आई ह्या शब्दात सर्व आले खरतर, पण दुसऱ्यांदा आईपण अनुभवताना अनेकदा आपल्या पहिल्या बाळाची काळजी असते, पहिल्या बाळाला आपल्या घरी नवीन बाळ म्हणजे भाऊ किंवा बहीण येणार आहे हे समजावून सांगणे ही कसोटी असते.
असे म्हणतात आई भेदभाव करत नाही, पण ज्या बाळामुळे आपण आई झालोय त्या बाळाकडे थोडे दिवस का होईना आपले दुर्लक्ष होते हे तितकेच खरे पण आहे.
मी ठरवलं होते की मी माझ्या पहिल्या बाळा कडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही, म्हणूनच प्रत्येक अल्ट्रा साउंड ला सोबत घेऊन येणार भाऊ किंवा बहीण दाखवणे असे करत होते. तिला तिचा पूर्ण वेळ दिला , जाणीव देखील करून दिली की आता अजून कोणी तरी मला आई म्हणणार आहे. माझं बाळ रेडी होतं, उत्सुक होत. बाळ येणार म्हणून खुश होतं.
पण जेव्हा खरच बाळ आलं त्या दिवशी सर्व बदलून गेल.
तिचच काय माझं पण सर्व बदलून गेल जिला खूप लहान समजत होते ती एका मिनिटात मोठी वाटायला लागली, डिलिव्हरी मुळे उठता येत नव्हते, बाळाला घेता येत नव्हते, मोठी ला सर्व सांगत होते आई कडे जाऊ नकोस, तिला त्रास होतोय.
एवढ्याशा जीवाला हा बदल खूप मोठा होता, तिने तो स्वीकारला बाळ पाहून आनंदित झाली माझी कितीही इच्छा होत असली तरी तिला जवळ घेता येत नव्हते, उठताना बसताना मदतीची गरज लागत होती.
सर्व विचारांमुळे झोप येत नव्हती, आज पर्यंत मला सोडून न झोपलेलं माझं बाळ शेजारच्या बेड वर झोपल ते पाहून मलाच वाईट वाटलं, नवीन बाळ हवंय त्याला पण माझी गरज आहे पण एक मन म्हणत होत आपण अंतर देतोय का आपल्या लाडकीला.
दोन दिवस हे पचवण्यात गेले की वेळ द्यावा लागणार आहे स्वतःला आणि सर्वांना कारण कितीही माहिती असलेली प्रश्न पत्रिका असली तरी खरी सोडवताना अडचण येते, उत्तर माहिती असतात पण वेळ पुरत नाही अगदी तसंच हे होणार हे माहिती असून ते ऍक्सेप्ट करण अवघड जातंय.
आता वेळ जात आहे दोन महिने गेले अनेक अडचणी आल्या. पण वेळ सर्वात जालीम औषध आहे हे खरंय.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा