बावरे मन...भाग-62

बावरे मन..भाग 62 (हो ग नाही लावत........विचारेन मी तिला........सुजय बर......स्नेहा ते नव्हे दादुने कस काय सोड??

बावरे मन..भाग 62

(हो ग नाही लावत........विचारेन मी तिला........सुजय

बर......स्नेहा

ते नव्हे दादुने कस काय सोडल तुला......सुजय स्नेहाला चिडवत म्हणाला

गप्प रे....तु पण झालास का सुरु आता.....स्नेहा

हो मग काय......आमचा अधिकार आहे तो.....सुजय)

आता पुढे.....

हो का.......घोडेमैदान जास्त लांब नाहीये......आमची पण वेळ येणार आहे लक्षात असु दया....स्नेहा सुजयला चिडवत म्हणते.....

हो का.....चिडव हा.....मला काहीच फरक पडणार नाहीये......सुजय

हो का बघुया हा.........फरक पडतो की नाही ते.......स्नेहा

कोणाला कशाचा फरक पडतोय......रेवा बोलत सुजयच्या रुममध्ये येते........

रेवाच्या अचानक येण्याने सुजय व स्नेहा दचकतात....हिने काही ऐकल तर नसेल ना हा विचार त्यांच्या मनात आला ते दोघे एकमेकांकडे पाहतात.....

अरे काय झाल एकदम शांत का झालात.....काही महत्वाच बोलत होता का.....मी जाऊ का मग.....रेवा

अग काही महत्वाच नाही असच इकडच्या तिकडच्या गप्पा....स्नेहा

ओ.....बर बर.......रेवा

रेवाच्या अशा बोलण्याने स्नेहाच्या व सुजयच्या लक्षात येत की हिने काही ऐकल नाहीये....तसे दोघे रिलॅक्स होतात.....

तु इथे कशी काय........स्नेहा

अग....तु रुममध्ये कुठे दिसली नाहीस ना....मग मी तुला इकडे तिकडे शोधत होते.....मग तुझा सुजयच्या रुममध्ये आवाज आला म्हणुन तुला पहायला आले......रेवा

अग मला रुममध्ये बसुन कंटाळा येत होता....मला काही काम पण करु देत नाहीये तुम्ही....मग काय करु म्हणुन सुजय सोबत गप्पा मारत बसले......स्नेहा

इथुन पुढे तुलाच काम करायच आहे.....आता कर आराम........रेवा

हो ग पण कंटाळा येतो ना......अस बसुन सवयच नाही...स्नेहा

मग आपण काही तरी करुया का.....रेवा

काय करणार.....त्यापेक्षा गप्पाच मारत बसुया आपण.....स्नेहा

बर चालेल......पण सुजय तुला काही काम नाहीये ना......रेवा

अग नाही....सुजय

बर..रेवा

रेवा आपल्या दोघांची सुट्टी उदया संपतेय लक्षात आहे ना.....सुजय

हो आहे लक्षात.....नको वाटायल आता बॅकेत जायला.....किती धमाल येत होती ना लग्नात.....रेवा

नको तर मला पण वाटालय पण काम तर कराव लागणारच आहे ना.....सुजय

हो ते पण आहेच....रेवा

वहिनी तुझी सुट्टी आहे अजुन बाकी.....तुम्ही निवांत फिरायला वगेरे जाऊन या.......सुजय

अरे जास्त कुठे शिल्ल्क आहे..फक्त आठ दिवस तर आहे.....स्नेहा

मग तुला वाढवुन हवी आहे का ‍सुट्टी.......सुजय

अरे नको.....खुप सुट्टया झाल्या आहेत आता कामाच पण पहायला हव ना...नाही तर बॅकेतील स्टाफमध्ये चर्चा नको....मॅनेजर सरांची वहिनी झालेय म्हणुन हिला सुट्टी वाढवुन मिळाली आहे...स्नेहा

हो ग ते पण होवु शकत.....लग्न ठरल तेव्हाच म्हणत होते...आता काय स्नेहाला ओरडा बसणार नाही.....रेवा

अशी चर्चा होती त्यावेळी.......सुजय

हो अरे.......चालायच लक्ष दयायच नाही आपण....स्नेहा

हमम..ते पण आहे.....

