बावरे मन...भाग-60

बावरे मन..भाग 60 (सप्तपदी पुर्ण झाली आहे.....गुरुजी आता तुम्ही थोडावेळ आलेल्या पाहुणे व मंत्रीमंड?

बावरे मन..भाग 60

(सप्तपदी पुर्ण झाली आहे.....गुरुजी

आता तुम्ही थोडावेळ आलेल्या पाहुणे व मंत्रीमंडळीना भेटुन घ्या.....नंतर आपण कन्यादानाची विधी करु.........गुरुजी

हो गुरुजी.......आशुतोश)

आता पुढे...

विधी झाल्यावर आशु व स्नेहा त्याच्या सोफ्यावर बसतात....तसे एक एक पाहुणे मंडळी व मित्रमंडळी भेटायला येवु लागले...त्यांना त्याच्या वैवाहिक आयुष्याला शुभेच्छा देवुन त्यांच्यासोबत फोटो काढतात.

वधु वराला भेटुन पाहुणे मंडळी जेवणाचा आस्वाद घेत होते.......थोडावेळ असाच पाहुण्याशी भेटाभेटी त्यांच्यासोबत फोटो काढण्यात गेला.....

आशु स्नेहा आता कन्यादान विधी करुया आपण......गुरुजी

हो गुरुजी......आशु

रेवा बेटा....रेखाताई व सुधिररांवाना कन्यादान विधिसाठी बोलावुन आण....गुरुजी

हो गुरुजी आत्ता बोलावुन आणते...रेवा

काका काकु तुम्हाला गुरुजींनी कन्यादान विधीसाठी बोलावल आहे....रेवा

हो का.......आम्ही आलोच ते कन्यादानासाठी घेतलेल साहित्य घेवुन येते.....तु स्नेहा जवळ थांब जा.....रेखाताई

हो काकु......रेवा

रेखाताई व सुधिरराव कन्यादान विधीसाठी येतात......या सुधिरराव रेखाताई कन्यादान विधीला सुरुवात करुया ना....गुरुजी

हो गुरुजी.......सुधिरराव जड मनानेच हो म्हणतात....

या पाटावर बसा.......कन्यादानासाठी तांब्यांच तबक व कृष्णाची मुर्ती आणला आहात ना...गुरुजी

हो गुरुजी आणले आहे....रेखाताई

बर आता मी थोडक्यात कन्यादानाच महत्व सांगतो त्यानंतर आपण विधीला सुरुवात करुया..गुरुजी

हो चालेल गुरुजी........सुधिरराव

लग्न लागल्या नंतर महत्वाचा विधी म्हणजे कन्यादान . कन्यादानापेक्षा  कन्यानिवेदन हा शब्द योग्य कारण अपत्य दान करण्याचा अधिकार कोणालाच नाही, दत्तक देऊ शकता. योग्य वराकडे संस्काराच्या माध्यमातून योग्य कन्या निवेदन करायची थोडक्यात तिचा पालकत्व त्याच्या परिवाराकडे सोपवायचे. कन्येचा स्वीकार करताना 'धर्माप्रजा सिध्यर्थं कन्यां प्रतिगृण्हामि' असे वर म्हणतो, प्रजा हि सर्वांचीच वाढत असते पण धर्माप्रजा म्हणजे काहीतरी विचार करून निर्माण केलेली प्रजा. आपली येणारी पुढची पिढी हि  आपल्यापेक्षा विकसित व चांगली असावी हा उद्देश.पितरांना मोक्ष प्राप्ती व्हावी , पिढ्यांचा उद्धार व्हावा म्हणून विष्णूस्वरूप वराला आपली लक्ष्मीस्वरूप कन्या सुपूर्त करावी. कन्या देताना वराला काही अटी घालूनच देतात, 'धर्मेच नातिचरामी' 'अर्थेच नातिचरामी' 'कामेच नातिचरामी ' असे त्याच्या कडून वदवून घेऊनच त्याला कन्या देतात. याचा अर्थ असा कि धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत त्यातले पहिले तीन हे गृहस्थाश्रमात प्राप्त होतात ते उपभोगुनच चौथ्या पुरुषार्थ प्राप्त करायचा पण हे उपभोगताना कोणत्याही प्रकारचा अतिरेक होता कामा नये. म्हणून वर तिथे नातिचरामी म्हणजेच कोणत्याही बाबतीत मी अतिरेक करणार नाही असे वचन देतो.या संस्कारात वधूपिता कोठेही 'इदं न मम' असे म्हणत नाही. या संस्काराची सांगता व्हावी, आपली प्रठीष्ठा व महत्व वाढावे म्हणून सोळा प्रकारच्या वस्तू कन्येस द्यायला सांगितल्या आहेत यज्ञाचे पुण्य मिळावे म्हणून धेनुदान, वराहाने धारण केलेली पृथ्वी स्थिर व्हावी म्हणून भूदान, मुलीच्या सेवेसाठी नोकरचाकर,विष्णू हा शेषशाई आहे म्हणून वराला शैय्यादान , सर्व सोपस्कार पूर्ण व्हावे म्हणून गृहदान , दुध-तुपासाठी म्हैस ....अर्थात या सर्व गोष्टी देणे आजकाल अशक्य व गैरसोईचे आहे तरी किमान पंचधातू हे या वेळी द्यावेत.


