best wishes for new born baby boy in Marathi

best wishes for new born baby boy in Marathiघ
best wishes for new born baby Boy in marathi नवजात बाळाच्या जन्माबद्दल शुभेच्छा संदेश ||
मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा || Congratulations For Baby Boy In Marathi|| New Baby Born Wishes In Marathi.
बाळाचे आगमन संदेश, मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन मेसेज, मुलगा झाला शुभेच्छा, पुत्ररत्न शुभेच्छा संदेश मराठी, पुत्ररत्न प्राप्त झाले, पुत्ररत्न झाल्याबद्दल अभिनंदन !

मुलाचा जन्म म्हणजे आई-बाबांच्या आयुष्यातील सगळ्यात मजेदार वळण, सगळ्या कुटुंबीयांसाठी नातेवाईकांसाठी आणि संपर्कातल्या प्रत्येकासाठी तो आनंदाचा क्षण आणि तो क्षण व्यक्त करण्यासाठी आज आपण घेऊन आलो आहोत काही सुंदर अशा शुभेच्छा नवीन मुलाच्या बाळाच्या जन्माबद्दल अभिनंदन शुभेच्छा !!

★आईकडून बाळाचे स्वागत★
कुणाची आई होण्याची खरच किती असते गोडी
स्त्रीसाठी ' स्त्रीत्वाची 'त्याच्याशिवाय वेगळी कल्पना आहे थोडी
आई होऊन जगताना खूप काही शिकावं लागतं
संस्कारांसोबत सोडवावी लागतात लहानग्या जीवाची खूप सारी कोडी...
पण मी तयार आहे तुझा सांभाळ करायला बाळा
कारण तुझ्या पहिल्याच स्पर्शाने मला अनुभव दिलाय माझ्यातून प्रकट झालेल्या पुरुषाचा जिव्हाळा !!
तुला या सुंदर सृष्टीवर माझ्या कुशीतून जन्म मिळाला त्याला मीच माझे भाग्य समजते ... माझ्या छोट्याशा आयुष्यात तुझे स्वागत आहे.

आज जणू यशोदेला कृष्ण मिळाला
माझ्या नंदलाला च्या घरी त्याचा कन्हैया आला
मी सखी त्या दोघांची
त्यांनी किती स्वप्न पहिलीच्या दिवसाची हे सांगू कुणाला
अरे जुनियर या रक्ताची नसली तरी हक्काचे मावशीकडून वेलकम ब्रो.
आणि याच्या आई-बाबांना या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.


★आईकडून बाळाचे स्वागत★
तुझ्या चेहऱ्यावरच्या पहिल्या हास्यान आई होण्याच्या सगळ्या वेदना विसरले
नऊ महिन्यानंतर जेव्हा तू हातांवर आला तेव्हा असं वाटलं जगातला सगळं सुख मला मिळालंय
अनेक संकटांना सामोरे जाऊन एखादं मिशन कंप्लिट करण्याचे सुख काय असतं ना ते माझ्यासारख्या भाबड्या मुली माझ्या तान्हूल्या बाळा माझ्या आयुष्यात तुझे खूप खूप स्वागत आहे.
तू मोठा झाला की हे वाचून दाखवेल तोपर्यंत आणि तुला माझ्या हृदयाशी घट्ट जपून ठेवेल.
★मम्मा लव्हस यु बेबी★


झोपमोड होण्याची, डायपर बदलण्याची,,
आणि अमाप प्रेम करण्याची वेळ आली आहे!!
थोडे कर्तव्य थोड्या जबाबदाऱ्या पण सोबतच,,
आमच्या सुंदर स्वप्नांची सुंदर सकाळ झाली आहे!!

आम्हाला आई-बाबा म्हणून एक नवी ओळख देण्यासाठी थँक्यू बाळा आमच्या आयुष्यात आला आहेस.. आज पासून तुझे प्रत्येक स्वप्न आमची पहिली प्रायोरिटी असेल तुला खूप खूप आशीर्वाद आणि आभाळभर प्रेम ★


आजीला हवा होता वंशाचा दिवा,,
आजोबांना खेळायला बाहूला नवा
तुझ्या येण्याने सारे स्वप्न पुरे झाले..
आम्हाला जन्मभर तु सोबतीला हवा
आई-बाबा चे खुप आशिर्वाद बाळा ....!!!


आगमन नव्या बाळाचे , अभिनंदन आई-बाबांचे.
बाळास अनेक आशीर्वाद व शुभेच्छा..!!


मुलगा म्हणजे आम्हा सामान्य लोकांसाठी सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट... आणि समाजाला एक चांगला नागरिक देण्याची एक उत्तम संधी !!
तुझ्या आई बाबा म्हणून हे कर्तव्य आम्ही मोठ्या निष्ठेने पार पाडू आमच्या आयुष्यात तुझे खूप खूप स्वागत आहे बाळा .


आई -बाबा होणं म्हणजे , आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाचं वळणं तुम्हा दोघांनाही या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या मुलाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.
Congratulations For New Born Baby boy

(आईकडून शुभेच्छा)
घरात नव्या पाहुण्याचं येणं म्हणजे,
घरातल्या शांततेला कोमल गोड कीलकार्यांची साज,
घरातल्या प्रत्येक आनंदावर त्याचा पहिला हक्क
त्याच्या उठल्याने दिवस सुरू आणि त्याच्या झोपल्यानंतर रात्र
ईश्वरी रुपान घरी आलेला छोटा पाहुणा किती प्रमाणात जगतो आपण त्याला,
त्याच बाप्पाच्या कृपेने माझ्या घरी हा आनंदाचा क्षण आला आहे मला मुलगा झाला आहे....
आई होण्याचा अभिमान वाटतोय खूप खूप आशीर्वाद आणि प्रेम बाळा थँक यु मला आई म्हणून नवा जन्म देण्यासाठी !!


कुणीतरी बाबा बाबा म्हणून मला वेड लावणार याची कल्पना होती मला,
पण कुणाच्या तरी पायात माझा बोट व्यवस्थितपणे बसावा आणि मग मी अभिमानाने त्याच्या चेहऱ्याकडे पहावं ही भावना तुझ्यामुळे मिळाली एका मुलाचा बाप होणं खरंच फार अभिमानाची गोष्ट असते.
माझ्या आयुष्यातील खूप खूप धन्यवाद ज्युनियर तुला इतका प्रेम देणार ना की भरून पावशील बघ लवकर मोठा हो !!!


लहान पोरांसारखा वागणं मस्ती करणे आणि रोमँटिक कपल म्हणून मिरवणूक बंद करा आता.... आता मुलगा झाला म्हणे तुम्हाला त्या लहानग्याचे लाड पूरवा.
तुमच्या आयुष्यातल्या छोट्या पाहुण्याचं स्वागत आहे आणि तुम्हा दोघांचाही अभिनंदन.


तुमच्या कुटुंबात देवाने पाठवलेलं अमूल्य भेटीबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन!


★आजी कडून शुभेच्छा बाळाला ★
आजीच्या कहाण्या म्हणे खूप फेमस असतात
पण ऐकायला कोणी नसल्यावर त्या अपूर्णच असतात
माझ्या गोष्टींची पोटली खुली करण्यासाठी मला पाहुण्याचं खूप खूप आभार
चांदण्यांच्या अंगात माझ्यासोबत गोष्टी ऐकायला बसणारा सखा मला उतार वयात मिळाला
धन्यवाद सुनबाई हे सुखं तू मला दिलास... माझ्या नातवाला खूप खूप प्रेम आणि त्याच्या आई-बाबांना आशीर्वाद.


येवल्या पावलांनी नवा पाहून आज सगळं घर आपलंसं करणार
त्या छोट्या छोट्या पावलांपासून यशाच्या उंच शिखरापर्यंतच्या प्रवासासाठी आजच खूप साऱ्या शुभेच्छा , या जगात तुझा अस्तित्व मोठ्या हिमतीने उभं कर ... खूप खूप वेलकम बाळा.


कॉलेजमधली हट्टी जोडी , ज्यांच्या मस्ती ला नसायची पारावार
स्वतः दंगा करून त्यांना सतवायला नवीन पाहुणा आला आहे म्हणे कॉलेजमधल्या सगळ्यात डॅशिंग कपल ला आई बाबा होण्यासाठी शुभेच्छा.
आणि ज्युनियर मस्तीखोरला अख्या गॅंग कडून वेलकम वेलकम वेलकम....!!!


