बायको ची वसंत पंचमी

"साडी "शब्द कानावर पडताच प्रशांतने कान टवकारले.आज जाईन बाजारात तेव्हाच तर सगळी छान तयारी होईल ना !" बरं- बरं- ठेवते ग आता, अजून टिफिन भरायचा आहे ग याचा, भेटू मग.""अहो --ऐका ना" प्रियंका चा आवाज मधाळ झाल्यासा वाटला.'हं, बोल-- काय सेवा'??'आज लवकर घरी ये ना रे'!!कां ग ?"क्या- इरादा है !पियू".'अरे- मला एक साडी घ्यायची आहे'.साडी??-- पण तू तर फारशी नेसत नाही, सूट,जीन्स---प्रशांत ला मध्येच थाबवत---हो-रे पण क्लबमध्ये वसंत पंचमी चा कार्यक्रम आहे ना, त्यात ठरले आहे तेव्हा---.
* बायको ची वसंत पंचमी*

प्रशांत आरशासमोर उभा राहून दाढी करत होता.
प्रियंका, त्याची बायको --आपल्या कुठल्याशा मैत्रिणीशी फोनवर..
"अग हो मॅडम चा फोन होता\" , त्याचाच विचार करतेय,!
"मी व्हाईस प्रेसिडेंट, त्यामुळे ड्रेस कोड मी जर फॉलो नाही केला तर कसे बरे दिसेल"???
तिकडून काय बोलणे झाले ते काही प्रशांतच्या कानावर आले नाही.
"एक घेऊनsच घ्या वी झालं साडी, लग्नातली खूपच ओल्ड झाली ग"!
"साडी "शब्द कानावर पडताच प्रशांतने कान टवकारले.
आज जाईन बाजारात तेव्हाच तर सगळी छान तयारी होईल ना !"
बरं- बरं- ठेवते ग आता, अजून टिफिन भरायचा आहे ग याचा, भेटू मग."
"अहो --ऐका ना" प्रियंका चा आवाज मधाळ झाल्यासा वाटला.
"हं, बोल-- काय सेवा"??
"आज लवकर घरी ये ना रे"!!
कां ग ?"क्या- इरादा है !पियू".
"अरे- मला एक साडी घ्यायची आहे".
साडी??-- पण तू तर फारशी नेसत नाही, सूट,जीन्स---
प्रशांत ला मध्येच थाबवत---हो-रे पण क्लबमध्ये वसंत पंचमी चा कार्यक्रम आहे ना, त्यात ठरले आहे तेव्हा---
प्रशांत नी मनाशी हिशोब केला मागची दोन वर्षे लॉक डाऊन मध्ये प्रियंकाने खूपच साथ दिली. काहीही म्हणून मागितले नाही तेव्हा. आणि आता सगळं व्यवस्थित सुरू आहे, कालच मिटिंग मध्ये टार्गेट पूर्ण झाल्याने बॉस पण खुश ,प्रमोशनच्या पण चान्स आहे त्या आनंदात एक साडी कुछ भी नही.

संध्याकाळी प्रियंका प्रशांत साड्यांच्या दुकानात---
प्रशांत एका सभ्य नवऱ्या प्रमाणे खुर्चीवर बसून साड्या नेसलेल्या पहात बसला, आणि प्रियंका चोखंदळ ग्राहक प्रमाणे गादीवर बसून साड्या पाहत पाहत दुकानदाराला सांगत होती.
"पीली साडी, बसंती रंग की बताना".
दुकानदाराने पिवळ्या साड्यांचा ढीग लावला.
इस मे ज,sरा बडी बॉर्डर बताना, और,टर्मरिक यल्लो सितारो वाली भी बताना.
पहिला गठ्ठा एका बाजूला सरकला.
आणि मोठी बॉर्डर आणि चमकधमक वाल्या साड्या येऊन पडल्या.
त्या चमचम चांदण्यांनी प्रशांत चे डोळे दिपून गेले.
पण प्रियंका ची नजर अजूनही भिरभिरत होती.
बाजूच्या काउंटरवर अजून काही बायका साड्या पाहात होत्या त्यातली एक पिवळी साडी पाहताच,
वो-मस्टृर्ड यल्लो बताना म्हणतात ती साडी इकडे येऊन पडली.
बराच वेळ झाला-- , त्या फिक्‍या, गडद, पिवळ्या, बसंती कां काय म्हणतात त्या साड्या पाहून पाहून प्रशांतला आपल्याला पिवळ्या झाल्यासारखे वाटू लागले,

"ही सनसेट यलो कशी आहे रे"-- म्हणत प्रियंका ने ढिगार्‍यातून एक साडी खेचून बाहेर काढली--
पिवळ्या ची इतकी नांव असतात? प्रशांत चक्रावला.
वा ssमस्तच-- एकदम झकासss तुला खूsप खुलेल,
चला सुटलो एकदाचे (मनातल्या मनात म्हणत) प्रशांत उभा राहिला.
आपका चॉइस एकदम बढीया है मॅडम दुकानदाराने म्हणताच साडी कॅश काउंटर वर गेली.
"चला झालं ना? आता काहीतरी खाऊ या भूक लागली आहे".
\"पण अजून ॲक्सेसरीज घ्यायचा आहेत, म्हणजे मॅचिंग बांगड्या, ईयरिंग, पर्स वगैरे\".
"आलिया भोगासी की पिवळ्या पंचमी शी असावे सादर" म्हणत बाकी खरेदीही झाली
घरी येता येता "अग पण दुसऱ्या रंगाची का नाही घेतली पिवळाच कां?
"अरे पिवळा रंग उत्साहाचे प्रतीक असतो. वसंत पंचमी आहे ना पिवळ्या रंगावर बरेचसे लेक्चर प्रियंकाने प्रशांतला सुनावले",( जे तिला क्लबमध्ये द्यायचे होते) त्यातले काही त्याच्या कानावर तर ,काही गाडीच्या आवाजातच विरून गेले.

दुसरे दिवशी संध्याकाळी,
प्रशांत बाल्कनीत उभा होता. समोरून प्रियंका आणि तिच्या क्लबच्या मैत्रिणींचा घोळका येताना दिसला.
त्यां पिवळ्या रंगा चा घोळका पाहून प्रशांतला आठवले
शाळेत हिंदी विषयात" सावन के अंधे को हरा ही हरा नजर आता है, अशी एक म्हण होती.
त्याच प्रमाणे" बसंत के प्रेमी को पीला ,पीला ही नजर आता है" ही नवी म्हण कशी वाटेल?
प्रशांत मनातल्या मनात विचार करु लागला.
\"तरी बर आॅफीस मधे हे फॅड नाही पोचले नाही तर"पिवळी पितांबर नेसलेले पुरुष "कल्पनेनेच त्याला हसुं फुटलं.

रात्री बेडरूममध्ये शिरताना प्रशांत विचार करत होता, प्रियंका वर चढलेला पीतज्वर उतरवून लवकरच व्हॅलेंटाइनच्या गुलाबी रंग चढवायला हवा.
-----------------------------------------