यामागे अजून लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे यागोष्टी मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून दिल्या जातात, स्वतःच्या मुलीपेक्षा त्यांना कोणतीही गोष्ट मौल्यवान नाही व किती दिले हे महत्वाचे नसून या मागच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत.
 हा विधी करताना कन्येचे हात हा सगळ्यात खाली त्यावर वराचे हात त्यावर कन्येच्या पित्याचा हात असा क्रम असतो, वास्तविक जी गोष्ट द्यायची ती मध्ये पाहिजे; म्हणजे घेण्या-याचे हात सगळ्यात खाली पाहिजेत. पण या ठिकाणी कन्येचे हात खाली असतात कारण कन्या हि भूमी स्वरूप म्हणजे स्थिर आहे. विवाहानंतर ती तिच्या सासरी गेली व ती तिथे पत्नी,काकू,मामी,आई या कोणत्याही नात्यात गेली तरी माहेरी तिची कन्या म्हणूनच भूमिका राहते,लग्नानंतर कितीही वर्षांनी ती माहेरी आली तरी अमुकांची सून घरी आली असा उल्लेख न करता लेक घरी आली असेच सर्वजण म्हणणार ;म्हणजेच कन्या हि तिच्या भूमिकेत स्थिर आहे.

आल ना लक्षात कन्यादानाच महत्व...गुरुजी

हो गुरुजी...सुधिरराव

आता विधीला सुरुवात करुया.....गुरुजी

हो....सुधिरराव

सुधिररवा स्नेहाचा हात घ्या व त्यावर आशुचा हात ठेवा...त्यानंतर एखाद फुल त्यांच्या हातावर ठेवा....अक्षता टाका....आणि एका कलशामध्ये पाणी घेवुन त्यातील पाणी पंचपाळाने त्यांचा हातावर सोडा.....रेखाताई तुम्ही सुधिरांवाच्या हाताला हात लावा आणि हे पाणी मी मंत्र बोलुपर्यत सोडत रहा....गुरुजी

हो गुरुजी......सुधिरराव

गुरुजी मंत्र म्हणत होते तसे सुधिरराव गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळे विधी जसेच्या तसे करत होते....

आता मुलींचा हात....वराच्या हातात दया.....आणि मी माझी कन्या तुम्हाला देत आहे तिचा व्यस्थित सांभाळ करा असे वराला सांगा....आणि तुम्ही आणलेले तांब्यांचे तबक ‍व बाळकुष्णाची मुर्ती दया........गुरुजी

गुरुजींनी जसे सांगितले तसे सुधिरराव स्नेहाचा हात आशुच्या हातात देत बोलतात.....स्नेहाचा हात आशुच्या हातात देताना सुधिरांवाचे डोळे पाणावले......पण आता आपल्या डोळयात पाणी स्नेहाने पाहिल तर जास्तच रडेल म्हणुन त्यांनी स्वत:ला सावरल.....

बाबा तुमच्या पेक्षा जास्त प्रेम मी करेल की नाही माहीत नाही पण तुमच्या इतक प्रेम मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन....तिला कशाचीही कमी पडु देणार नाही.....आशु

आशुच बोलण ऐकुन सुधिरावांना समाधान मिळाल.....आपण योग्य मुलाच्या हातात आपल्या मुलीचा हात दिला हयाच त्यांना सार्थक वाटु लागल....

कन्यादानाची विधी पुर्ण झाली आहे....आता तुम्ही तुमच्या जागेवर बसा.......गुरुजी

हो गुरुजी.....आशु

परत थोडावेळ आलेले पाहुणे  व मित्रमंडळी भेटायला येवु लागले.....थोडावेळ असच भेटाभेटी झाल्यानंतर..फोटोग्राफर आशु व स्नेहाला त्यांचे कपल फोटो काढायचे आहेत म्हणुन त्यांना बोलवायला आला...

हो आम्ही येतो म्हणुन आशु त्यांची मोजडी शोधु लागला....पण त्याला कुठे दिसेनाच...तो सुजयला बोलावतो.......

