बावरे मन...भाग-54

बावरे मन..भाग 54 (इकडे रेवा आपल्या हातावरील मेंहदी एकसारख पाहत बसली होती...तिला विश्वासच बसत नव्ह

बावरे मन..भाग 54

(इकडे रेवा आपल्या हातावरील मेंहदी एकसारख पाहत बसली होती...तिला विश्वासच बसत नव्हता की सुजयने आपल्या हातावर मेंहदी काढली आहे.......आणि तेही त्याच नाव....मेंहदी पाहत पाहत ती झोपी जाते.........

बाकिचे पण सगळे आवरा आवरी करुन झोपी जातात.....सुजय पण उदया थोडी फार तयारी करुन आपल्या रुममध्ये येवुन रेवाच्या हातावरील काढलेल्या मेहंदीच्या विचारात झोपी जातो......)

आता पुढे......

सकळी 8 वाजता स्नेहाला चुडा भरण्याचा कार्यक्रम होता व सकाळी 10 ला हळदीचा कार्यक्रम करणार होते......त्यामुळे सकाळ पासुनच खुप धावपळ सुरु होती....

स्नेहा झाल की नाही तुझ.....अग सगळे वाट पाहत आहेत तुझी.....चुडा भरायचा आहे ना........रेखाताई रुममध्ये येत बोलतात......

अग आई ही काय मी तयार आहे.....रेवा असताना तु कशाला काळजी करतेयस....रेवाने केव्हाच तयार केलय मला..... स्नेहा

छान दिसतेयस हा........रेवा मस्त तयार केली आहेस स्नेहाला......रेखाताई.

थॅक्स काकु.......रेवा

बर चला पटकण.......परत आणि हळदीसाठी वेळ व्हायला नको.....रेखाताई

हो काकु आम्ही आलोच......रेवा

स्नेहासाठी हॉलमध्ये चुडा भरण्यासाठी.......छान ॲरेजमेन्ट केली होती......स्नेहाला बसण्यासाठी मधोमध छोटस चौरंग ठेवल होत.......तिच्या साईडला बाकिच्या पाहुण्यांना बांगडया भरण्यासाठी सोय केली होती...

स्नेहा हॉलमध्ये येते.......रेवा तिला तिच्यासाठी सजवलेल्या चौरंगवर बसवते....

माधवीताई रेखाताई व मालतीताई व आणखीन दोघीजनी अशा पाच सुहासनी स्नेहाला हळदी-कुंकू लावतात.......

ताई तुम्ही सुरु करा चुडा भरायला..........माधवीताई त्या बांगडीवालीला सांगतात.....

परंपरेनुसार पहिला स्नेहाला चुडा भरायला सुरुवात करतात.....चुडा भरताना स्नेहा आशुकडे पाहत असते...चुडा भरताना स्नेहाच्या चेहऱ्यावर एक वेगळच तेज आल होत....

स्नेहाचा चुडा भरल्यानंतर.....मग माधवीताई रेखाताई मालतीताई.....आणि आलेले बाकीच्या पाहुणे बांगडया भरतात....

बर चला मुलींनो...हळदीची तयारी करा तुम्ही.....परत गडबड होईल नंतर....माधवीताई

हो आई आम्ही जातो.....आध्या

सगळे हळदीच्या तयारी लागतात...

आज सगळयांच्या ड्रेसची पिवळा कलरची थिम ठरवली होती.....आणि हळदीच्या कार्यक्रमाचे डेकोरेशन पण पिवळया कलरचे पडदे व व्हाईट कलरचे पडदे अशी केली होती........हळदीचा कार्यक्रम हॉलच्या समोरच्या लॉनमध्ये करण्यात आली होती......आशु व स्नेहासाठी बसण्यासाठी खुप छान सोय केली होती.....सुरवातीला एकमेकांना लावतेली हळद पहायची नसते म्हणुन दोघांच्यामध्ये एक छोटासा पडदा लावला होता......परंपरेनुसार दोघांना हळद लावुन झाली की मग तो पडदा बाजुला करणार होते....

