बावरे मन...भाग-63

बावरे मन..भाग 63 (रेवा......ओय.....कुठे हरवलीस......राधिका.... आ....काही नाही.....बोल ना तु......काय म्हणत होतीस.......र??

बावरे मन..भाग 63

(रेवा......ओय.....कुठे हरवलीस......राधिका....

आ....काही नाही.....बोल ना तु......काय म्हणत होतीस.......रेवा

तुझ्याशी बोलुन खुप छान वाटल....कोणाशी तरी बोलायच होत.....पण तुझ्यारुपाने मला एक चांगली मैत्रीण मिळाली......थॅक्स रेवा.......राधिका.

अग थॅक्स काय........मी तुला तुझी मैत्रीण वाटले हयातच सगळ आल.....रेवा)

आता पुढे....

पण रेवा तु सुजयला काही बोलु नकोस हा.....मला त्याला स्व:हुन सांगायच आहे......राधिका

आ........नाही सांगत...नको काळजी करु.......रेवा

थॅक्स........बर जाऊया का आत.......राधिका

हो हो........रेवा

रेवा व राधिका आत येतात......

राधिका तु जा झोपायला मी थोडयावेळात जाईन......रेवा

बर चालेल......राधिका

राधिका गेल्यावर रेवाला तिचे शब्द आठवत होते.....आय लव्ह सुजय..

खरच सुजय पण प्रेम करत असेल का राधिका वर........पण राधिका बोलली तस विचार करता.....एका क्षणी ती बोलत होती ती पटलच ना.....किती काळजी घेतो तो राधिकाची.......तिला कधी दुखवत नाही....तिला जे हव ते सगळे करत असतो......रेवाच्या मनात हे सगळे विचार येत होते.......तिला राधिका सुजयच्या जवळ जायची आणि सुजय तिला बाजुला करायचा नाही ते आठवत होत......असे खुप विचार करत होती......

अजुन झोपली नाहीस तु.........सुजय तिथे येत बोलतो...

सुजयला समोर पाहुन रेवाला काय बोलाव कळेनाच....पण स्वत:ला नॉर्मल करते......

तु काय करतोयस अजुन.......रेवा

अग माझ्या रुममधील पाणी संपल होत ते आणायला आलो होतो......सुजय

ओके..........रेवा

तु का झोपली नाहीस अजुन....सुजय

अरे ते झोप येत नव्हती म्हणुन मग हॉलमध्ये येवुन बसले.....रेवा

बर...तब्बेत बरी आहे ना तुझी.....सुजय

हो अरे आहे......फक्त झोप येत नव्हती म्हणुन बसले होते.......रेवा

बर..मला पण झोप येतच नव्हती मी पण असाच टाईपास करत बसलो होतो........मी थांबु का तुझ्या सोबत......आपण गप्पा मारत बसुया.......सुजय

रेवाला आयता चान्स मिळाला होता.....सुजयच्या मनात राधिका बद्दल काय फिलिंग्स आहेत ते काढुन घ्यायचा......

अरे विचारतायेस काय.....आवडेल मला....रेवा

ओके.......थोडावेळ अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात.....

बर तु आणि राधिका एवढ काय गप्पा मारत बसला होता.......सुजय

अरे काही नाही असच जनरल.....मग नंतर ती तिच्या बाबांच्या बद्दल सांगत होती.......हळवी झाली होती खुप.......रेवा

हो ती मामाच्या खुप क्लोज होती.....सुजय

छान आहे ना ती.......किती सहन केलय ना तीने एवढया लहान वयात.....रेवा

हो ना.....त्यावेळी तिची खुप वाईट अवस्था होती तेव्हा पासुन आम्ही तिला खुप जपतो......सुजय

हो सांगत होती ते पण.......आणि लग्नात तिला एन्जॉय करता आल नाही म्हणुन थोड नाराज पण होती...रेवा

असणारच ना...त्याच्यासाठी सुट्टी घेवुन आली होती आणि तिला एन्जॉयच करता आल नाही....सुजय

पण समजुतदार पण आहे रे.....तिला समजावल्यावर लगेच स्माईल आली चेहऱ्यावर......ती ना खुप छान आहे........रेवा

हो समजुतदार आहे ती.......सुजय

सुजय एक विचारु का...रेवा

हो विचार ना..........रेवा

असच मनात आल म्हणुन विचारतेय........राधिका एक लाईफ पार्टनर म्हणुन तुला कशी वाटते.......रेवा

खुपच छान असेल.....जो तिच्या लाईफमध्ये येईल ना तो खुप लकी असेल.....आणि तिला कोण नाही म्हणेल तो मुर्खच असेल......तिच्यासारखी लाईफ पार्टनर भेटायला भाग्यच लागत........सुजय