ये रेवा.......तु इथे आहेस होय....मी कुठे कुठे शोधतेय तुला......आध्या रुममध्ये येत बोलते....

अग काय येवढ का शोधतेयस तिला....सुजय

अरे मालतीकाकु बोलवत आहेत तीला....आध्या

का ग.....आई का बोलवत आहे....रेवा

काही माहीत नाही ग.....चल पटकण काही तर काम आहे वाटत...आध्या

बर चल जाऊया.....मी आलेच हा.......रेवा

हो चालेल.......स्नेहा

कशी आहे ना ही.......सुजय

म्हणजे........स्नेहा

बग ना जरा पण दमत नाही....सतत काम काम काम....सुजय

हो..तशीच आहे....काम करायला आवडत तिला.....स्नेहा

ये वहिनी रेवा बद्दल काही तरी सांग ना......सुजय

काय सांगु सांग.......स्नेहा

जे तुला माहिती आहे ते सगळ......सुजय

मग स्नेहा तिला ज्या गोष्टी माहिती होत्या त्या सगळया सांगत होती....

सुजय तुला एक सांगायच राहिलच......आम्ही दोघी बॅकेतुन घरी जायचा ना तेव्हा एक मुलगा रेवाच्या मागे मागे यायचा....ती मला सांगितली होती पण मी तिला लक्ष देवु नको म्हणुन सांगितल होत....पण तो मुलगा रोज मागे मागे यायचाच....आणि ते दिसायला पण बरोबर दिसायच नाही.....थोडया दिवसांनी ना आजुबाजुचे ओळखीचे लोग बोलायला पण लागले...त्यावेळी रेवा मला एवढ ओरडली होती ना...तु गप्प का बस म्हणालीस मला....त्याच वेळी त्या मुलाला अद्दल घडवली असती तर एवढ झाल असत का......मग मला काय कराव कळेनाच मी फक्त सॉरी बोलले आणि गप्प बसले........पण रेवा खुप चिडली होती..आज तो मागे येवुच दे त्याला आज कशी अद्दल घडवते बग अस म्हणाली आणि तिच ती काम करु लागली...पण मला टेन्शन नेमक ही काय करणार आहे हे कळायला मार्गच नाही..मग काय संध्याकाळ व्हायची वाट पाहत बसले...आणि बॅकतुन जसे आम्ही बाहेर आलो आणि त्या मुलाला पाहिल तेव्हा मला खुप भिती वाटु लागली....आता ही काय करते काय माहित......पण ती त्याला काहीच बोलली नाही....ती तसच स्टॉपपर्यत नेहमीसारखी येवुन थांबली....नंतर मुलगा त्यादिवशी रेवाच्या बाजुलाच येवुन थांबला.....तेव्हा मात्र रेवा जास्तच चिडली........आणि त्या सगळया लोकांच्या एवढ बोलली ना.....शेवटी तो काय म्हणाला असेल.......स्नेहा

काय बोलली.....सुजय सुध्दा उत्सुकतेने विचारला.......

ताई मला माफ करा इथुन पुढे मी तुमचा पाठलाग करणार नाही.........अस म्हणुन स्नेहा हसायला लागली...

काय....कसली डेरिंगबाज आहे यार ही......सुजय

मग काय..अजुन तु तिला ओळखलयस कुठे.......कळेल पुढे पुढे.....स्नेहा सुजयला चिडवत म्हणाली....

