Dec 03, 2020
प्रेम

बावरे मन...भाग-69

Read Later
बावरे मन...भाग-69

बावरे मन..भाग 69

 

(दुसऱ्या दिवशी सुजयला कधी एकदा बॅकेत जाईन आणि रेवाशी बोलेन अस झाल होत......तो पटकण आवरुन बॅकेत जातो.....रेवा तिच्या डेस्कवर बसली होती...पण नेहमीप्रमाणे ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते....सुजयला वाईट वाटत पण ती चिडली आहे त्यामुळे अस करत असेल अस वाटल.......तो कोणत्या ना कोणत्या कारणाने तिला केबिनमध्ये बोलवत होता........पण रेवा मात्र त्याच्याशी खुप रुड वागत होती.....बघता बघता चार दिवस असेच जातात......पण रेवाच्या वागण्यात काहीच बदल नाही......ती तशीच वागत होती....आता मात्र सुजयला तिच्या वागण्याचा त्रास होवु लागला.......त्याला हे सहन करण अशक्य झाल....आणि त्याने काही तरी ठरवल.........व तो घरी गेला............)

 

आता पुढे......

 

वहिनी मला तुझ्याशी थोड बोलायच होत.......सुजय

 

हो बोल ना........स्नेहा

 

ते मी........म्हणजे.......मी माझी ट्रान्सफर करुन घेतलेय.......सुजय

 

काय........अरे पण का........आणि कुठे करुन घेतलीस तु ट्रान्सफर.........स्नेहा

 

बेंगलोर ला..........सुजय

 

अरे पण का.........स्नेहा

 

वहिनी रेवाच अस वागण नाही सहन करुन शकत मी......तिच्या हया वागण्याचा त्रास होवु लागलाय मला.....मी नाही पाहु  शकत तिच अस रुड वागण.........तिच्या पासुन दुर गेलेलच बर आहे तिच्यासाठीही आणि माझ्यासाठी ही........सुजय

 

सुजय अस नको रे करु होईल सगळ व्यवस्थित...........हव तर मी बोलते तिच्याशी......स्नेहा

 

नाही नको वहिनी......माझ सगळ फायनल झालय.......मी उदया तिकडे जायला निघतोय.........सुजय

 

सुजय का करतोयस तु अस..........प्लीज ऐक ना माझ.........स्नेहा

 

वहिनी प्लीज नको थांबवु मला........प्लीज........मी आलोच आई बाबांना सांगुन येतो.......अस म्हणुन सुजय जातो........

 

अरे यार हे सगळ काय होवुन बसलय.......रेवा का करतेयस यार अशी.......का कळत नाहीये तुला.....सुजय किती प्रेम करतो तुझ्यावर......का एवढी रुड वागतेयस.........अशी कधीच नव्हतीस तु........स्नेहा

 

सुजय हॉलमध्ये येतो........माधवीताई व आनंदराव हॉलमध्येच बसले होते..........

 

आई बाबा मला तुम्हाला काही तरी सांगायच आहे.........सुजय

 

काय बोल ना......आनंदराव

 

बाबा ते माझी ट्रान्सफर झाली आहे......सुजय

 

अस अचानक....आनंदराव

 

हो अचानकच झाली....सुजय

 

कुठे झाली आहे........माधवीताई

 

बेंगलोर....सुजय

 

अशी अचानक कशी काय ट्रान्सफर झाली.......माधवीताई

 

काही कळल नाही ग आई.......पण झाली आहे मला पण आत्ताच कळाल.......उदया निघाव लागणार आहे......सुजय

 

उदया लगेच........माधवीताई

 

हो.......सुजय

 

अरे पण सगळी तयारी व्हायला नको का.......माधवीताई

 

अशी काय तयारी करायची आहे....होईल ना........सुजय

 

अरे हो पण.....माधवीताई

 

आई तु नको काळजी करु.....होईल....सुजय

 

बर......पण किती वाजता जाणार आहेस.......आनंदराव

 

