बावरे मन...भाग-49

बावरे मन..भाग 49 (रेवा आता इथेच काही दिवस रहायला येणार म्हटल्यावर सुजय खुप आनंदात होता.....रेवा सोब

बावरे मन..भाग 49

(रेवा आता इथेच काही दिवस रहायला येणार म्हटल्यावर सुजय खुप आनंदात होता.....रेवा सोबत आता जास्त वेळ घालवता येईल......त्यामुळे तो रेवाची आतुरतेने वाट पाहत होता....रेवाची हालत पण काही वेगळी नव्हती.......ती सुध्दा इथे रहायला आल्यामुळे खुप आनंदात होती....आता तिला सुजय दररोज दिसणार होता....सतत तिच्या अवती भवती असणार होता......हया  कल्पनेनेच ती खुश होती......)

आता पुढे...

सुजय खाली येतो.......पाहतो तर रेवा त्याच्या समोर होती........किती सुंदर दिसतेय ही......पाहतच रहावस वाटतय...........

रेवाची नजर सुध्दा सुजयला शोधत होती........ती इकडे तिकडे सुजय कुठे पाहतोय का ते पाहत होती.......

रेवा आलीस तु.........चल तुझ सामान माझ्या रुममध्ये ठेवुया........आध्या

हो चालेल.......काकु आले मी.........रेवा

हो जा बाळ.......पटकण आवरुन या परत आपल्याला निघायच आहे खरेदीला....माधवीताई

सुजय जिन्यावरच थांबला होता.....रेवा आध्याच्या रुममध्ये जात असताना सुजय तिला दिसतो......कसला क्युट दिसतोय हा.......रेवा मनातल्या मनात बोलत सुजयकडे पाहत जात होती......आणि त्या पाहण्याच्या नादात तिला आपण जिन्याजवळ आलो आहे हे सुध्दा कळल नाही.......व पायरीला ठेच लागुन रेवाचा तोल जातो.... सुजय पळत खाली उतरतो व तिला पकडलो.......रेवा सुध्दा पडेल म्हणुन सुजयला घट्ट पकडते....दोघे एकमेकांच्या डोळयात हरवुन जातात......इतके हरवतात की आजुबाजुला कोण आहे की नाही हयाच सुध्दा भान नव्हत....हा क्षण इथेच थांबावा अस वाटतय....सुजय माझ्या इतक्याजवळ हे फिलिंगच वेगळी आहे.......रेवा सुजयच्या डोळयात पाहत मनातल्या मनात बोलत होती....हया विचाराच्या नादात तिच्याही नकळत तिने त्याच्या भोवतीची पकड घट्ट केली होती......असे दोघे एकमेकांकडे पाहण्यात हरवुन गेले होते आणि इकडे आध्याला पण त्यांचा फोटो काढण्याचा चान्स मिळतो......ती फोटाज काढते.....

ओय काय चाललय........स्नेहा सुजय व रेवाकडे पाहुन बोलते........स्नेहा इतक्यातच आली होती सुजय व रेवाला पाहुन डायरेक्ट त्यांच्याजवळच आलेली असते......स्नेहाच्या आवाजाने दोघे भानावर येतात.....व बाजुला होतात

काय चाललय तुमच......स्नेहा दोघांच्याकडे थोड चिडण्याच नाटक करत बोलते.....

अग वहिनी आम्ही वर जात होतो रेवाच सामान ठेवायला.....आणि तिचा तोल गेला.....व दादयाने तिला पकडल ती पडेल म्हणुन......आध्या

ओ........अस झाल होय......रेवा सुजय..........स्नेहा थोड खटयाळपणे त्यांच्याकडे पाहत म्हणत होती.....

रेवाला स्नेहाचा रोख कळतो ती लाजते व मी आलेच म्हणुन सामान घेवुन वर जाते.......आध्याही तिच्या पाठोपाठ गेली......रेवा जाताना सुजय एकटक तिलाच पाहत असतो........

अहो देवरजी........जरा भानावर या आता.....तुमच्या मॅडम गेल्या रुममध्ये........स्नेहा त्याला चिडवत म्हणाली........

वहिनी तुझ्या मैत्रिणीने मला वेड केलय......सुजय आपल्या केसात हात फिरवत स्नेहाला खटयाळपणे बोलतो...

