बावरे मन...भाग-9

बावरे मन..भाग 9 (रेवा कॉफी घेत स्नेहच्या डेस्कजवळ जाते....स्नेहा आवरल काम...... आहे अजुन.....आज कस्टमर ख

बावरे मन..भाग 9

(रेवा कॉफी घेत स्नेहच्या डेस्कजवळ जाते....स्नेहा आवरल काम......

आहे अजुन.....आज कस्टमर खुप आहेत ना ग....त्यामुळे वेळ लागतोय .....तुला का बोलावल होत सरांनी........)

आता पुढे......

अग ते लोनसाठी विजीट दयायची आहे उदयापासुन...ते सांगायला बोलवले होते.......

बर...कोण जाणार आहात विजीटला......

मी आणि सर....रेवा

काय........? तु आणि सर........स्नेहा शॉक होवुनच विचारते...

हो बग ना यार हयाच्यासोबत काम करायच म्हणजे टेन्शनच...नाही म्हणायच पण अवघड....काही ऑपशनच नाहीये.....राकेश नसल्यामुळे मलाच कराव लागणार आहे.......

बेस्ट लक......खडूससोबत काम करण्यासाठी.....अस म्हणुन स्नेहा हसते......

तुला खुप मज्जा वाटतेय ना......मी त्या खडुससोबत काम करणार म्हणुन.....बस तु हसत मी जाते माझ काम करायला......रेवा स्नेहावर चिडते व आपल्या डेस्कवर येवुन काम करु लागते.....

बॅकेची वेळ संपल्यावर स्नेहा रेवाला बोलावयला येते.....रेवा चल आवरल का.....

पण रेवा काहीच उत्तर देत नाही......कारण तीला स्नेहाचा राग आलेला असतो......

स्नेहाच्या लक्षात येत की ही अजुन चिडली आहे.....अग रेवा मी मस्करी करत होते...काय ग तु पण...

हो का.......खुप मज्जा घेत हसत होतीस की........

सोड ना ग......परत नाही हसणार मग तर झाल.......

बर....रेवा

जाउया का आता....की इथेच बसायच आहे  खडूसच लेक्चर ऐकत..........स्नेहा तिला परत चिडवत हसते....

तु सुधारणार नाहीस......रेवा स्नेहाला एक फटका मारते..चला जाऊया म्हणत बाहेर येते

रेवा घरी येते....आई आले ग मी.....अस म्हणून रुममध्ये फ्रेश होण्यासाठी जाते.....तोपर्यत मालतीताई रेवासाठी चहा घेवुन येतात.....

हे घे रेवा चहा.......बर ऐक ना आई......उदया पासुन मी विजीटला जाणार आहे.......

कसली विजीट....मालतीताई

अग तो राकेश गेलाय ना सुट्टीवर......त्यामुळे लोन डिपार्टमेंन्टच काम पेन्डिंग आहे....मग त्यासाठी विजीट आहे......

कोण कोण जाणार आहात..विजीटला......रमाकांतराव...

बाबा... मी आणि सर.....

कोण तो खडुस काय.....आकाश रेवाकडे हसत म्हणतो.....

दादा  तु पण........ती स्नेहा पण मला हसत होती......

अग नावच दिली आहेस तस..मग हसायला येणारच ना...आकाश

बाबा सांगा ना ओ दादाला.....

लहानच समजतेस बग अजुन.....मालतीताई

हो आहे मी लहानच......रेवा

बर चला बास झाली थट्टा....जेवूया आता......रमाकांतराव

सुजय ही घरी पोचतो......सगळेजण गप्पा मारत चहा घेत असतात....

आई उदया पासुन मला यायला थोडा वेळ होईल......सुजय

का रे सुजय.......आनंदराव.

अहो बाबा उदयापासुन लोन डिपार्टमेंन्टची विजीट आहे...सुजय

एकटाच जाणार आहेस का.......माधवीताई

नाही आई.....मी आणि लोन डिपार्टमेंन्ट मधील एक मुलगी आहे.....

मुलगी..... दादया नाव काय आहे तिच......आध्याला सुजयला चिडवायला चान्स भेटला होता

ते तुला कशाला हव आहे.......सुजय...

मी असच विचारत आहे........आध्या

रेवा देसाई....सुजय

ओहोहो.......रेवा........नाव मस्त आहे की.........आणि मुलगी ही मस्तच असेल ना दादया.....आध्या सुजयला चिडवत म्हणाली.....

ये गप्प... झाल का तुझ सुरु........आई ही खुप अगाव होतेय हा.......सुजय.....

काय अगाव वगेरे होत नाहीये मी..... साधा प्रश्न तर विचारला...........आध्या

हो का......तु कसा प्रश्न विचारलीस ना ते कळल मला....सुजय

कसा विचारले रे.......आध्या आणखिन चिडवत हसत विचारते.......

आपण आध्याच्या बोलण्यात अडकलो हे लक्षात आल्यावर सुजय......मुद्दाम आध्याला ये गप्प.......चल जेवायला.......सुजय....

दादया लाजलास तु..........आध्या हसत बोलते......

तसे सगळे हसायला लागले......

काय रे तुम्ही दोघे लहानच समजता अजुन.........चला बास आता.... जेवायला या....माधवीताई

सगळे जेवत असतात....सुजय व आध्याची मस्करी चालुच असते.......तेवढयात माधवीताई.....बास आता मस्करी मला महत्वाच बोलायच आहे.....

तसे सगळे शांत होतात........काय ग आई काय बोलायच आहे......आशुतोष

तुझ्याबद्दलच आहे......माधवीताई

आशुतोषला काहीच कळेना आईला नेमक काय म्हणायच आहे....माझ्याबद्दल काय आई

अरे आम्ही दोघांनी ठरवल आहे की...तुझ्या लग्नाच बघायच आता.....माधवीताई

पण आई एवढया लवकर...आशुतोष

लवकर कुठे......झाल की वय आता.......आनंदराव

तुला कोण आवडत असेल तर तस सांग आपण तुझ्या आवडीच्या मुलीशीच लग्न करुया.....आनंदराव

बाबा तस काही नाहीये........आशुतोष

खरच ना आशु......उगाच कस सांगु असा काही विचार नको करु असेल तर सांग तस.....माधवीताई

अग आई खरच तस काही नाहीयें.......आशुतोष

मग गुरुजींना सांगुन मुली बघायला सांगते.....चालेल ना.....माधवीताई

तुम्ही म्हणाल तस आई बाबा......आशुतोष

उदया मी गुरुजींना फोन करुन सांगते......माधवीताई

आशुतोषचा होकार ऐकल्यावर सुजय आणि आध्या काय गप्प बसतात होय.....

मग दादु....वहिनी कशी  हवी रे तुला.....की आम्ही शोधु.......आध्या

ए गप्प बसा.....आता जास्तच चिडवतील म्हणुन आशुतोष उठुन रुमध्ये जातो...

ये दादु लाजलास काय.........आध्या व सुजय...

नंतर बाकिचे सगळेजण जेवण आटपुन.....आपापल्या रुमध्ये जातात......

🎭 Series Post

View all