सुजयची धावपळ सुरु असते....तो स्नेहा व आशुची हळद स्पेशल कशी करता येईल हयासाठी स्वत:हुन सगळ लक्ष देत होता......

सुजय तु अजुन तयार झाला नाहीयेस.....राधिका सुजयजवळ येत विचारते.....

अग ते तयारीच पाहत होतो ना.......सुजय

बर आता मी बघते इथल तु जा तयार होवुन ये.........राधिका

नक्की ना..........सुजय

हो अरे......राधिका....

बर....पण बाकिचे अजुन कुठे आहेत..........सुजय

ते होय.........वहिनीला रेवा तयार करत होती ना......मग आता रेवाला आध्या तयार करत आहे........येतील इतक्यात.......राधिका.....

ओ.......ओके........मी आलोच तयार होवुन......अस म्हणत सुजय जात असतो........आज रेवा कशी तयार होत असेल.....नेहमी सारखीच सुंदर दिसत असणार.......पण आज तिला हळद तर लावणारच.....सगळयांच्या समोर असो किंवा सगळयांच्या नकळत........सुजय मनातल्या मनात बोलत असतो........

ओय दादया....काय कुठे लक्ष आहे.......केव्हाची बोलवतेय........आध्या

सुजय आध्याच्या आवाजाने भानावर येतो.......आ......काय म्हणत होतीस.......सुजय

जरा रेवाच्या विचारातुन बाहेर ये......आध्या सुजयला चिडवत म्हणाली.....

झाल का तुझ सुरु.......बर मला सांग तु रेवाला तयार करत होतीस ना........सुजय

हो अरे केले ना तयार.......पण तुला कोण सांगितल हे.......आध्या

राधिकाने सांगितल.......सुजय

ओ.....बर....आध्या

कशी दिसतेय रेवा......सुजय उत्सुकतेने विचारतो....

ती समोर आल्यावर बघ ना........आज तो तुम्हारे होश उड जायेगे......मेरे भाई....आध्या सुजयला चिडवत बोलते.....

सांग ना यार......सुजय

नाही म्हटल ना......ती समोर आल्यावर बघ......आणि पटकन तयार होवुन ये.....नाहीतर वहिनी एन्ट्री मिस करशील........आध्या

बर मी आलो पाच मिनिटात तयार होवुन.....रेवाला बघण्यासाठी सुजय गडबडीने तयार होण्यासाठी जातो......

थोडयावेळात सुजय तयार होवुन आशुला घेवुन लॉनवर येतो.......आता सगळे स्नेहाची वाट पाहत होते...

स्नेहा रेवा चला लवकर सगळे वाट पाहत आहेत....रेखाताई

हो आई चल झाल आहे आमच.....स्नेहा

बर चला......स्नेहा व रेवा जात असतात तेवढयात आध्या राधिका येते......

वहिनी आम्ही तुलाच बोलवायला येत होतो...सगळे वाट पाहत आहेत बाहेर....दादु तर केव्हाचा तयार होवुन आलाय..आध्या..

अग आम्ही येतच होतो....रेवा

बर चला पटकन.....आध्या

सगळेजण बाहेर येत असतात...आणि अचानक अग बाई मी स्नेहाला हळदीनंतर साडी दयायची असते ती विसरलेच की.......थांब मी आणते जाऊन......रेखाताई

अहो काकु थांबा मी जाते आणायला......मीच ठेवली आहे ती साडी.....रेवा

बर लवकर ये....रेखाताई

हो तुम्ही जा तोपर्यत पुढे मी आलेच......रेवा

आध्या व राधिका स्नेहाला घेवुन बाहेर येतात.........स्नेहा पायऱ्यावरुन खाली उतरु लागते तर तिच्या एन्ट्रीवर म्युझिक सुरु होत.....

गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली
सजणी मैत्रीणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली
गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली


स्नेहा खाली येते आणि तिला जिथे बसवणार होते तिथे जात असते...आशु तिथेच समोर थांबला होता.......स्नेहाला पाहुन तर त्याची विकेटच पडली होती.....तो एकटक स्नेहाला पाहत होता.....स्नेहाने हळदी कलरची लेहंगा चोली घातली होती होती....केसाची सुंदर अशी हेअर स्टाईल केली होती....गळयात हातात माथ्यावर कंबरेला हळदीचे दागिने घातले होते....त्या दागिन्यामुळे स्नेहा आणखीन सुंदर दिसत होती.....चेहऱ्यावर छानस मेकअप...ओठांना लावलेली लिपस्टिक....डोळयातील काजळ.... आणि चेहऱ्यावरची तिची घायाळ करणारी स्माईल...सगळयांच्या नजरा स्नेहावरच खिळल्या होत्या.......गाण्याच पुढच कडव सुरु होत......आणि माधवीताई तिकडुन हळद घेवुन येतात....


नवऱ्या मुलाची आली हळद ही ओली
हळद ही ओली लावा नवरीच्या गाली
हळदीनं नवरीचं अंग माखवा
पिवळी करून तिला सासरी पाठवा
सजणी मैत्रीणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
सासरच्या ओढीनं ही हासते हळूच गाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली

स्नेहा आली पण रेवा कुठे दिसतच नव्हती.....सुजची नजर रेवाला शोधत होती....पण त्याला कुठे  रेवा दिसेनाच......स्नेहाला व आशुला त्यांच्यासाठी सजवलेल्या चौरंगावर बसवतात....



आला नवरदेव वेशीला, वेशीला ग, देव आला नारायण ग
मंडपात गणगोत सारं बैसलं ग पोरं-थोरं, ताशा वाजिलं

सासरी मिळू दे तुला माहेराची माया
माहेराच्या मायेसंगं सुखाची ग छाया

भरुनीया आलं डोळं जड जीव झाला
जड जीव झाला लेक जाय सासराला
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं

सजली नटली नवरी आली
आनंदाच्या सरी तुझ्या बरसु दे घरीदारी... ग पोरी सुखाच्या सरी...
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली

गाण जस संपत तसे........परंपरेनुसार पाच सुहासिनी.......आशुला हळद लावायला सुरुवात करतात.....पाच सुहासिनींनी हळद लावल्यानंतर......माधवीताई व आनंदरांवाना सुध्दा हळद लावली जाते......नंतर आशुची उष्टी हळद स्नेहाकडे घेवुन येतात...

स्नेहा तुझ्या नवऱ्याची उष्टी हळद आली बग......मालतीताई स्नेहाला चिडवत म्हणाल्या.....

मग आशुची उष्टी हळद पाच सुहासिनी स्नेहाला लावत असतात..स्नेहाला लावल्यानंतर.....रेखाताई व सुधिररावांना सुध्दा हळद लावतात....

अहो नवरा नवरी झाले त्यांचे आई बाबा झाले.....आता करवलीला हळद लावयला नको का....मालतीताई...

हो हो......आध्या चल ये हळद लावुन घे ये......मालतीताई

हो काकु.....मग सगळेजण आध्याला हळद लावतात.......अहो मालतीताई मुलांकडची करवली तर झाली पण मुलींकडची करवली कुठे आहे.....एक कोण तरी पाहुणी बोलते.....

अरे हो रेवा कुठे आहे.......स्नेहाला बहिण नसल्यामुळे रेवाच तिची करवली होती.....कारण मैत्रिण ही बहिनी सारखीच असते ना.....

अहो मालतीताई ती साडी आणायला गेली आहे..........अस म्हणत रेखाताई मागे बघतात......हे बघा आलीच रेवा.......रेवा आली म्हटल्यावर सुजय मागे पाहतो........

रेवा पायऱ्या उतरुन खाली येत होती........आणि चुकुन परत कोण तर तेच सॉन्ग चालु करत.....

गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली
सजणी मैत्रीणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली
गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली

त्या म्युझिकवर रेवा चालल येत होती......परत का सॉन्ग चालु केल म्हणुन सगळेच मागे पाहु लागतात...आणि सगळयांच्या नजरा रेवावर जातात.......

