby girl in Marathi


©® अंजली दिनकर औतकार