दुपारी निघेन.......जायच्या आधी बॅकेत जाऊन तेथील ‍सगळया फॉर्मॅलिटज पुर्ण करुन मग जाईन......सुजय

 

बर चालेल......तु पॅकिंग कर जा....आनंदराव

 

हो बाबा........सुजय

 

तु तुझ आवर मी तुला खायला काही तरी करते........माधवीताई

 

अग आई हयाची गरज नाही ग......सुजय

 

गरज काय नाही.....गप्प घेवुन जा......मला ओरडायला लावु नकोस.......माधवीताई

 

बर......तुला जे दयायचे आहे ते कर........ मी आलोच....सुजय अस बोलत त्याच्या रुममध्ये जातो...

 

रुममध्ये येवुन तो पॅकिंग करायला सुरुवात करतो......बऱ्यापैकी पॅकिंग झाल्यावर तो कपाट बंद करत असतो तेव्हा त्याला रेवाचा फोटो दिसतो....तो फोटो घेवुन तो बेडवर येवुन बसतो....

 

रेवा तुला त्रास होतोय ना माझ्यामुळे......आता इथुन पुढे नाही होणार......खुप दुर जातोय तुझ्यापासुन.......आता इथुन पुढे नाही दिसणार मी तुला.....माझा त्रास नाही होणार तुला.....आता तर हॅपी रहा.....सुजय रेवाच्या फोटोकडे पाहुन डोळयात पाणी आणत बोलत असतो......

 

ती खुश राहील पण तु राहशील का खुश तिच्यापासुन दुर जाऊन.......स्नेहा आत येत बोलते....

 

स्नेहा आत येताना.........सुजय पटकण आपल्या डोळयातील पाणी पुसतो......व मागे वळतो......

 

किती आणि काय काय लपवणार आहेस सुजय.......स्नेहा

 

चेहऱ्यावर हसु आणत सुजय मागे वळतो........अग वहिनी अस काही नाही........काहीच लपवत नाहीये मी....सुजय

 

हो का......मी आल्यावर डोळे पुसताना पाहिलय सुजय .....स्नेहा

 

अग नाही ते डोळयात काही तरी गेल होत म्हणुन ते डोळे पुसत होतो....सुजय

 

बास सुजय......का करतोयस अस......त्रास होतोय ना तुला तर माझ्याशी तर बोल.......अस सगळया गोष्टी मनात ठेवत राहिलास तर तुलाच त्रास होणार आहे.....स्नेहा

 

अग काही लपवत नाहीये मी.......आणि मला त्रास पण होत नाहीये......नको काळजी करुस.........सुजय

 

हो का.........मग हे सगळ माझ्याकडे पाहुन बोल.......स्नेहा

 

वहिनी मला अजुन पॅकिंग करायची आहे......आपण नंतर बोलुया का........प्लीज........सुजय

 

बर.....तुला नाही ना बोलायच........नको बोलुस......मी जाते.......अस म्हणुन स्नेहा बाहेर जाते......

 

स्नेहा गेल्यावर मागाचपासुन अडवलेले अश्रु बाहेर आले......रेवाच्या फोटोकडे पाहुन सुजय रडु लागला....

 

नाही राहु शकत ग तुझ्याशिवाय.......का कळत नाहीये तुला......का अशी वागतेयस..........अस बोलत सुजय रेवाचा फोटो छातीजवळ धरुन रडत होता........

 

स्नेहा हे सगळ बाहेर राहुन पाहत होती........सुजयला अस रडताना पाहुन तिला खुप वाईट वाटत होत......आणि रेवाचा राग पण येत होता........पण ती मनातल्या मनात काही तरी ठरवते व राधिकाकडे जाते........

 

****

 

सुजय सगळ सामान घेतलायस ना.....माधवीताई

हो ग आई सगळ घेतलो आहे......आता निघु का.....मला बॅकेत जाऊन सगळया फॉरमॅलिटीज पुर्ण करायच्या आहेत आणि मग बेंगलोरला जायच आहे.....सुजय

 

हो चालेल निघ तु......आनंदराव

 

सुजय आई बाबांचा आर्शिवाद घेवुन जायला निघतो......सुजय जाताना पाहुन आध्याला रडु यायला लागल.....स्नेहा आध्याला समजावुन सुजय सोबत बॅकेत जाते.....

