बावरे मन...भाग-52

बावरे मन..भाग 52 (हो निघुया.............परत पाऊले जड झाली होती पाय उचलत नव्हते......पण आता मन घट्ट करण गरेजेच

बावरे मन..भाग 52

(हो निघुया.............परत पाऊले जड झाली होती पाय उचलत नव्हते......पण आता मन घट्ट करण गरेजेच होत........स्नेहाने आता मन घट्ट केल व बाहेर पडली........तिच्यासाठी सजवुन आणलेल्या गाडीत जाऊन बसली......

स्नेहा तुझ्या सगळया बॅगा घेतल्या आहेत का ते एकदा पाहुन येते.........रेवा

हो चालेल.......स्नेहा)

आता पुढे.....

रेवा सगळया बॅगा चेक करत होती.....सुजय तिथे येतो..........तुम्ही मुली कस हे सगळ करु शकता........सुजय थोड इमोशनल होत बोलतो......

काय झाल........रेवा

आपल्या आई वडिलांना सोडुन जाण्याच ते सहन करण्याची सहनशक्ती फक्त तुम्हा मुलींच्यामध्येच असु शकते.... मुले किती ही स्ट्रॉग असले तरी.......त्याच्याकडे तुमच्या इतकी सहनशक्ती नाही.....खरच मानल तुम्हाला......मघाशी वहिनी केवढी रडत होती......ते पाहुन कस तरच झाल.......सुजय बोलत होता आणि रेवा त्याच्याकडे एकटक पाहत होती.........किती विचार करतो हा......खरच किती गोड आहे आणि निरागस पण......रेवा मनातल्या मनात बोलत होती.....पण थोड भानावर येत......सुजय असच असत रे......एक दिवस मुलीला तिच्या आई बाबांच घर सोडुन जावच लागत....तिच सगळ बालपण तिच्या मैत्रीणी तिच्या इथल्या सगळया आठवणी सगळया गोष्टी तिला सोडुन जावच लागत....रेवा

खरच मानल तुम्हाला.....आमची एखादी गोष्ट जरी इकडे तिकडे नाही दिसली तर आम्ही चिडचिड करतो.....आणि तुम्ही तुमच सगळच मागे सोडुन येता.....अगदी तुमच नाव सुध्दा जी तुमची ओळख आहे.....खरच मानल तुम्हाला.....पण मी माझ्या बायकोला अजिबात नाव बदलु देणार नाहीये.......तिची ओळख आहे ती अणि मी ती नाही बदलु देणार....सुजय

खरच किती गोड आहे हा.....मी खुप योग्य व्यक्तीची निवड केलेय हयाचा मला अभिमान वाटतोय.....लव्ह यु सुजय.........रेवा मनातल्या मनात बोलत होती......

बर निघुया का.....सगळे वाटत पाहत असतील......सुजय

सुजच्या आवाजाने रेवा भानावर येते हो निघुया........रेवा

****

आई काकु वहिनी आली......ये दि पटकन चल आपल्याला वहिनीच स्वागत करायच आहे ना.......रेवा

हो हो चल पटकन......राधिका.....

माधवीताई मालतीताई आरतीच ताट  घेवुन एन्ट्रीजवळ तयार असतात....

स्नेहा गाडीतुन उतरते........रेवा तिला घेवुन समोर येते..........गुलांबाच्या फुलांच्या पाकळयांच्या पायघडया......पायघडयांच्या दोन्ही साइडला मित्र मंडळी फुलांच्या पाकळया घेवुन थांबले होते....आजुबाजुला पसरलेला सुगंध.....सगळीकडे केलेली सजावट....स्नेहा हे सगळ पाहुन भारावुन जाते.....

स्नेहा जाऊया का........स्नेहा गोड लाजत हो म्हणते.........स्नेहा जसजशी पुढे जाऊ लागली तस तिच्यावर फुलांच्या पाकळयांचा वर्षाव होवु लागला.....ती येताना सुंदर म्युझिक सुरु झाल......स्नेहा तशीच चालत चालत पुढे येते.....ती आल्यावर माधवीताई तिच औक्षण करतात....औक्षण झाल्यावर आशु स्नेहाच वेलकम करण्यासाठी येतो........पण स्नेहाच्या समोर आल्यावर तो तिला पाहण्यातच हरवुन जातो.....स्नेहाने मोरपंखी करलची साडी नेसली होती.......त्याच्यावर मॅचिंग असे एअरिंग......पिंक कलरची लिपस्टिक...डोळयात काजळ..सुंदर अशी हेअर स्टाईल....गळयात छानसा सेट.......चेहऱ्यावर मेकअप.....खुप मस्त दिसत होती स्नेहा.....आणि आशु तिला पाहुन तसाच भान हरपुन उभा राहीला होता......

