हे दिवस चांदण्यांचे...

A Poem On Love

धुंद वाहणाऱ्या वाऱ्याचे..
मंद वाहणाऱ्या लाटांचे...
अलगद मिठीत कवटाळण्याचे
आठवणींच्या पावसात मन चिंब भिजण्याचे..
हे दिवस चांदण्यांचे.....


नव्या आठवणीत फुलण्याचे..
फुलांमध्ये हरवून जाण्याचे...
शाल गडद काळोखाची पांघरण्याचे...
रजनीच्या विसाव्यास निवांत पहुडण्याचे..
हे दिवस चांदण्यांचे....


मनातील वादळांना बोलके करण्याचे..
अस्थिर मनाला शांत करण्याचे...
तुझ्या स्पर्शाने मोहून जाण्याचे....
फुलपानं थेबांने सजण्याचे...
हे दिवस चांदण्यांचे....


गंध मातीचा दरवळण्याचे..
तुझ्या शब्दांमध्ये विरघळण्याचे..
पापण्यांच्या पंखामध्ये अश्रू वाहण्याचे...
मोकळ्या नभांगणास अनुभवण्याचे...
हे दिवस चांदण्यांचे....


तु चंद्र नभीचा होण्याचे...
हातात हात गुंफूणी सूर प्रेमाचे छेडण्याचे..
मैफिलीत चांदण्यांच्या रमण्याचे...
श्वास श्वासांत फुलण्याचे...
हे दिवस चांदण्यांचे...!!

कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे