Nov 26, 2020
प्रेम

बावरे मन...भाग-61

Read Later
बावरे मन...भाग-61

बावरे मन..भाग 61

 

(स्नेहा व आशु व घरचे सगळे जाताना पहिला गणपती मंदिरात जातात तिथे दर्शन घेतात...नंतर त्याच्या कुलदैवताचेही दर्शनाला जातात तिथे मंदिराचे पुजारी जसे सांगतील तसे विधी करतात देवाला नव्या आयुष्य सुखाचे जावो अशी प्रार्थना करतात व सगळे घरी जायला निघतात.

सगळयांना घरी जायला संध्याकाळचे पाच वाजले....माधवीताई व मालतीताई पुढे जाऊन स्नेहाच्या स्वागताची तयारी करतात....

माधवीताई नवरा नवरी आले पहा.....मालतीताई माधवीताईना दारात गाडी आलेली पाहुन ओरडुन सांगतात.....)

 

आता पुढे.....

हो हो आले आले........माधवीताई साडी सावरत बाहेर येतात.....

 

आले का.....मालतीताई काही राहिल नाहीये ना ओ.....पहिल्यांदाच करतेय ना हे सगळ काही कमी पडायला नको.....माधवीताई

 

अहो माधवीताई काही कमी नाहीये सगळ व्यवस्थित आहे.....मालतीताई

 

स्नेहा व आशु खाली उतरतात......त्याच्या स्वागताची छान तयारी केली होती.....दारात रांगोळी काढली होती सगळीकडे फुलांच्या पाकळया टाकल्या होत्या....आणि मध्ये एक माणुस जाईल एवढीच एक लाईनमध्ये रांगोळी काढली होती...व त्यामध्ये भरगच्च पाकळया टाकल्या होत्या.....आशुला कळेनाच एवढया जागेतुन दोघे कस जायच.....तो आध्याला बोलावतो..

 

काय रे दादु.......आध्या

 

मला सांग नेमक काय केला आहात तुम्ही.....एवढयाशा जागेतुन कस जायच आम्ही....आशु

 

जाशील रे दादु......आध्या

 

अग पण कस..आशु

 

तु चल आधी मग सांगते मी तुला...आध्या

 

आशु व स्नेहा गेटसमोर येवुन थांबतात.....दादु....आता एवढयाश्या जागेतुन तुम्हाला दोघांना जायच आहे.....रेवा

 

अग पण कस जाणार सांग.......शक्य आहे का ते.....आशु

 

हो आहे ना.......आध्या

 

ते कस.....आशु

 

तु वहिनीला उचलुन घे.......आध्या

 

ये काही पण काय......आशु आध्याला थोड जवळ ओढत.....तु वेडी आहेस काय..सगळया मोठयाच्या समोर कस उचलु स्नेहाला......

 

ये दादया काय रे तु पण......एवढ काय लाजायच.....त्यांना पण माहितेय ते....तु उचल.....आध्या मोठयाने बोलत म्हणाली..

 

ये दादु उचल ना रे लवकर.....राधिका

 

आशु उचल.....आम्ही आहे म्हणुन लाजु नकोस....रमाकांतराव

 

तसे सगळे हसायला लागले.....

 

ये दादु उचल रे पटकण वहिनीला.....सुजय

 

बर उचलतो.........आशु स्नेहाला उचलुन घेतो व त्या फुलांच्या पाकळयामधुन चालत दारापर्यत येतो.....आशु उचलताना स्नेहाला मात्र लाजल्यासारख होत होत.....

 

दाराजवळ येवुन आशु स्नेहाला खाली उतरवतो.....आशु व स्नेहाला बाहेर उभा करुन रेवा आध्या व राधिका आत मध्ये जातात....

 

आशु स्नेहा इथे समोर उभे रहा........माधवीताई

 

माधवीताई आशु व स्नेहाच औक्षण करुन...भाकर तुकडा ओवाळुन टाकतात...स्नेहा आता उजव्या पायाने हया मापट ओलांडुन आत ये........माधवीताई

 

ये आई काय गडबड आहे.....थांब ना जरा.....आध्या

 

अग आता आणि काय राहिलय तुमच..दमले असतील ते दोघे....येवु देत ना आत.....माधवीताई

 

ये नाही हा आई.....एक काहितरी राहिलय अजुन.......आध्या

 

काय राहिलय.......माधवीताई पण विचारत करत बोलतात.....