काय रे दादु काय हव आहे का.....सुजय

अरे माझी मोजडी कुठे दिसत नाहीये...आशु

तु कुठे काढली होतीस......सुजय

इथेच बाजुला काढली होती विधी करताना.....पण आता कुठे दिसेनाच....आशु

सुजय व आशुची शोधाशोध पाहुण रेवाला हसु यायला लागल..ती हसताना सुजयच लक्ष रेवाकडे गेल.........

तु का हसतेयस.......म्हणजे मोजडी तु लपवुन ठेवली आहेस तर...सुजय

हो मग काय....माझा हक्क आहे तो.......रेवा हसत बोलते

काय रे दादु तुला सांगितल होत ना...इकडे तिकडे मोजडी काढु नको म्हणुन.......सुजय

बर आता जाऊदे ते...... माझी दक्षिणा दया मला......मग मी तुमची मोजडी देते.....रेवा हसत बोलली...

ये अस कस...मी शोधुन आणेण थांब तु.....सुजय

अहो दादा फोटो काढायला वेळ होतोय....फोटोग्राफर..

दादा फक्त दहा मिनिट...मी लगेच शोधुन आणतो......सुजय

बर पण जरा लवकर हा...फोटोग्राफर

हो हो मी आलोच अस म्हणत सुजय मोजडी शोधायला जातो......पंधरा-विस मिनिट होतात पण त्याला मोजडी कुठे सापडतच नाही....तो तसाच स्टेजवर येतो.....

अरे काय सापडली का मोजडी......आशु

नाही ना सापडली.....सुजय एवढस तोंड करुन बोलतो....

बर मग दया आता माझी दक्षिणा....रेवा हसत बोलते

बर बर देतो थांब ना जरा..........आधी मोजडी तर आण.....सुजय

नाही नाही आधी दक्षिणा मग मोजडी.....रेवा

अरे अस कस...तुझ्याकडे नसली तर....सुजय

असल्याशिवाय बोलणार आहे का.....रेवा

थांबा थांबा...भांडु नका तुम्ही.....मी देतो तुझी दक्षिणा....आशु

सुजय ते पाकिट दे.....आशु

बर.......सुजय त्याच्या खिशातुन पाकिट काढुन आशुकडे देतो.....

हे घे रेवा.......आशु ते पाकिट रेवाकडे देत बोलतो.....

रेवाला ते पाकिट थोड ओझ लागत......म्हणुन ती उघडुन पाहते.....ये दादु येवढे पैसे.....मी एवढे नाही रे घेवु ‍शकत.....मी फक्त मस्करी म्हणुन फक्त दक्षिणा मागत होते.....मला फक्त हयाती 101 रु दे बास.....रेवा

अग तुझ्यासाठीच आहे ते.....घे.........आशु

नाही रे दादु एवढे पैसे कसे घेवु नको नको.....रेवा

हयांच काय चालल म्हणुन माधवीताई व मालतीताई तिथे येतात.....

अरे मुलांनो काय झाल.....माधवीताई

अग आई रेवाला मोजडी लपल्याबद्दल पैसे देत होतो ग पण घेतच नाहीये.....आशु

अग रेवा घे ना......तुझ्यासाठीच तर त्याने बाजुला ठेवले होते.......माधवीताई

काकु पण हे खुप आहेत.......अग खुप कुठे थोडेच आहेत घे.......माधवीताई

ये आई तु तर सांग ना.....अग अकरा हजार आहेत हयात........रेवा

अहो माधवीताई हे खुपच होतात.......मान म्हणुन 101 रु दया फक्त...मालतीताई

काही नाही.....हे घे तु......आशु दे तिला......काही जास्त नाहीयेत....माधवीताई

आशु रेवाच्या हातात ते पाकिट देतो.....हया सगळयाच्या समोर तिच काहीच चालत नाही.....मग ती ते पाकिट घेते....

ओय आता मोजडी कुठे आहे दे.......सुजय

देते ना........दादु जरा बाजुला हो ना......रेवा आशुला बाजुला करत बोलते.....आणि सोफ्याच्या खालुन ती मोजडी काढते..हे घे दादु घाल.....रेवा आशुच्या पायात मोजडी घालत बोलते.....

डोक छान चालत हा तुझ......काय भारी जागा शोधुन काढली होतीस....वा मानल तुला......सुजय

मग काय कराव लागत.......तु रुममध्येच शोधणार मला माहित होत..म्हणुन मी ते रुममधुन इथे लपवले......तसे सगळे हसायला लागले.......

