रात्रीचा सुंदर प्रवास

Beautiful Night Traveling.

                        रात्रीचा सुंदर प्रवास

  रात्री प्रवास करतांना खुप छान seen दिसत असतात. दिवसा उजेडात जे आपण पहातो कदाचित त्यापेक्षा ही काही सुंदर असे seen रात्री दिसतात. आणि मुख्य म्हणजे रात्री दिसतात अंधारात चमकणारे lights .

     जशी बस highway ला लागते तसा सुरु होतो गाड्यांंचा पाठशिवणीचा खेळ. कधी मागे,कधी पुढे, कधी पहिली लेन, कधी दुसरी, कधी तिसरी . असा गाड्यांंचा खेळ मोठ्या highway वर बघायला मजा वाटते.

   आणि काही वेळा नंतर येतो माझ्या आवडत्या नर्मदा नदीवरील पुल.  नदीवरच्या  पुलावरची lighting खूप छान दिसते. रेवा शांत वहातांना दिसते. अस.वाटत किनाऱ्यावरील मंदीरातील देव आराम करत आहे.

     रात्री आकाशात दिसतात चंद्र आणि चांदण्या .जसे तेही आपल्या बरोबर येत आहे. केव्हा चंद्र दिसत नाही आणि मग थोड्या वेळाने दिसतो. जस तो आपल्याला सांगत असतो मी येतोय तुमच्या सोबत गावाला मजा करायला.

     रात्री घाट चढतांना बस चा वेग थोडा कमी होत असल्याने झाड , शेत  छान दिसतात. तर कुठ झोपळ्यां मधील lights चमकतांना दिसतात. नागमोडी वळणाचा घाट रस्ता असतांना त्या रस्ता वरील चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या गाड्यांंच्या light मुळे रस्ता सुंदर दिसतो. नागमोडी गोल गोल रस्त्यावर गाड्यांंची lighting चालत असते. चढत, उतरत असते.

    घाटात दिसतात उंच उंच झाड आणि प्राणी ,पक्षी असलेले bords .

  जशी रात्र वाढलेली असते आणि घाट घाट असतो तशी खुप छान थंडगार हवा लागत असते.

    एखादे गाव आले की ते गाव त्या गावातील चालू असलेले light दिसतात.

  रात्री गाव समजते तर तिथल्या light वरून .कमी light असले तर छोट गाव आणि जास्त lights असले की मोठ गाव. असा साधारण अंदाज.

  मधुनच शेता जवळ असलेले घर आणि त्यांचे light दिसतात.

    जशी सकाळ व्हायला येते तस सुंदर थोड थोड उजळतांना दिसत.

   आणि .....आणि..... आणि.... मग दिसतात खुप लांब पसरलेले light . मोठ  गाव / शहर .

      आल....आल......आल......नाशिक आल..

   खुप आनंद होतो.

  खुप दिवसांनी जवळच्यांना भेटता येणार असत.मग मनात चालू होते या वेळेस कुठे कुठे फिरायला जायच काय काय करायच आहे.

  उजळतांना सकाळी सकाळी दिसते लोकांची लगबग आणि आपण वाट पहात असतो आपल्या ऊतरणाऱ्या stop ची .