बावरे मन...भाग-58

बावरे मन..भाग 58 (सुजय व सगळे पुरुष मंडळी......उदयाची थोडी तयारी करु लागले......ती तयारी झाल्यावर सगळे ??

बावरे मन..भाग 58

(सुजय व सगळे पुरुष मंडळी......उदयाची थोडी तयारी करु लागले......ती तयारी झाल्यावर सगळे आवरुन झोपायला जातात.....

रेवा स्नेहा आध्या राधिका आजच्या कार्यक्रमा बद्दल बोलत बसल्या होत्या.....

अग मुलींनो बास आता किती गप्पा मारताय......उदया परत लवकर उठायच आहे ना...स्नेहा जास्त जागरण करु नको.....परत उदया तुझी धावपळ होणार आहे....मालतीताई

हो ग आई आता आम्ही झोपणारच आहोत.......रेवा)

आता पुढे...

बर पण जास्त जागरण नको करु ग.......झोपा आता......मालतीताई त्यांना सांगुन झोपायला जातात....

चला झोपुया.....लवकर उठायच आहे ना अस म्हणुन रेवा उठुन झोपायला जात असते......आणि स्नेहा तिचा हात पकडते.......

ओय काय.........झोपायच नाहीये का.......रेवा तिला हसत विचारते........

स्नेहा खाली बसलेली असते......रेवाचा हात पकडुन उठते......रेवा थॅक्यु सो मच........

थॅक्यु.......?......कशासाठी.........रेवा थोडा विचार करत बोलते......

माझ्यासाठी इतक छान सरप्राईज दिल्या बद्दल.....स्नेहा

ये वेडाबाई...काहीही पण असत तुझ.......थॅक्स काय ग त्यात...माझ्या बेस्टीसाठी तर केल आहे ना हे.......रेवा

हो ग......पण तरीही म्हणावस वाटल.........स्नेहा

वेडीच आहेस.....आणि तु दुर जातेयस म्हणुन हे सगळ तुझ्यासाठी नाही केल ग....माझ्या फिलिंग्स सांगत होते फक्त तुला.....आणि तु कुठे आता लांब जाणार आहेस......हयाच तर शहरात आहेस.......रेवा

हो ग......आपण दुर जाणारच नाही......आणि आता तुझ्या लग्नानंतर पण जाणार नाहीये.....कळल का...जाऊबाई......स्नेहा रेवाला चिडवत हळु आवाजात बोलते.....

झाल का तुझ सुरु चल आता झोपुया....राधिका आध्या चला तुम्ही पण झोपा......रेवा

हो.....झोपतो आम्ही........आध्या.

***

सकाळी लवकर सगळयांची धावपळ सुरु झाली.....कोण कामाच्या गडबडीत होते.....तर कोण आपली तयारी करत होते.....स्नेहा रेवा आपल्या तयारीत रमल्या होत्या......बाकी पुरुष मंडीळी तयारी मध्ये होते....महिला वर्गाची पण धावपळ सुरु होतीच.......लग्नाची खुप छान तयारी केली होती.....

स्नेहा व आशुसाठी खुप छान पध्दतीने स्टेज सजवला होता....सगळीकडे फुलांचे डेकोरेशन......मागे त्या दोघांन हार्टशेपमध्ये चि.आशुतोश व चि.सौ.का.स्नेहा शुभ विवाह....अस लिहल होत......ते वाचतानाच इतक छान वाटत होत......स्टेजवरच गुरुजींनी विधीसाठी तयारी केली होती.......पाहुणे मंडळीना बसण्याची छान सोय केली होती....

अहो ऐकलत का.......गाठीभेटी साठी पाच महिला व पाच पुरुषांना गुरुजी घेवुन या म्हणुन सांगितले आहेत......माधवीताई

बर मग आपण आपल्या पाहुणे मंडीळी आहेत त्यातीच जोडी जोडी बोलवुया ना....आनंदराव.

हो हे बर होईल......चला मग सांगुया त्यांना......नाहीतर परत वेळ होईल.......

इकडे रेखाताई व सुधिरराव सुध्दा त्याच्या पाहुण्यातील पाच महिला व पाच पुरुषांना सांगत होते......

माधवीताई आनंदराव व रेखाताई व सुधिरराव त्यांच्या त्यांच्या कडील पाच महिला व पुरुष पाहुण्यांना घेवुन येतात......

वराकडचे पाच महिला व पुरुष आलेत का गाठीभेटीसाठी........गुरुजी......

हो गुरुजी आलेत.......आनंदराव

आणि वधुकडील पाच महिला व पुरुष...गुरुजी.....

हो गुरुजी आलेत....सुधिरराव..