ओय दादु..........आता तिलाच पहायच आहे........आयुष्यभर.....वेलकम कर आता......आध्या आशुला चिडवत म्हणाली......

तसा आशु  भानावर येतो व गालातल्या गालात हसतो.....त्याने सोबत आणलेले गुलाब फुल तो स्नेहाला देतो.......व आपला हात पुढे करतो.....स्नेहा त्याच्या हातात हात दिल्यानंतर......वेलकम स्नेहा......

स्नेहा लाजतच आशुच्या हातात हात देत तशीच त्याच्यासोबत हॉलमध्ये येते.....स्नेहाचे आई बाबा व बाकीचे पाहुणे मंडळीही हॉलमध्ये येवुन बसतात.......मग सगळयांचा व्यवस्थित पाहुणचार केला जातो....

स्नेहा आशु रेवा आध्या व राधिका गप्पा मारत बसले होते....त्यांची दंगा मस्ती चिडवाचिडवी चालु होती........

स्नेहा सकाळ पासुन खुप धावपळ झाली असेल ना तु थोडावेळ रुममध्ये जाऊन आराम कर जा.....परत संध्याकळी आणि मेंहदीचा कार्यक्रम आहे....परत त्यावेळी आणि  तुला दमल्यासारख व्हायला नको...माधवीताई

हो आई जाते.....स्नेहा

ये आई काय ग...अजुन वेळ आहे ना ग मेहंदीला....बसुदे ना वहिनीला आमच्या सोबत आम्ही किती छान गप्पा मारत होतो......आध्या

अग आध्या वहिनी तुझीच आहे..आणि आता ती आपल्या घरीच येणार आहे ना.......तेव्हा हव्या तेवढया गप्पा मार म्हणे पण आत्ता तिला थोडा आराम करु दे खुप दगदग झाली आहे तिची.....परत संध्याकाळी चेहरा थकल्यासारखा दिसेल मग ती कार्यक्रम पण एन्जॉय करु शकणार नाही.......आणि तिचे फोटो सुध्दा छान येणार नाहीत....माधवीताई

अग हो.....मी हया सगळयांचा विचारच केला नाही.......सॉरी सॉरी....ये वहिनी जा तु आराम कर जा.....आध्या

रेवा तु पण जा तिच्या सोबत तुझी पण खुप धावपळ झाली आहे......माधवीताई

अहो काकु एवढी काय धावपळ झाली नाही......आणि लग्नघर म्हटल्यावर थोडी धावपळ असणारच ना.....रेवा

हो ग बाळ पण नंतर तुलाच दमायला होईल.....तु पण मग मेहंदीचा कार्यक्रम एन्जॉय करु शकणार नाहीस.....थोडा वेळ आराम कर....आणि हव तर नंतर ये मदतीला.....माधवीताई

बर काकु.....रेवा

अग आध्या सुजय कुठे दिसत नाहीये....केव्हाची शोधतेय त्याला.....माधवीताई

अग आई तो बाहेर आहे...संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी करतोय.....आध्या......

बर मी आले जाऊन तिकडेच........माधवीताई

स्नेहा व रेवा दोघी आराम करायला जातात....

रेवा किती मस्त वाटत आहे ना ग......आपण कोणासाठी इतके स्पेशल आहोत हे फिलिंगच वेगळी आहे ना...स्नेहा आशुने केलेल्या वेलकमचा क्षण आठवुन बोलत होती....

हो ग खरच खुप मस्त वाटत ग......आपण कोणासाठी तरी स्पेशल आहोत हि फिलिंगच वेगळी आहे.....रेवा सुजयचा विचार करत  बोलत असते.....स्नेहाच्या ते लक्षात येत....

ओ मॅडम थोड विचारातुन बाहेर या........तुमची स्पेशल व्यक्ती इकडेच येत आहे पहा.......स्नेहा रुममच्या बाहेर पाहत बोलते........स्नेहाच बोलन ऐकुन रेवा लगेच दाराकडे पाहते.....तर खरच सुजय त्यांच्याकडे येत होता......

