बावरे मन...भाग-50

बावरे मन..भाग 50 (सुजय व आशु त्यांची खरेदी करुन रेवा व स्नेहाजवळ येतात.... काही मदत हवी आहे का.........सु?

बावरे मन..भाग 50

(सुजय व आशु त्यांची खरेदी करुन रेवा व स्नेहाजवळ येतात....

काही मदत हवी आहे का.........सुजय

हो चालेल आम्ही ना रेवासाठी कपडे पाहतोय पण ड्रेस घ्यायचा की साडी कळत नाहीये.........स्नेहा)

आता पुढे...

एवढच ना........त्यात काय अवघड आहे.........साडीच घ्या ना छान दिसेल तिला.......सुजय

हो का........रेवा मग तु साडीच घे.........चालेल ना.....स्नेहा रेवाला चिडवत बोलते..

रेवा स्नेहाला डोळे मोठे करुन गप्प बस अस खुणवुन सांगते.....

बर चला मग साडी पाहुया रेवा बग तुला कशी आवडते....स्नेहा

सुजय मी पण मग साडी घेईन....तु चॉईस कर ना माझ्यासाठी........राधिका....

अग दी पण तुला साडी व्यवस्थित सांभाळता येईल का.... हया आधी तु कधी नेसली होतीस का साडी.......आध्या

नाही.....कधीच नाही नेसले......राधिका

तुला सवयच नाहीये त्याची मग कशी करणार तु......आध्या

असुदे मला घ्यायची आहे........राधिका....सुजयने साडी रेवाला छान दिसेल अस बोलला होता त्यातुळे आता तिला साडीच नेसायची होती.....

बर जशी तुझी इच्छा.....आध्या

सुजय सांग ना कशी साडी घेवु....राधिका सुजयला र्फोस करत होती....मग सुजय नायलाजस्तव साडी पाहत होता..सुजय तिला एकएक साडी दाखवत होता....पण ती ही नको ती नको अशीच करत होती.....एक साडी तिला आवडते....पण ती एवढी खास नव्हती......

राधिका एवढी छान नाहीये ग साडी....सुजय

पण मला आवडली आहे सुजय.....राधिका.....

बर घे मग.....सुजयला तिच्या हट्टापुढे काहीच बोलता येत नाही......

इकडे रेवा पण साडी चॉईस करत होती....आरशात पाहुन कशी दिसते साडी हे पाहत होती.....पण पाहताना सुजय आशातुन पाहील व सांगेल ही नको ती नको ही छान आहे ही घे.....पण सुजय पाहतच नसतो....तिला खुप वाईट वाटत......स्नेहाच लक्ष तिच्याकडे जात तिच्या लक्षात येत......ती रेवाच्या नकळत सुजयला मेसेज करते......स्नेहाचा मेसेज पाहुन सुजयला लक्षात येत.....तो राधिका मी आलोच म्हणुन सांगुन स्नेहाजवळ येतो......

पसंद पडली का साडी.....सुजय मुद्दाम स्नेहाजवळ येवुन बोलतो....सुजय

अरे कुठ काय....रेवा पसंदच पडत नाहीये.....स्नेहा

दादया तु चॉईस कर ना.......तुझी चॉईस मस्त आहे........आध्या

हो सुजय तु सांग ना.........स्नेहा

ओके चालेल.....बघु.....कोणत्या कोणत्या साडया आहेत....सुजय साडी पाहु लागतो......

थोडा वेळ साडया पाहील्या नंतर त्याची एका साडीवर नजर जाते.......दादा ती साडी जरा दाखवा ना.....सुजय

तो सेल्समन ती साडी दाखवतो......सुजय ती साडी रेवाला देतो..........रेवा ही साडी बघ कशी वाटते तुला......रेवा ती साडी कशी दिसते ते आरश्यात पाहत असते......आणि तिला पण ती साडी आवडते पण सुजयला आवडली असेल ना नक्की.....असा विचार करत ती आरशातुनच मागे पाहते तर सुजय मस्तच अस खुणवुन सांगत असतो......सुजयला आवडली आहे म्हटल्यावर रेवाही खुप खुश होते......ही असुदे साडी.... मला आवडली....खुप मस्त आहे......रेवा थोड लाजतच स्नेहाला सांगते......रेवाला साडी आवडली म्हटल्यावर सुजय खुश होतो....आणि गालातल्या गालात हसतो..........(सुजयने ही साडी कालच येवुन पसंद केली होती आणि त्या सेल्समनला सांगुन ठेवला होता आम्ही उदया आलो ना मी तुला सांगेन तेव्हाच ही साडी मला दयायची)........ते त्याला आठवल व तो गालातल्या गालात हसला....

