Login

जागतिक तापमान वाढ आणि सौंदर्यप्रसाधने

Is Every And Each Beauty Cream Lotion Shampoo Is Suitable For Us Let's Think

          आता थंडी पडली आहे. विंटर क्रीम , बाॅडी लोशन, मोइश्चरायझर , ओठांसाठी वेगळी क्रीम,  टिचलेल्या भेगांसाठी आणखीन दुसरी...... रात्री झोपताना,  सकाळी उठल्यावर,  बाहेर जाताना बाहेरून आल्यावर ,अगदी काहीही कारणाने कुठल्याही चेहऱ्यावर 2 - 4 क्रीम्स,  1 - 2 पावडरी \"चोपडायलाच\" हव्यात. 

         डोळ्यांसाठी आयलायनर, पिंपल साठी अजून काही, डार्क सर्कलसाठी नवा एक थर, ओठांसाठी लिपर्गाड, आणि उन्हात फिरायचं म्हणून सन स्क्रीमही हवचं. 

              सगळं कसं वेगवेगळं......... एकावर दुसरं, तिसऱ्या साठी चौथं........ पाचव्या ना घेतलं म्हणून आणखी सहावं.... एवढं करूनही सुंदर झालो की नाही म्हणून शंकाच..... ते तसंच द्यायचं टाकून परत नव्या कॉस्मेटिक्स चा शोध सुरूच.

              कुणी सांगतो हर्बल्स वापरा...... कोणी म्हणतं त्यात काही दम नाही. कुठलीतरी जाहिरात सांगते अमुक क्रीम लावा आठ दिवसात \"गोरं\" व्हा मग आपल्याही घरी ती क्रीम हवीच.

          अशाच एखाद्या ट्युब मुळे कोणाच्यातरी पिंपल्स अर्ध्या रात्रीत नाहीशा होतात....... मग हि ट्यूब तर घरी हवीच हवी.

              लगेच दुसऱ्या दिवशी ती \"ट्राय\" होते. ट्राय करून भलतच काहीतरी उभरतं......... मग अजून एक औषध....... अजून एक रामबाण उपाय...... या उपायांपायी अनेक \"बाण\" च फक्त सुटत राहतात...... पाच पन्नास ट्यूब,  क्रीम्स घरात येऊन पडतात . काही वापरले जातात तर काही अडगळीत . \"लक बाय चान्स\" एखादी क्रीम सूट होतेही.... म्हणूनही इतर धूळ खात पडतात.  पसारा इतका वाढतो की , नक्की काय,  कोणासाठी आणि कशासाठी घेतलं हे ही आठवत नाही!

              हे काय फक्त चेहऱ्याचं ! \"साईड बाय साईड\" केसांचं,  हाता-पायाचं नखांचं, पायांच्या भेगांसाठी, ड्राय स्कीन चं  सगळं व्यवस्थित नको व्हायला? त्यात शाम्पू, कंडीशनर,  साबण आणि फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींची भर! जाहिरातीतल्या अशाच एखादी चे केस अमुक एखादा शाम्पू वापरून इतके बळकट होतात , लांबसडक होतात की , ते दुसर्‍या मजल्यावरून खाली सोडून त्यांना पकडून तिचा \"मजनू\" वर चढून येतो !

                ते पाहून तमाम पोरी फ्लॅट . लगेच हा शाम्पू ड्रेसिंग टेबलावर हजर. कुणी पार्लरमध्ये उठ सूट जाऊन कॉस्मेटिक्स चे थरावर थर चोपडून घेतं,  तर कुणी पार्लरला नावे ठेवत सगळ्या क्रीम्स , ब्लिच, फेशियल किट , तमाम फ्रूट क्रीम घरातच मांडून बसतं.... शेविंग क्रीम \"एक्झॅक्टली\" कशी वापरायची हे कळायच्या आतच पोरांकडे दोन चार प्रकारचे \"आफ्टर शेव लोशन्स\" आधीच असतात.

             रात्री झोपण्यापूर्वी एखाद्या छानशा पुस्तकाची दोन पाने चाळायला पाच मिनिटे ही वेळ नसतो पोरांना,  पण स्वतःच्या शरीरावर नानातर्‍हेचे \"कॉस्मेटिक्स\" साग्रसंगीत \"चोपडायला\" रोजचा तासभर ही कमी पडतो..... बसमध्ये, ट्रेनमध्ये बसल्या बसल्या,  येता-जाता पॅचवर्क सुरूच!

          लिपस्टिक आणि नेलपेंट तर खास सार्वजनिक ठिकाणी लावायच्या गोष्टी........ शरीराची रंगरंगोटी करण्यात इतका वेळ जातो की , मेंदूची ही मशागत करावी लागते याचे भानच नाही.

                घरात ट्युबाच ट्युबा...... नुसता  ढीग..... पैसे किती गेले हिशेब नाही..... चुकीच्या सौंदर्यप्रसाधनांच्या वापराने पर्यावरणावर परिणाम होतोच; पण ते नाही तर किमान आपल्यावर काय विपरीत परिणाम होतोय,  याचा तरी विचार करणार की नाही?

            एवढे जमेल........?

    १. पृथ्वीवरील ओझोनचा थर नष्ट करण्यात सौंदर्यप्रसाधने 15 टक्के हातभार लावतात.  त्यामुळे योग्य ती आणि गरजेपुरतीच सौंदर्यप्रसाधने जबाबदारीने वापरूनही आपण निसर्ग संवर्धनात हातभार लावू शकतो.

  २. मित्र-मैत्रिणी काय वापरतात , यापेक्षा आपल्या नक्की गरजा आणि समस्या काय आहे?  हे तपासूनच कॉस्मेटिक्स आणावीत.

 ३. सर्वच कॉस्मेटिक्स सर्वांनाच \"सूट\" होत नाहीत त्यामुळे त्यांच्यावर ची माहिती नीट वाचावी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

  ४. एकावर एक फ्री सौंदर्यप्रसाधनं बाबत तर जास्तच सावधगिरी बाळगायला हवी. कदाचित ती सौंदर्यप्रसाधने \"एक्सपायर\" झालेली किंवा त्यातील रसायन घातक असू शकतात.

  ५. भारंभार क्रीम्स , लोशन्स विकत घेण्यापूर्वी त्यातल्या किती वापरल्या जातील ? किती पडून राहतील? आणि किती मुळातच आपल्याकडे आहेत ? हे जरूर पडताळावे.

       माहिती आणि फोटो - साभार गुगल


 (सदर लिखान हे मोबाईल मधून केलेले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व)


(वाचक मंडळी तुमचा अभिप्राय हेच आमच्या लेखणीचा स्फूर्तिस्थान त्यामुळे आपली मत नक्की नोंदवा आणि तुम्हाला माझं लिखाण जर आवडत असेल तर मला फॉलो करा .तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.........)


🎭 Series Post

View all