मुलगा झाला मुलगा झाला..... लाडू पेढ्यांचा तर मौसमच आला
खरी कसरत आजपासून सुरू होणार काय काय म्हणत घ्यायला लावणार माहिती आहे का कोणाला.
हॅपी फॅमिली या बाळाला मोठा जीव लावून सांभाळा.
______ कुटुंबीयांना मुलाच्या जन्माच्या खूप खूप शुभेच्छा!! आणि नव्या जीवाला खूप आशीर्वाद.


माणूस आयुष्यात नेहमी पहिला नंबर वर असायचा ठरवतो
मला सुद्धा नेहमी उंचीवर राहायला आवडतं माझ्यापेक्षा मोठा कोणी असू शकत नाही.
अजिबात तुला तळहातावर घेतलं तेव्हा मनात इच्छा उत्पन्न झाली तुला खांद्यावर घ्यावा मी तुला माझ्यापेक्षा मोठा बनताना बघण्यासाठी आतुर आहे बाळा मला" बाबा "म्हणून एक नवा जन्म दिला आहे त्यासाठी तुझ्या आभार आणि माझ्या छोटूश्या घरात तुझी खुप खुप स्वागत!!

“अभिनंदन भाऊ! तुम्ही आता एका गोंडस छोट्या देवदूताचे वडील आहात.
Congratulations For New Born Baby boy

तुमच्या नवीन आगमनाला आरोग्य आणि आनंदाच्या शुभेच्छा पाठवत आहे. तुझ्या नवीन आगमनाबद्दल अभिनंदन लिटल मॅन. ”
आणि तुझ्या आई वडिलांना कान पकडून आता मोठा होण्याची सक्त ताकीद.
Congratulations For New Born Baby boy


मुलाचे आई-बाबा होण्यासाठी खूप खूप अभिनंदन तुमचा हा प्रवास सुखाचा असो.... तुम्हाला शुभेच्छा आणि बाळाला खूप सारा प्रेम..


तुमच्या बाळाला चांगले आरोग्य, प्रेम आणि दिर्घ आयुष्य मिळो. अभिनंदन!”

हे मौल्यवान बाळ तुमच्यासाठी एक भेट आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी आशीर्वाद आहात. तुमच्या अविश्वसनीय कुटुंबाबद्दल अभिनंदन. ”
Congratulations For New Born Baby boy


नव्या बाळाच्या येण्याने घरात झाले गोकुळ
मुलाच्या जन्म झाल्याने , म्हणे धन्य होतं कुळ
नव्या बाळाच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा
बाळ खूप मोठा हो वो ह्या त्याच्यासोबत सदिच्छा
मुलाच्या जन्माचे खूप खूप अभिनंदन !!


किती करावे सोहळे आणि किती भरणारे थाट
एका नव्या जन्मासाठी सृष्टीने रचला हा घाट
तुमचा मुलगा तुमच्यासाठी घेऊन येऊ अनंत आनंद
सर्वांच्या सोबतीने होऊ दे, संसार सुखी आणि स्वच्छंद
मुलाच्या जन्माचे खूप खूप अभिनंदन !!
Congratulations For New Born Baby boy


कसे सांगू आणि कुणा सांगू मज किती आनंद होत आहे
तुझ्या घरी, जणू क्रुष्ण आलाय असा मज भास होत आहे
बाप झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन मित्रा तुझ्या घरी येणाऱ्या नव्या पाहुण्याला माझे खूप सारे प्रेम लवकरच भेटायला येतो य...लिपीवर हिरो ला
Congratulations For New Born Baby boy

तुम्हाला ह्या शुभेच्छा नक्की आवडल्या असतील हीच अपेक्षा.
ह्या शुभेच्छा होत्या तुमच्या घरी नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या जन्माच्या स्वागतासाठी Marathi wishes for new born baby  boy by Anjali Autkar, newborn baby girl wishes in Marathi, best wishes for new born baby boy in Marathi


©® अंजली दिनकर औतकार