खरच मस्त आहे ग साडी.......स्नेहा

हो दादया मस्तच चॉईस आहे हा तुझी..........आध्या

थॅक्स सुजय.........रेवा

अरे थॅक्स काय त्यात......काय तु पण रेवा......सुजय

अरे मुलांनो झाली का तुमची खरेदी.......माधवीताई

हो आई झाली.....ये आई रेवाची साडी बघ......किती मस्त आहे....दादया ने चॉईस केली आहे.....आध्या

बघु.......अरे वा.....खरच खुप मस्त आहे ग.....खुप छान दिसेल तुला.....माधवीताई

थॅक्स काकु.......रेवा

ये आत्तु माझी साडी बघ ना.....रेवाच्या साडीच कौतुक करताना राधिका पण आपली साडी दाखवत असते.......

छान आहे तुझी पण साडी.....पण राधिका तुला सांभाळता येईल ना ग....माधवीताई

हो ग आत्तु करेन मी मॅनेज......राधिका

रेवा झाली का तुझी खरेदी.......मालतीताई

हो ग आई.....ही बग साडी.......कशी आहे........रेवा

मस्तच आहे ग......खुपच छान आहे........मालतीताई

हो ग रेवा खुप सुंदर साडी आहे......रेखाताई

सगळेजण रेवाच्या साडीच कौतुक करत होते.......ते ऐकुन राधिका कस तरी वाटल.....काय यार आपण सुजयच ऐकायला हव होत तो ही साडी नको म्हणत होता......बहुतेक कोणाला जास्त आवडली नाही वाटत.....आणि आता बदलते तर कस म्हणु.........राधिका.....

बर झाली का सगळयांची खरेदी......माधवीताई

हो.......सगळे एकदम ओरडतात.....

बर चला मग निघुया......मालतीताई........

सगळे जायला निघत असतात.......

ए स्नेहा ऐक ना.......गाडीत माझी पर्स राहिली.....मी साडीचे पैसे नंतर देते तुला........रेवा

तु फटके खाशील हा......तु मला पैसे देणार आहेस.......वेडी आहेस का रेवा.....स्नेहा

अग एन्गेजमेंन्ट वेळी पण तुच घेतला होतास ड्रेस आणि आता पण तु चांगल नाही ग वाटत ते......रेवा

गप्प बस......माझ्या मैत्रिणीसाठी मी एवढ पण नाही का ग करु शकत.......स्नेहा

अग पण....रेवा

अग वगेरे काही नाही...मी घेणार नाहीये पैसे.....चल आता.....स्नेहा

बर बाई.........जशी तुझी इच्छा.......ऐकणारच नाहीस ना तु......रेवा....

अजिबात नाही........स्नेहा रेवाकडे पाहुन हसत बोलते......

बर ऐक ना स्नेहा....तुझी बाकीची पण खरेदी करायची आहे.....हळदीसाठी मेहेंदीसाठी ज्वेलरी..... बाकीची पण थोडी खरेदी....परत पार्लरची पण अपॉइन्टमेन्ट घ्यायला हवी......रेवा

हो ग किती काळजी करशील.....अजुन आपल्याकडे आठ दहा दिवस आहेत.....स्नेहा

स्नेहा कधी हे आठ दहा दिवस जातील कळणारच नाही.....त्यापेक्षा ना आपण उदया जाऊन हे सगळ करुन येवु ओके परत काही रहायला नको.....रेवा

