बावरे मन...भाग-47

बावरे मन..भाग 47 (नेमका तुला राग कशाचा आला आहे......तिच प्रमोशन झाल हयाचा......ती इथेच राहणार आहे हयाचा ?

बावरे मन..भाग 47

(नेमका तुला राग कशाचा आला आहे......तिच प्रमोशन झाल हयाचा......ती इथेच राहणार आहे हयाचा की.......स्नेहा

कि काय........रेवा

की ती सुजयच्या सारखी जवळ जाते हयाचा..........स्नेहा)

आता पुढे......

काही पण काय स्नेहा मी का चिडु ती त्याच्या जवळ आल्यावर......रेवा दुसरीकडे पाहत बोलते.....

कारण तु सुजयच्या प्रेमात पडलेयस........स्नेहा

स्नेहा अस बोलल्यावर रेवा एका क्षणी स्नेहाकडे एकटक पाहु लागते.........काही न बोलता तशीच स्नेहाकडे पाहत राहते.......

हो ना रेवा.........सुजय आवडतो ना तुला....स्नेहा

काही पण काय अस काही नाहीये............रेवा दुसरीकडे बघत बोलते.....

असच आहे......वेडाबाई तुला ते कळत नाहीये..........स्नेहा

स्नेहा तु वेडी झालेयस का.........रेवा

मी नाही तु झाली आहेस..........सुजयच्या प्रेमात....... तु सुजयवर प्रेम करत नाहीस म्हणतेस ना.....मग राधिका त्याच्याजवळ असल्यावर तु का चिडतेस........ते दोघे बोलत असले की तुला आवडत नाही....आणि आता तर...राधिका इथे राहणार म्हटल्यावर ‍तुला ते आवडल नाही......तु सरळ बाहेर निघुन आलीस....वेडाबाई हयालाच प्रेम म्हणतात.......जे तुला कळत नाहीये........स्नेहा

स्नेहा अस कस होईल.....मी सुजय बद्दल असा विचारच कधी केलाच नाही ग......रेवा

बर मला एक सांग.........तुला सुजयशी सतत बोलु वाटत..........स्नेहा

हो वाटत........रेवा थोड अडखळतच हो बोलते..

तुला सुजय सोबत वेळ घालवायला आवडतो........स्नेहा

हमममम.......रेवा

असे अनेक प्रश्न स्नेहा रेवाला विचारते........बग एवढे प्रश्न विचारत होते......सगळयांच उत्तर होच होत तुझ........तु थोडावेळ विचार कर......तुझ तुलाच कळेल.......की तु सुजयवर प्रेम करु लागली आहेस.......मी आलेच थोडयावेळात.......स्नेहा

स्नेहा बाहेर गेल्यावर रेवा विचार करत बसली होती.....

स्नेहा बोलतेय तस असेल...........मी सुजयच्या.....................रेवाला त्या दोघांच्यामध्ये घडलेले प्रत्येक क्षण डोळयापुढे येवु लागले

खरच मी राधिका सुजयच्या जवळ गेल्यावर का चिडते........खरच मी प्रेम करते म्हणुन चिडते का....आणि तो माझ्या नेहमी जवळ असावा अस का वाटत....सतत माझ्याशीच त्याने बोलाव असा का माझा हट्ट असतो.....आणि सुजय माझ्या किती तर वेळा जवळ आला होता... त्यावेळी मी त्याला का अडवले नाही.....त्याच ते जवळ येण का मला आवडायच......खरंच मी प्रेम करतेय का.........रेवा

अस बोलल्यावर रेवाच्या चेहऱ्यावर हसु येत........खरच मी सुजयवर प्रेम करु लागलेय......अस अचानक बोलल्यावर रेवा लाजते व आपला हात चेहऱ्यावर ठेवते.......

खरच.... आय लव्ह सुजय..........रेवा एकदम बोलुन जाते...आणि मगाच पासुन हे सगळ पाहत राहिलेली स्नेहा आत येते.......

ओहो.......आय लव्ह सुजय का.........स्नेहा रेवाला चिडवत आत येते........