हो का बघु हा.......सुजय

अरे हो आणखीण सांगायच राहिलच की........स्नेहा

काय.....सुजय

पण तु तिला सांगणार नाहीस ना कि मी तुला सांगितल आहे.......स्नेहा

नाही ग सांगत.....सांग.....सुजय

तु जेव्हा सुरवातीला आलास ना....बॅकेत.....तेव्हा तु तिला पहिल्याच दिवशी ओरडला होतास..आणि ते कमी काय म्हणुन परत दुसऱ्या दिवशी ही......आणि ते ही त्या राकेशीची चुक होती आणि तिला ओरडला होतास..........स्नेहा

हा मग काय झाल......काही म्हणत होती का रेवा.....सुजय

तेव्हा पासुन ना तिने तुला नाव पाडल होत.......ते मी तुला सांगितल होत ना....स्नेहा हसत म्हणाली.....

हो त्याच काय झाल मग.....सुजय

अरे मग नंतर मी म्हणाले ना की काय म्हणत होता खडुस.......तर त्यावर म्हणायची.....ए स्नेहा मी म्हणत होते तेवढा खडुस नाहीये ग तो.....चांगला आहे.......स्नेहा

अस म्हणायची रेवा.....सुजय

हो ना........मला काय वाटत सुजय...तिला तु आवडत असशील......स्नेहा डायरेक्ट न सांगता रेवाच्या फिलिंग्स....इनडायरेक्ट सुजयला सांगते........

खरच अस असेल का ग वहिनी.....बहुतेक असेल रे....माझा एक अंदाज आहे..स्नेहा

अस असेल तर छानच आहे.....हो ना.....सुजय

हो रे छानच आहे...पण तिला हर्ट होईल अस कधी वागु नकोस....कारण प्रत्येक गोष्ट ती खुप मनाला लावुन घेते.......स्नेहा

मी प्रॉमिस करतो वहिनी....ती हर्ट होईल अस कधीच वागणार नाही.....तीला हव तस सगळ करेन....सुजय

बर आता आपण जाऊया का खाली सगळे म्हणतील एवढया काय गप्पा मारत बसले आहेत.....स्नेहा

हो चालेल......सुजय

***

मुलींनो आवरा ग पटपट.....गुरुजी आत्ता येतील.....रेवा तु पहिला स्नेहा तयार झालेय का बग जा बर.....माधवीताई

हो काकु पाहुन येते......रेवा

स्नेहा झाल की नाही ग तुझ.....रेवा बोलत आत येते....

झाल काय.....तु तयार करणार होतीस.....आणि तुच गायब.....स्नेहा

सॉरी सॉरी यार.....पुजेची तयारी करत होते ग....पाच मिनिटात तयार करते तुला.....रेवा

मग काय रेवा थोडावेळात स्नेहाला तयार करते......व दोघी देवाला नमस्कार करायला जातात......

अरे तुम्ही अजुन इथेच गुरुजी केव्हाचे आलेत चला लवकर......सुजय त्याच्या जवळ येत बोलतो...

सुजय बोलवायला आल्यावर स्नेहा गडबडीने उठायला जाते व तिच्या पदराने देवाऱ्यावरील दिवा विजतो......

रेवा.....देवाऱ्यावरील दिवा विजला ग........आई म्हणते की दिवा विजलेला चांगला नसतो........स्नेहा

स्नेहा अस काही नसत ग.......उगाच काही पण विचार नको करुस.......रेवा

हो ग वहिनी अस काही नसत.......सुजय

नसेल ही कदाचीत पण सकाळ पासुन ना मला खुप भिती पण वाटतेय...का माहित नाही.......आणि आता हा दिवा विजला...........खरच मला भिती वाटतेय ग........स्नेहा

तु जास्त नको विचार करुस...काही चुकीच होणार नाही असा विचार कर म्हणजे काही होणार नाही.....चल आता......रेवा

स्नेहा पुजेला येवुन बसते....पुजा खुप चांगल्या प्रकारे पार पडते....सगळयांची जेवणे होतात.....सगळ आवरल्यावर रितीप्रमाणे रेखाताई व सुधिरराव स्नेहाला घेवुन जाणार होते....त्यामुळे ती जायची तयारी करत होती......

