Jan 19, 2022
कविता

प्रियकरा..

Read Later
प्रियकरा..

तू असा मागून येऊन
डोळ्यांवर हात धरतोस
मीही मग नाटक करते
न ओळखल्याचं
पण तुला ठाऊकय
तुझ्या देहाचा गंध
तू येण्याआधीच माझ्या
कायेला येऊन बिलगला असतो
तुझ्या बोटांचा स्पर्श
माझ्या पापण्यांना होताच
गालावर गुलाबी चढते
तू अवखळ हसत
ओळख पाहू म्हणतोस
मीही मग एकदोघांची
नावं टाकते सांगून
तेव्हा मात्र रुसतोस
शेवटी तुझं नाव घेतलं
तरी तुझा अनुराग
काही केल्या नाही जात
मग चुकले बाबा असं
कान धरुन म्हंटल की
पुन्हा घेतोस जवळ
मीही मग मिटून जाते
तुझ्या बाहुपाशात
स्थळकाळाचं भान
रहात नाही दोघांना
दोन देह मनाने
 एकरुप होऊन जातात
अगदी राधाकृष्णासारखे

-----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now