स्नेहा तु........म्हणजे तु बाहेर गेलीच नाहीस.......रेवा

हो मग काय मला कळायला नको होय........पण फायनली तुला कळल तर......स्नेहा

रेवा लाजत स्नेहाला जाऊन मिठी मारते.............स्नेहा पण सुजयला मी आवडत असेल का ग........रेवा

स्नेहाला सांगु वाटत होत की सुजय पण तुझ्यावर प्रेम करतोय पण सुजयने तिला सांगु नको म्हणुन सांगितल होत.........

अग का नाही आवडणार नक्की आवडत असशील.......स्नेहा

तु त्याचा विचार नको करुस......फक्त तुला सुजय आवडतो हे महत्वाच आहे.....

थॅक्यु स्नेहा मला जाणीव करुन दिल्याबद्दल.....रेवा

मार खाशील आता ‍थॅक्स म्हणे.......तुझ्यासाठी एवढ पण करु शकत नाही का ग मी......स्नेहा

हो ग करुच शकतेस........रेवा

स्नेहाला आता चिडवण्याचा मुड झाला........रेवा आत्ताच काय ते माझ्याकडुन लाड करुन घे हा.....लग्नानंतर लाड वगेरे नाही होणार.......स्नेहा

रेवाला काही कळेनाच.........म्हणजे.....लग्नानंतर अस काय बदलणार आहे......रेवा

खुप काही बदलणार आहे.......मी तुझी मोठी जाऊ असेल ना..........स्नेहा

अस बोल्यावर रेवाच्या लक्षात येत की ही सुजय व रेवाच्या लग्नाबद्दल बोलत आहे.......

ये गप्प ग.........रेवा स्नेहाला एक फटका मारते

गप्प काय......होणार नाहीये का मी तुझी जाऊ........स्नेहा

अस बोलल्यावर रेवा लाजते व स्नेहाला मिठी मारते......

मग आत्ताच काय लाड करुन घ्यायचे आहेत घे करुन.......लग्नानंतर मी जाऊबाईचा रुबाब दाखवणार हा......तुला नुसत ऑर्डर सोडणार बग....रेवा हे कर......रेवा ते कर........रेवा मला हे आणुन दे.......रेवा मला ते आणुन दे..........स्नेहा जाऊबाईचा खोटा रुबाब दाखवत बोलत होती......

हो का.....चालेल हा मला......मी करेन हा सगळ.......जाऊबाई.......रेवा पण स्नेहाची मस्करी करत बोलते.......

हो का.....तु करशील पण माझा दीर तुला करु दिला तर........लाडक्या राणीसाहेबांना कस काम लावेल..........स्नेहा

गप्प ग स्नेहा........आता मला चिडुवन भड्डावुन सोडशील.......रेवा

हो मग काय आयता चान्स भेटलाय मला चिडवायला मग चिडवणारच ना....स्नेहा

हो का......घे घे चिडवुन मेरा भी टाईम आयेगा.....रेवा डोळा मारत बोलते

बर चला बाहेर जाऊया........काम करायच आहे आपल्याला.......स्नेहा

हो चल नाहीतर तुझा दिर ओरडायला लागेल........रेवा

ओ........माझा दिर काय...........तुझा कोणच नाहीये का.........स्नेहा रेवाला चिडवत हसु लागली....

तू गप्प बस आणि चल बाहेर........रेवा थोडी लाजत स्नेहाचा हात पकडुन बाहेर येते.......

सुजय स्नेहा त्याला काय सांगते हयाची वाट पाहत होता.......तो शरदला स्नेहाला बोलवायला पाठवुन देतो........

स्नेहा सुजयच्या केबिनमध्ये येते...........

तु बोलवलास  का मला.........काही काम होत का........स्नेहा

नाही ग वहिनी काम कुठल.......रेवा बद्दलच की विचारायच होत......अशी का बाहेर गेली रेवा.......सुजय थोड काळजी करत विचारतो........

