Jan 20, 2021
प्रेम

बावरे मन...भाग-74

Read Later
बावरे मन...भाग-74

बावरे मन..भाग 74

 

(मालतीताई आपण बाहेर बसुन बोलुया का.......जास्तवेळ रेवाला बोलायला लावायला नको.....ती थोडा आराम करुदे.........माधवीताई

हो.....जाऊया..........बाळा आम्ही आहे बाहेर काही लागल तर सांग हो........मालतीताई

हो आई........रेवा हळु आवाजात बोलते......)

 

आता पुढे.....

 

सगळे बाहेर जात असतात..........स्नेहासुध्दा त्यांच्यासोबत बाहेर जात असते......पण रेवा तिच्या हाताला पकडते व तिला थांबवते...........

 

काय ग काही हव आहे का...........स्नेहा

 

स्नेहा सुजय....................सुजय कुठे दिसत नाहीये..........रेवा

 

अग आहे तो इथेच........स्नेहा

 

मला भेटायच आहे त्याला.......प्लीज त्याला पाठवुन देशील.....रेवा

 

हो देते पाठवुन........असेल बाहेरच............स्नेहा

 

हमम.......रेवा

 

स्नेहा बाहेर जाते......व सुजयला शोधत असते......पण तिला सुजय कुठे दिसतच नाही......

 

आध्या तु सुजयला कुठे पाहीली आहेस का ग.........स्नेहा.....

 

अग तो मंदीराच्या दिशेने जाताना पाहिल मी........आध्या

 

बर.....मी आलेच.........स्नेहा

 

हो चालेल मी रेवाला भेटुन येते...........आध्या

 

हो..........स्नेहा आध्याला विचारुन मंदिराच्या दिशेने सुजयला बोलायला जाते.....

 

तर सुजय मंदिरातच असतो..........तो बाप्पाला नमस्कार करत असतो......बाप्पाने त्याच्या रेवाला त्याला परत केलेल असत........एवढया मोठया संकटातुन तिला बाहेर काढलेल असत.......त्यासाठी तो बाप्पाचे आभार मानत असतो.......

 

सुजय..........स्नेहा मागुन सुजयला आवाज देते.......

 

स्नेहाचा आवाज ऐकुन सुजय मागे वळतो.......वहिनी तु.......रेवा ठिक आहे ना.....सुजय

 

अरे हो हो....ती ठिक आहे.........केव्हाची शोधतेय तुला..........स्नेहा

 

का........सुजय

 

का म्हणजे.......सगळे रेवाला भेटायला गेले होते तु का आला नाहीस..........स्नेहा

 

नाही ते...........सुजय

 

ते काय.........रेवा तुला शोधत होती......पण तु कुठे दिसलाच नाहीस.....ती मला विचारत होती........स्नेहा

 

काय विचारत होती.............सुजय

 

हेच की.....सुजय कुठे आहे......मला भेटायच आहे त्याला.........स्नेहा

 

खरच वहिनी......सुजय आनंदरात विचारतो

 

हो सुजय........रेवाला तुला भेटायच आहे.......स्नेहा

 

आणि काय म्हणत होती का........सुजय

 

तुला पाठवुन दे म्हणुन सांगितली आहे.......तुझी वाट पाहतेय ती.........जा तिला भेटुन ये जा.......स्नेहा

 

हो वहिनी........मी आलोच तिला भेटुन......अस म्हणुन सुजय रेवाकडे जातो......

 

दादया कुठे होतास तु.....वहिनी शोधत होती.........आध्या

 

हो भेटली मला.....मी आलोच रेवाला भेटुन........सुजय

 

हो........आध्या

 

सुजय रुममध्ये येतो व रेवाच्या जवळ जातो.......पण रेवा झोपली होती........अरे यार ही तर झोपली आहे.....नंतर भेटेन......अस म्हणुन सुजय जात असतो........

 

सुजय...............

 

सुजय त्याच नाव ऐकल्यावर मागे वळतो.........

 

कुठे जातोयस.........रेवा हळु आवाजात विचारते.....

 

अग कुठे नाही...तु झोपली होतीस ना........म्हणुन नंतर भेटता येईल म्हणुन बाहेर जात होतो......सुजय

 

सुजय ते मी तुला............रेवा

 

शुशूश्श्श्श्शश्‍........काही बोलु नकोस........डॉक्टरांनी जास्त बोलायच नाही अस सांगिलय.........सुजय

 

सांगु देत.......पण मला बोलायच आहे......रेवा

 

रेवा ऐक माझ.....तु आत्ता शुध्दीवर आली आहेस.....जास्त बोललीस तर तुला त्रास होईल......सुजय

 

सुजय.......सॉरी.......मी तुला खुप त्रास दिला ना.......तुझ्याशी खुप वाईट वागले........तुला हव तस बोलले.....रेवा बोलत होती.........सुजयला सॉरी बोलती होती........पण सुजय रेवाच्या जवळ येतो व तिच्या ओठांवर बोट ठेवत............बास........किती बोलतेयस..........शांत बस पाहु.........सुजय

 

सुजयच्या अशा अचानक जवळ येण्याने रेवाला त्यांचे आधीचे क्षण डोळयासमोर येतात......व तिच्या डोळयात पाणी येत........

