सुंदर नातं भाग ९ (अंतिम भाग)

Story of beautiful relationship

आपण मागील भागात बघितलं, रोहित व निशा त्यांच्या लग्नाची बातमी राहुल आणि निकिताला देतात. राहुल व निकिताला सुखद धक्का भेटतो. रोहित व निशाचे लग्न जमल्यामुळे राहुल व निकिता जाम खुश असतात. निशा व रोहितचे surprise राहुल व निकिताला खूप आवडलेले असते. निशासाठी निकीताकडेही एक surprise असते.

निकिता--- निशा माझ्याकडेही तुझ्यासाठी एक surprise आहे, मी तुला surprise देणार होती तर तूच मला surprise दिलंस. तुझं surprise खूप छान आहे. मला खूप भारी वाटतंय. रोहित मी तुला जिजू म्हणून हाक मारलेली चालेल ना. माझ्या मैत्रीणीला सुखात ठेवायचं, तिला जर रडवल तर गाठ माझ्याशी आहे.

रोहित--- जिजू म्हणालीस तरी चालेल किंवा रोहित म्हणाली तरी चालेल. तू तर आत्ता पासूनच धमक्या द्यायला लागलीस. काळजी नको करुस तुझ्या मैत्रिणीला कधीच त्रास नाही देणार. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं मलाच सहन नाही होणार.

निशा--- तुमच्या दोघांच राहुद्या, निकिता काय surprise देणार आहेस ते सांग.

निकिता--- निशा माझंही लग्न ठरलंय.

निशा--- काय? कधी? कसं? कुणाशी? मला तर काहीच कल्पना नाही दिलीस.

राहुल--- अग निशा श्वास तर घे, निकिता सांगत आहे जरा शांतपणे ऐकून घे, मग प्रतिक्रिया दे.

रोहित--- आज काय surprise देण्याचाच दिवस आहे.

निकिता--- रोहित तुला पण मोठा धक्का बसणार आहे. So be ready.

निशा--- टाईमपास पुरे झाला, पटकन सांग सगळं आता.

निकिता--- रोहित, निशा तुम्ही दोघेही त्याला ओळखतात.

रोहित--- आम्ही दोघं, कसं शक्य आहे? आम्ही दोघं फक्त राहुललाच ओळखतो, बाकी तर असं कोणीच नाहीये ज्याला आम्ही दोघं ओळखतो.

रोहित सहजपणे बोलून जातो,निशा एकदा राहुलकडे बघते, मग निकिताकडे बघते, अचानक तिच्या डोक्यात विचार येतो आणि ती जोराने ओरडते.

निशा--- म्हणजे तुझं आणि राहुलचे लग्न जमले आहे का?

निकिता---निशा हळू बोल जरा, सगळे आपल्याकडेच बघत आहेत.तुझा अंदाज बरोबर आहे. राहुल व माझंही लग्न ठरलंय.

रोहित--- राहुल निकिता बोलतेय ते खरं आहे, पण तु मला काहीच बोलला नाहीस.

राहुल--- हो खरं आहे, अरे सगळं खूप घाईत घडलं, सांगायला वेळच नाही भेटला, तसही आपण भेटणारच होतो तर मी विचार केला, भेटल्यावरच सांगू.

रोहित--- ते सगळं ठीक आहे पण तुमच्या घरच्यांची सहजासहजी परवानगी कशी भेटली, ते लग्नासाठी तयार कसे झाले?

निकिता--- रोहित लग्न त्यांनीच तर ठरवलं आहे. तुला असं वाटतं आहे का, आमचं लव्ह मॅरेज आहे म्हणून.

निशा--- अग तुम्ही एकमेकांचे मित्र होतात ना आधीपासूनच मग तुमचे तर लव्ह मॅरेजच असणार ना.

