शिव जयंतीच्या शुभेच्छा आणि कविता २०२३

शिव जयंतीच्या शुभेच्छा आणि कविता२०२३


शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

*असा होता शिवबा*

महाराष्ट्राची शान शिवबा
रयतेचा अभिमान शिवबा,
जिजाऊच्या संस्कारांची
सोनेरी ती खाण शिवबा.

रायगडाचे त्राण शिवबा
शिवनेरीचा मान शिवबा,
जगदंबा भवानी मातेला
वंदनारा महान शिवबा.

गनिमाचे ज्ञान शिवबा
कर्तव्याची जाण शिवबा,
शत्रुंचा कर्दनकाळ शिवबा
मावळ्यांचा प्राण शिवबा.

हर हर महादेव गर्जना करत
युध्दास पेटणारा शिवबा,
हिंदवी स्वराज्य स्थापन्या
लढणारा शुरवीर शिवबा.

धगधगता अंगार शिवबा
सळसळती तलवार शिवबा,
माता भगिनींचा राखणदार
असाच होता आमचा शिवबा.
--------------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©®