बावरे मन...भाग-70

बावरे मन..भाग 70 (अग मला कस माहित असणार.......तु अचानक मला ओढत आणलीस.....का आणलीस कशासाठी आणलीस मला काय म

बावरे मन..भाग 70

(अग मला कस माहित असणार.......तु अचानक मला ओढत आणलीस.....का आणलीस कशासाठी आणलीस मला काय माहित..........रेवा

बर......महित नाहीये ना तुला मी सांगते तुला का इथे आणले आहे........स्नेहा अस बोलुन रेवाच्या समोर येते........

तुला माझ्या तोंडुनच ऐकायच आहे ना मग ऐक..........सुजयने त्यांची ट्रान्सफर करुन घेतलेय बेंगलोंर ला.....तो निघुन गेला कायमचा.......तुझ्यापासुन दुर.........तुला त्रास होवु नये म्हणुन........स्नेहा)

आता पुढे.......

काय.......रेवा एकदम ओरडते...पण हे ऐकल्यावर रेवाला शॉकच बसतो......तिच्या डोळयात पाणी येत....सुजयला रोज पाहता येईल हया आशेवरती ती बॅकेत यायची आणि आता सुजय तिच्यापासुन दुर गेलाय म्हटल्यावर तिला रडु यायला लागल......पण तिला स्नेहासमोर रडता पण येईना.....स्नेहा डोळयातील पाणी पाहेल म्हणुन ती पटकण स्नेहाकडे पाठ करते......व डोळयातील पाणी पुसते...पण सुजयच्या जाण्याचा काहीच फरक पडत नाही अस दाखवत......अग बॅकेत आहे म्हटल्यावर ट्रान्सफर तर होणारच ना त्यात काय एवढ......आणि मला का त्रास होईल सरांचा........तुझ काही तरीच असत हा स्नेहा.....

हो का होत नाही का त्रास मग.....हे सगळ माझ्याकडे बघुन बोल........स्नेहा

आता मात्र रेवाची कसरत होती.....पण ती खंबीर होते.......डोळयातील पाणी पुसते.....आणि स्नेहाकडे पाहते........काय ऐकायच आहे तुला सांग.....हेच ना की मला सुजयच्या जाण्याचा काहीच फरक पडत नाही......तर ऐक मला त्याला असण्याचा किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नाही.....रेवा स्नेहाच्या डोळयात पाहुन बोलते.....

रेवाचा तो खंबिरपणा पाहुन स्नेहाला आर्श्चय वाटत.....एकढ बळ आल तर कुठुन तुझ्यात.....इतक्या सहज खोट बोलतेयस......आणि ते ही माझ्या डोळयात पाहुन........स्नेहा

अस काही नाही......जे आहे तेच बोलतेय मी.......रेवा

रेवा तुला का कळत नाहीये ग......तु प्रेम करतेस सुजयवर....आणि राधिका सुजयवर प्रेम करते म्हणुन तु अशी करतेयस माहितेय मला..........स्नेहा

स्नेहा सारख सारख तेच तेच काय ग........सांगितलय ना मी तुला......मी सुजयवर प्रेम नाही करत......आणि राधिका प्रेम करते म्हणतेस ना....पण ती प्रेम करतेय म्हणुन मी का अशी करु......

ते दोघेही एकमेकांवर प्रेम करतात....मग मी कुठे आले मध्ये......उगाच तु गैरसमज करुन घेतेयस स्नेहा.......रेवा

गैरसमज मी नाही तु करुन घेत आहेस रेवा.........स्नेहा

मी कोणताच गैरसमज करुन घेत नाहीये.....आणि हयात गैरसमज करुन घेण्यासारख काय आहे....रेवा

तु घेत आहेस रेवा........स्नेहा

अग पण कोणता गैरसमज.........रेवा

हेच की सुजय व राधिका एकमेकांवर प्रेम करतात.....स्नेहा

अग मग ते खरच आहे ना......त्यात गैरसमज करुन काय घ्यायच.....रेवा

स्नेहा रेवाजवळ जाते....आणि तिच्या हाताला पकडुन तिच्याकडे वळवते......हाच तर गैरसमज आहे रेवा तुझा........सुजय राधिकावर प्रेम करत नाही.......कळल का तुला.....तो नाही राधिकावर प्रेम करत.......स्नेहा

काय.........हे एकल्यावर रेवाला शॉकच बसतो......अग अस कस होईल......राधिकाने त्याला प्रपोज केल होत...आणि त्याने हो पण म्हटल होत....मला राधिकाने सांगितल होत......रेवा

अग हो........स्नेहा पुढे काही बोलणार इतक्यात मागुन आवाज येतो.........हो मी बोलले होते...........

रेवा मागे वळुन पाहते तर राधिका बोलत होती......

हो रेवा मी बोलले होते पण ते सगळ चुकीच होत.......तो माझा गैरसमज होता.......मी चुकीचा अर्थ काढला होता......राधिका बोलत रेवा समोर येवुन थांबते.......

राधिका काय बोलतेयस तु.........व्यवस्थित बोल काय ते........रेवा

हो सगळ सांगते.......ते सांगण्यासाठीच इथे आले आहे.........अस म्हणुन राधिका झालेला सगळा प्रकार रेवाला सांगते........

काय.........ते सगळ ऐकल्यावर रेवा रडु लागली........तिला काय बोलाव कळेना......रेवा रडताना स्नेहा तिच्या जवळ आली.......

आता कळल का तुला.....सुजय फक्त तुझ्यावर प्रेम करतो......आणि तुला त्रास होवु नये म्हणुन तो बेंगलोरला गेला....

स्नेहाला समोर आल्यावर रेवा तिला मिठी मारुन रडु लागली.....स्नेहा मी खुप चुकीच वागले ग सुजयशी......मी अस वागयला नको होत ग.......मी एवढ रुढ वागुन सुध्दा तो मला किती समजुन घेत होता....पण मी मात्र त्याच्याशी वाईटच वागले......रेवा सगळ रडत बोलत होती.......

स्नेहा मला सुजयला सॉरी म्हणायच आहे ग........रेवा

आता ते शक्य नाहीये रेवा......सुजय बेंगलोंर जातोय.....तुझ्यापासुन खुप लांब.......स्नेहा

नाही अस नाही करु शकत तो.......तो दुर गेल्यावर मी काय करु.....नाही राहु शकत ग सुजयशिवाय......खुप प्रेम करते ग सुजयवर......त्याच्याशिवाय नाही ग राहु शकत.....तु सांग ना सुजयला तो ऐकेल तुझ.......प्लीज यार.....माझ्यासाठी......प्लीज........रेवा

तुला वाटत नाही का मी त्याला समाजावल नसेल अस.........खुप समजावले ग......पण तो नाही ऐकला......शेवटपर्यत त्याला समजावत होते......पण त्याच्या निर्णयावर ठाम होता.......त्याला कोण थांबवु शकत असेल तर ती फक्त तु आहेस......आता तो फक्त तु थांबवल्यावरच थांबेल......स्नेहा

हो रेवा......तो फक्त तुझच ऐकेल.....अजुन पण वेळ गेली नाही....तु जाऊन थांबवु शकते......तो एअरपोर्टवर गेला आहे......राधिकाच पुढे काही न ऐकुन घेता रेवा सुजयकडे धावत सुटते......

अग रेवा ऐक कुठे जातेयस...........राधिका मागुन ओरडत होती.......

राधिका नको थांबवुस तिला......ती सुजयकडे जातेय......जाऊदे.....ती थांबवल्यावरच सुजय थांबेल.......स्नेहा

अग पण वहिनी..........राधिका

अग नको काळजी करुस.......सगळ ठिक होईल........स्नेहा

बर......मी जाते घरी......राधिका

हो जा मी थोडयावेळात येईन काम आवरुन........स्नेहा

****

रेवा एअरपोटच्या बाहेर येते व रोडवर ती सुजय कुठे दिसतोय का ते पाहत होती...........सुजय कुठे दिसतच नव्हता.....ती सुजय फोन करत होती पण सुजय तिचा फोन उचलतच नव्हता......ती शोधत असताना तिला रस्त्याच्या पलिकडे सुजय दिसतो.......सुजय पाहिल्यावर ती सुजयला हाक मारते....पण सुजयच लक्षच नसत......सुजय निघुन जाईल म्हणुन ती तशीच हाक मारत.....रस्ता ओलांडत असते....आजुबाजुला गाडया येत आहेत हयाच सुध्दा तिला भान नव्हत.....ती रस्त्याच्या मधोमध येते व सुजयला जोरात हाक मारते.....

रेवा.........रेवाचा आवाज आला......पण इथे कशी असेल.....मला भास होत असेल.....सुजय स्वत:शीच बोलत असतो......पण परत सुजय अशी हाक येते......परत रेवाचा आवाज.....सुजय मागे वळुन पाहतो......आणि पाहतो तर.....रेवा मागे असते.....ती रस्ता ओलांडत असते......

रेवा............सावकाश गाडी येत आहे........सुजय रेवाला ओरडतो........पण रेवा सुजय पाहिल्यावर इकडे तिकड न पाहताच जात होती.....ती धावत जात होती आणि अचानक......

रेवा...............सुजय जोरात ओरडतो......आणि रेवाकडे धावत सुटतो......

रेवा सुजयकडे जाण्याच्या ओघात साईडने येणारी ट्रक तिने पाहिलीच नाही....आणि ती तशीच पुढे जात होती...व त्या ट्रकने तिला धडक दिली........

सुजय रेवाजवळ येतो.....तिला आपल्या जवळ घेतो.......रेवा उठ ना......रेवा डोळे उघङ.....रेवा उठ ना.....प्लीज यार......माझ्यासाठी......सुजय रेवाला उठवत असतो......पण रेवाला ट्रकने जोरात धडक दिली होती......तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता.....सगळीकडे रक्त साडले होते.......आजुबाजुला लोक जमा झाले होते.........

रेवा उठेना म्हटल्यावर सुजय तिला उचलुन बसवतो.....व तिला हॉस्पिटला घेवुन जातो.......रेवा प्लीज उठ ना ग......माझ्यासाठी........डोळ उघड रेवा.....बघ ना ग मी तुझ्या समोरच आहे.....तुझा सुजय तुझ्या समोर आहे........मी तुला काही होवुन देणार नाही.......प्लीज डोळे उघङ......काका लवकर चला.......सुजय त्याच्या ओळखीच्या डॉक्टरांना फोन करतो.......डॉक्टरांनी त्याला तिला काही पण करुन शुध्दीत ठेवायला सांगितल होती......तिने जर शुध्द हरपली तर कंन्डीशन क्रिटीकल होवु शकते......त्यामुळे सुजय रेवाला सतत बोलवत होता.....तिला शुध्दीत ठेवण्याचा प्रयत्न करत होता.......पण थोड पुढे गेल्यावर रेवा काहीच बोलेना.....ती शांतच झाली.........

रेवा.......रेवा.....रेवा उठ.......प्लीज यार माझ्यासाठी डोळे उघङ.........काका लवकर चला.........सुजय ड्राव्हर काका ना गाडी फास्ट चालवायला सांगत असतो.....

सुजय रेवाला घेवुन हॉस्पिटलमध्ये येतो.....डॉक्टर काका......प्लीज पहा ना हि डोळेच उघडत नाहीये.......काही बोलल तरी काहीच हालचाल करत नाहीये........

सुजय तु शांत हो......मी पाहतो........अस म्हणुन डॉक्टर रेवाला आयसीयु मध्ये घेवुन जातात.....

डोक्याला मार लागल्यामुळे खुप रक्त गेल होत.......डॉक्टर रेवाला चेक करुन बाहेर येतात.......

सुजय डोक्याला जबरदस्त मार लागलाय......त्यामुळे रक्त पण खुप गेलय.....ऑप्रेशन कराव लागणार आहे......डॉक्टर

डॉक्टर काका काही पण करा पण रेवा बरी झाली पाहिजे.......प्लीज डॉक्टर काका...रेवाला काही होता कामा नये.....सुजय

सुजय शांत हो मी सगळे प्रयत्न करेन.....मी आलोच अस म्हणुन डॉक्टर ऑप्रेशन थिटरमध्ये जातात.....

इकडे स्नेहा आनंदरात होती......रेवा सुजय आता एकत्र येणार दोघे आता भेटले पण असतील असा ती विचार करत होती......

फोन करु का....काय करु त्यांना डिस्टर्ब तर होणार नाही ना.......नाही करतेच......अस म्हणुन स्नेहा सुजयला फोन लावते.....

स्नेहाचा फोन पाहुन सुजय पटकण फोन उचलतो........फोन उचलल्यावर स्नेहा सुजयच ऐकुन न घेता बोलायला सुरु करते.....

मग देवरजी......भेटल्या का तुमच्या मॅडम.......झाल का सगळ सॉटाउट.....झालच असेल तुम्ही मला का सांगाल हो ना.....मस्त हातात हात घालुन फिरत असणार हो ना.......स्नेहा सुजयची मस्करी करत त्याला चिडवत बोलत असते.........

स्नेहाच बोलण ऐकुन सुजयला जास्तच रडु यायला लागल..........वहिनी............रेवा...........अस म्हणुन सुजय रडु लागतो.........

सुजयचा रडलेला आवाज पाहुन स्नेहाला काहीच कळेना..........सुजय काय झाल......बोल ना का रडतोयस तु........रेवाच काय.......काय म्हणत होतास.........रेवा ठिक आहे ना..........बोल सुजय काय झालय........स्नेहा

वहिनी रेवाचा ॲक्सिडेंन्ट झालाय.....सुजय

काय............स्नेहा

हो वहिनी........तिला हॉस्पिटलमध्ये घेवुन आलोय.....ऑप्रेशन सुरु आहे.........सुजय

सुजय मी आले......मी येते तिथे.....अस म्हणुन स्नेहा फोन ठेवते व हॉस्पिटला जायला निघते.....

जाता जाता.....रेवाच्या घरी आकाशला फोन करुन सांगते.....आशुला पण फोन करुन  सांगते.....थोडयावेळात स्नेहा हॉस्पिटलमध्ये पोहचते......सुजय एकटाच बसलेला तिला दिसतो.......ती धावत सुजय जवळ जाते......

सुजय...........स्नेहा सुजयच्या खांदयावर हात ठेवत त्याला हाक देते........

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all