रेवा तिला मदत करायला येते....स्नेहा बग मी म्हणाले होते ना....काही होणार नाही ....ते फक्त आपल्या मनाचे खेळ असतात.......रेवा

हो ग सगळ छान पार पडल्यावर जिवात जिव आला.....स्नेहा

हो ना....आता हयाचा जास्त विचार नको करु....आई बाबांच्याकडे फक्त दोन दिवसांसाठी जाणार आहेस.......आणि तिथुन तुम्ही फिरायला जाणार आहात महाबळेश्वर ला....रेवा

हो ग......आशुतोश ना दुसरीकडे कुठे तरी जायच होत...पण माझ्या सुट्टया कमी आहेत ना म्हणुन मग चार दिवसात महाबळेश्वरच होईल म्हणुन मग त्यानी हा प्लॅन केला....स्नेहा

हो ग..परत एकदा जा म्हणे.......रेवा

हो......स्नेहा

बर चला जाऊया बाहेर......रेवा

हो.......स्नेहा

स्नेहा तिच्या आई बाबांसोबत तिच्या घरी दोन दिवसांसाठी जाते......ती गेल्यानंतर सगळे आवरा आवरी करु लागतात.....सगळ आवरल्या नंतर....हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते......

माधवीताई आता आम्ही पण निघतो......थोडयावेळात.....मालतीताई

तुम्ही कुठेही जाणार नाही हा.....रहा अजुन थोडे दिवस...माधवीताई

अहो नको राहिले की आता पंधरा दिवस......अजुन किती दिवस रहायच.....आणि उदया संध्याकाळी आकाश येणार आहे....मग जातो आम्ही......मालतीताई

हो काकु......माझी पण सुट्टी संपली आज..उदया पासुन बॅकेत जाव लागले ना.....रेवा

आकाश उदया संध्याकाळी येणार आहे ना......मग आज एक दिवस रहा आणि उदया सकाळी जा ना......आणि रेवा बॅकेत काय तु सुजय सोबत जाऊच शकतेस की.......माधवीताई

अहो पण कशाला....मालतीताई.

ते काही नाही....आज एक दिवस राहणार अहात तुम्ही......माधवीताई

बर.....राहतो आम्ही आज एक दिवस.....मालतीताई

रेवा आज राहणार म्हटल्यावर सुजय खुश होतो....

***

रात्रीचे जेवण आटपल्यावर राधिका पाय मोकळे करण्यासाठी बाहेर बागेत जात होती....डॉक्टरांनी तिला सांगितल होत.......

ये राधिका बाहेर जातेयस का.....रेवा

हो ग जरा फिरुन येते की.....राधिका

थांब मी पण आले तुझ्या सोबत.....रेवा

हो चल ना......हया लग्नाच्या गडबडी आपण व्यवस्थित बोललो पण नाहीये...तेवढयाच गप्पा होतील आपल्या......राधिका.....

हो चालेल ना.........रेवा

थोडावेळ बागेत फिरत गप्पा मारल्यानंतर जास्त फिरल्यामुळे पाय परत दुखायला नको म्हणुन दोघी झोपाळयावर गप्पा मारत बसतात......

लग्न छान झाल ना पण बग ना या माझ्या पायामुळे मला एन्जॉयच करता आल नाही.....राधिका

असु दे ग....काय करणार ना.....आता लवकर बरी हो.....रेवा

हो ग....राधिका

राधिका...मला आध्या कडुन तुझ्या बाबांच्या बद्दल कळाल....तेव्हा खुप वाईट मला....रेवा

रेवाच्या तोंडातुन बाबांच नाव येताच राधिकाच्या डोळयात पाणी येत....राधिकाच्या डोळयात पाणी पाहुन रेवाला कसतरी वाटत........