बर.....माझी मैत्रिण......तुमची कोणीच नाहीये का ती.........स्नेहा

माझी........?माझी कोण आहे ग ती.......सुजय मुद्दाम नौटंकी करत बोलतो.........

हो का.......माहीत नाही होय...तुला.....नौंटंकी कुठला.......स्नेहा हसत बोलते

नाही ग माहीत......सुजय काहीच माहीत नाही असा चेहराऱ्यावर आव आणत बोलतो......

हो का......तुमची बायको होणार आहे ती विसरलातच की काय.......स्नेहा......

हो का ती माझी बायको होणार आहे.........मी विसरलोच ग........बर झाल हा आठवण करुन दिलीस......सुजय परत नाटकी करत बोलु लागतो....

गप्प बस......बायको बोलल्यावर मनातुन आनंदाच्या उकळया फुटत आहेत आणि म्हणे विसरलोच......स्नेहा

ए वहिनी ऐक ना माझ काम होत तुझ्याकडे....सुजय

काय बोल ना.........स्नेहा

ते ना मला रेवासाठी साडी घ्यायची होती........सुजय थोड लाजतच हसत स्नेहाला सांगतो......

ओहो.....जोरात तयारी सुरु आहे की.........स्नेहा

वहिनी बास ग किती चिडवशील......मी काही तरी सांगतोय ना.......सुजय

बर बाबा नाही चिडवत........स्नेहा

हा.....मला साडी घ्यायची आहे रेवाला पण मी डायरेक्ट नाही ना घेवु शकत......आणि जरी घेतलो तर आता काय कारण सांगु........त्यापेक्षा तु एक काम कर ना तु तिला साडी घेतेयस अस सांग.........सुजय

अरे वा सगळा विचार करुन झालाय तर आपला.........बर चालेल असच करुया......स्नेहा

थॅक्स वहिनी.......सुजय

गप्प बस थॅक्स म्हणे.......आल्या बघा तुमच्या मॅडम.......रेवा जिन्यावरुन खाली येत होती....स्नेहाने सांगितल्यावर सुजय मागे पाहतो......सुजय तिला एकटक पाहत राहतो......इतक्यात मागुन राधिका येत होती....ती रेवाच्या बाजुने येवुन तिच्या पुढे येते......

सुजय आता राधिका जवळ आली ना तुझ्या तर झाल रेवा परत चिडणार.....त्यापेक्षा आज जास्त जवळ येवु नको देवुस तिला नाही तर परत तिचा मुड ऑफ होईल......स्नेहा तिला हळु आवाजात सांगत होती.........

सुजयलाही तिच बोलण पटत.....बर मग मी गाडी बाहेर काढतो जातो.......तिथे काय राधिका माझ्या मागे येणार नाही.......सुजय

हो चालेल.....स्नेहा

राधिका गडबडीने खाली येते....सुजय.....सुजय.....ती सुजयला बोलवत असते.....

अग राधिका तो गाडी बाहेर काढायला गेलाय.........स्नेहा

असा काय हा.......मला काही तरी विचारायच होत त्याला......राधिका...

नंतर विचार ना आत्ता आपल्याला वेळ होतोय ना म्हणुन तो गाडी बाहेर काढायला गेलाय....स्नेहा

बर......राधिका एवढुस तोंड करुन बोलते......

मुलांनो झाल का तुमच...निघायच का......माधवीताई

हो आई आमच झाल आहे.......स्नेहा

सगळे जायला निघतात

****

स्नेहा बग तुला कोणत मंगळसुत्र आवडत.......माधवीताई

आई तुम्हीच पहा ना मला हयातल एवढ नाही कळणार.....स्नेहा

अग आम्ही पण पाहणार आहोतच पण तुला कस डिजायन हव ते बग.......हव तर तुझ्या नवऱ्याला विचार नाही तर नंतर आम्हालाच म्हणेल माझ्या बायकोला मंगळसुत्र घेत होता आणि मलाच विचारला नाही......मालतीताई त्यांना चिडवत बोलतात.....

तशी स्नेहा आशुकडे पाहुन गोड हसते.......मग आशु काय कोणाच लक्ष नाही ते पाहुन तिला हळुच डोळा मारतो........स्नेहा आणखीनच लाजते......

अग बग ना कोणत आवडत.....रेवा....

