बावरे मन...भाग-51

बावरे मन..भाग 51 (पण बिन काही नाही जा ना कर जा अजुन आपल्याला बाकिचे डान्स पण करायचे आहेत...स्नेहा ब?

बावरे मन..भाग 51

(पण बिन काही नाही जा ना कर जा अजुन आपल्याला बाकिचे डान्स पण करायचे आहेत...स्नेहा

बर.....रेवा तयार झाल्यावर सुजय खुप खुश होतो......म्युझिक सुरु होत आणि रेवा व सुजय डान्स करु लागतात......डान्स करताना दोघे इतके हरवुन गेले होते की.......म्युझिक संपल तरी त्या दोघांना भान नव्हत....ते तसाच डान्स करत होते.......)

आता पुढे......

ओय.......काय कुठे लक्ष आहे म्युझिक संपल तरी डान्स करताय......स्नेहा

स्नेहाच्या आवाजाने दोघे भानावर येतात.....व बाजुला होतात.....

ये रेवा कसला भारी डान्स करतेस ग तु.......आणि तुमच्या दोघांचा डान्स तर........वॉव....खरच खुप मस्त......राधिका दिच्या ऐवजी तु आणि दादयाच डान्स  करायला हवा होता....आध्या

आध्या अस बोलताना.......रेवा व सुजय एकमेकांकडे पाहतात.........आणि त्याच्याही मनात ते येवुन जात.....पण डायरेक्ट बोलु पण शकत नव्हते ना ते......

इतक्यात राधिका तिथे येते.....काय झाल असे शांत का झालात.......

अग काही नाही तुझीच वाट पाहत होतो.......बर आता तुमच झालय ना बाकिचे पण डान्सची प्रॅक्टिस करुया का.........आध्या

हो हो चालेल.......राधिका

थोडावेळ डान्स प्रॅक्टिस करुन सगळे खाली जेवायला येतात........झाली तुमची प्रॅक्टिस.......माधवीताई

हो आई झाली......आता जेवण आटपल ना...तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे......आध्या

हो ग माहीतेय......बर स्नेहा तुझे आई बाबा घरी गेले हा......मी त्यांना थांब म्हणत होते पण तयारी करायची आहे म्हणुन जातो म्हणाले......तुला आशु सोडायला येईल........माधवीताई

हो आई चालेल......स्नेहा

सगळेजण जेवण आटपतात व परत डान्सची प्रॅक्टीस करतात.......

****

रेवा निघालेयस की नाही अजुन तु.......स्नेहा

अग ही काय निघतेच आहे ग.......रेवा

किती वेळ यार कधी होणार आपली शॉपिंग......स्नेहा

अग आलेच...... मी आणि आध्या येत आहोत......रेवा

स्नेहा रेवा व आध्या मिळुन त्यांची राहीलेली खरेदी करतात......

खरेदी, डान्स प्रॅक्टीस, पाहुण्याना निमंत्रण.......बाकिची तयारी हयामध्ये बघता बघता आठ दिवस कधी निघुन गेले कळलच नाही........चार दिवसावर लग्न आले....दोन्ही घरात धावपळ सुरु होती पाहुणे मंडीळीची रेलचाल वाढली...काही जवळचे पाहुणे रहायला आले होते त्यांनचा पाहुणचार चालु असतो.......हॉलवर दोन दिवस आधी जायच होत......एक दिवस मेहंदी व एक दिवस हळद व संगीत....आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लग्न असा कार्यक्रम ठरला होता.....उदया सगळे हॉलवर जायला निघणार होते त्यामुळे काही सामान राहु नये सगळ सामान व्यवस्थित घेत होते.....

रेवा स्नेहा सोबत एक दिवस रहायला येणार होती तिला सुजय सोडायला आलेला असतो......

अग स्नेहा.....रेवा व सुजय आले बग.......रेखाताई

हो आई आले..........स्नेहा रुममधुनच आवाज देत होती......

सुजय रेवा बसा ना तुम्ही......रेखाताई......

अहो काकु मी काय पाहुणी आहे का.....रेवा

अग तस नाही.....रेखाताई

अरे आलात तुम्ही.........स्नेहा

हो आलो......आम्ही......रेवा

तु सामान आणली नाहीस काहीच........स्नेहा

अग आजचा एक दिवस ना मग एका दिवसापुरते सामान आणले आहे........रेवा

बर...चालेल.....स्नेहा

बर मी निघु का........सुजय

अरे असाच कसा जातोस......थांब आई तुझ्यासाठी चहा आणयला गेली आहे.....स्नेहा

अग वहिनी कशाला.......खुप काम आहे ग.......सुजय

काम काय होतच राहतील.......आणि चहा साठी फक्त पाच मिनिट लागतील.......तो घे आणि  तु जा ना मग.....स्नेहा

बर चालेल.........सुजय

सुजय हा घे चहा..........आणि आता जेवुनच जा......रेखाताई

अहो काकु नको.....खुप काम आहे घरी.......परत कधी तर येईन......आणि आता काय कोणत्या ना कोणत्या निमित्ताने येण होतच राहील...तेव्हा जेवुनच जाईन.......सुजय

बर......जशी तुझी ईच्छा.....रेखाताई

बर मग मी निघतो........आणि हो वहिनी उदया तुम्हाला आणायला मीच येणार आहे सो लवकर तयार रहा..........सुजय

हो चालेल........स्नेहा

ओके.... काकु येतो....बाय वहिनी......बाय रेवा........सुजय

ओके बाय.......व्यवस्थित जा.......रेवा एकदम बोलुन जाते........

रेवा अशी बोलल्यावर स्नेहा तिच्याकडे पाहते.......काय मग मॅडम गेल्या काही दिवसात खुपच काळजी घेताय आमच्या देवरजींची........स्नेहा रेवाला चिडवत बोलते..........

झाल का तुझ सुरु.........तयारी करायची आहे ना अजुन चल आधी ती करु........मग चिडवत बस म्हणस........ रेवा

हो चल माझी बॅग भरायची आहे.....तशी मी बऱ्यापैकी बॅग भरली आहे तरी पण तु एकदा चेक कर हा.......स्नेहा रेवा सोबत बोलत तिच्या रुममध्ये येते

हो दाखव पाहु..........रेवा

ही काय बॅग.....बग आणि काही राहीलय का बग......स्नेहा

थोडा वेळ काही राहीलय का चेक करत बॅगा भरुन तयार करतात........फायनली बॅग्स तर भरुन झाल्या......स्नेहा

हो ग झाल......आता काही राहीलय का.........स्नेहा

ते नंतर पाहु चल आधी जेवुन घेवुया.......स्नेहा

बर चल......रेवा

****

तयारीत रात्र कधी होते कळलच नाही........सगळे रात्रीची जेवणं आटपुन झोपायची तयारी करु लागतात.....

स्नेहा रेवा चला झोपा आता.......उदया लवकर उठायच आहे......रेखाताई

हो काकु आम्ही जातच आहोत......चल स्नेहा....रेवा

स्नेहा तिच्या रुममध्ये गेल्यावर रेखाताईचे डोळे भरुन आले......किती वेळ स्नेहा समोर लपवुन ठेवलेले अश्रु आता वाहु लागले.......त्या डोळयात पाणी आणत त्यांच्या खोलीत जातात......आणि काल पासुन पाहत असलेल्या स्नेहाच्या लहानपणीच्या वस्तु तिचे फोटो.....पाहत बसल्या.....स्नेहाच्या लहानपणीच्या फोटोचा अल्बम त्यांनी हातात घेतला......आणि ते फोटो पाहतना त्यांना अश्रु अनावर झाले.....त्या अल्बम ला छातीपाशी धरुन रडु लागल्या......इतक्यात सुधिरराव तिथे येतात.....रेखा ते सामान.........अस म्हणत ते आत येत असतात तर त्यांना रेखाताई स्नेहाच्या वस्तु समोर ठेवुन रडताना दिसतात......सुधिरराव त्यांच्या जवळ येतात.......रेखाताईचे अश्रु पाहुन त्याचे ही डोळे पानावले......

रेखा........आवर स्वत:ला........स्नेहाने पाहिल तर ती पण रडायला लागेल..... अस आपण रडतेल पाहिल स्नेहाने तर तिला जाताना त्रास होईल खुप....शांत हो पाहु........सुधिराव रेखाताईची समजुत काढत असतात......पण त्यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती......त्यांनाही रडु येत होत पण रेखाताई जास्तच रडतील म्हणुन ते अश्रु लपवण्याचा प्रयत्न करत होते........

पहा ना बघता बघता आपली स्नेहा कधी मोठी झाली कळलच नाही.......एवढी मोठी झाली की आता ती सासरी चालली आहे....कालपर्यत आई आई करुन मागे फिरत होती.......आई मला हे दे ना ग.....आई मला ते दे ना ग......सतत बडबड चालु असायची.......आता तो आवाज ऐकायलाच येणार नाही.....घर अगदी शांत होवुन जाईल.....बोलता बोलता त्याच लक्ष एका वस्तुकडे जात.....हा ड्रेस पहा ना......तिच्या पहिल्या वाढदिवसाला तुम्ही किती हौसेन आणला होता.....आणि ही बाहुली......तिच्या मैत्रिणीने आणली आहे म्हणुन मला पण पाहिजे म्हणुन केवढा हट्ट केला होता........जोपर्यत तुम्ही तिला तशीच बाहुली आणुन दिला नाहीत तोपर्यत रडत होती.... आणि ही भातुकली......हयाच्यासोबत दिवसभर खेळत रहायची.........त्या बाहुलीच लग्न सुध्दा लावल होत तिने....आणि ती सासरी चालली म्हणुन केवढी रडली होती....तेव्हा मला म्हणायची आई मी तुला आणि बाबांना सोडुन कुठे नाही जाणार...आणि आता बघा ना खरच चालली आपली लेक सासरी....अस म्हणुन रेखाताई जास्तच रडु लागल्या........पण आता सुधिररांवाना अश्रु अनावर झाले ते ही रडु लागले.....रडणारच ना ओ.....शेवटी किती झाल तरी बापाच मन आहे ते......सुधिरराव रडतच कपाटाजवळ गेले....कपाट उघडुन त्यांनी एक एन्व्हलप काढल....आणि त्यांच्यावर हात फिरवु लागले......रेखा तुला आठवत.......एकदा शाळेत निबंध स्पर्धा होती.....माझे बाबा विषय होता निबंधाचा.......किती सुंदर निबंध लिहला होता तिने......त्या निबंधासाठी तिला बक्षिस पण मिळाल होत.....ते निबंधाचा कागद ऱ्हदयाशी कवटाळत सुधिरराव रडु लागले....आणि लहान असताना........मी ऑफिसमधुन आलो की......बाबा आले आले त्या बोबडया शब्दात धावत माझ्याकडे यायची आणि मी तिला उचलुन घेतल की.....बाबा मला काय आणल अस विचारायची.....आता हे सगळे अनुभवताच येणार नाही ना........या आठवणीच आपल्या सोबत आहेत........अधुन मधुन येत राहील भेटायला पण कधी तर परत सासरी जावच लागणार  ना......किती झाल तर ते परक्याच धन......अस म्हणत सुधिरराव रडु लागले....अहो सावरा स्वत:ला.....मला रडु नको म्हणताय आणि स्वत:च रडत आहात......स्नेहाने पाहिल तर ती पण रडायला लागेल......शांत व्हा पाहु........हो तिला त्रास नको....चला झोपुया का...उदया निघायच आहे ना लवकर.......सुधिरराव डोळे पुसत म्हणाले

****

स्नेहाची अवस्था काही वेगळी नव्हती.....आज आपला हया घरातील शेवटी रात्र म्हणुन तिला भरुन आल होत...किती तर वेळ ती झोपण्याचा प्रयत्न करत होती पण झोप तर लागत नव्हती.....ती उठुन बसते...आणि हॉलमध्ये येते...सगळीकडे पाहुन इथल्या आठवणी ती मनात साठवुन घेत होती....लहानपणा पासुन ते आतापर्यत जे जे क्षण तिने हया हॉलमध्ये, तिच्या रुममध्ये, आई बाबाच्या रुममध्ये, किचनमध्ये.....त्या सगळया आठवणी ती मनात साठवत होती... आता आपल्याला परत कधी यायला मिळेल हया कल्पनेनेच तिला भरुन आल.......अस नाही की ती परत तिच्या आई बाबांच्याकडे येणार नव्हती.......पण लग्नानंतर मुलगी परक्याची होते म्हणतात ना.....तस तिच झाल होत......आपण किती आपले पणाने माहेरी आलो तरी आता आपला एवढ अधिकार नाहीये इथे अस मनात येवुनच जात.....लग्नाआधी ज्या हक्काने आपण वावरत असतो हट्ट करत असतो तो लग्नानंतर नाही करता येत.....करायचा म्हटल तरी नाही करता येत.......हया अशा कल्पनेनेच तिला भरुन येत होत....हॉलमधुन ती किचनमध्ये आली.......तिला काही वेळ पुर्वी आपण आईभोवती वावरत असलेला भास झाला.....किती हट्ट करायचो आपण आईकडे आई ते कर हे कर......चालुच असायच पण ती कधीच नाही म्हणायची नाही......पण आता असा हट्ट करता येईल का......या विचारानाचे तिच्या डोळयात पाणी आल....स्वत:ला सावरत ती किचनमधुन बाहेर आली.....आणि आईबाबांच्या रुममच्या बाहेर येवुन थांबली.....हळुच दार उघुन तिथुन आईबाबांची खोली पाहीली पण आई बाबांच्याकडे लक्ष गेल्यावर ती तिथुन लगेच मागे फिरली.....कारण जर ती आत्ता त्यांच्याजवळ गेली तर तिला अश्रु अनावर झाले असते....तिच रडण बघुन आई बाबांना त्रास हाईल म्हणुन ती तिच्या रुममध्ये आली.....आपल्या प्रत्येक गोष्टीकडे निरखुन पाहु लागली.....आपला बेड ,आपल कपाट, आपल ड्रेसिंग टेबल.....हया आपल्या गोष्टी आता काही क्षणात परक्या होणार हया भावनेनेच तिला रडु येत होत.....ती बेडवर येवुन बसली पण तिला आता स्वत:चे अश्रु सावरण कठीण झाल ती हुंदके देवुन रडु लागली.....रेवा मगाच पासुन जागीच होती पण आता तिला तिचा स्पेस मिळुदे म्हणुन स्नेहाजवळ नाही गेली...तिला मनसोक्त रडु दिली....तिच्या आठवणी तिला साठवुन घेवु देत होती पण आता तिच रडण पाहुन रेवाला सुध्दा रहावेना ती उठली आणि स्नेहा जवळ आली.....स्नेहा नको ना ग रडु........स्नेहाच रडण पाहुन रेवाला सुध्दा रडायला येवु लागल....