बर आता गाठीभेटीला सुरुवात करुया.........प्रथम वधु पक्षाकडील पुरुषांनी वर पक्षाकडच्या पुरुषांना नाम ओढावा.....त्यानंतर टॉवेल, टोपी, नारळ, पान, सुपारी दयावी...एकमेकांना साखर भरवावी व नंतर एकमेकांच्या गाठीभेठी घ्याव्या.........व त्यानंतर असेच वर पक्षाकडील पुरुषांनी वधुपक्षाकडील पुरुषांना गाठीभेटी कराव्या.....गुरुजी..

गुरुजीनी सांगितल्याप्रमाणे.......वर व वधु पक्षाकडील पुरुषांच्या गाठीभेटी होतात....

आता वधु पक्षाकडच्या महिलांनी वर पक्षाच्या महिला हळदी-कुंकु लावावे त्यानंतर....हिरवा पिस, नारळ,ओटी दयावी व नंतर त्यांना साखर भरवुन त्यांच्या गाठीभेटी घ्याव्या...आणि असेच वर पक्षाकडील महिलानी वधुपक्षाकडील महिलांना गाठीभेटी कराव्या....गुरुजी

गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे वर व वधु पक्षाकडील महिलांच्या गाठीभेटी होतात....

आता गाठी भेटी झाल्या आहेत.......आनंदराव आता पुढच्या तयारीला लागा........गुरुजी

हो गुरुजी.......आनंदराव

रेखाताई स्नेहाला गौरीहार पुजायला सांगा........आणि हो पुजा करताना तिला पिवळया रंगाची साडी नेसायला सांगितली आहे.....ती नेसायला सांगा.....गुरुजी

हो गुरुजी.........सांगते....गुरुजी

रेखाताई गुरुंजीनी सांगितल्यावर स्नेहाकडे येतात........स्नेहा अग गुरुजींनी गौरीहार पुजायला सांगितल आहे........ती गौरीहार पुजण्यासाठी ती पिवळया कलरची साडी मामाने दिली आहे ती नेस....गुरुजी येवुन तुला गौरीहार कस पुजायच ते सांगतील.......तुझी तयारी झाली की सांग मला मी गुरुजींना सांगते......

हो आई......मी तयार झाले की रेवाला पाठवते...........स्नेहा

हो चालेल......

स्नेहा गौरीहारसाठी तयार होते.......व रेवाला सांगुन गुरुजींना सांगते.......गुरुजी येवुन गौरीहार कसा पुजायचा ते सांगतात.....

 दाक्षायणीने कठोर तपश्चर्या करून शंकराला प्राप्त करून घेतले. महादेवासारखा पती मिळावा या चांगल्या हेतूने ही पूजा केली जाते. सजवलेल्या मंडपिमध्ये तांदुळाची रास करून त्यावर अन्नपूर्णेची स्थापना करून गौरीहराची पूजा केली जाते, काही ठिकाणी बाळकृष्ण ठेवण्याची पद्धत आहे. अन्नपूर्णा म्हणजेच दाक्षायणी. शंकरासारखा पराक्रमी, बलवान, पती प्राप्त व्हावा म्हणून हे पूजन. मुलगी ' गौरी गौरी सौभाग्य दे दारी आलेल्याला आयुष्य दे' अशी प्रार्थना करत थोड्या थोड्या अक्षता देवीवर वाहते.
अन्नपूर्णा देण्यामागे ज्या घरी ही मुलगी राहणार आहे त्या घरी तिने अन्नपूर्णेप्रमाणे वागून घरातील सर्वांची अन्नदात्री बनावे अशी धारणा. मंडपीची रचना करण्या मागे सुशोभित छताशिवाय देवाची आराधना करू नये असा संकेत आहे. लग्नाला उभी राहताना मुलगी मामाने दिलेली पिवळ्या रंगाची साडी नेसते. यालाच अष्टपुत्री म्हणतात. हे वस्त्र लग्न लागल्यानंतर दान करायला सांगितलेले आहे, ते दान करण्या मागचा हेतू असा कि  वधू या भूमिकेतून मुलगी आता पत्नी या भूमिकेत गेलेली असते म्हणून ते वस्त्र तिने परत नेसायचे नसते.
एका पाटावर गौरी हाराची बोळकी ( साखरेची किंवा लाकडाची एकावर एक अशी चिकटवलेली पाच बोळकी असतात ) मांडतात . मुलीला तिचे बरोबर देण्यासाठी आणलेली अन्नपूर्णेची मूर्ती पाटावर मध्यभागी ठेवतात . तसेच तांदुळाच्या राशीवर इंद्रायणी करिता सुपारी मांडतात . पाटावर बाजूला लादुगडू ठेवतात . या देवतांची ( गौरीहर पूजा ) वधूने करायची असते.

गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे स्नेहा गौरीहारची पुजा करु लागते........

स्नेहा गौरीहार पुजेपर्यत रेवा तिची तयारी करुन घेते....तिची तयारी झाल्यावर स्नेहाच्या तयारीसाठी त्या पार्लरवालीला मदत करते......

आनंदराव मुहुर्ताची वेळ जवळ आलेय....वधु वराला त्यांच्या मामांना त्यांना मंडपात घेवुन यायला सांगा.......गुरुजी

हो हो गुरुजी सांगतो.........आनंदराव

आनंदराव येवुन दोन्हीकडे सांगुन जातात.........आनंदरावानी सांगितल्यावर सुजय व आशु थोडी फास्ट तयारी करतात.......

आशु झाली का तयारी तुमची....अस म्हणत माधवीताई रुममध्ये येतात......अग बाई कसाला राजबिंडा दिसतोय.......माझीच दृष्ट नको लागायला....अस म्हणत आपल्या डोळयातील काजळ आशुच्या कानामागे लावतात.....

आई काय ग तु पण......आशु

काय ग काय.....जे आहे ते आहे......खुप मस्त दिसतोयस........माधवीताई

हा मग काय दिसणारच.....कोण तयार केलय त्याला...सुजय आपली कॉलर उचलत बोलतो.....

हो का......आणि तुम्ही कधी तयार होणार......माधवीताई

अग आई आत्ता दादुला तयार केलो.....आता मी होतो ना तयार......पाच मिनिटात होतो बग....सुजय

बर पटकण आवरुन या.......माधवीताई

इकडे स्नेहा सुध्दा तयारी लागते.........स्नेहा आवरल ना ग तुझ...रेखाताई स्नेहा आवरली आहे का ते पहायला येतात.......

अगबाई किती सुंदर दिसतेयस तु......रेखाताई

अग आई पार्लरच्या काकीनी तयार केलय.......आणि रेवा सुध्दा त्यांना मदत करत होती हा....स्नेहा

हो का....खुप सुंदर दिसतेय...माझीच दृष्ट नको लागायला.....अस म्हणत रेखाताई आपल्या डोळयातील काजळ स्नेहाच्या कानामागे लावतात......अग पण रेवा कुठे आहे.......रेखाताई

अग आई ती तयार होतेय....म्हणजे आधी आवरली होती.....आता थोड टचअप करतेय....ही बग आलीच.......स्नेहा

रेखाताई मागे वळुन पाहतात.....अग बाई रेवा किती सुंदर दिसतेयस.........साडीत पहिल्यांदाच पाहतेय तूला...खुप खुलुन दिसतेय तुला साडी........रेखाताई

थॅक्स काकु.....रेवा

बर मुलींनो चला आवरा पटपट.......गुरुजी बोलवत आहेत........रेखाताई

हो काकु आम्ही तयारच आहोत.....तुम्ही बोलवला की आम्ही येतोच बाहेर......रेवा

बर.......रेखाताई

दोघेही गडबडीने तयार होतात....पहिला आशुला घेवुन सुजय हॉलच्या मागच्या बाजुने घेवुन जातो.....व हॉलच्या लॉनवर येतो.....तेथुन आशुला घोडयावर बसवुन आणायच होत.....म्हणजे एक प्रकारची वरातच घेवुन येणार होते........मग सुजय सगळयांना बोलावुन घेतो......माधवीताई आनंदराव आध्या राधिका....मालतीताई रमांकातराव..आणि बाकिचे पाहुणे मंडळी येतात........बॅन्ड बाजाच्या तालावर आशुला घोडयावरुन घेवुन येत असतात.......

आध्या सुजय व त्यांचे व आशुचे मित्र वराती समोर डान्स करत होते......राधिकाच्या पायाला लागल असल्यामुळे ती त्याच्यासोबत नुसता चालत येत होती....असच नाचत मजा मस्ती करत वरात हॉलच्या मेन दाराजवळ येते......आशु घोडयावरुन उतरुन हॉलच्या दारावर येतो...आशु आल्यावर रेखाताई....त्याच्या पायावर पाणी घालतात..... औक्षण करतात..त्याला गोड भरवतात..

आशुच औक्षण झाल्यावर आशुचे मामा नसल्यामुळे.....रमांकातराव त्याचे मामा म्हणुन आशुला उचलुन घेणार होते.......

आशु उचलु ना.......रमाकांतराव

काका कशाला उचलताय....नुसत बोटाला धरुन चला ना......आशु

अरे अस कस....मामा आहे म्हटल्यावर उचलायला नको का....अस म्हणत रमाकांतराव आशुला उचलुन घेतात......व स्टेजकडे घेवुन येतात....आशुला घेवुन जाताना त्यांच्या अंगावर फुलांचा वर्षाव होत होता....रमाकांवराव आशुला स्टेजवर घेवुन येतात...त्याला खाली उतरवतात...आशु आणलो ना तुला व्यवस्थित घाबरत होतास.......रमाकांतराव आशुची मस्करी करत बोलले.....तसे सगळेच हसायला लागते....