स्नेहा कसला मस्त दिसतोय ना ग हा.........रेवा सुजयकडे पाहत बोलत असते.....

हो का......मी सांगते थांब त्याला तु अस बोलत होतीस म्हणुन.......स्नेहा रेवाला चिडवत बोलते.....

ये वेडी आहेस का.....तु काही बोलणार नाहीयेस त्याला कळल......रेवा सुजयला स्नेहा सांगेल या भितीने बोलते.......

बर बाई नाही सांगत.......वेडी कुठली......स्नेहा

काय गप्पा चालल्या आहेत मैत्रिनींच्या......सुजय आत येत बोलतो......

काय गप्पा असणार संध्याकाळच्या कार्यक्रमाचच की बोलत होतो.......स्नेहा

अस होय.......सुजय

हो...तु आत्ता इथे कस काय......करमत नाहीये की काय रेवाला  बघित्याशिवाय...स्नेहा थोडया हळु आवाजात बोलते.......

ये वहिनी काही पण काय..............ते मी तुम्हाला काही हव आहे का विचारायला आलो होतो......सुजय

हो......अरे काही नको अत्ताच तर आलो आहोत आम्ही.....स्नेहा

बर.....काही लागल तर सांग मला.......ओके.....सुजय

हो सांगेन......स्नेहा

****

रेवा हे बघ ना......छान दिसतय ना हे....एवढा मेकअप मी कधी केलाच नाहीये ग......स्नेहा

खुप मस्त दिसतय.......आणि तु उत्सवमुर्ती आहेस ना मग तुलाच जास्त तयार व्हायला हव कळल......आणि काही जास्त नाहीये उलट कमीच आहे......आता ना तु शांत रहा.....मला जरा पिनअप करु दे.....रेवा

बर मॅडम......स्नेहा

माझ्याकडे बघ पाहु........रेवा

स्नेहा रेवाकडे पाठकरुन उभी होती रेवाने तिच्याकडे बघ म्हटल्यावर ती रेवाकडे वळते........

कसली मस्त दिसतेयस यार.....आज दादुच काही खर नाही.....आज दादुची विकेटच जाणार आहे.....रेवा

ए गप्प काही पण असत तुझ......स्नेहा लाजत बोलते.......

कसली भारी लाजतेस यार.......रेवा

तु गप्प ना आता......किती चिडवशील......स्नेहा

हा मग काय......परत परत चान्स भेटणार आहे होय मला चिडवायचा......रेवा

हो का....मला पण तुला चिडवता येत हा.........स्नेहा

हो का....मग चिडव मला काहीच फरक नाही पडणार.......रेवा

हो का.......अरे सुजय तु कधी आलास........सुजयच नाव ऐकताच रेवा मागे वळते......आणि तिची नजर सुजयला शोधु लागते.....पण सुजय तिला कुठेच दिसत नाही.....रेवाची शोधाशोध पाहुन स्नेहा हसु लागली....

काय झाल हसायला......रेवा

तु काय म्हणत होतीस मला फरक पडत नाही म्हणे......नुसत सुजयच नाव घेतल तर लगेच त्याला शोधु लागलीस.......आणि म्हणे फरक पडत नाही......नुसत म्हणायच असत तस....पण मनातुन खुप काही वाटत असत.......स्नेहा रेवाला चिडवत असते....

गप्प ग....चल आवर आता आपल्याला जायच आहे बाहेर......रेवा

हो ग जाऊया....अरे सुजय तु......ये ना.....स्नेहा

आता परत फसवु नकोस मी फसणार नाही.....चल आवर....रेवा

अग रेवा खरच सुजय आला आहे......स्नेहा हळु आवाजात रेवाला सांगत असते..पण रेवा ऐकतच नसते......अग खरच सुजय आला आहे.....स्नेहा

तु गप्प बस हा आता चल बाहेर..अस म्हणत रेवा मागे वळते....सुजयही त्यांच्याकडेच येत असतो....दोघे एकदम समोर येतात....व दोघांचे डोके एकमेकांना बडवते.....आ........रेवा डोक्यात हात लावत वीव्हळते....सुजय ही डोक्याला हात लावत असतो...

