बावरे मन...भाग-31

बावरे मन..भाग 31 बर बर.....उदया आपल्याला मुलगी पहायला जायच आहे लक्षात आहे ना.......माधवीताई अरे हो ते ल?

बावरे मन..भाग 31

बर बर.....उदया आपल्याला मुलगी पहायला जायच आहे लक्षात आहे ना.......माधवीताई

अरे हो ते लक्षातच नाहीये हया कामाच्या गडबडीत......पण मी उदया फ्री आहे येईन....पण आत्ता जातो आजच्या आज डॉक्युमेन्ट अपलोड करायचे आहेत........10 पर्यत व्हायला हव सगळ.......आणि आई मी जेवायला खाली नाही येत माझ जेवण वरच दे माझ्या रुममध्ये.......सुजय

आता पुढे......

बर बर जा तु........माधवीताई

आमच्या जेवणाच बघा तोपर्यत.........आनंदराव मस्करी करत म्हणाले........

अहो अजुन वेळ आहे जेवायला......थांबा थोडा वेळ........बर आशु तु तुझी तयारी आत्ताच करुन घे कोणते कपडे घालायचे ते आत्ताच बघ.....उदया जायच्या वेळेला गडबड नको...........आणि तुम्ही जाऊन थोडी मिठाई वगेरे घेवुन या जावा.......तोपर्यत मी जेवणाच बघते.......माधवीताई

सगळ झाल की अजुन काही राहीलय सांगायच..........आनंदराव........

झाल आता जा तुम्ही.......आध्या चल मदत कर चल मला.......माधवीताई

ए आई पाच मिनिटात आले........दादुला कपडे चॉईस करायचा मदत करुन येते........आध्या

बर ये पटकन.......माधवीताई

सुजय डॉक्युमेंन्ट अपलोड करत बसलेला असतो........लास्टच्या एकाच कस्टमरचे डॉक्युमेंन्ट अपलोड व्हायचे बाकी होते

9.30 वाजले यार......कधी अपलोड होणार हे.........ह्या सर्व्हरला पण आजच स्लो व्हायच होत.....सुजय वैतागत बोलत होता..........तेवढयात त्याच्या फोन वाजतो........

आत्ता कोण फोन.............अस बोलणार तेवढयात स्क्रिन वर रेवाच नाव दिसत......रेवा हयावेळेला कशी काय फोन केलेय.........असा विचार करत सुजय फोन उचलतो........

हॅलो रेवा बोल.........सुजय

सॉरी एवढया उशीरा फोन करतेय..........रेवा

इट्स ओके रेवा........सुजय

मी ते डॉक्युमेंन्ट अपलोड झाले की नाहीत बघायला म्हणुन फोन केलेला.........रेवा

कुठल काय.....लास्टच्या एकाच कस्टमरच अपलोड होत नाहीये...........सर्व्हच स्लो झालय...सुजय

आता मग.......9.30 होऊन गेलेत दहा पर्यत तर करायच आहे........रेवा थोडया काळजीने विचारते.......

बघु आता काय होतय............आपल्या हातात काही नाहीये आता..........सुजय थोड उदास होत बोलतो

सुजय.....तु सॅड नको होऊस नक्की होईल बग.............रेवा अस म्हणत असते तोपर्यत सुजय जोरात ओरडतो........

एस..............फायनली............सुजय

अरे काय झाल असा काय ओरडतोयस..........रेवा

रेवा झाल अपलोङ फायनली............सुजय खुश होत बोलला.....

खरच...रेवा सुध्दा खुश होवुन विचारते......

हो झाल....फायनली..........सुजय

मग सरांना फोन करुन सांगाव लागेल ना...........रेवा

नाही फोन करायची गरज नाहीये......मी मेल करतो त्यांना.......सुजय

ओके चालेल.........रेवा

आता दोघांना काय बोलाव कळेना दोन मिनिट शांतच राहीले.....शेवटी रेवानेच.....जेवण झाल का अस विचारली........

हे काय काम करत जेवत आहे.....तुझ जेवण.......सुजय

झाल माझ...........बर ठेवु का फोन...........रेवा

झोप आली आहे काय.......सुजय

काय........म्हणजे......रेवा

म्हणजे ते झोप आली असेल ना तुला.......सुजयला तिच्याशी असच बोलत रहाव अस वाटत आणि तो त्या नादात एकदमच बोलुन गेला झोप आली आहे का.........नंतर लक्षात आल्यावर आपल बोलन सावरत बोलतो....

बर........बाय गुड नाईट.........रेवा

बाय..गुड नाईट..........सुजय तोंड एवढस करुन फोन ठेवतो.......