रेवा कस असत बघ ना ग........आयुष्याची विस पंचविस वर्षे आपल्या आई बाबांच्या सोबत रहायच......आणि एके दिवस एक व्यक्ती येते आणि त्याच्यासाठी हे सगळ सोडुन जायच.....आपल्या आई बाबांना सुध्दा.......अशी का परंपरा केली असेल......सगळ त्रास मुलींनाच का ग.........आई बाबांना पण किती त्रास होत असेल ना ग....एवढी वर्ष तळहातवर जपलेल्या आपल्या जीवाला अनोळखी व्यक्तीच्या हातात देताना....आत्ता ना मी आई बाबांच्या रुममध्ये गेले होते.......पण आत जायच झालच नाही ग मला.....मला रडायलाच आल......मी गेल्यावर किती एकटे पडती ग ते........किती सवय झालेय त्यांना माझी.....किती एकट एकट वाटेल ना ग त्यांना........स्नेहाच हे बोलण ऐकुन इतका वेळ रुमच्या बाहेर उभे असलेल तिचे आई बाबा आत आले.....स्नेहाच बोलण ऐकुन दोघांनाही रडु यायला लागल....पण स्वत:ला सावरत रेखाताई.......ये वेडाबाई एकटे कुठे आहे आम्ही तुझ्या आठवणी आहेत ना......आणि तु काय कायमची चालली आहेस काय.....अधुन मधुन..सणाला वगेरे येणारच आहेस की......आणि आम्हाला तुझी आठवण आली तर आम्ही तुझ्याकडे येवु......रेखाताईच बोलण ऐकुन स्नेहा कशी बशी रडु आवरते व त्यांना मिठी मारते.........आई मी खुप मिस करेन ग तुम्हाला......हो ग बाळा.......आठवण तर येणारच ना ग......पण बघ तु त्या घरी इतकी मिसळुन जाशील ना....कि तुला आमची आठवण पण येणार नाही आम्हालाच तुला फोन करावा लागेल....रेखाताई स्नेहाचा मुड ठिक करण्यासाठी मस्करी करतात......ये आई अस काही नाही होणार कळल.......मी रोज फोन करत जाईन तुला......अस वाटत बाळ आपल्याला पण एकदा आपण आपल्या संसारात रमलो ना......कि तिथल्याच होवुन जातो.......ओ बाबा सांगा ना आईला.....मी नाही विसणार तुम्हाला......हो ग बाळ तुझी आई तुझी गंमत करतेय......स्नेहा थोड शांत झाल्यावर बर बाळ झोप आता उदया लवकर उठायच आहे ना.....स्नेहाला सांगुन रेखाताई व सुधिरराव त्याच्या खोलीत जातात........