 

काय झाल का रडतेयस........त्रास होतोय का..........सुजय

 

नाही.........रेवा

 

मग का रडतेयस...........सुजय

 

सुजय मला सोडुन तु कुठे जाणार नाहीस ना.....रेवा

 

ये वेडाबाई.....तु हयासाठी रडतेयस.........मी कुठेही जाणार नाहीये तुला सोडुन......तुझ्याजवळच राहणार आहे.......मी माझी ट्रान्सफर कॅन्सल केली आहे....सुजय रेवाचे डोळे पुसत बोलत होता........

 

नक्की ना.......रेवा

 

हो नक्की.........सुजय

 

सुजयच्या बोलण्याने रेवाच्या चेहऱ्यावर हसु येत.......

 

बर चला आता आराम कर.........खुपवेळ बोलतेयस......आता शांत झोप.........सुजय

 

सुजय माझी इच्छा नाहीये.......तुझ्याशी बोलत बसावस वाटत आहे.......रेवा

 

बोलुया ना.....पण आत्ता आराम कर.....तु ठिक झालीस ना.....आपण भरपुर गप्पा मारुया....चल आता आराम कर......सुजय

 

बर.........रेवा एवढस तोंड करत बोलते....

 

***

 

बघता बघता महिना कधी झाला....कळलाच नाही....हया महिन्याभरात रेवाच्या घरचे व बाकिचे सगळे रेवाची खुप काळजी घेत होते तिला काय हव नको ते पाहत होते......वेळेवर जेवण देणे औषध देणे आशा सगळयांच गोष्टी सगळे करत होते........सुजयच्या घरचे सुध्दा एक दोन दिवसांनी येवुन रेवाची चौकशी करत असायचे तिला तिच्या अवडीचे काय हव ते घेवुन यायचे.....सुजय सुध्दा बॅक सांभाळुन रेवाची काळजी घेत होता....तिला रोज फोन कराचला तिच्याशी बोलायचा.....

आता रेवा बरी झाली होती आणि आज पासुन बॅकेत परत जॉइन होणार होती........रेवा एवढया मोठया संकटातुन बाहेर आली आणि ती परत  बॅकेत येत होती......बॅकेतील सगळया स्टाफने तिच्या स्वागताची तयारी केली होती.......

 

ये रेवा मॅडम आल्या चला चला........शरद बाहेरुन ओरडत येतो.....

 

तसे सगळे दरवाजा जवळ येवुन थांबतात..........रेवा सुजय सोबत आली होती....सुजय व स्नेहा तिला सोबत घेवुन आले होते......

 

रेवा आत आल्यावर तिच्यावर फुलांच्या पाकळयांचा वर्षाव करण्यात आला......मालगावे मॅडमांनी तिचे औक्षण केले........व बाकीच्या स्टाफने तिला बुके देत तिचे स्वागत केले.......

 

थॅक्यु सो मच.......रेवा

 

रेवा आता बरी आहेस ना ग.......मालगावे मॅडम.......

 

हो मॅडम मस्त आहे........तुम्ही सगळे कसे अहात......किती दिवसांनी पाहतेय सगळयांना.....रेवा

 

बर चला.......झाल ना स्वागत सगळे कामाला लागा.......सुजय केबिनमध्ये जात म्हणाला......

 

हो सर.........सगळे एकत्र ओरडतात......

 

खडुस.......रेवा हळुच स्नेहाच्या कानात बोलते.......

 

रेवा अस बोलल्यावर स्नेहा सुजयकडे पाहत हसते........

 

सुजयला काही कळतच नाही.........ही अशी का हसतेय त्याला कळतच नाही.....सुजय केबिनमध्ये जातो.....व स्नेहाला केबिनमध्ये बोलावुन घेतो......

 

स्नेहा कुठे जातेयस.......रेवा

 

अग सरांनी बोलावल आहे.......केबिनमध्ये जातेय..........स्नेहा

 

आल्या आल्या कामाला लावल का खडुसने........रेवा हसत म्हणाली

 

खडुस का.......सांगते थांब हा सुजयला.....स्नेहा रेवाला चिडवत म्हणाली.....

 

सांग जा घाबरते की काय तुझ्या दिराला......रेवा हसत म्हणाली..

 

घाबरत नाहीस का.....मग आता तर सांगतेच थांब......अस म्हणत स्नेहा सुजयच्या केबिनमध्ये जाते...

 

मे आय कम इन सर.......स्नेहा

 

एस कम इन........सुजय

 

तु बोलवलस का........स्नेहा

 

हो..........तु मघाशी माझ्याकडे पाहुन हसत का होतीस......सुजय

 

अरे ते होय.........अस म्हणुन स्नेहा हसु लागते.......

 

आता हसायला काय झाल.........सुजय

 

अरे तु केबिनमध्ये येत बोलला नाहीस का.....चला आता कामाला लागा.........स्नेहा

 

हा त्याच काय.....तेव्हा.....रेवा तुला खडुस म्हणाली म्हणुन हसत होते.......स्नेहा परत हसते

 

मी खडुस आहे.......सुजय थोडा रागिट लुक देत बोलतो.......

 

काय माहित तुमच्या मॅडमांनाच विचार.....त्यांना तु खडुस वाटतोस.....स्नेहा

 

हो का......तिला तर विचारणारच आहे.....पण आज नाही.......सुजय

 

म्हणजे काय समजल नाही..........स्नेहा

 

क्रमश:

 

 

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

 

 

Circle Image

Swati