सुंदर नातं भाग २

Story of beautiful relationship

मागील भागात बघितल्या प्रमाणे, रोहित पहिल्यांदाच मुलगी बघायला जाणार असतो, त्याला कांदेपोहे कार्यक्रमाची उत्सुकता लागलेली असते तर दुसरीकडे निशाला मुलगा बघायला येणार असतो, निशा रंगाने सावळी असल्याने पहिलेच काही मुलांकडून तिला नकार आलेला असतो, निशाला  कांदेपोहे  कार्यक्रमाचा कंटाळा आलेला असतो.

रोहितचे आई वडील नाशिकला राहत असतात, रोहित नाशिकला जाण्यासाठी शिवाजी नगर बस स्थानकावरुन बस मध्ये बसतो. थोडया वेळाने बस सुरू होण्याआधी एक मुलगी रोहितच्या शेजारी येऊन बसते, त्या मुलीने चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेला असतो. सीटवर बसल्यावर ती मुलगी हळूच तीचा स्कार्फ काढते, रोहित कडे बघून स्माईल देते आणि रोहितला विचारते, हाय रोहित, मला ओळखले की नाही, मी निकिताची मैत्रीण निशा, काल आपली भेट कॉफी शॉपमध्येे झाली होती.रोहित-- हाय निशा, ओळखले ना, तू  स्कार्फ बांधलेले असल्यानेे पटकन लक्षात नाही आलं. निशा--तू नाशिकला चाललायेस का?  रोहित---हो, माझे आई बाबा नाशिकला राहतात, तू पण नाशिकलाच चालली आहेस का? निशा--- नाही मी सिन्नरला चालली आहे, माझी आई सिन्नरला राहते. बर झाल तू भेेेटलास बसमध्ये, कंटाळा नाही येणार प्रवासाचा. मला एकट्याने प्रवास करायला खूप कंटाळा येतो. तेवढ्यात बस सुरू होते.  रोहित--- मला तर आवडतं एकटयाने प्रवास करायला, छानपैकी कानात हेडफोन टाकून गाणी ऐकत जायचंं. निशा--- प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. मला ही आवडत गाणी ऐकायला पण त्यापेक्षा जास्त मला गप्पा मारायला आवडतात.रोहित----मला गप्पा मारायला सुचत नाही, मी लहान पणापासूनच शांंत स्वभावाचा आहे. निशा--- असं काही नसतं, एकदा गप्पा मारायला सुरुवात केली की विषय आपोआप सुचत जातात. तुुुला बोअर झाले तर सांंग नाहीतर मी बोलतच राहील.  

तेवढ्यात रोहितला फोन येतो, रोहित फोनवर बोलत असतो, रोहितच्या बोलण्यावरून निशाला समजतं की रोहित मुलगी बघायला जाणार आहे, रोहितचे बोलणे संपल्यावर तो फोन कट करतो.    