स्नेहा चल आता जास्त विचार नको करु झोप.......रेवा

हो........स्नेहा

****

स्नेहा रेवा झाल की नाही तुमच आवरा पटपट सुजय आत्ता एवढयात येईल पहा....रेखाताई

हो हो काकु झालच आहे आमच फक्त पाच मिनिट........रेवा

अग सुजचा फोन आलाय.......रेवा

बग ना काय म्हणतोय.......स्नेहा

हो हो........हा सुजय बोल.........रेवा

अग मी आलोय पाच मिनिटात आत येतो.....तुम्ही तयार अहात ना....सुजय

हो झालच आहे तु ये आत........रेवा

बर....सुजय

आला का सुजय.......स्नेहा

हो आला आहे बाहेर आहे.....रेवा

बर......स्नेहा

अरे सुजय ये ना ये.......रेखाताई

काकु आवरलय ना सगळ.....आपल्याला लवकर निघायला हव...सगळे हॉलवर पोहचले आहेत....सुजय

हो हो निघुया......तु रेवा व स्नेहाला घेवुन पुढे हो आम्ही तुमच्या मागे येतोच.....सुधिरराव

स्नेहा रेवा या लवकर सुजय वाट पाहतोय........रेखाताई

हो ग आई हे बग आम्ही आलोच.......स्नेहा रेवासोबत बाहेर येत बोलते

ये वहिनी मस्त दिसतेस हा..आज दादयाच काही खर नाहीये.......सुजय स्नेहाला चिडवत बोलतो......

स्नेहा थोड लाजत गप्प रे......स्नेहा

बर निघायच का.....सुजय

हो निघुया......रेवा

स्नेहा देवाला नमस्कार करुन ये बाळ......रेखाताई

हो आई.......स्नेहा

स्नेहा देवाला नमस्कार करुन येते.....आणि निघायची वेळ होते......परंपरेप्रमाणे....रेखाताई तिला जाताना तिची ओटी भरतात व साखर पाणी देतात.......स्नेहा साखरपाणी घेवुन जायला निघते...पण दाराच्या दिशेने जशी पावले जात होती तशी जड होवु लागली.....मनाची घालमेल सुरु झाली...आई बाबांपासुन दुर जात असलेली जाणीव पावला पावला होवु लागली....डोळे भरुन आले.....त्याच जड पावलांनी उंबऱ्यापर्यत कशी बशी गेली.....पण कालपासुन धरुन ठेवलेला धिर सुटला........आणि स्नेहा मागे वळली व बाबांच्याकडे धावत जाऊन त्यांना जाऊन मिठी मारली व हुंदके देवुन रडु लागली....स्नेहाच्या रडण्याने सुधिररावांनीसुध्दा अडवलेल्या अश्रुंना वाट मिळाली ते सुध्दा स्नेहाला जवळ घेवुन रडु लागली.....त्या बाप लेकीच प्रेम पाहुन पाहुणे मंडीळींचे सुध्दा डोळे पानावले.......पण रेखाताईनी मन घट्ट केले.....स्नेहा ये बाळ.....चल वेळ होतोय ना......आईच्या आवाजाने स्नेहाला आणखीन रडु आल ती आईला मिठी मारुन परत रडु लागली....रेखाताई सुध्दा रडु लागल्या........पण आत्ता आपण कमकुवत झालो तर तिची पावले उचलणार नाहीत........ये बाळ.......बास किती रडशील चल निघायच आहे ना.......रेवाचे डोळे पण भरुन आले होते...पण आत्ता स्नेहाला सावरण गरजेच होत........वातावरण जरा खेळीमेळीच करण्यासाठी ती स्नेहाला चिडवु लागली........ओय मॅडम पाठवणीच्या वेळी रडण्यासाठी थोड अश्रु शिल्लक ठेवा की.....काय सगळे अश्रु इथेच संपवणार अहात.....रेवाच्या बोलण्याने सगळे हसु लागले वातवरण थोड खेळीमेळीच झाल......

सुजयला सुध्दा हे सगळ पाहुन डोळयात पाणी आल.....पहिल्यांदा एवढया जवळुन त्याने एका मुलीची सासरी जातानाची मनस्थिती काय असते ते  पाहिली होती.....पण तो थोड नॉर्मल होतो.....वहिनी निघायच......सुजय

हो निघुया.............परत पाऊले जड झाली होती पाय उचलत नव्हते......पण आता मन घट्ट करण गरेजेच होत........स्नेहाने आता मन घट्ट केल व बाहेर पडली........तिच्यासाठी सजवुन आणलेल्या गाडीत जाऊन बसली......

स्नेहा तुझ्या सगळया बॅगा घेतल्या आहेत का ते एकदा पाहुन येते.........रेवा

हो चालेल.......स्नेहा

***

क्रमश:

पुढचा भाग 6/10/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all