दुसर काय असणार....राधिकाच की.......म्हणजे तुला मिठी मारली ना ती......ते पाहुन मॅडमांना राग आला....म्हणुन निघुन गेल्या......स्नेहा

ओ........अस होय......मग गेला का राग आमच्या मॅडमांचा......सुजय

काय माहीत मी समजावल तर आहे........स्नेहाला सुजयला सांगु वाटत होत की रेवा पण तुझ्यावर प्रेम करते.....आणि तिला आज रिलाईज झाल आहे........पण स्नेहा काहीच बोलत नाही......ते दोघे स्वत:हुनच सगळ एकमेकांशी बोलु देत अस तिला वाटत होत.......

मग आता कस करायच......कसा घालवायचा मॅडमांचा राग.....सुजय

आता तुझ तु बघ बाबा... तुझी मॅडम आहे.......स्नेहा सुजयला चिडवत बोलते.....

वहिनी तु परत सुरु झालीस का......सुजय......

दोघे बोलत असतात.......तेवढयात सुजयचा फोन वाजतो.......अग आईचा फोन आहे.......थांब काय म्हणतेय बघु........

हा बोल आई........सुजय

अरे मी फोन हयाकरता केला होता.......की उदया स्नेहाच्या घरचे......रेवाचे आई बाबा.......आपल्या घरी येणार आहेत.....लग्नाच्या तयारीच ठरवायला.......उदया रविवारच आहे पण तु काही काम काढु नयेस म्हणुन परत आणि फोन केला.........माधवीताई

अग काही काम नाहीये मी आहे फ्री.......सुजय

बर.......स्नेहा व रेवाला पण सांग मग......माधवीताई

अग हे काय वहिनी इथेच आहे.......मी सांगतो तिला........सुजय

बर चालेल..........ठेवते मी फोन बाकीच घरी आल्यावर बोलु........माधवीताई

बर........बाय........सुजय

काय म्हणत होत्या आई.........स्नेहा

अग ते उदया सगळे आपल्या घरी येणार आहेत ना.....लग्नाच्या तयारीच बोलायला.......ते तुला व रेवाला सांग म्हणत होती.........सुजय

ओ.......आईचा फोन वेगेरे कुठे आला नाही मला..........स्नेहा

अग राहुन गेल असेल.....घरी गेल्यावर सांगतिल की.........सुजय

बर.........चालेल.........मी येवु का.........स्नेहा

हो चालेल.........रेवाला सांग हा.......सुजय

हो हो सांगते हा..........स्नेहा

बर वहिनी रेवाला पाठवुन दे.....ते मघाशी जे डॉक्युमेंन्ट दिली आहे ना त्यात थोड करेक्शन करायच आहे......सुजय

बर देते पाठवुन.........स्नेहा

स्नेहा रेवा जवळ येते.......रेवा सरांनी तुला बोलवल आहे..........

का.........रेवा

अग ते मघाशी जे डॉक्युमेंन्ट दिली आहेस ना....त्यात थोड करेक्शन करायच आहे.......स्नेहा

बर जाते..........रेवाला सुजयच्या केबिनमध्ये जायच म्हटल्यावर धडधडु लागल.....मी आत गेल्यावर वेडयासारखी करणार नाहीये ना......आता त्याच्या समोर जायच म्हटल्यावर मला टेन्शन येत आहे यार.......माझ्या बोलण्या वागण्यातुन त्याला काही कळणार तर नाहीये ना.....रेवा विचार करत करत केबिनच्या बाहेर येते.........थोड घाबरतच.....आत जाते.........सर तुम्ही बोलवत का.........

हो ते डॉक्युमेन्ट मध्ये थोड करेक्शन करायच होत......सुजय हातात फाईल घेत बोलतो........सुजय रेवाला कुठे करेक्शन करायच आहे ते सांगत असतो.....पण रेवा सुजयलाच पाहत असते......

कसला क्युट दिसतोय हा.........मी हयाच्यावर प्रेम करत होते पण मला कळलच नाही....त्या राधिकाचा राग येतो पण आज तिच्याचमुळे मला कळल तर की मी सुजयवर प्रेम करतेय........रेवा विचार करत त्याच्याकडे एकटक पाहत होती........सुजय तिला सगळ सांगत असतो पण ही भान हरवुन सुजयला पाहत होती........