निकिता--- हो आम्ही आधीपासून एकमेकांना ओळखायचो, आम्ही मित्रही होतो पण त्याचबरोबर आम्ही नातेवाईकही होतो. राहुल हा माझ्या मावस आत्याचा मुलगा आहे. मागच्या महिन्यात आमच्या घरच्यांनी आम्हाला दोघांनाही विचारलं होतं, तुम्हाला एकमेकांशी लग्न करायचे आहे का?

राहुल--- आम्ही दोघांनीही आमच्या नात्याकडे ह्या द्रुष्टीने कधीच पाहिले नव्हते, आम्ही एकमेकांचे फक्त चांगले मित्र होतो. आईचे म्हणणे होते की, तुमचं सर्वच एकमेकांना माहीत आहे, तुमचे एकमेकांशी सूत्रही चांगले जुळते. 

निकिता--- आम्ही घरच्यांकडून वेळ मागून घेतला. त्या दिवशी कॉफी शॉप मध्ये तुझ्याशी बोलणं झाल्यावर मला असं जाणवलं की एखाद्या अनोळखी मुलाशी लग्न करण्यापेक्षा ओळख असलेल्या राहुलशीच लग्न केले तर चांगलेच होईल.

राहुल--- रोहित तुला भेटल्यानंतर माझंही मत निकिता सारखेच झाले.

निकिता--- रात्रभर विचार केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलला फोन करून बोलावले, आम्ही बऱ्याच वेळ चर्चा केली मग कुठे जाऊन एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

राहुल--- आमचा निर्णय झाल्यावर आम्ही आमच्या घरी फोन करून लग्नासाठी होकार कळवला.आमच्या पेक्षाही घरचे जास्त खुश आहेत.

निशा--- अरे वा, छानच झाले ना. निकिता आपली मैत्री कधीच तुटणार नाही, आता राहुल व रोहितच चांगले मित्र आहेत, म्हणजे आपल्या मैत्रीत काहीच अडथळा राहणार नाही.

राहुल--- हो आणि आपले मुल सुद्धा एकमेकांचे खूप चांगले मित्र राहतील.

राहुलच्या या बोलण्यावर सगळेजण खूप असतात.

राहुल, निकिता, रोहित व निशा सगळेजण मिळून साखरपुड्याची खरेदी करतात. एका महिन्यात निशा व रोहितचा साखरपुडा पार पडतो. राहुल, निकिता दोघेही त्यांच्या साखरपुड्यासाठी नाशिकला जातात. निशा व रोहितचा साखरपुडा व्यवस्थित रित्या पार पडतो.

"होता अंधकार सर्वत्र

वाट एकटीच होती,

चालताना एकटेच

साथ कुणाचीच नव्हती,

अशात तुझे येणे झाले,

शुभ्र सहवास तुझा

मन चांदण्यात न्हाले...

अन सोबत तुझ्या

जीवन सुंदर झाले"

रोहित व निशा post engagement period चा चांगलाच आनंद घेतात. दोघांच्याही घरी लगीनघाई सुरु होते. साखरपुडा झाल्यावर रोहित व निशाचे एकमेकांप्रती प्रेमही वाढते.

रोहित व निशाचे prewedding photo shoot लोणावळ्याला होते.

लग्नाची खरेदी दोघे मिळून पुण्यातच करतात. लग्नानंतर रोहित व निशा हनिमूनला सिमला, कुल्लू, मनालीला जायचे ठरवतात.

काही दिवसांनंतर रोहित व निशाचे लग्न देवा ब्राह्मणांच्या साक्षीने, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने थाटामाटात पार पडते.

" प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यात साथ देणाऱ्या एका मुलाची गरज असते,

अन प्रत्येक मुलाला त्याच्या आयुष्यात त्याच्यावर प्रेम करणाऱ्या एका मुलीची गरज असते,

अन यासाठी दोघांना ही एका अतूट नात्याची गरज असते,

अन ते नातं म्हणजे लग्न"

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all