सुजय तर काय......ब्लॅन्कच झाला होता.........रेवा पायऱ्या उतरत एका हातात साडी व दुसऱ्या हाताने लेहंगा सावरत येत होती.....मध्येच वाऱ्याची झुळुक आल्यावर समोर येणार बट.....वॉव यार...कसली भारी दिसतेय ही.......सुजय मनातल्या मनात बोलत होता.....

रेवानी हळदी कलरची लेहंगा चोली घातली होती......ओढणी एका साईडला पिनअप करुन मागुन कंबरेला पिनअप केली होती.....त्यावर घातलेला कमरपट्टा..केसाची वनसाईड केलेली हेअरस्टाईल......समोर एक केसांचा बट सोडला होता.....कानात घातलेले मोठे झुमके...मॅचिंग बांगडया.......गळयात मॅचिंग असा सेट.....डोळयात काजळ.....ओठांना लिप्स्टिक...आणि चेहऱ्यावर केलेला मेकअप.......त्या म्युझिकवर रेवा येत होती......अस वाटत आहे.....आमच्या लग्नाच्या हळदीसाठी रेवाची एन्ट्री होत आहे........सुजय मनातल्या मनात बोलतो व स्वत:च्या विचारवर स्वत:च हसतो.........

अग रेवा केवढा वेळ.....चल करवली आहेस ना तु.....मग तुला हळद लावायला नको...चल पटकण.....रेखाताई तिच्या हातातील साडीचा बॉक्स घेत बोलतात...

मग सगळेजण रेवाला हळद लावतात.....हळद लावुन झाल्यानंतर........स्नेहाला कळसातला आहेर दिला जातो......व आशुला सुध्दा कपडे देतात.....माधवीताईना व आनंदरावांना माधवीताईच्या माहेरचा आहेर केला जातो.............रेखाताई व सुधिररांवाना......रेखाताईच्या माहेरचा आहेर केला जातो.......

आता पंरपरेनुसार हळदीचा कार्यक्रम झाला होता.....मगाच पासुन आशु व स्नेहाच्या मध्ये जो पडदा होता तो आता काढला जातो....पडदा काढल्या काढल्या दोघांच्या नजरा एकमेकांना पाहण्यासाठी आतुरलेल्या......पण सगळेजण अवतीभोवती असल्यामुळे एकमेकांना पाहता पण येत नव्हत...आता सगळेजणच एकमेकांना हळद लावु लागले.....मोठे लोक सुध्दा आज मागे नव्हते...ते सुध्दा हळद फुल एन्जॉय करत होते.......

स्नेहा व आशुला हळद लावुन सगळे एकमेकांना हळद लावण्यात गुंग होते.....सुजयही स्नेहा व आशुला हळद लावतो.........तेवढयात रेवाही स्नेहा व आशुला हळद लावयला आली होती....रेवा स्नेहा व आशुला हळद लावत होती....ती तिच्याच नादात होती......आण सुजय रेवाला एकटक पाहत होता......स्नेहाच लक्ष सुजयकडे जात.......रेवा गेल्यानंतर स्नेहा सुजयला विचारते.....ओय देवरजी.....काय झाल.........

काही नाही.......सुजय

सांग ना काय झाल....स्नेहा

वहिनी ते मला रेवाला हळद लावयची होती.......पण कस लावु तेच कळत नाहीये.....सुजय एवढस तोंड करुन बोलतो.....

ओहो......किती ते रोमॅन्टीक.....स्नेहा सुजयचे गाल ओढत बोलते.......

ये वहिनी काय तु पण.........सुजय हसत बोलतो....

बर मी बघते काही करता येत का ते......स्नेहा

थॅक्स वहिनी.....थॅक्यु सो मच......सुजय आनंदात बोलतो.....

स्नेहा रेवा व सुजयला हळद कशी लावता येईल हयाचा विचार करत असते पण तिला काहीच सुचत नाही.....ये आध्या इकडे ये ना.....स्नेहा आध्याला बोलावते.......

काय ग वहिनी........आध्या

ऐक ना.......ते सुजयला ना रेवाला हळद लावायची आहे.....पण मला काहीच सुचत नाहीये.....स्नेहा

***

क्रमश:

पुढचा भाग 12/10/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all