नवजात बाळासाठी शुभेच्छा- प्रगतीचा तुझ्या झुलू दे झुला

नवजात बाळासाठी शुभेच्छा- प्रगतीचा तुझा झुलू दे झुला


*नवजात बाळासाठी शुभेच्छा*

*प्रगतीचा तुझ्या झुलू दे झुला*


इवलुशी पावलं,कोमल कांती
नाजूक फुलापरी रे बाळा,
धरती वरती घेता जन्म तू
लागला तुझा आम्हास लळा.


यशस्वी जीवन घडावे तुझे
उदंड आयुष्य लाभो तुला,
सुख, समाधानाच्या वर्षावात
प्रगतीचा तुझ्या झुलू दे झुला.
---------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©®