सॉरी सॉरी यार....मी उगाचच विषय काढला...माझ्यामुळे उगाच तुझ्या डोळयात पाणी आल.....सॉरी......रेवा

अग सॉरी नको बोलुस.....तुच काय कोणीही बाबाच नाव काढल असत तरी माझ्या डोळयात पाणी आल असत....मी ना माझ्या बाबाशी खुप क्लोज होते....ग..........तुला माहितेय ती त्याला अहो बाबा अस कधी हाक मारलीच नाही.....ये बाबा अशीच हाक मारायचे......माझी आई व आत्तु मला ओरडायच्या अरे तुरे नको करत जाउस.....ओ बाबा बोलत जा....पण मी ऐकायचेच नाही मग त्या बाबाला सांगायच्या तु पण तिला अस बोलवु देतोस.....बर वाटत का ते....त्यावर माझा बाबा म्हणायचा.....ती माझी लेक नंतर आहे......आधी ती माझी एक चांगली मैत्रीण आहे....आणि मला आवडत ये बाबा बोलवलेल......तु आणि तुझी लेक धन्य आहात म्हणायची आत्तु.....

आणि तुला माहितेय...आपण आपल्या कॉलेजमधी फ्रेन्डशी कस वागतो ना बिनधास्त तसे आम्ही दोघे असायचो......हा माझा बाबा आहे हयाला कस सांगु अस कधी माझ्या मनातच आल नाही.....ना कधी त्याची मला भिती वाटली...कॉलेजमध्ये कोणत्या मुलाने त्रास दिला ना तर मी माझ्या बाबाला सांगायचे...त्यावर माझा बाबा मला खुप छान समजावायचा....म्हणायचा...बाळा अशा प्रसंगाला स्वत: सामोर जायला शिक.....मी किती दिवस पुरणार आहे तुला.....तेव्हा मी त्याला ओरडायचे.....परत अस बोललास तर बग......मी बोलणारच नाही तुझ्याशी......

त्यावर माझा बाबा मला म्हणायचा..ये चिऊताई अस नको ग करु...तु नाही बोललीस तर जीव जाईल माझा....मी फक्त तुला सांगत होतो ग......एकटीला तुला हे सगळ मॅनेज करता आल पाहिजे.......हो रे बाबा.....इथुन पुढे मी तु म्हणशील तस करेन........ओके.......आम्ही हे बोललो ना त्याच्या दुसऱ्यादिवशी खुप वेळ झाला तरी तो येतच नव्हता....तो ऑफीसला गेला होता......पण नेहमीपेक्षा खुप वेळ झाला तरी येतच नव्हता आम्ही ऑफिसमध्ये फोन करुन विचारल तर त्यांनी सांगितल की ते नेहमीपेक्षा लवकरच गेलेत आज......काही तरी काम असेल म्हणुन वेळ होत असेल म्हणुन आम्ही वाट पाहत होतो......आणि अचानक फोन आला...........आणि ती बातमी ऐकल्यावर आमच्या पायाखालची जमिनच सरकली....कोणी तरी एका माणसाने बाबाच्या फोनवरुन फोन केला होता..बाबाचा ॲक्सिडेंन्ट झाला आहे म्हणुन....आम्ही लगेच तिथे पोहचलो....तर माझा बाबा तसाच रक्ताच्या थारोळयात पडला होता......त्याला साध कोणी हॉस्पिटल मध्ये सुध्दा घेवुन गेल नव्हत...माझा बाबा तसाच तळमळत पडला होता.....