रेवा कळल ना काय काय करेक्शन करायच्या आहेत.....अस म्हणत सुजय रेवाकडे पाहतो......तर रेवा एकटक सुजयकडे पाहत असते........ही अशी का पाहतेय मला.......मी आज काही वेगळा दिसतोय का......अस म्हणत सुजय मोबाईच्या स्क्रिनवर स्वत:ला एकदा पाहतो......अरे सगळ तर ठिक आहे........मग अशी का बघतेय ही.......काय झालय हिला...........चिडलेय का अजुन माझ्यावर....राग आलाय म्हणुन तर अशी पाहत नाहीये ना......

रेवा......सुजय रेवाच्या समोर चुटकी वाजत तिला भानावर आणतो......

क.............काय.......काय म्हणत होतास का......रेवा

म्हणजे मी मगाच पासुन एवढ बडबडतोय हयातल हीने काहीच ऐकल नाहीये........अग मी म्हणत आहे  समजल का तुला....काय काय करेक्शन करायच आहे.........सुजय रेवाकडे पाहत म्हणाला

अरे बापरे......माझ लक्षच नव्हत हा काय बोलत होता हयाच्याकडे...रेवा वेडयासारख वागु नकोस......आता हयाला कस सांगु मी काहीच ऐकल नाहीये.......रेवा विचार करु लागली........

अग काय झाल समजल नाहीये का तुला.....परत सांगु का........सुजय

हो नाही समजल....परत सांगशील का तु..........रेवा

बर बघ........सुजय तिला परत सगळ सांगतो..........

बर आता तर कळल का........सुजय

हो आता कळल........रेवा आपली जीभ चावत बोलली.......

बाय द वे.......कुठे लक्ष होत तुझ......एकदा सांगितल की लगेच लक्षात येत तुझ्या.....आणि आज दोन दोन वेळा सांगाव लागल.........सुजय ती काही तरी बोलेल हया आशेने विचारतो.....

आ काही नाही......ते आज समजलच नाही........रेवा आता इथुन बाहेर जा नाही तर परत काही तरी वेडेपणा करशील.......रेवा मनातल्या मनात बोलते......

मी जाऊ का.......रेवा

हो चालेल.......बर ऐक.........उदया आमच्या घरी यायच आहे.......वहिनीने सांगितल का तुला........सुजय

नाही काहीच बोलली नाही..........मी केबिनमध्येच आले ना....म्हणुन तिला बोलता अस नसेल......रेवा

बर........मग उदया या घरी.......सुजय

उदया सुजय सोबत वेळ घालवायला मिळणार म्हटल्यावर रेवाला आनंद होतो........ती आनंदाच बोलुन जाते...........हो नक्की येईन.........मी येते..........अस म्हणुन रेवा बाहेर जाते........

अरे घरी यायच आहे म्हटल्यावर हिला येवढा का आनंद झाला...........वेडी झाली आहे ही......काय वेगळच वागतेय आज..........सुजय

****

सुजय आशु आध्या आवरा रे पटकण सगळे केव्हाही येतील..........माधवीताई

आई झालय आमच......सगळे एकदमच बोलत हॉलमध्ये येतात......

तेवढयात मालतीताई रमाकांतराव व रेवा येतात.........काय झाली का तयारी........मालतीताई

अरे या या ना....ये रमांकात या वहिनी........आनंदराव

तुम्ही आल्याशिवाय कशी होईल तयारी.........माधवीताई हसत बोलतात

ही बगा आले आता........सांगा काय काय करायच आहे..........तुम्ही सांगितल्यापेक्षा लवकरच आलेय मदत करायला........मालतीताई

अहो आवरलय सगळ.......तुम्ही बसा......मी चहा आणते तुमच्यासाठी.......माधवीताई

अहो आम्ही काय पाहुणे आहोत का......सगळे आले की घेवु एकत्रच.........मालतीताई

तेव्हा परत घेवु....आत्ता आणते थांबा......अग रेवा ये ना बस इथे.........माधवीताई

नाही काकु तुम्ही बसा मी चहा आणते सगळयांना........रेवा

अग पण कशाला......आत्ता आली आहेस बस मी करते.......माधवीताई

अहो त्यात काय एवढ मी करते तुम्ही बसा........रेवा

बर कर........माधवीताई

***

क्रमश:

पुढचा भाग 28/9/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all