Oct 28, 2020
प्रेम

सुंदर नातं भाग १

Read Later
सुंदर नातं भाग १

रोहित हा साॅफ्टवेअर इंजिनिअर, पुण्यात एका नामांकित कंपनीत नोकरी करत असतो. रोहितचा स्वभाव प्रेमळ, मनमिळावू, मितभाषी, नेहमी सर्वांना मदत करणारा. रोहित दिसायला गोरापान, उंच, राजबिंडा होता.                   नेहमीप्रमाणे रोहित सकाळी घाईघाईने ऑफिसला जायची तयारी करत होता तेवढयात त्याचा फोन वाजला, रोहितने फोन बघितला तर बाबांचा फोन येत होता, रोहितला प्रश्न पडला,यावेळेला तर बाबांचा फोन येत नाही म्हणून रोहितने घाईघाईने बाबांचा फोन घेतला. रोहित-- Good morning बाबा, एवढया सकाळी कसा काय फोन केलात? घरी सगळे ठीक आहेत ना. बाबा-- अरे हो सगळं सांगतो, घरी सगळे ठीक आहेत, उद्या सुट्टी घेऊन घरी ये, तुझ्या साठी मुलगी बघायला जायचंय. मुलगी साॅफ्टवेअर इंजिनिअर आहे, पुण्यात नोकरी करते, तुला साजेशी मुलगी आहे रोहित--बाबा पण असं अचानक  बाबा--- मला बाकी काही सांगू नकोस, उद्या घरी ये मग सविस्तर चर्चा करु,  बाबांनी रोहितच्या उत्तराची वाट न पाहता फोन ठेवून दिला. रोहितने घडयाळात बघितले तर वेळ खूप झाला असल्याने ऑफिसला जायला उशीर नको म्हणून पटपट आवरुन निघाला. रोहित ऑफिसला गेला आणि त्याच्या जागेवर जाऊन बसला पण आज रोहितचे कामात लक्षच लागत नव्हते, राहून राहून रोहितच्या मनात एकच विचार येत होता, कशी असेल ती मुलगी? माझ्या मनातल्या राजकुमारी सारखी असेल का? काय बोलू मी तिच्याशी? अशाप्रकारे खूप सारे प्रश्न रोहितला पडत होते. विचार करत असतानाच रोहितने राहुलला फोन करून संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर काॅफी शाॅप मध्ये भेटायला सांगितले. राहुल हा रोहितचा कॉलेज पासूनचा जिवलग मित्र. रोहितला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे राहुलच  देऊ शकेल म्हणूनच रोहितने राहुलला भेटायला बोलावले.  ठरल्याप्रमाणे रोहित व राहुल संध्याकाळी काॅफी शाॅप मध्ये भेटले.राहुल---- बोला रोहित साहेब,  आज कशी काय आठवण  काढली या गरीबाची, काय विशेष? रोहित---राहुल नौटंकी बंद कर तुझी, पहिले काॅफी ऑर्डर करुया. राहुल--- बोल काय म्हणतोस?  रोहित--- आज सकाळी बाबांचा फोन आला होता,  उद्या घरी बोलावलय,  मुलगी बघायला जायचंय. राहुल--- अरे वा,  काय करते मुलगी?  रोहित---साॅफ्टवेअर इंजिनिअर आहे, इथे पुण्यातच आहे नोकरीला. राहुल--- चांगलच आहे ना मग,  तुला पण पुण्यातच नोकरी करणारी मुलगी पाहिजे होती ना. मग प्राॅब्लेम काय आहे? रोहित--प्राॅब्लेम काहीच नाहीये पण तुला तर माहीतच आहे ना, आजपर्यंत मी कुठल्याही मुलीशी कामाव्यतिरिक्त काहीच बोललेलो नाही, आता अस अचानक एका अनोळखी मुलीसोबत काय बोलू? मला कसे कळणार ती माझ्या योग्य आहे की नाही. मला जाम टेंशन आलय रे. राहुल---- अरे एवढा विचार नको करु, तु फक्त कांदेपोहे कार्यक्रमाचा आनंद घे. असं थोडेच आहे का, तु मुलगी बघितली व लगेच लग्न झाले. मी तुला काही टीप्स देतो.  अशा रीतीने रोहित व राहुलचे बोलणेेेेेे चालूूच होते तेवढयात राहुलची मैत्रीण निकिता तिथे येते.निकिता---- हाय राहुल, किती दिवसांंनी दिसतोयस, खूूूपच  बिजी  झाला आहेेस वाटतं  राहुल--- हो  थोडा कामात बिजी आहे, पण तू इकडे कशी  काय, एकटीच आली आहेस का?  निकिता--- माझ्या एका मैैैैत्रीणीला भेटायला आले आहे, येतच असेेल, राहुल  रोहित व निकिता ची एकमेकांशी ओळख करून देतो. तेवढ्यात निकिता ची मैैैैत्रीण निशा  तिथे येते. निकिता निशाची ओळख राहुल व रोहितशी करुन देेेते. राहुल व रोहित कॉफी शॉप मधून बाहेर पडतात. निकिता व निशा एका टेबलवर जाऊन बसतात आणि कॉफीची ऑर्डर देतात. निकिता--- बोल निशा काय म्हणतेस,  फोन करून  का बोलावून घेतले?  निशा--- अगं आज सकाळी आईचा फोन आला होता, उद्या घरी बोलावल आहे, परवा मुलगा बघायला येणार आहे. निकिता--- अरे वा मस्तच आहे की,  काय करतो मुुुलगा? निशा--- साॅफ्टवेअर इंजिनिअर आहे, पुण्यातच नोकरीला आहे. निकिता--- चांगलाच आहे ना, तुला असं तोंड पाडायला काय झालंय? निशा--- कंटाळा आलाय मला या कार्यक्रमांचा, प्रत्येक वेळी साडी घालायची, नटून थटून सर्वांसमोर  जायचं, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे खाली मान  घालून द्यायची. आणि समोरच्या पाहुण्यांंनी घरी जाऊन मुलगी पसंत नाही म्हणून  नकार द्यायचा. खरचं दिसणंं   एवढं महत्त्वाचे असते का? निकिता--- निशा नको काळजी करुस, तुुुझ्या गुणांची कदर करणारा भेटेल, रिलॅॅक्स  हो आणि घरी जा  उद्या, नाराज असलीस  तर काकूंना वाईट वाटेल.  निशा--- आईचाच विचार करून तर शांंत राहते.  बाबा गेल्या पासून खूूप सोसलय  ग आईने. अशा रीतीने गप्पा संपवून निशा व निकिता काॅफी शाॅप मधून बाहेर पडतात. निशा ही साॅॅफ्टवेअर इंजिनिअर आहे,   पुण्यात नोकरी करते, निशा लहान असताना तीच्या वडीलांचा मृत्यू होतो.निशाची आई तीच्या काका काकूूंंसोबत  गावाकडे राहत असते.                                                         वरील प्रमाणे निशा व रोहित दोघेही लग्न करण्याच्या उंंबरठयावर असतात, दोघांची  ही मनस्थिती सारखीच असते फरक फक्त एवढाच असतो की, रोहित पहिल्यांदाच मुलगी बघायला जाणार होता तर निशा मात्र तिच्या दिसण्यासाठी खूप नकार पचवून बसली होती. दोघांनाही कल्पना नव्हती  की पुढे काय वाढून ठेवले आहे. 

रोहित आणि निशाचा पुढील प्रवास बघूया पुढच्या भागात

 © Dr सुप्रिया दिघे