सुजयच हे बोलण ऐकुन रेवाला राधिकाच बोलण खर वाटु लागल.......राधिका म्हणतेय तस खरच सुजय राधिका वर प्रेम करु लागलाय..........तिच्याच विचाराने तिच्या डोळयात पाणी आल..पण सुजय बघेल म्हणुन.......ती स्वत:ला सावरते.........सुजय झोपुया का आता....उदया आणि परत जायच आहे ना बॅकेत......रेवा

हो चालेल.......गुड नाईट......सुजय

गुड नाईट......रेवा

रेवा आध्याच्या रुममध्ये येते......पण तिला काही केल्या झोप लागेना...सतत तोच विचार तिच्या डोक्यात येत होता....आता तिला रडु आवरेणा......ती आध्याला कळणार नाही अस हळु आवाजात रडु लागली...किती तर वेळ ती रडत त्याच विचारात होती.....आणि मनाशी काही तरी ठरवुन झोपायचा प्रयत्न करत असते आणि त्या विचारात तिला कधी झोप लागली कळलच नाही.......

***

ये रेवा इकडे बघ पाहु......आध्या

काय ग काय झाल....रेवा

तुझा चेहरा असा का दिसतोय.....आध्या

असा म्हणजे......रेवा

असा म्हणजे खुप रडल्यासारखे......डोळे बघना ते कसे दिसतायत.....आध्या

आध्या अस बोलल्यावर रेवाला रात्री आपण रडलेल आठवत.....पण आता आध्याला काय सांगायच तिला कळेना......अग रात्री वेळाने झोपले ना त्यामुळे तसे वाटत असतील.....काही तरी उडवाउडवीची उत्तरे देत बोलते.......

पण अस....आध्या

काय माहीत झाल असेल ग....बर चल मी निघते बॅकेत जायला वेळ होतोय......आध्या परत काही तरी विचारेल म्हणुन ती जायला निघते....

हो ओके बाय........आध्या

रेवा खाली येते........आई मी माझी बॅग भरुन ठेवलेय.....आध्याच्या रुममध्ये तुम्ही निघताना ती घेवुन जा....रेवा

हो घेते........मालतीताई

रेवा निघालीस का तु.......माधवीताई

हो काकु निघते.....वेळ होतोय ना......रेवा

बर........एक मिनिट रेवा.....हे तुझ्या डोळयांना काय झालय.....माधवीताई

काही नाही कुठे काय....रेवा

अग केवढे सुजलेत ते......माधवीताई

अहो काकु  झोप झाली नाहीये ना त्यामुळे असेल बहुतेक...रेवा

अस होय..बर.....माधवीताई

रेवा निघुया......सुजय रेवाला स्माईल देत विचारतो......

रेवा सुजयकडे न पाहताच निघुया म्हणुन बाहेर येते........

अरे ‍हिला काय झाल आता.....चिडलेय का ही......बघु गाडीत विचारता येईल.....अस म्हणत सुजय सगळयांना बाय करुन बाहेर येतो....

सुजय बाहेर येतो व गाडीचा लॉक काढतो.......चल बस जाऊया......सुजय

रेवा गाडीच्या मागच्या साईडला जाऊन बसते....

ही अशी काय करतेय.....एवढी का चिडलेय ही.....मी काय केलय एवढ चिडण्यासारख....सुजय मनातल्या मनात बोलतो....

मागे का बसलीस.....सुजय

काही नाही माझ डोक थोड दुखत आहे......त्यामुळे थोड झोपता येईल म्हणुन मागे बसलेय.......निघायच का आता.....रेवा

आपण डॉक्टरांच्याकडे जाऊया का मग........सुजय

नाही नको एवढी पण गरज नाहीये.........रेवा

बर चालेल.........अस म्हणत सुजय गाडी चालु करतो.........

ही एवढी का रुढ वागतेय......काही कळतच नाही.......सुजय रेवाच्या वागण्याचा विचार करत असतो...पण त्याला काही कळतच नसत.....

त्या विचारातच ते बॅकेजवळ पोहचतात......सुजय गाडी थांबवतो......पण रेवाचा डोळा लागला होता....सुजय तिला उठवतो....रेवा आपण आलो.....जायच का.......

हममम..........थॅक्स....रेवा गाडीतुन उतरत बोलते व काही न बोलताच ती डायरेक्ट बॅंकेत जाते.....

सुजयला तिच वागण खटकत असत....त्याला काही कळेनाच...पण तो त्यावेळी तिला काहीच बोलत नाही......तो आत येतो व डायरेक्ट आपल्या केबिनमध्ये जातो.......

रेवा सुध्दा आपल्या डेस्कवर येवुन काम करत असते.....

रेवा झाली का सुट्टी.........अस बोलत मालगावे मॅडम रेवा जवळ येतात.......

हो झाली.........रेवा

लग्न मस्त झाल ना स्नेहाच....मालगावे मॅडम.....

