सुंदर नातं भाग ६

Story of beautiful relationship

मागील भागात बघितल्याप्रमाणे, निशा व तिच्या घरचे रोहितला बघण्यासाठी रोहितच्या घरी येतात. रोहित निशाला घेऊन त्याच्या रूममध्ये जातो.             निशा-----रोहित तुला जर मला नकार द्यायचा असेल तर बिनधास्त देऊ शकतोस, फक्त माझे मन जपण्यासाठी  किंवा मला बरे वाटावे म्हणून होकार देऊ नकोस. प्रत्येकाच्या आपल्या जोडीदाराबद्दल वेगळ्या अपेक्षा असूच शकतात. तुला जर मी तुझ्या योग्यतेची वाटत असेल तरच होकार दे.    रोहित---- माझा निर्णय मला घेऊ देत ना. तूच तर म्हणतेस ना कोणीच परिपूर्ण नसतो. मला एक संधी तर देऊन बघ, तुला समजून घेण्यासाठी, एकदम अशी निष्कर्षावर येऊ नकोस.आपली योगायोगाने ही तिसरी भेट घडली आहे. तुला असं वाटतं नाही का, या आपल्या भेटींमागे नक्कीच काही तरी कारण असेल. आपण दोघांनी एकत्र यावे ही देवाचीच इच्छा असेल तर. या सगळ्या परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने बघ म्हणजे तुझ्या लक्षात येईल. आणि तुला जर मी तुझ्या योग्य नसेल वाटतं तर तुही मला नकार देऊ शकतेस. निशा----- तुला तर माझ्या सर्व अपेक्षा माहीतच आहे तरीपण सर्वांची परत कल्पना देते, सगळ्याचा नीट विचार कर आणि मग निर्णय घे.मी लहान असतानाच बाबा गेले, आईने शिवणकाम करून मला वाढवले, तीने माझ्यासाठी खूप हाल अपेष्टा सहन केल्या आहेत.माझ्या काका काकूंनी आम्हाला खूप  आधार  दिला. ते मला त्यांच्या मुलीसारखच मानतात. आता   आईला सांभाळण्याची माझी वेळ आहे. मला आईला खूप सुुखात ठेवायचंं आहे. तुझ्याशी माझं लग्न झाले तर मी स्वतःला भाग्यवान समजेल.               रोहित---- निशा मी तुझ्या सर्व अपेक्षा पूर्ण  करण्याचा प्रयत्न करेल. माझ्या आयुष्यातील जोडीदाराबद्दल ज्या काही अपेक्षा आहेत त्यामध्ये तू पूर्ण पणे बसते. खरं सांगायचं  तर जेव्हा तु मला  बसमध्ये भेटली होती तेव्हाच तू मला   खूप आवडली होती. माझेे आई बाबाही स्वभावाने खूूप चांंगले आहेत, ते तुला  चांंगल्या  रितीने सांभाळून घेेतील. निशा मला  पहिल्या पासून वाटतंं आलय, माझ्या  व  माझ्या जोडीदारामध्येे एक मैत्रीपूर्ण नातेे असावे.

एक सुंदर नातं असावं,

एक सुंदर नातं असावं, त्याला कोणतचं नाव नसावं

भावनांच गुंफण असावं, शब्दांच कुंपण नसावं

नावाचं बंधन नसावं,तरी जिवाभावाचं असावं

एक सुंदर नातं असावं, त्याला कोणतचं नाव नसावं

निशा----रोहित तुला माहीत आहे, माझी आई मला नेहमी सांगते, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते, ती वेळ आल्याशिवाय काहीच घडत नाही. मी कधीच विचार नव्हता केला की हा सुंदर योगायोग घडेल. तु म्हणतोस ते खरे आहे, हे सगळं घडण्यामागे नक्कीच देवाचीच इच्छा असेल.  रोहित--- मी स्वतः ला भाग्यवान समजेल जर तु लग्नाला होकार दिलास तर

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय, भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय

श्वास घेऊन तर प्रत्येक जण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय

निशा----- रोहित मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला, म्हणतात ना, प्रेम करणारं माणूस मिळायला भाग्य लागतं. रोहित---- चल बाहेर जाऊन सगळ्यांना आपला निर्णय सांगूया. रोहित व निशा रुममधून बाहेर येतात, निशा आईजवळ जाऊन बसते. राऊत काका---- तुमचं बोलणं खूपच लवकर संपल. काय निर्णय झाला तुमचा, लगेच सांगणार आहात की विचार करायला वेळ पाहिजे. रोहित----- काका, आमचा निर्णय झाला आहे पण त्या आधी तुम्हाला सगळ्यांना काही सांगायचं आहे. मी आणि निशा एकमेकांना आधी पासूनच ओळखतो, याआधी आमची भेट झालेली आहे. निशाची मैत्रीण निकिता माझा मित्र राहुलची मैत्रीण आहे, त्या दोघांमुळेच दोन दिवसांपूर्वी आमची पहिली भेट कॉफी शॉप मध्ये झाली होती. त्यानंतर योगायोगाने आमची भेट बसमध्ये झाली. पुणे ते सिन्नर या प्रवासात आमच्या खूप गप्पा झाल्या होत्या. निशा तर मला तेव्हाच आवडली होती. माझा या लग्नासाठी होकार आहे. राऊत काका----- निशा तुझं काय म्हणणं आहे, तुला रोहित पसंत आहे का?   निशा लाजत लाजत मानेनेच होकार देते.निशाच्या  व रोहितच्या घरचे सगळेच खूप खुश होतात. निशा व रोहितही मनापासून खुश असतात. राऊत काका----- रोहित, निशा जोडीने घरातील सर्व वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करा. निशा व रोहित सगळ्यांचे जोडीने आशिर्वाद घेतात. निशाच्या मनात तिच्या आवडत्या गाण्याच्या ओळी येतात,

आपकी नजरोंने समझा प्यार के काबील मुझे,

दिल की ये धडकन ठहर जा मिल गई मंजील मुझे

जी हमें मंजूर है आपका ये फैसला.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all