बर आता मुलीला घेवुन या.......गुरुजी

हो गुरुजी.........सुधिरराव

रेखाताई स्नेहाला बोलावायला जातात......स्नेहा चला आपल्याला बाहेर जायच आहे......

हो काकु........रेवा स्नेहाला घेवुन हॉलच्या मागच्या बाजुन घेवुन जाऊन हॉलच्या पुढच्या दाराजवळ आणते.....स्नेहाला डोलीतुन आणणार होते.....मग सगळेच हॉलच्या दाराजवळ येतात.....स्नेहाकडचे सगळेच....रेखाताई सुधिरराव रेवा...तिचे मामा मामी...आणि पाहुणे व मित्र मंडळी डोलीसमोर येतात...

स्नेहा डोलीमध्ये बसते.....व ते डोलीवाले डोली उचलुन घेतात....स्नेहा डोलीत बसवुन सगळे मजा मस्ती करत हॉलच्या दाराजवळ येतात......डोली दाराजवळ उतरवतात......स्नेहा डोलीतुन बाहेर येते......स्नेहा बाहेर आल्यावर माधवीताई तिच्या पायावर पाणी घालतात...तिच औक्षण करतात....तोंडात साखर देतात......खुप सुंदर दिसतेयस....स्नेहाच्या चेहऱ्यावरुन हात फिरवत बोलतात....तशी स्नेहा गोड लाजते.....

बर स्नेहाचे मामा कुठे आहेत.....त्यांना बोलवा.....रमाकांतराव

स्नेहाचे मामा तिला उचलुन स्टेजकडे येवु लागतात....ते जसे येतील तसे त्यांच्यावर फुलांच्या पाकळयांचा वर्षाव होवु लागतो.....स्नेहाचे मामा तिला स्टेजवर घेवुन येतात......

बर मुलगी आली आता पुढच्या विधिला सुरवात करुया......माधवीताई अंतरपाट विसरला आहात....गुरुजी.......

अग बाई कशी काय विसरले.........सुजय जरा घेवुन ये जा आशुच्या बॅगेतच आहे बग......माधवीताई

सुजय रेवाला शोधत  असतो.....पण माधवीताई त्याला आत पाठवतात.....तो अंतरपाट अणायला जातो.....थोडयावेळात सुजय अंतरपाट घेवुन येतो........आणि गुरुजींना देतो.....गुरुजी तो अंतरपाट घेतात...त्या अंतरपाटामुळे आशु व स्नेहाला पाहता तर येणारच नव्हत पण सुजय व रेवाला ही एकमेकांना पाहता येणार नव्हत....

दोन पाटाच्यामध्ये ते अंतरपाट धरतात....एका पाटावर आशु व एका पाटावर स्नेहा उभे राहतात..आणि गुरुजी मंगलाष्टाके बोलायला सुरु करतात.....

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।

बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||

लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |

ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं || 1 |

पहिली मंगलाष्टक होतात तसे सगळे अक्षता टाकतात.......

मंगलाष्टके सुरु झाली तशी स्नेहाच्या डोळयात पाणी आल...पण स्वत:ला सावतर ती चेहऱ्यावर हसु ठेवते....

गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।

कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।

क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।

पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। 2 ।।

दुसरी मंगलाष्ट झाल्यावर परत सगळे त्या दोघांच्या अंगावर अक्षता टाकतात...

लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।

गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।

अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।

रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। 3।।

राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।

ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।

आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।

रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। 4 ।।

लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।

रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।

दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।

धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। 5 ।।

लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।

साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।

सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।

गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। 6 ।।

जशी मंगलाष्टके होतील तसे सगळे दोघांच्यावर अक्षता टाकत होते..

आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।

गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।

दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।

वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। 7 ।।

शेवटची मंगलाष्टके सुरु होताना रेखाताईच्या डोळयात पाणी आल....सुधिरावांचे डोळेही पानावले...लग्न लग्न म्हणुपर्यत त्यांच्या मुलीच्या डोक्यावर अक्षता पडल्या सुध्दा....बघता बघता लग्न झाल सुध्दा...

***

क्रमश:

पुढचा भाग 21/10/2020 ला पोस्ट केला जाईल..

लग्नाच्या विधी मांडण्याचा प्रयत्न केला आहे....तरी काही कमी जास्त झाल असेल तर कथेचा भाग म्हणुन समजुन घ्यावे....

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all