निशा---- मुलगी बघायला जाणार आहे वाटतं, खूपच उत्सुक दिसत आहेस. रोहित---हो मुलगी बघायला जाणार आहे, ही पहिलीच वेळ आहे माझी म्हणूनच उत्सुकता आहे, कुठलीही गोष्ट पहिल्यांंदाच घडत असली तर उत्सुकता असतेच ना.  निशा--- हो उत्सुकता असायलाच हवी. रोहित--- खूप दिवसांपासून घरचे मागे लागले आहेत, लग्न कर म्हणून, पण मीच टाळत होतो. निशा--- का टाळत होता? रोहित--- माझ्या मते लग्न करताना मुलाने आर्थिकरित्या, मानसिक रित्या सक्षम असले पाहिजे, एक मुलगी आपलं घर सोडून मुलाकडे येते तेव्हा मुलाची जबाबदारी असते की मुलीच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, उगचं कोणी तरी म्हणतय म्हणून लग्न नसत करायचं.निशा--- किती छान विचार आहेत रे तुझे, असे विचार प्रत्येक मुलाचे असते तर किती बरे झाले असते. रोहित---- माझं सोड तुला अनुभव आहे की नाही कांदेपोहे कार्यक्रमाचा, की तुझी पण पाटी कोरीच आहे निशा--- याबाबतीत खूप अनुभवी आहे मी, गेल्या एक वर्षांपासून दर महिन्याला एक तरी कार्यक्रम होतो. मुलाकडचे बघायला येतात, चहा पितात, पोहे खातात, मला बघतात आणि घरी जाऊन सांगतात, आम्हाला मुलगी पसंत नाही. रोहित---- ते तर चालायचंच, प्रत्येकाची निवड वेगवेगळी असते. निशा--- सवय झालीय मला आता या सगळ्याची, पण राग येतो मुलांच्या मानसिकतेचा प्रत्येक मुलाला मुलगी सुंदरच हवी असते, सुंदरतेपुढे तीचे शिक्षण, तीचा स्वभाव काहीच दिसत नाही. रोहित----पण त्यात  चुकीचे अस काय आहे? सगळ्यांंना आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार असतोच ना, कोण म्हटलं तुला तू सुंदर नाहीयेस ते. निशा----- मला बरे वाटावे म्हणून खोटे बोलू नको, मला मान्य आहे, प्रत्येकाला जोडीदार निवडण्याचा हक्क आहे, मग त्यांनी बायोडाटा मध्ये स्पष्ट उल्लेख करावा की, मुलगी गोरीपानच असावी, बाकीच्या मुलींनी संपर्क साधू नये. रोहित----- रिलॅक्स निशा, किती साचलयं तुझ्या मनात निशा---- रोहित, मला ना हा कांदेपोहे कार्यक्रमच पटत नाही रोहित----- ही तर आपली परंपरा आहे ना, आपण नाही नाकारु शकत.निशा----- आपली परंपरा मी नाकारतच नाहीये, जी मुलगी रोज ड्रेस मध्ये वावरते, तिला कार्यक्रमाच्या वेळी साडीच घालावी लागते, साडीत मुलगी कम्फर्टेबल आहे की नाही याचा कुणालाही काही फरक पडत नाही, मग मुलांना का धोतर घालायला लावत नाही. सॉरी रोहित, जरा जास्तच बोलले  रोहित---- सॉरी काय त्यात, पण आपण तरी काय करु शकतो, आजपर्यंत जे चालत आलय ते तसचं चालत राहणार, तुझ्या मुळे मला कळलं तरी मुलींच्या मनात काय चालू असते. निशा---- मुलींच्या मनात काय चालू असते याची कुणालाच कल्पना नसते. रोहित----- बरं मला सांग, तुझ्या होणाऱ्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत?  निशा---- मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, मला पुढे नोकरी करण्याची इच्छा आहे, माझे करिअर माझ्या साठी खूप महत्त्वाचे आहे, जसे त्या मुलाचे स्वप्न असतील तशी माझी पण काही स्वप्न आहेत, ती पूर्ण करण्यासाठी मला पाठिंबा द्यावा, जशी त्या मुलावर आई वडीलांची जबाबदारी असेल, तशी माझ्या वरही माझ्या आईची जबाबदारी आहे. कस आहे ना रोहित कोणीच परिपूर्ण नसतं, त्याने मी जशी आहे तसचं मला स्विकारावे.रोहित---- खरं आहे निशा तुझं, कोणीच परिपूर्ण नसतं. Adjustment तर प्रत्येकालाच करावी लागते. निशा---- तुझ्या काय अपेक्षा आहेत तुझ्या होणाऱ्या जोडीदाराकडून?  रोहित----- माझं आणि तिच्या तलं नातं खास असावं, बायको होण्याआधी ती माझी चांगली मैत्रीण असावी. सुख दुःखात माझ्या सोबत खंबीरपणे उभी राहावी. माझ्या आई वडिलांना स्वतः चे आई वडील समजून सांभाळावे.  निशा----- वाव, किती छान विचार आहेत तुझे, नशीबवान असेल तुझी बायको.

सिन्नर जवळ आले होते, एवढा वेळ कसा गेला हे दोघांनाही कळले नाही.  निशा------ छान वाटलं तुझाशी बोलून, वेळ कसा गेला कळलंच नाही   रोहित---- हो ना,.तु म्हटली तसचं झालं, बोलायला लागलं की विषय आपोआप सुचत जातात, छान वाटल तुझ्याशी बोलून. निशा---- एक विनंती करते, उद्या मुलीला बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर तुझा जो काही निर्णय असेल तो मुलीला लवकर कळवं. रोहित---- हो नक्की.

सिन्नरच्या बस स्थानकावर बस थांबते, निशा रोहितला बाय म्हणून खाली उतरते.

©Dr सुप्रिया दिघे

🎭 Series Post

View all