बर जा पटकण तुम्ही फोटो काढुन घ्या....माधवीताई

हो आई.....आशु

आशु व स्नेहा त्यांचे कपल फोटो काढायला जातात.....थोडावेळ त्यांचे फोटो काढुन झाल्यावर फॅमिली फोटो काढतात......बराच वेळ फोटो काढुन झाल्यावर.....सगळे एकत्र जेवायला जातात...सगळयांची जेवण आटपतात.....व सगळे निघायची तयारी करु लागतात.....

जशी जायची वेळ आली तस रेखाताई व सुधिरांवाचे डोळे भरुन आले......

स्नेहा निघायच आहे ना....आई बाबांना नमस्कार कर...माधवीताई

स्नेहा रेखाताईना व सुधिरांवाना नमस्कार करायला जाते....नमस्कार करुन उठते तर तिला हुंदका आवरत नाही..ती रेखाताईच्या गळयात पडुन रडु लागते......थोडावेळ दोघी रडल्यानंतर रेखाताई स्वत:ला सावरतात....ये बाळ...शांत हो........जा बाबांना भेट जा......त्या दोघीच रडण पाहुन सुधिरराव थोडे बाजुला गेले होते......स्नेहा सुधिरांवाच्याकडे जात असते......स्नेहा जशी सुधिरांवाच्याकडे येत होती.....तस सुधिरांवाना त्यांच्याकडे इवल्या इवल्या पावलांनी धावत येत असलेली स्नेहा दिसते.......तेव्हा तर सुधिरांवाना रडुच आवरेना....स्नेहा सुधिरांवाच्या जवळ येते..व त्यांना मिठी मारुन रडु लागते.....सुधिरांवाना आता अश्रु अनावर झाले ते ही रडु लागले..बाप-लेकीचा प्रेम पाहुन आलेल्या पाहुण्यांच्या सुध्दा डोळयात पाणी आल......माधवीताई आध्या हयांच्या सुध्दा डोळयात पाणी आल....

रेखाताई थोड सावरत स्नेहा व सुधिरांवाच्या जवळ येतात...ये स्नेहा चला बाळ निघायला वेळ होतोय ना...चला...अहो........सावरा स्वत:ला........रेखाताई स्नेहाला बाजुला करत बोलल्या....

स्नेहा तशीच रडत होती तिला बाजुला रडत असलेली रेवा दिसते.......ती रेवाजवळ जाते....आणि तिला घट्ट मिठी मारुन रडु लागते....त्या दोघीच प्रेम पाहुन मालतीताई आध्या....माधवीताई हयांना सुध्दा रडायला येत होत.......सुजय व आशु व बाकिच्या पाहुण्याच्या डोळयात सुध्दा पाणी आल....

ये बाळांनो एवढ कशाला रडताय ग.....एकाच तर शहरात आहात तुम्हाला केव्हा हव तेव्हा तुम्ही भेटु शकता.....माधवीताई स्नेहा व रेवाला बोलत म्हणाल्या...

स्नेहा रेवा चला आपल्याला उशीर होतोय ना....परत आपल्याला मंदिरात पण जायच आहे....माधवीताई

दोघीही डोळे पुसतात.....स्नेहा आशुतोश सोबत त्यांच्यासाठी खास सजवलेल्या गाडीत जाऊन बसते....एका गाडीत रेवा आध्या राधिका सुजय बसतात......व बाकिचे बाकिच्या गाडीत बसतात...व जायला निघतात....

स्नेहा जातेल पाहुण परत सुधिरराव व रेखाताईचे डोळे भरुन आले...पण चेहऱ्यावर हसु ठेवुन स्नेहाची पाठवणी करतात....व स्नेहा गेल्यावर ते सुध्दा जायला निघतात..

स्नेहा व आशु व घरचे सगळे जाताना पहिला गणपती मंदिरात जातात तिथे दर्शन घेतात...नंतर त्याच्या कुलदैवताचेही दर्शनाला जातात तिथे मंदिराचे पुजारी जसे सांगतील तसे विधी करतात देवाला नव्या आयुष्य सुखाचे जावो अशी प्रार्थना करतात व सगळे घरी जायला निघतात.

सगळयांना घरी जायला संध्याकाळचे पाच वाजले....माधवीताई व मालतीताई पुढे जाऊन स्नेहाच्या स्वागताची तयारी करतात....

माधवीताई नवरा नवरी आले पहा.....मालतीताई माधवीताईना दारात गाडी आलेली पाहुन ओरडुन सांगतात......

***

क्रमश:

पुढचा भाग 25/10/2020 ला पोस्ट केला जाईल..

लग्नाच्या विधी मांडण्याचा प्रयत्न केला आहे....तरी काही कमी जास्त झाल असेल तर कथेचा भाग म्हणुन समजुन घ्यावे....

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all