आम्ही त्याला लगेच हॉस्पिटला घेवुन गेलो......पण खुप उशीर झाला होता ग.....माझा बाबा मला सोडुन गेला होता......ते डॉक्टरांचे शब्द माझ्या कानात अजुन ऐकु येतात......सॉरी आम्ही हयांना नाही वाचवु शकलो........राधिका हे सगळे हुदके देत रडत सांगत होती.......ती जास्तच रडताना रेवा तीला सावरत होती......थोडा शांत झाल्यावर ती परत सांगु लागली......बाबाच्या जाण्याचा मला खुप धक्का बसला होता..तो नाहीये हयाच्यावर माझा विश्वासच बसत नव्हता.......मी खुप कोलमडुन गेले होते.....माझी ती अवस्था कोणालाच पहावेना......सगळेजण खुप प्रयत्न करत होते मला नॉर्मल करायचा पण बाबाच्या जाण्याचा एवढी धास्ती घेतली होती की कोणाचा काहीच उपयोग होत नव्हता......मग आत्तु मला तिच्याकडे घेवुन आली.....इथे आल्यावर सुध्दा आध्या दादु सुजय आत्तु मामा..खुप प्रयत्न करायचे मला हयातुन बाहेर काढण्याचा.......पण त्याचाही काहीच उपयोग होत नव्हता.....मग सुजय मला बाहेर घेवुन जाऊ लागला...मला माझ्या कर्तव्याची जाणीव करुन दिला...माझा बाबा असता तर त्याला अस मी वागलेल आवडल असत का...अस तो म्हणाला.....आणि मला माझ्या बाबाचे शब्द आठवले.....मी किती दिवस पुरणार आहे तुला.....तेव्हा मग मी स्वत:ला सावरल.....आणि नॉरमल रहायचा प्रयत्न करु लागले...

मी एकटी अशी राहु नये म्हणुन सुजयने माझ्या जॉबच पण पाहिल...मग माझा सगळा वेळ जॉब मध्ये जाऊ लागला मग हळु हळु मी हयातुन बाहेर पडले......फक्त सुजयमुळे....म्हणुन मी त्याला एवढ मानते...तो म्हणेल ते सगळ ऐकते.....तो इतका मस्त आहे ना.....कोणीही त्याच्या प्रेमात पडेल.....त्याच्या हया केअरिग वागण्यामुळे तो मला कधी आवडु लागला कळलच नाही......

आवडु लागला म्हणजे..........रेवा थोड प्रश्नार्थक नजरेने विचारते.....

म्हणजे......आय लव्ह सुजय.....राधिका

हे शब्द ऐकल्यावर रेवाच्या पायाखालची जमिनच सरकली......तिला काय बोलाव कळेना..राधिकाचे शब्द तिच्या कानात घुमु लागले......पण ती स्वत:ला सावरते

राधिका.....सुजय तुझ्यावर प्रेम करतो........रेवा थोड अडखळत विचारते.....

नाही ग माहित.....पण मला अस वाटत तो माझ्यावर प्रेम करत असेल......म्हणजे बग ना.....जेव्हा मला कोणाच्या तरी आधाराची गरज होती तेव्हा त्यानेच मला आधार दिला.....आणि आत्ता पण किती माझी काळजी घेतो......माझा पाय मुरगळला तेव्हा पण किती काळजी घेत होता.....एवढ काही लागल नसताना सुध्दा.....किती घाबरला होता.......मी बाहेर चालेल की जाताना किती सुचना करतो....असच कर तस करु नको व्यवस्थित जा........हया सगळया वरुन मला वाटत की तो माझ्यावर प्रेम करत असेल.....मी दोन चार दिवसात त्याला विचारणारच आहे......बघु तेव्हा कळेलच की.........त्याच्या मनात काय आहे.....

हे सगळ ऐकल्यावर रेवाला धक्काच बसला......राधिकाच बोलण ऐकल्यावर रेवाला सुध्दा वाटु लागल....सुजय सुध्दा राधिकावर प्रेम करत असेल....तिला तो आणि राधिका एकत्र असलेले प्रसंग आठवु लागले.....आणि रेवाला वाटु लागल....की सुजय पण राधिकावर प्रेम करतो........ती त्याच विचारात होती.....

रेवा......ओय.....कुठे हरवलीस......राधिका....

आ....काही नाही.....बोल ना तु......काय म्हणत होतीस.......रेवा

तुझ्याशी बोलुन खुप छान वाटल....कोणाशी तरी बोलायच होत.....पण तुझ्यारुपाने मला एक चांगली मैत्रीण मिळाली......थॅक्स रेवा.......राधिका.

अग थॅक्स काय........मी तुला तुझी मैत्रीण वाटले हयातच सगळ आल.....रेवा

***

क्रमश:

पुढचा भाग 29/10/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all