आनंदाला उधाण आले जेव्हा
मी आई होणार हे कळले.
जिवणाला एक वळण मिळाले जेव्हा
माझ्या बाळाशी माझे नाते जुळले.
एका मागून एक दिवस जात होते.
बाळाची वाट पाहण्याचा आनंद होत होते.
नऊ महिन्यांचा काळ कसा गेला समजलचं नाही,
कारण, बाळाच्या सानिध्यात मी हरवून गेले होते
अखेर तो दिवस आला
बाळाचा माझ्या जन्म झाला
परीच्या रुपाने मला एक
मौल्यवान मोती मिळाला,
लहानगे हात-पाय, नाजुक नाजुक डोळे,
परी ला पाहून मी हरवून गेले.
मनात उसळल्या मायेचे लाटा
आनंदात माझ्या तीचा खूप मोठा वाटा...
"बाळा होऊ कसे उतराई,
तुझ्यामुळे मी झाले आई "
सुखात तुझ्या सुख, दुखात तुझ्या दुःख
कारण आईपणाचे लाभले तुझ्यामुळे सौख्य
नजरे आड झालीस क्षणभर जरी
मन थार् वर राहत नाही
तुझ्याविना श्वासही माझा, माझी साथ देत नाही.
परी तुझ्यासाठी मन माझे सतत झुरते
लुटु- लुंटु चालणारे तुझे पाय मी डोळ्यात भरते.
आई हा शब्द ऐकण्यासाठी
माझे कान आतुरले, पण
ते ऐकण्याआधीच मी तुला
निर्दयीपणे ऐकटीला सोडले होते.
निर्दयीपणाचा कळसच झाला
एवढ्याशा वयात तुला एकटेपणा दिला
माफ कर चुकले मी.तुला एकटीला सोडलं,
कारण,डोक्यात माझ्या फक्त शिक्षणच उरलं.
मान्य आहे मला मी चुकिची वागले आहे
पण विरहात तुझ्या क्षणो क्षण जळते आहे.
पाण्याविना मासा पंखाविना पक्षी
तशीच काहीतरी अवस्था आहे
बाळा तुझ्या विना माझी
शरिर जरी इथे असले, जीव तुझ्यातआहे.
तुझ्याविना जिवन माझे अर्थहिन आहे.
जमलं तर माफ कर तुझ्या हया
आईला, विसरु नको बाळा माय-लेकीच्या
नात्याला...
विसरु नको तु बाळा माय-लेकिच्या नात्याला
तुझी आई.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा