Feb 24, 2024
मराठीमध्ये शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा- उत्तुंग यशासोबत घे भरारी

Read Later
वाढदिवसाच्या शुभेच्छा- उत्तुंग यशासोबत घे भरारी


*१) वाढदिवसाच्या शुभेच्छा- उत्तुंग यशासोबत घे भरारी*

फुलावी लेखणी लिखाणातू, ही
जन्मदिनी देते मी तुला शुभेच्छा
उत्तुंग यशासोबत घेऊन भरारी
व्हाव्यात पुर्ण तुझ्या मनातील इच्छा.
-------------------------------

*२)वाढदिवसाच्या शुभेच्छा*


जीवनात तू व्हावे यशस्वी
अशी करते मी सदैव प्रार्थना,
सुख समाधानाची व्हावी उधळण
हीच जन्म दिनी शुभ कामना.
-----------------------

*३)*वाढदिवसाच्या शुभेच्छा-*

ना रक्ताचे तरीही ते जिव्हाळ्याचे
साथ देऊनी जुळले नाते हे हक्काचे,
उदंड आयुष्याच्या शुभेच्छांनी बहरुन
फुलावे तुझ्या मनीचे सुंदर जग स्वप्नांचे.
-------------------------

*४)वाढदिवसाच्या शुभेच्छा*

जीवनाला अर्थ माझ्या लाभला पुर्ण तेव्हा
तू मला अन् मी तुला आपलेसे केले जेव्हा
साथ आपली राहो कायम हीच आहे इच्छा
वाढदिवसाच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा
-------------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©®
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Vanita Shinde-kirdkude

Housewife & Tailor

I'm Postgraduate. My Hobies -Writing Poetry& Story. I Like Drawing

//