हो ग थांब ना पाहतेय........स्नेहा

स्नेहा एक एक डिजायन पाहत होती......सगळयांची नजर चुकवुन आशुकडे पाहुन विचारत होती हे असुदे का म्हणुन.....मग आशु हे नको ते नको अस खुणवुन सांगत होता......त्यातील एक मंगळसुत्र त्याला आवडत व तो हे असुदे अस सांगतो......

आई हे असु दे......स्नेहा

पाहु.....खुप मस्त आहे ग....छान चॉईस आहे की.......माधवीताई

स्नेहा माधवीताईकडे पाहुन हसत थॅक्स आई.......म्हणते

बर एक छोटस मंगळसुत्र पण घेवुया बॅकेत जाताना बर पडेल.....माधवीताई

अहो पण आई आता एक घेतलाय की....परत कशाला.....स्नेहा

त्याला काय होत.....असुदे घे ......माधवीताई

रोज वापरण्यासाठी एक सुंदर अस छोटस मंगळसुत्र घेतात....

स्नेहा आता बाकिचे दागिने बघ कसे हवेत तुला......रेखाताई

रेखाताई व सुधिरराव स्नेहासाठी काही दागिने घेणार होते एकुलती एक आहे ना.....मग  घेणारच ना.....स्नेहा ते दागिने पाहत होती....

सुजय असच काय काय दागिने आहेत ते पाहत असतो....आणि त्याची नजर एका अंगठीवर पडते....आणि त्याला ती पाहताक्षणी पसंद पडते......आणि त्याला काही तरी सुचत तो स्नेहाकडे पाहुन तिला खुणवुन बाजुला बोलतो....

अरे काय झाल अस का बोलवलस मला.......स्नेहा

ऐक ना मला ना एक रिंग खुप आवडलेय.....आणि ती मला रेवासाठी घ्यायची आहे.....मी जेव्हा तिला प्रपोज करेन ना तेव्हा दयायची आहे मला.....सुजय

वा....खुपच जोरात तयारी सुरु आहे की.....स्नेहा

हो मग काय..करायला हव ना......पण तीला बसते की नाही पहायला हव ना....तु काही तरी करुन तिला बसते का बघ ना......सुजय

ओके बघते पण कोणती रिंग ते तर सांग.......सुजय स्नेहाला ती रिंग दाखवतो.....व स्नेहाला पण ती खुप आवडते......अरे वा चॉइस मस्तच आहे की.....रेवा मॅडम खुशच होतील......स्नेहा

जा आता परत जायला निघाले की गडबड नको......सुजय

हो जाते...बाकिचे दागिने पाहत होते...त्याच लक्ष नाही ते पाहुन स्नेहा रेवाला हाक मारते......ए रेवा बघ ना ही रिंग किती मस्त आहे.....रेवा स्नेहा अस बोलल्यावर पाहु लागते.........

वॉव खरच किती मस्‍त आहे ग......रेवा

थांब पाहु......स्नेहा ती रिंग काढुन हातात घेते...रेवा बघ पाहु घालुन कशी दिसते ते पाहु......स्नेहा

अग पण घ्यायची नाही आणि कशाला पहायची.....रेवा

अग पण पहायला काय जात....बग पाहु.......स्नेहा तिच्या हातात रिंग देत बोलते.......

रेवा ती रिंग घालुन बघते.....आणि आश्चर्य काय ती रिंग तिला एकदम परफेक्टच बसते....अरे तुला व्यवस्थित बसली की........स्नेहा

हो पण आपल्याला घ्यायची नाही अस म्हणत रेवा ती रिंग काढते.....आणि स्नेहाच्या हातात देते.....आणि राधिकाची नजर त्या रिंगवर पडते....

ये वहिनी कसली मस्त रिंग आहे ग ही.........मला खुप आवडली......मी घेतेच ही....मला खुप आवडली आहे...

राधिका घेणार म्हटल्यावर स्नेहा व सुजयचा चेहराच पडतो.....सुजयला काय कराव कळेनाच......तो त्यांच्याजवळ जातो.......अग आत्ता कशाला घेतेस तुझ्या एन्गेजमेन्टमध्ये घेतील की मुलांकडचे..सुजय काही तरी कारण सांगुन तिला नको म्हणत होता....

