Mar 01, 2024
प्रेम

सुंदर नातं भाग ५

Read Later
सुंदर नातं भाग ५

मागील भागात बघितल्याप्रमाणे, निशाच्या कांदेपोहे कार्यक्रमात जे काही घडते त्यामुळे निशा मनातून खूपच दुखावलेली असते. पण आईच्या, काका काकूंच्या आनंदासाठी निशा मुलाच्या घरी जायला तयार होते. निशाचे काका मात्र  खूपच खुश असतात कारण त्यांना मनापासून वाटत असते की आपण ज्या मुलाच्या घरी जाणार आहोत तोच मुलगा निशासाठी योग्य असेल. निशाची आई निशाच्या रुममध्ये जाते तर बघते, निशा उदास चेहऱ्याने कुठल्यातरी विचारात हरवलेली असते. निशाला असं बघून निशाच्या आईला खूप वाईट वाटते. आई निशाजवळ जाऊन निशाच्या डोक्यावरुन हात फिरवते व विचारते, काय झालं निशू बाळा एवढा कसला विचार करत आहेस? निशा----- आई लग्नच केले नाही तर चालणार नाही का? माझ्या सोबत जे काही घडतंय त्यात माझा काय दोष आहे? मी मुलगी म्हणून जन्माला आली हा दोष आहे की मी दिसायला सुंदर नाही हा दोष आहे. माझ्यामुळे तुला, काका काकूूंंना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. निशाची आई----- निशू बाळा, जेे घडतंय त्यात तुझा काहीच दोष नाहीये. तुला कोणी  सांंगितलं आम्हाला तुझ्या मुळे त्रास होतो आहे. तुुुझे काका म्हणत होते की,  आपण ज्या मुलाच्या  घरी जाणार आहोत तो मुलगा खूपच   चांंगला आहे. बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेेव, आपण जर कधी कुणाचे काही वाईट नाही केले तर आपलेही वाईट होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीची  ठराविक वेळ असते. आता उठ आणि तयार हो मुलाकडे जायला उशीर  नको. निशाची आई रुममधूून निघून जाते, निशा छान ड्रेस घालून तयार होते.

थोड्याच वेळात निशा व तिच्या घरचे मुलाच्या घरी जाण्यासाठी तयार होतात, गाडीत बसून निघतात. गाडीत बसल्यावर निशाच्या डोक्यात रोहितचा विचार येतो, रोहितचा कांदेपोहे कार्यक्रम कसा झाला असेल? काही वेळातच निशाची गाडी मुलाच्या घरासमोर येऊन थांबते. निशा गाडीतून खाली उतरते तर समोर राऊत काकांना बघते. निशाला राऊत काकांना बघून खूप आनंद होतो. राऊत काका निशाच्या वडिलाचे जिवलग मित्र होते. निशा राऊत काकांजवळ जाऊन त्यांना नमस्कार करते. राऊत काकांसोबत मुलाचे बाबापण असतात. राऊत काका निशाला व तिच्या घरच्यांना मुलाच्या घरात घेऊन जातात. निशा मुलाच्या आई बाबांना नमस्कार करते. सगळेजण सोफ्यावर बसतात. राऊत काका सगळयांची एकमेकांशी ओळख करून देतात.राऊत काका मुलाच्या बाबांना विचारतात, अरे हा रोहित कुठे आहे, किती वेळ लावत आहे तयार व्हायला, मुलीसमोर यायला लाजत आहे का? राऊत काकांच्या बोलण्यावर सगळेजण खळखळून हसतात. निशाच्या विचार करते की हा बसमध्ये भेटलेला रोहितच असेल का? परत निशा विचार करते की निशा जागेपणी स्वप्न बघणे चांगले नाही. तेवढ्यात रोहित तिथे येतो तो निशाच्या आईला, काका काकूंना नमस्कार करतो. राऊत काका निशाची आणि रोहितची एकमेकांशी ओळख करून देतात. निशा व रोहित एकमेकांकडे बघतात तेव्हा त्यांना विश्वासच बसत नव्हता की.जे आपण बघत आहोत ते खरे आहे की खोटे.

नजरेला नजर भिडत होती पण तोंडातून शब्द फुटतं नव्हता.

राऊत काकांच्या बोलण्याने दोघांचीही तंद्री भंग पावते. राऊत काका------ रोहित निशाकडे बघतच बसणार आहेस की तीच्याशी बोलणार पण आहेस,  निशाला तुझ्या रुममध्ये घेऊन जा.रोहित----- हो काका जातो.

रोहित निशाला घेऊन त्याच्या रुममध्ये जातो. निशा व रोहित रुममध्ये गेल्यावर खूप हसतात. दोघेही मनातून खूप खूश असतात. रोहित------ निशा काय झालंय तुला? चेहरा असा का पडलेला आहे? निशाला आश्चर्य वाटते, रोहितला कसे कळलं असेल. निशा रोहितला सकाळी कांदेपोहे कार्यक्रमात जे घडले ते सगळं सांगते. रोहित----- भिषण आहे सगळं. तु जास्त विचार नको करुस. स्वतःला दोष देऊ नकोस, जे काही झालं त्यात तुझी काहीच चुक नाहीये. निशा---- तुुुुझा कसा झाला कांदेेपोहे कार्यक्रम? कसा होता तुझा पहिला अनुभव? रोहित------ काही खास नाही, मुलगी माझ्या चौकटीच्या बाहेर होती. नकार दिला मी लगेच.  निशा----- आता  रोहित आपण आपल्या बद्दल बोलूूयात का? बाहेर जाऊन सांंगावंं लागेल ना. रोहित----- हो ना. आपल्याला  आपल्या बद्दल बोलायला पाहिजे.

रोहित व निशामध्ये काय बोलणं होत बघूया पुढच्या भागात

©® Dr Supriya Dighe

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//