बायकोचा ©®Copy Right

Baykocha


बायकोचा ©®copy rights
तिला समजणे कठीण आहे..

संघ.... मुंबई
प्रकार...लघुकथा

ती... अरे तू घरभर पसारा करतोस आणि सगळीकडे तुझ्या वस्तू शोधत बसतोस..

तो... अग तू आहेस ना ,इतके बोलण्यापेक्षा शोधून दे जरा

ती... ज्याने त्याने आप आपले काम एकदम परफेक्ट करावे.. म्हणजे कोणाची मदद घ्यायची गरज लागत नाही

तो... तुझ्या वस्तू कधी हरवल्यात तर मीच शोधून देतो..तू ही केली मदद शोधायला तर बिघडणार कुठे..

ती... पण मी तुला कधी सांगतच नसते वस्तू हरवली आहे शोध म्हणून..

तो.. बरोबर आहे,आता तुला कसे काय आठवणार, माझ्यावर आता वेळ आली आहे ना.

ती... त्यासाठी कामात perfection असायला
हवे, जे तुझ्यात नाही, तुला ते कोणी शिकवले नाही..तू आपला लाडाचा बाबू..

तो... ए, माझ्या आईकडे जायचे नाही कळलं

ती... अरे मी तर नाव पण नाही घेतले त्यांचे

तो....तू आत्ता म्हणालीस ते काय होते,कोणाला
उद्देशून होते

ती.... तुला असे वाटले का मी आईंना उद्देशून
बोलले, छे रे !!.. मी का असे म्हणू बाबा..

तो....10 min पासून बोलते ,कोणी आदर्श
गृहिणी असती तर तीने हातात माझे पाकीट
देऊन मोकळी झाली असती, कट कट
ऐकण्यापेक्षा..

ती..... मी आदर्श आहे ,पण गृहिणी नाही..मग मी
का शोधू... बस शोधत तू तुझे पाकीट..

तो... तुला खूप अभिमान आहे ना ,बघच तू
आता ,फक्त एखादी वस्तू हरवू देत मग
बघतो..

ती.....चल, चल हे ह्या जन्मी तरी शक्य नाही हो,
तुला पुढच्या जन्मात मिळेल chance... वाट
बघ

तो... मी आणि पुढच्या जन्मात ..ते ही आणि
तुझ्यासोबत....वाट बघ...

ती.... बंधलंय मी तुला वडाला ,आता तू माझाच
आहेस...सुटू शकत नाहीस...एकदम पक्का
धागा आहे ..मागच्या वर्षीचा ही अगदी तसाच
पक्का होता आणि ह्या वर्षीचा ही..

तो... पण अद्दल घडवणार तुला

ती.... जमतंय का बघ..अद्दल घडवायला

तो.... देव दयाळू आहे ,तू बघशील

ती.... बर ,बघ करतो का देव तुझ्यावर दया

तो... मला दृढ विश्वास आहे हो..

ती... हम्मम, बरं चल मी निघते ऑफिसला

ती त्याच्या सोबत बोलत असतांना तिने चुकून तिचे सगळे ड्रेस त्याच्या कपाटात टाकले हे तिच्या लक्षात आलेच नाही... आणि त्याच्यावर हसत बाहेर पडली..

तो.... अब आयेगा उट पहाड के नीचे...बघू लक्षात येते की नाही ते..

ती ऑफिस मधून घरी येते ,ड्रेस बदलू म्हणून तिच्या कपटाकडे जाते...आणि सकाळी घडी घालून ठेवलेले कपडे तिला दिसत नाहीत..त्यात तिचा गाऊन काही शोधल्या सापडत नाही.. तिच्या असलेल्या सगळ्या ठिकाणांवर शोधते.. पण सापडत नाहीत...ती त्याच्या कपटाकडे तर ढुंकून ही बघत नाही...तिला विचार ही येत नाही की आपण चुकन इथे तर ठेवले नसतील ना..
कारण तिला माहीत असते, मी अशी चूक चुकून ही करणार नाही...माझी शिस्त म्हणजे माझी शिस्तच...मी जर अशी करायला लागले तर माझ्या perfection मध्ये आणि त्याच्या गचाळ पणा मध्ये काय अंतर ....मी हे करू शकत नाही ,आणि म्हणून मी त्याच्या कपाटाला मुळीच हात लावणार नाही...सगळे कपडे माझ्या कडे दार उघडल्या उघडल्या धाव घेऊ लागतील..

ती....मी तर शोधून शोधून कंटाळले...त्याला विचारावे तर तो आता भाव खाईल..

तो... काही शोधतेस...काही हरवलंय...काही गवसत नाही...म्हण की तू ही चूक करू शकते.. मॅडम perfection..

ती.... अजून ही मी हारले नाही, मी मान्य करणार नाही..मी शोधून काढेन फक्त तू मला disturb करू नकोस..मी विचारत आहे ,जरा दीर्घ श्वास घेऊन शांत बसते आणि आठवते, असे केल्याने ठेवलेली वस्तू कुठे ठेवली हे लगेच लक्षात येते..

तो... हो तू कर, कर तुझा योग कर, आज माझा योग आला आहे, मी मदद करू म्हणालो असतो, पण तुला गरज नाही ना...

ती.... नकोय तुझी मदद, त्यात ही घोळ घालून ठेवशील..imperfect नवरोबा...

तो.... असू दे मग...