असुदे जेव्हा घेतील तेव्हा पाहु पण मला ही रिंग खुप आवडली आहे....मी घेणारच...थांब मी घालुन बघते......राधिका रिंग घालुन पाहण्याच्या नादात होती तितक्यात सुजय त्या सेल्समनला जाऊन सांगतो की ती रिंग मी घेणार आहे आणि त्या मॅडमांनी विचारल तर ती बुक केली आहे अस सांगा म्हणुन....तो सेल्समनही तयार होतो....

राधिकाला ति रिंग थोडी लुज होत होती....पण तिला ती घ्यायचीच होती.....ती त्या सेल्समनला त्याची प्राईज विचारते व पॅक करा म्हणते....

अहो मॅडम हि रिंग बुक केली आहे तुम्ही दुसरी पहा......सेल्समन

काय........मग अशीच दुसरी नाहीये का....राधिका.....

नाही एकच आहे......सेल्समन

राधिका तु दुसरी रिंग बघ ना मग....स्नेहा

नाही मला हीच हवी होती...राहुदे मला नाही घ्यायची....अस म्हणत राधिका बाहेर जाते.....

ती बाहेर गेल्यावर सुजय हॅपी होतो......

स्नेहा त्याला खुणवुन विचारते कस काय झाल हे.......नंतर सांगतो अस खुणवुनच सुजय सांगतो....

बर मुलांनो चला झाली खरेदी चला पुढच्या खरेदीला जाऊया....माधवीताई

हो चला चला....सगळे बाहेर येतात.....अरे मी गाडीची किल्ली आत विसरलो थांबा हा आणतो....सुजय किल्लीच निमित्त सांगुन...आत येतो व ती रिंग खरेदी करतो......

****

सगळे स्नेहाच्या कपडयांची खरेदी करत होते......दादा पहिला देवीची साडी दया..नंतर मुलीच्या साडया दाखवा.......मालतीताई

हो हो.........देवीची साडी खरेदी करुन....मग स्नेहाच्या साडयांची खरेदी करु लागतात......

विडयाची साडी, हळदीची साडी, अक्षताची साडी, वरातीची साडी, पुजेची साडी(हल्ली वरातीच प्रमाण थोडया प्रमाणात कमी झाली आहे पण साडी मात्र काढली जाते) आशा पाच साडया काढल्या जातात....स्नेहाच्या साडयांची खरेदी झाली तशी आशुतोष स्नेहाच्या साडयांना मॅच होईल असे शेरवानी व बाकिचे त्याचे कपडे काढायला जातो.......

माधवीताई आता आहेराच्या साडया वगेरे पाहुया.......मालतीताई

हो चालेल........नंतर आहेराच्या साडयाची व बाकीच्या कपडयाची खरेदी केली जाते.....

मुलांना तुम्ही तुमचे कपडे पाहुन घ्या........अहो तुम्ही आणि रमाकांत भाऊजी जाऊन तुमचे कपडे पहा जा ना.....माधवीताई

हो आम्ही आमची खरेदी करुन येतो.....आनंदराव

काकु आम्ही पण मेहंदीचे हळदीचे व संगीताचे ड्रेसेस पाहुन येतो....तुम्ही पण तुम्हाला सांगितल्याप्रमाने साडया घ्या हळदी मेंहदी व संगीताच्या.......रेवा

हो ग पाहतो आहे........मालतीताई

ये आत्तु मला सगळया फंक्शनसाठी ड्रेसेस हवे आहेत हा........राधिका....

हो ग बाळ तुला हव ते घे........माधवीताई

राधिका माधवीताईना मिठी मारत थॅक्यु आत्तु अस बोलते....

बऱ्यापैकी खरेदी झालेली असते.........रेवा तु अजुन तुला कपडे घेतले नाहीस.....स्नेहा

अग तोच विचार करतेय नेमक काय घेवु........म्हणजे ड्रेस घेवु की साडी......रेवा

तु दोन्ही पण ट्राय कर......स्नेहा

बर बघते........रेवा

सुजय व आशु त्यांची खरेदी करुन रेवा व स्नेहाजवळ येतात....

काही मदत हवी आहे का.........सुजय

हो चालेल आम्ही ना रेवासाठी कपडे पाहतोय पण ड्रेस घ्यायचा की साडी कळत नाहीये.........स्नेहा

***

क्रमश:

पुढचा भाग 2/10/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all