हो खुप छान झाल.......रेवा

तुझी तब्बेत बरी नाहीये का......चेहरा वेगळाच वाटतोय...मालगावे मॅडम

अहो ते लग्नात खुप धावपळ झालेय ना त्यामुळे तस वाटत असेल....रेवा

बर बर......काळजी घे.....येते मी........मालगावे मॅडम

हो......रेवा

मालगावे मॅडमांशी बोलुन रेवा आपल काम करत असते....तेवढयात राधिकाचा फोन येतो....

हो बोल राधिका.......रेवा

अग काय हे.......मला न सांगताच गेलीस........राधिका

अग.....मी आले होते तुझ्या रुममध्ये..पण तु झोपली होतीस......आणि मला बॅकेत जायला वेळ होत होता.......मग राहुदे म्हटल नंतर फोन करता येईल....सॉरी......रेवा

अग सॉरी काय........तु दिसली नाहीस ना....म्हणुन मग आत्तु ला विचारले तर आत्तु म्हणाली तु गेली आहेस....म्हणुन मग फोन केला ग.....राधिका

हो ग वेळ होत होता म्हणुन आले.....रेवा

रेवा.......तु सुजयला काही बोलली नाहीस ना ग......आपल्या कालच्या बोलण्या बद्दल......राधिका

अग नाही नाही...मी काही बोलले नाही..........रेवा

थॅक्स यार रेवा......मला तुझ्याशी बोलुन इतक छान वाटतय ना.......अस मला माझ्या बाबांशी बोलल्यावर वाटायच.......राधिका

अस बोलल्यावर रेवाच्या डोळयात पाणी येत...किती निरागस आहे ही......तिच्या बाबांशी बोलताना कस वाटत होत तस वाटत हिला.....आणि फारशी ओळख नसताना.......रेवा आपल्याच विचारात मनातल्या मनात बोलत होती...

अग कुठे हरवलीस......आहेस ना तु.....हॅलो रेवा........राधिका

आ........आहे बोल ना......रेवा

काही नाही आता तु काम कर.......नाही तर तुझा बॉस तुला ओरडेल........राधिका हसत बोलते...

हो.....रेवा हसु येत नसताना सुध्दा फक्त राधिकासाठी हसण्याच नाटक करते........

ओके बाय ..........भेटु पुन्हा........राधिका

हो......नक्कीच..बाय...रेवा

फोन ठेवल्यावर रेवा आपल काम करु लागते.....

***

अशी का वागत होती ही......काहीच कळत नाहीये.........बहुतेक तिच डोक दुखत आहे म्हणत होती त्यामुळे तिची चिडचिड होत असेल.........हो हेच कारण असेल.....काय सुजय तु पण काही पण विचार करतोस तु.........सुजय स्वत:शी बोलत म्हणतो.......

वहिनी म्हणतेय तस लवकरच विचारायला हव रेवाला..........पण कधी आणि कस विचारु.....हया सुट्टीमुळे काम एवढ लोड आहे....मला आता सगळ मॅनेज करायला वेळच नाही मिळणार......आणि मला हया बाबतीत कोणतीच गडबड करायची नाहीये.....रेवाला खुप छान प्रपोज करायचे आहे.......तिच्या आयुष्यातील तो खुप मेमोरेबल क्षण असायला हवा....पण कस करु तेच कळेना......वहिनीशी बोलु का........नाही नको.....ते फिरायला जाणार आहेत...परत मी माझ काही तरी सांगितल तर ती त्याचाच विचार करत बसले....वहिनी फिरायला जाऊन आली कि मगच तिच्याशी बोलुन मग प्रपोज करतो रेवाला........हो हे बेस्ट आहे.......पण आता रेवाला पहायची खुप इच्छा झाली आहे.....इतके दिवस रोज माझ्या समोर असायची........आणि नाहीये तर करमतच नाहीये........तिचा तो आवाज...तिच आजुबाजुला वावरण........सारख ते आठवत आहे......

तीला केबीन मध्ये बोलावु का......पण का बोलावल आहे म्हटल्यावर काय सांगु......सुजय विचार करत असतो.......काय कारण सांगाव इतक्यात शरद तिथे येतो........

सर आत येवु..........शरद

ये शरद.........सुजय

सर ही फाईल राकेश सरांनी दिली आहे........शरद

बर मी चेक करतो......सुजय

सुजय ती फाईल चेक करुन राकेशच्या डेस्कवर फोन करतो......

हॅलो राकेश.......आता तु एक फाईल पाठवली आहेस......सुजय

हो सर......त्यांनी आज लोन साठी अपलाय केलाय.....ती त्याचीच फाईल आहे.....ते तुम्ही त्याच लोन पास होईल का ते पाहुन सांगाल का त्यांना मला मग कळवता येईल........राकेश

ओके......मी चेक करतो.......सुजय

***

क्रमश:

पुढचा भाग 31/10/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all