 

अग आई उखाणा ग.....आध्या

 

अग बाई हो की लक्षातच आल नाही....मालतीताई

 

हया मुलींच्या सगळ लक्षात राहत बघा.....माधवीताई

 

हो ना......मालतीताई

 

बर चला दादु वहिनी पटपट उखाणे घ्या........आध्या

 

ये आध्या मला उखाणा वगेरे नाही येत हा....आशु

 

जसा येतो तसा घे...पाच पाच उखाणे घेतल्याशिवाय घरात प्रवेश नाही....आध्या

 

पाच पाच काय.....इथे एकही आठवेना आणि पाच घे म्हणे....आशु

 

बर मग दोन तर घ्यावे लागणारच हा....त्याशिवाय मी आत येवु देणार नाहीये.....आध्या

 

आशु घे रे बाबा..नाहीतर तुम्हाला असच बाहेर थांबवेल ती......माधवीताई

 

बर वहिनी तु पहिला घे आणि तु पाच उखाणे घ्यायचे हा......आध्या

 

स्नेहा जास्त आडेवेडे न घेता नाव घेते.....

 

“मोगऱ्याचा सुगंध पावसाळयातील मृदगंध...

आशुतोशरांवाशी जुळले आता,रेशमी ऋणानुबंध...”

 

स्नेहाने पहिला उखाणा घेतल्यावर सगळे टाळया वाजवु लागले....वहिनी मस्तच हा..अजुन चार बाकी आहेत.....आध्या

 

“दोन जीवांचे मिलन जणू, शतजन्मांच्या गाठी..

आशुतोश रावांचे नाव घेते, तुमच्या आग्रहासाठी”

 

“उंबरठ्यावरती माप देते, सुखी संसाराची चाहूल…
आशुतोश रावांच्या जीवनात टाकले मी, आज पहिले पाऊल”

 

ये वहिनी एखादा मोठा उखाणा घे ना.....राधिका.....

 

मोठा...?...बर प्रयत्न करते.......स्नेहा

 

“पुण्याच्या तुळशी बागेत आहे श्रीरामाच मंदीर

श्रीरामाच्या मंदिरात आहे श्रीरामाची मुर्ती

श्रीरामाच्या मुर्ती शेजारी सीतेची मुर्ती

सीतेच्या कंबरेला सोन्याचा घडा

सोन्याच्या घडयात केशराच पाणी

आशुतोश रावांचे नाव घेते झाले मी त्यांची राणी”

 

ओहो.....राणी काय.......आध्या चिडवताना स्नेहा लाजते..ये वहिनी आता शेवटचच....आध्या

 

“जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज… 
आशुतोश रावांच नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज”

 

ये दादु बग वहिने पाच पाच उखाणे घेतेले आता तु दोन तरी घे.......आध्या

 

बर बाई घेतो......

 

“एक होती चिऊ आणि एक होता काऊ
स्नेहाच नाव घेतो, डोकं नका खाऊ “

 

ये दादु हा काय उखाणा आहे.......व्यवस्थित घे ना........आध्या

 

व्यवस्थित काय...आता घेतला ना उखाणा......आशु

 

ये आई सांग ना ग दादुला......आध्या

 

आशु घे ना रे व्यवस्थित तु पण काय लहान मुलांसारखा करतोयस...माधवीताई

 

बर बर घेतो.....आशु

 

“हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे

स्नेहामुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे”

 

वा वा...मस्त मस्त.......आणखीण एक....आध्या

 

ये झाले की दोन......आशु

 

तो काय उखाणा होता.....घे पटकन एक......आध्या

 

बर.....आशु

 

“निळे पाणी,निळे डोंगर हिरवे हिरवे रान,

स्नेहाच नाव घेवुन राखतो सर्वाचा मान.”

 

वा वा वा.........मस्तच.......आध्या

 

आध्या झाल ना तुझ......आता गृहप्रवेश करुया का.....माधवीताई

 

हो...आध्या

 

स्नेहा उजव्या पायाच्या अंगठयाने ते तांदळाने भरलेले मापटे अलगद ओलांडुन आत ये.......माधवीताई

 

स्नेहा माप ओंलाडते आणि आत येते......

 

वहिनी....आता ना त्या परातीमध्ये कुंकूचे पाणी केले आहे.....त्यात पाय टाक व पुढे चालत  जा.......आध्या

 

स्नेहा आपली लक्ष्मीची पावले उठवत घरात प्रवेश करते......

 

आशु स्नेहा जा देवाला नमस्कार करा आणि मग येवुन बसा तुम्ही थोडावेळ......मालतीताई

 

स्नेहा व आशु घरातल्या देवांना नमस्कार करतात व थोडावेळ हॉलमध्ये येवुन बसतात...

 

बाकिचे पण खुप दमलेले असतात....त्यामुळे सगळेच हॉलमध्ये येवुन बसतात....

 

बर तुम्ही सगळे बसा मी तुमच्यासाठी चहा आणते.......रेवा

 

अग रेवा तु पण दमली आहेस थांब मी करते चहा......माधवीताई

 

एवढ काही नाही काकु......करते मी........रेवा

 

रेवा सगळयांना चहा करते..सगळे चहा घेवुन थोडावेळ आराम करतात.......नंतर मालतीताई माधवीताई संध्याकाळच्या स्वयंपाकच बघतात..रेवा व आध्या सुध्दा त्यांना मदत करतात.....पाठराखीण म्हणुन रेवा व मालतीताईच राहणार होत्या......संध्याकाळची जेवण आटपुन थोडा वेळ दंगा मस्ती...चेष्टा मस्करी....चिडवा चिडवी सुरु असते.....अशाच थोडयावेळ गप्पा मारुन सगळे झोपायला जातात.....

 

****

 

आध्या दादु आणि वहिनी तयार झाले बग....हळदपाणी खेळायला उशीर होतोय.......माधवीताई

 

आध्या स्नेहा व आशुला बोलावुन आणते...घराच्या मोकळया जागेतच हळदपाणी खेळणार होते...

 

आशु स्नेहा चला पाटावर बसा.....दोघे पाटावर बसतात.....

 

आता काही खेळ खेळायचे आहेत.....माधवीताई

 

खेळ.....कोणते......आशु

 

सांगते थांब ना सगळयाची गडबडच तुला तर.......माधवीताई

 

ये आई मी सांगते थांब त्याला....आध्या

 

हो दादु आम्ही सांगतो तुला.......रेवा

 

बर सांगा मग.....आशु

 

हे बग ही सुपारी तु डाव्या हातात पकडायची स्नेहा तिच्या दोन्ही हाताने ती काढायचा प्रयत्न करेल.....आणि स्नेहा तु ही सुपारी दोन्ही हातात पकडायची आणि दादु डाव्या हाताने काढायचा प्रयत्न करेल.....दादु तु फक्त एकाच हाताने सुपारी काढायची आहे हा...दुसऱ्या हाताचा वापर करायचा नाहीये.....रेवा

 

अस सांगितल्यावर...खेळ खेळायला सुरवात करतात....किती तर वेळ स्नेहा आशुच्या हातातील सुपारी काढायचा प्रयत्न करत असते....आध्या आणि रेवा स्नेहा वहिनी म्हणुन तिला चिअरप करत होत्या.....स्नेहा एकदम जोरात काढायला जाते आणि तिचे नख आशुला लागतात......व त्यामुळे त्याची मुठ सैल होते व स्नेहा सुपारी काढते.......येयेये....वहिनीने काढली सुपारी.....आध्या

 

आता दादु तु.....स्नेहाच्या हातातील सुपारी काढ......मग आशु स्नेहाच्या हातातील सुपारी काढयचा प्रयत्न करत होता.....पण किती वेळ झाला तरी त्याला सुपारी निघत नव्हती...

 

दादु बास झाल तुला निघत नाहीये ती.....वहिनी जिंकली बग.....आध्या सगळयांना हसत सांगते...

बर आता दुसरा गेम आहे....आध्या

 

कोणता.....मी काही तरी देईन तुला ते तु तोंडात पकडायच आणि स्नेहा ते तोंडाने बाजुला करणार....रेवा

 

ये असल काही करणार नाहीये हा मी....आशु

 

कराव लागेल....चल आवर पटकण......आध्या आशुला दाब देत बोलली......मग काय आशुला गप्प कराव लागल.....

 

बर काय धरायच आहे मी तोंडात..........आशु

 

हे बघ......रेवा आशुच्या हातात लवंग देत बोलते.......

 

ये रेवा वेडी आहेस का....काही पण काय......आशु

 

काही पण काय नाही चल आवर पटकण....रेवा

 

मग काय आशु तोंडात लवंग पकडतो.....स्नेहा ते लाजत काढायचा प्रयत्न करत असते......काढताना स्नेहाच्या ओठाचा स्पर्श आशुच्या ओठांना होतो...तेव्हा दोघे एकमेकांकडे पाहतात....आणि स्नेहा लाजुन खाली मान घालते.....

 

आता शेवटचा गेम आहे हा......हया परातीमध्ये लाल पाणी आहे व गुलाबाच्या पाकळया टाकल्या आहेत..त्यात मी एक अंगठी टाकेन ती कोण पहिला शोधुन काढेल आयुष्यभर त्याच ऐकाव लागेल......रेवा हसत बोलते

 

बर.....मग करुया का सुरवात...आध्या

 

हो.....आशु व स्नेहा

 

रेवा पाण्यात अंगठी टाकते.......स्नेहा व आशु ती शोधु लागतात....शोधता शोधता आशु स्नेहाचा हात पकडतो.....स्नेहा डोळयानेच खुनवुण सोडा म्हणुन सांगते.मग स्नेहाला जास्त त्रास न देता तो तिचा हात सोडतो......आणि त्या नादात स्नेहाला अंगठी सापडते...आणि ती सापडली म्हणुन हात वर करते व सगळयांना दाखवते...