****

आशु, आध्या, सुजय आवरल की नाही तुमच......माधवीताई सगळयांना ओरडत होत्या......

सगळे हॉल मध्ये येत बोलतात हो ग आई हे बग झाल आवरुन.........

बाबा कुठे आहेत......माधवीताई

आलो आलो.......मी तयारच आहे.....आनंदराव हॉलमध्ये येत म्हणाले......

बर मग निघायच का.......माधवीताई

हो निघुया तु काय काय सोबत घ्यायच असत ते घेतलीस ना......मिठाई वगेरे........आनंदराव

हो घेतलेय......गुरुजींना पण फोन करुन सांगितलेय आम्ही निघालो म्हणुन.....माधवीताई

बर बर चला.....परत वेळ नको.........आनंदराव

****

अग आवरल का पाहुणे आले बग......सुधिरराव

हो हो आवरलय सगळ......मुलींनो आवरल का ग पाहुणे आले बघा.....रेखाताई

सगळे आत येवुन बसतात.....तेवढयात आशुचा फोन वाजतो........आई मी पाच मिनिटात आलो महत्वाचा फोन आहे.........

बर पटकन ये.......माधवीताई

रेखाताई व मुलीची मैत्रीण चहा व पोहे घेवुन येतात......

तु..........?......तु इथे कशी काय..........माधवीताई व त्याच्या घरातले सगळयानांच आश्चर्य वाटत.....

काका काकु तुम्ही.............

अग रेवा तु कशी काय इथे.........माधवीताई

म्हणजे आपण मिस स्नेहा ना बघायला आलोय.......सुजय

हो अरे मुलीच नाव स्नेहाच आहे........तु ओळखतोस का तिला.....आनंदराव

हो बाबा त्या माझ्याच बॅकेत आहेत ना....सुजय

हे बग तु त्यावेळी फोटो पाहीला असतास तर तुझ्या लक्षात आल असत......माधवीताई

तुम्ही ओळखता एकमेकांना.......रेखाताई

हो.......माझ्या मित्राची मुलगी आहे ही.......आनंदराव

हो काकु ओळखतो आम्ही.......रेवा

मुलगी ओळखीचीच होती आणि आपल्याला कळलच नाही.......आनंदराव अस म्हणुन हसु लागले.........तसे सगळेजण हसायला लागले

बर पोहे घ्या ना थंड होतील......सुधिरराव

हो हो........आनंदराव

रेवा सगळयांना पोहे देते.........ती सुजयला पोहे देत असते......दोघे एकमेकांकडे बघुन हसतात......

रेवा स्नेहाच आवरला का बग जा.......रेखाताई

हो काकु जाते.......हा ट्रे ठेवते व जाते..........रेवा स्नेहा आवरलेय का बघायला जाते...

मुलगा कुठे आहे थोडया वेळाने येणार आहे का......सुधिरराव

नाही नाही आला आहे एक फोन आला म्हणुन बाहेर थांबलाय...........हा बगा आलाच.......आनंदराव

या या........बसा....पोहे घ्या.......सुधिरराव..

रेवा किचनमध्ये ट्रे ठेवायला जाते.........सुजय मला काहीच कस काय बोलला नाही......बाकीच तर किती काय काय बोलत असतो......पण मुलगी बघायला जाणार आहे हे बोललाच नाही......पण तो का मला सगळ सांगेल मी काय त्याची क्लोज फ्रेन्ड आहे होय..........पण मी हया सगळयाचा एवढा का विचार करतेय.....मी तर खुश व्हायला हव ना स्नेहासाठी इतक छान स्थळ आल आहे म्हणुन........पण सुजय स्नेहाला बघायला आलाय म्हणुन मला एवढ का वाईट वाटत आहे.........रेवा तिथेच विचार करत थांबली होती.........

अग रेवा अजुन तु इथेच स्नेहा आवरली की नाही पाहील नाहीस का.........रेखाताई

हो आत्ता जाते काकु......रेवा

बर जा लवकर.......रेखाताई

वॉव मस्त दिसतेयस......मुलगा पाहताक्षणी प्रेमात पडेल बग......रेवा

ए गप्प काहीही हम........स्नेहा

अग खरच खुप सुंदर दिसतेयस......रेवा

बर तु मुलाला पाहीलस का.......स्नेहा

ही अशी का विचारतेय......हीला सुध्दा माहीत नाहीये की सुजयच हीला पहायला आलाय..........मग मी पण सांगतच नाही.....सरप्रायज मिळु दे हीला........हो ग मुलगा मस्तच आहे..........रेवा

स्नेहा झाल का तुझ.........चला बाहेर पाहुणे वाट पाहत आहेत........रेखाताई

हो काकु झाल आमच चला जाऊया........रेवा.....

***

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all