रेवा लक्ष कुठे आहे तुझ......सुजय

तु खरच आलायस.....रेवा

अग काय बडबडतेयस...खरच आलोय म्हणजे..सुजय थोड विचार करत बोलतो.....

आ..........ते.......म्हणजे काही नाही...रेवा

बर.........आणि हे काय तु अजुन आवरली नाहीयेस......सुजय

फक्त पाच मिनिट लागतील आवरायला.....स्नेहाला आवरत होते.......रेवा

हो का.....मला आईने बोलावयला पाठवले आहे आणि तु अजुन तयार नाहीयेस.......सुजय

अरे हो हो.....सांगितल ना पाच मिनिटात तयार होईन.....रेवा

तुमचे पाच मिनिट माहीतेय मला.........सुजय

माझे पाच मिनिट म्हणजे पाच मिनिट असतात......कळल.....तु जा आम्ही आलोच....रेवा

आणि मला सांगतोय तु तर कुठे आवरला आहेस.......रेवा सुजयकडे पाहुन बोलते......

मला किती वेळ लागतो तयार व्हायला....पाच मिनिटात होतो तयार.....सुजय

हो का..........जा मग आवर जा....तु असा बोलत राहीलास तर मी पाच मिनिटात कशी आवरु.....रेवा

बर जातो......ये वहिनी कसली भारी दिसतेस.....आज दादुच काही खर नाहीये.......सुजय स्नेहाला चिडवत म्हणाला

आता तुझ झाल का सुरु.........मगाच पासुन हिने चिडवुन चिडवुन हैराण केले आहे आणि आता तु पण चिडव........स्नेहा

हो मग काय आमचा हक्क आहे तो........सुजय

हो का......चिडवा चिडवा.....आम्ही पण आमचा हक्क कसा दाखवतो बघ हा......आमची पण वेळ येईलच की......स्नेहा सुजयला रेवाकडे खुणवुन चिडवत असते.......

आता ही रेवा समोरच चिडवेल म्हणुन सुजय डोळयाने खुणवुन नको प्लीज नको अस सांगत असतो....

हो का.....बर बर......स्नेहा

ये वहिनी तयार झालीस का.....आध्या व राधिका आत येतात.....

वॉव वहिनी किती सुंदर दिसतेयस.....राधिका.....

थॅक्स राधिका.....स्नेहा

रेवा तु अजुन तयार झाली नाहीयेस.......आध्या

अग हे काय आत्ता होतेच  बग.......रेवा

सुजय तु पण अजुन तयार झाला नाहीयेस.......सगळे बाहेर तयार होवुन आले आहेत....राधिका......

आत्ता होईन तयार........सुजय

ये रेवा वहिनी आज मी तुला तयार करतो..........आध्या

रेवा वहिनी बोलल्यावर सगळेच आध्याकडे पाहतात.......

काय म्हणालीस तु.......राधिका

काय कुठे......रेवाला मी तयार करते बोलले........आध्या

नाही त्याच्या आधी........राधिका

आध्या आठवु लागली मी अस काय बोलले आहे......मग तिला लक्षात येते की ती चुकुन रेवाला वहिनी बोलली आहे......अरे यार आता मी काय सांगु यांना......अशी कशी मी वेंधळयासारखी करु शकते...आता दादया मला सोडणार नाही.......आध्या सुजयकडे पाहु लागली.......सुजय रागाने तिच्याकडे पाहत होता.....अग मी एवढच बोलले की.......आध्या

अग नाही तु ना......रेवा वहिनी अस बोललीस........राधिका

अग मी रेवाला वहिनी बोलले नाही..........मी अस म्हणाले रेवा वहिनी..... मी रेवाला तयार करते......मी वहिनीला पण सांगत होते ग.........आध्या काही तरी शब्दाची जुळवा जुळव करत बोलते....

ओ अस होय मला वाटल तु रेवा ला  वहिनी बोललीस........राधिका

नाही ग......रेवा आवर पटकण मी तयार करते तुला......दादया तु पण जा आवर पटकण........आध्या विषय बदलत बोलते.....

हो  सुजय रेवा चला आवरा पटकण.......स्नेहा

हो जातोय तुम्ही आवरुन या पटकण खाली......सुजय बाहेर जात बोलतो....

हो आम्ही आलोच.......स्नेहा

***

क्रमश:

पुढचा भाग 8/10/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all