 

स्नेहा जिंकली.....दादु आता आयुष्यभर स्नेहाच ऐकाव लागणार तुला......रेवा

 

अस बोलल्यावर सगळे हसायला लागतात.....व नंतर ते पाणी एकमेकांच्या अंगावर मारु लागतात...

 

बर चला मुलींनो झाल का तुमच...आता आम्हाला त्यांना हळद व तेल लावु दया...मालतीताई

 

हो हो झाल....रेवा

 

माधवीताई व मालतीताई आशु व स्नेहाला हळद व तेल लावतात.....व त्यांना अंघोळ घालतात.....

 

हे सगळ होत असताना सुजय व रेवा एकमेकांच्या नकळत एकमेकांना बघत होते....त्या प्रत्येक विधीला आपण आहोत अस त्यांना वाटत होत......आपल्या लग्नात पण अशाच सगळया विधी होतील...अस मनातल्या मनात बोलत होते....

 

बघता बघता असेच दंगा मस्ती करत.....चिडवा चिडवी करत दोन दिवस कधी होतात कळतच नाही......

 

बर उदया आपल्याला सत्यनारायणाची पुजा घालायची आहे.......माधवीताई.

 

हो ग आई हे कालपासुन दोन –तिन वेळा तर सांगितली असशील....आध्या

 

मी सारख सांगतेय कारण तयारी करायची आहे हे तुम्हाला सांगायच असत मला....कळल....माधवीताई

 

हो हो....बर चला करुया का मग तयारी.आध्या

 

हो......माधवीताई

 

****

 

सुजय आत येवु.....स्नेहा सुजयच्या रुममध्ये येत बोलते....

 

वहिनी तु.....ये ना........इकडे कस काय आज.....सुजय

 

का यायच नाहीये का.....बर मग जाते मी स्नेहा नाटक करत बाहेर जात असते.....

 

ये वहिनी काय ग तु पण.....मी असच विचारल ग.....तुझ्या मैत्रिणीला सोडुन इकडे कशी काय आलीस अस म्हणायच होत........सुजय

 

तिच्याच बद्दलच बोलायच होत म्हणुन आलेय......स्नेहा

 

काही प्रॉब्लेम आहे का....सुजय

 

अरे नाही.....काही प्रॉब्लेम नाहीये......स्नेहा

 

मग......सुजय

 

सुजय तु रेवाला कधी प्रपोज करणार आहेस...लग्नानंतर करतो म्हणाला होतास ना.......स्नेहा

 

हो करतो म्हणालो होतो.........सुजय

 

हा मग झाल ना आता लग्न........विचार ना मग.......स्नेहा

 

वहिनी मला अस नाही ग तिला विचारायच...काही तरी स्पेशल करायच आहे...सुजय

 

मग कर ना आता.......कोण नको म्हणतय का तुला........स्नेहा

 

पण एवढी गडबड का करतेयस तु........सुजय

 

गडबड नाही अरे.....पण वेळेत झालेल बर असत ना.......स्नेहा

 

हो ग वहिनी....तुला खुप गडबड झाली आहे माहितेय मला तुझ्या मैत्रीणीला तुझी जाऊबाई करुन घ्यायची......हो ना.....सुजय

 

हो मग काय असणारच....स्नेहा

 

उदया पुजा झाली ना......मग सगळे आपापल्या घरी जातील ना.....रेवा पण जाईल...मग त्यानंतर प्रपोज करेन तिला.......सुजय

 

बर...पण इतका पण वेळ नको लावुस........स्नेहा

 

हो ग नाही लावत........विचारेन मी तिला........सुजय

 

बर......स्नेहा

 

ते नव्हे दादुने कस काय सोडल तुला......सुजय स्नेहाला चिडवत म्हणाला

 

गप्प रे....तु पण झालास का सुरु आता.....स्नेहा

 

हो मग काय......आमचा अधिकार आहे तो.....सुजय

 

***

 

क्रमश:

पुढचा भाग 27/10/2020 ला पोस्ट केला जाईल..

 

लग्नाच्या विधी मांडण्याचा प्रयत्न केला आहे....तरी काही कमी जास्त झाल असेल तर कथेचा भाग म्हणुन समजुन घ्यावे....

 

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

 

 

Circle Image

Swati