सुंदर नातं भाग ४

Story of beautiful relationship

मागील भागात आपण बघितले, रोहितचा कांदेपोहे कार्यक्रम होतो, रोहितला मुलगी आवडत नाही, रोहित मुलीला नकार देतो, आता बघूया निशाकडे काय चालू आहे.

निशा सकाळी लवकर उठते, आईला व काकूला स्वयंपाकात मदत करते, घरातील बाकीची कामेही आवरते आणि स्वतः छान ड्रेस घालून तयार होते. थोडयाच वेळात मुलाकडचे निशाच्या घरी पोहचतात, निशाच्या घरचे पाहुण्यांचे व्यवस्थित रित्या स्वागत करतात, निशा चहाचा ट्रे हातात घेऊन येते व सर्वांना चहा देते तेव्हा तिला असं लक्षात येते की, हा मुलगा रोहित नाहीये, ती मनातून खूप नाराज होते पण चेहऱ्यावर मात्र हसू ठेवते. निशाला त्या मुलाला कुठे तरी बघितल्यासारखे वाटत होते, निशा आठवण्याचा प्रयत्न करीत होती पण तीला आठवत नव्हते, निशाला व त्या मुलाला एकांतात बोलण्यास वेळ देतात, त्यांचे बोलणं झाल्यावर ते दोघे रुम मधून बाहेर येतात, थोड्या वेळ सगळयांशी चर्चा झाल्यावर मुलाचे घरचे सांगतात,. आम्हाला मुलगी पसंत आहे. निशाच्या आईला, काका काकूंना खूप आनंद होतो. तेवढ्यात निशा बोलायला सुरुवात करते, निशा----- मला हे लग्न करायचे नाही, मुलाची इच्छा आहे की, मी लग्नानंतर नोकरी केलेली त्याला चालणार नाहीये, ठीक आहे मी त्याची इच्छा मान्य ही केली असती पण हा माझ्या आईची जबाबदारी घ्यायला ही नाही म्हणतोय, तुम्हाला जर बायकोने नोकरी केलेली चालणार नाहीये तर तुम्ही १० वी झालेल्या मुलीशी लग्न करा. मुलगा----- बघितलं किती उद्धट आहे ही मुलगी, तुला कसला माज आहे एवढा, दिसायला तर सावळीच आहेस ना, कोण करेल तुझ्याशी लग्न? मला नाही वाटत, मी काही चुकीचे बोललो म्हणून. निशा---- तुला कधीच वाटत नाही, तुझं काही चुकलयं , तुझ्या मुळे एका मुलीला तीचा जीव गमवावा लागला आहे तरी तुला वाटलं नाही तुझं काही चुकलयं म्हणून. घरात सगळेजण शांत बसतात, मुलाचे घरचे कावरे बावरे होतात. निशाचे काका---- काय बोलतेय निशा? तुला कसं माहीत हे सगळं. निशा----- काका,  तुम्हाला माझी मैत्रीण गौरी माहित होती ना, जिने मागच्या वर्षी आत्महत्या केली होती, तीचे आत्महत्या करण्याचे कारणच आपल्यासमोर उभे आहे, गौरीचे व हया मुलाचे लग्न ठरले होते, पण यांनी साखरपुडा झाल्यावर हुंड्याची मागणी केली, आणि धमकी दिली जर पैसे वेळेत नाही मिळाले तर लग्न मोडू म्हणून, हुंडा देण्याची गौरीच्या घरची परिस्थिती नव्हती, आई वडीलांची मानहानी होऊ नये म्हणून गौरीने आत्महत्या केली. मुलगा व त्याच्या घरचे खाली मान घालून निघून जातात. निशाचे काका---- बरं झालं सगळे वेळेतच कळले, खूप मोठा अनर्थ टळला. निशा, बेटा आपण तुझ्या साठी एखादा चांगला मुलगा शोधूयात.तु नको काळजी करुस, देव आहे आपल्या सोबत. निशा स्वतः ला खूप नशीबवान समजते की तिला पाठिंबा देणारा परिवार भेटला आहे.

काही वेळानंतर निशाच्या काकांना कुणाचा तरी फोन येतो, फोन झाल्यावर काका घरातल्या सर्वांना एकत्र बोलावतात व सांगतात, आपल्या निशासाठी खूप छान स्थळ सांगून आले आहे. मुलगा स्वभावाने खूप शांत, सोज्वळ आहे, तो बाहयरंगापेक्षा अंर्तमनाला जास्त महत्त्व देतो, आपल्या निशाला अगदी साजेसा मुलगा आहे. शिवाय मुलाकडच्यांची अशी इच्छा आहे की, मुलगी बघण्याचा कार्यक्रम मुलाच्या घरी व्हायला पाहिजे, मला तर वाटतं आहे, हेच घर आहे जिथे निशाच्या विचारांंना महत्त्व भेटेेेल, निशा तुझी काय इच्छा आहे? निशा मनातून तर खूपच उदास असते पण काकांंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तयार होते. लगेेेच निशाचे काका समोरच्या मंडळींना फोन करून संध्याकाळी कार्यक्रम ठरवतात. निशा विचार करतेे की अजून काय काय बघावे लागणार आहे या आयुष्यात कुणास ठाऊक.

कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं, दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं लागतं, जीवन यालाच म्हणायचं असतं, दुःख असूनही दाखवायचं नसतं, मात्र भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसाायचं असतं

Copyright @ Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all