ती योग करता करता लगेच त्याच्या कडे जाते आणि जोरात ओरडते, काय हे किती हा आळस, जरा तरी माझ्याकडून शिक रे...ते कपडे सकाळपासून लोळत पडले आहेत, त्यांना कपाटातील जागा दाखव जरा...ठेव ते आत आता तरी...का ठेवलेस हे असे प्रदर्शन करत बाहेर

तो.....असं कर तूच ठेव ते आत...please please तूच ठेव ते आत....आजच्या दिवस फक्त..

ती.... तू कमाल आहेस...तुझे काम मी करू..पडू दे तसेच मग...उद्यापर्यंत

तो.... स्वीटू...तूच ठेव ग...मी मान्य केलं तुझं perfection, मी मान्य केले की तू great आहेस.... गुणाची बाई तू तुझ्या बाबांची...

ती.... म्हस्का मारतोस तर ठीक आहे ,जा जरा तुझ्या हातची मस्त कॉफी बनव, मला खूप आवडते...एकदम परफेक्ट कॉफी ,तर एकदम perfect साखर असते तशी...

तो..... एकदम जोऱ्यात.."ए तू काय म्हणालीस ,मी काय ऐकले ,काय ते शब्द ,perfection....perfect हे माझ्या बाबतीत पहिल्यांदाच म्हणालीस...विश्वास नाही बसत...मी वेडा होईल असे गुणगान ऐकून...नको इतका जोऱ्यात झटका नको..

ती... जा नीट जा आणि तुझी ती बेकार कडू कॉफी घेऊन ये, जास्त कौतूक तुला सहन होत नाही म्हणूनच मी ही ते करत नाही..

तो.... बरं मग ठेव ते कपडे...

ती... अरे हो ठेवते

तो... मला बघायचा तुझ्या चेहऱ्यावरचा आंनद

ती.... वेडाच आहेस, त्यात काय आंनद.. कपडे ठेवते...तुझं कपाट नाही आवरत....

तो.... मला तरी तुझ्या चेऱ्यावर आनंद पहायचा आहे..

ती... मग तर मी नाहीच ठेवणार...तूच ठेव

तो.... ok मी मुकणार ह्या अविस्मरणीय क्षणाला..

ती..... डोक्यावर पडला होता ना तू लहानपणी ,आई म्हणत होत्या..

तो आत जातच असतो की ती कपटाकडे कपडे ठेवायला जाते...आणि कपाट उघडताच समोर जे पहाते ते पाहून, जरा शांतच होते..आपण अशी चूक कशी करू शकतो...हे मी केलेच नसणार.. हे काम ह्यांचेच असणार नक्की....

ती....तुम्ही हे आधी का नाही सांगितले, मान्य आहे मी बोलण्याच्या नादात चूक केली ,पण तुम्ही ही सांगायला पाहिजे होते...गम्मत बघत होतात तर...म्हणजे मी कधी चूक करेन आणि मग तुम्ही कसे मला रंगे हात पकडणार...

तो.... मी तर काहीच नाही बोलत ग, मी साधा सरळ, मी फक्त तुझ्या चुकीला ही तुझे perfection समजतो...कारण मी तुझ्यावर प्रेम करतो... तुझ्या perfection चा अभिमान आहे ,पण म्हणून त्यात कुठेही चूक शोधावी हे माझ्या मनाला नाही पटत..

ती.......मला मला शिकवले होते, परफेक्ट माणसाला परफेक्ट करण्याचा नादी लागू नये, म्हणूनच मी तुझ्या नादी लागत नाही...

तो... म्हणजे मी तुझ्या लेखी खरंच परफेक्ट आहे??

ती... नक्कीच, फक्त हे कधी कधी मी imperfect वागायला लागले की तुझ्या perfection मध्ये मुद्दाम चूक काढते रे... पण मी ही imperfect आहे हे मला माहित आहे..

तो....ओ तर तू जेलस होतेस तर...

ती....जरा चांगले म्हंटले की तुम्ही कॉफी बिघडवून टाकलीच..अगदी imperfectly perfect husband आहात ह्या कॉफी सारखे..

तो.....एक सांगू, तू नेहमी अशीच हक्काने गोड गोड भांडण करणार असशील तर मला चुका करायला आवडेल...नको परफेक्ट नवरा, मी आपला imperfect बरा... मग घर एकदम टापटीप...स्वच्छ, कृत्रिम, आणि हॉटेल सारखे वाटेल, मी ही perfect, तू ही perfect मग मज्जाच येणार नाही...म्हणून असू दे मी जसा आहे तसा...तू फक्त मला सावरून घेत जा, जर तुला वाटलेच की मी इथे अगदीच imperfect वागत असेल तर..

ती.... नाही अरे, तू माझ्या पेक्षा ही खूप परफेक्ट माणूस आहेस...तुझे मन परफेक्ट आहे, त्यात खोट नाही...हेच खास आहे तुझ्या बाबतीत..

तो... यार तू तर रडतेस...

ती... मग तूच मला रडायला लावलेस

तो... अरे ते कसं काय

ती.... माझ्या नवऱ्याला imperfect म्हणून..

तो... शांत

ती.... मला नाही आवडणार कोणी त्याला imperfect म्हंटल तर, एकवेळ मी म्हणाले तरी चालेल पण कोणी अशी हिम्मत चुकून ही करू नये ,खुद्द त्याने ही नाही..त्याच्यावर माझेच copy rights आहेत...

तो... तुला समजणे तर देवाला ही कठीण आहे..


©®anuradha andhale palve