 

सुजय बॅकेत पोहचतो.....व रेवाकडे न पाहताच तो आपल्या केबिनमध्ये जातो........रेवासुध्दा पाहुन न पाहिल्यासारख दाखवत आपल काम करत असते....

 

सुजय बॅकेतल्या ज्या काही फॉरमॅलिटीज आहेत त्या पुर्ण करत असतो......

 

पण स्नेहाला काही केल्या रहावत नव्हत ती परत एकदा सुजयशी बोलायला जाते.....जाताना तरी ऐकल अस तिला वाटत.......

 

मे आय कम इन सर..........स्नेहा

 

एस कम इन.........वहिनी बोल ना......काही काम होत का तुझ..........सुजय

 

सुजय तु खरच जाणार आहेस का..........स्नेहा

 

अग हो वहिनी........कालच तर सांगितल होत तुला.........आणि हे बग सगळया फॉरमॅलिटीज पण पुर्ण झाल्या.....आता थोडयावेळात निघणारच आहे.........सुजय

 

सुजय परत एकदा विचार कर........नको करु अस.......आपण बोलुया ना रेवाशी तिला सांगुया ना......स्नेहा

 

वहिनी......ती माझ्यावर प्रेमच करत नाही मग समजाऊन काय उपयोग आहे.......तु नको ग त्रास करुन घेवुस........मी इथुन गेलो की सगळ पहिल्यासारख होईल कोणालाच माझा त्रास होणार नाही.......आणि मला कोणाचा त्रास होणार नाही............सुजय

 

सुजय प्लीज यार एकदा विचार कर ना........स्नेहा

 

वहिनी इथे राहिलो तर मला जास्त त्रास होईल रेवा सतत माझ्या डोळयासमोर येत राहिल परत मला जास्तच त्रास होणार.........आणि तेच नकोय मला..........सुजय

 

अरे पण........स्नेहा

 

बर चला माझ्या सगळया फॉरमॅलिटीज पुर्ण झाल्या आहेत......मी निघतो........आई बाबांना दादु ला व आध्याला सांग निघालो म्हणुन.....पोहचल्यावर फोन करतो........मी........सुजय अस म्हणुन केबिनमधुन निघुन जातो.....

 

सुजय ऐक ना........स्नेहा मागुन ओरडत होती.....पण सुजय तिच न ऐकताच निघुन जातो.......

 

तेव्हा मात्र स्नेहाला रेवाचा राग येतो.....ती रेवाजवळ जाते आणि तिचा हात पकडुन तिला स्टाफरुमध्ये घेवुन येते.......

 

अग स्नेहा काय करतेयस तु.....सोड मला.......सोड यार.....मला त्रास होतोय..........रेवा मागुन ओरडत होती.......

 

स्नेहा स्टाफरुमध्ये आल्यावर रेवाचा हात सोडते.......

 

अग काय झाल अशी का घेवुन आलीस मला.......काय झालय........रेवा

 

तुला काहीच माहित नाही का.....काय झालय.......स्नेहा

 

अग मला कस माहित असणार.......तु अचानक मला ओढत आणलीस.....का आणलीस कशासाठी आणलीस मला काय माहित..........रेवा

 

बर......महित नाहीये ना तुला मी सांगते तुला का इथे आणले आहे........स्नेहा अस बोलुन रेवाच्या समोर येते........

 

तुला माझ्या तोंडुनच ऐकायच आहे ना मग ऐक..........सुजयने त्यांची ट्रान्सफर करुन घेतलेय बेंगलोंर ला.....तो निघुन गेला कायमचा.......तुझ्यापासुन दुर.........तुला त्रास होवु नये म्हणुन........स्नेहा

 

क्रमश:

 

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

 

 

Circle Image

Swati