ओके चालेल......उदया सकाळीच जाऊ म्हणजे परत येवुन आणि डान्स प्रॅक्टीस करायची आहे ना.....स्नेहा

हो चालेल.......रेवा

सगळेजण घरी पोहचतात.....रेवा व स्नेहा सगळयांना पाणी देतात.....स्नेहा तु बस मी सगळयांना चहा आणते जाते....रेवा

अग कशाला मी पण येते तुझ्यासोबत.....स्नेहा

अग सगळयांसोबत रहा ना.....रेवा

बर......स्नेहा

रेवा सगळयांसाठी चहा बनवायला जाते......रेवा किचनमध्ये जाताना पाहुन सुजय मुद्दाम काही तरी कारण काढुन किचन मध्ये जातो......

अरे तु काय करतोयस इथे काही हव आहे का.......नाही ते तु चहा करत होतीस ना मग मला ते........सुजय

तुला कॉफी हवी आहे हो ना.......रेवा

हो........सुजय

मला माहीतच होत तुला कॉफीच हवी असणार....मी आधीच ठेवलेय तुझ्यासाठी........रेवा

तुला कस कळत ग.......मी तर तुला सांगितलच नाही...........सुजय

ज्याच्यावर आपल प्रेम असत ना त्याच्या आवडी निवडी राहतात लक्षात......त्यासाठी कळायला लागत नाही येडु.........रेवा मनातल्या मनात बोलत असते आणि हे बोलताना चेहऱ्यावर एक छोटस पण क्युटवाल हसु असत.....

ओय काय झाल.......मी काही तरी विचारल तुला.........सुजय

रेवा थोड भानावर येत बोलते.....अरे त्यात काय कळायच आपण विजीट साठी जात होतो तेव्हा तुला काम केल्यानंतर कॉफी लागायची ना.....मग त्या अंदाजानुसार केली.....रेवा

 ओ.........अस आहे होय.........सुजय

हो..........सुजय एक विचारु का.......रेवा

हो विचार ना.......तुला कस कळल की मला ती साडी आवडेल....आणि ती साडी मला छान दिसेल.......रेवा

मला नाही कळणार तर कोणाला कळणार.....सुजय........

सांग ना.....रेवा

अग इतके दिवस पाहतोय ना तु कसे ड्रेस घालतेस कोणत्या कलरचे घालतेस...त्यावरुन एक अंदाज लावला........पण खरच आवडली ना तुला साडी....सुजय

हो खुप आवडली मस्तच आहे.......आणि कलर पण खुप छान आहे....रेवा

तुला काय सगळेच कलर छान दिसतात.......सगळयांच कलर मध्ये तु सुंदर दिसतेस......सुजय बोलता बोलता एकदम बोलुन जातो......

अस बोलल्यावर रेवा एकदम सुजयकडे पाहते......रेवा अस पाहताना सुजयच्या लक्षात येत की आपण माती खाल्ली आहे.....

काय म्हणालास.......रेवा

अग म्हणजे ते........वहिनी म्हणत होती की तुला सगळे कलर छान दिसतात.....साडी बघत होता ना तेव्हा.....सुजय काही तरी कारण सांगुन सुटकेचा नि:श्वास सोडतो......

ओ........अस होय.......बर.......रेवा

हम.....सुजय

बर मी चहा देवुन येते तुझी कॉफी ठेवली आहे इथे......रेवा

ओक थॅक्स.....सुजय

हा घ्या चहा.....रेवा सगळयांना चहा देते.......वा मस्तच झालाय चहा.......आनंदराव

हो ग रेवा खरच तुझ्या हाताला चव आहे हा......जेवण पण किती छान बनवतेस......माधवीताई

हा मग काय बायको कोणाची आहे......सुजय हळु आवाजात बोलतो....पण त्याच्या लक्षात आल नाही की स्नेहा त्याच्या बाजुला होती......तीला तो बोलेल ऐकु जात.......

हो का........बायको तुमचीच आहे हो........स्नेहा

स्नेहा अस बोलल्यावर सुजय लाजतो......ए वहिनी गप्प ग.....मी ते असच बोललो......सुजय

असच का........म्हणजे मनात तस काही नव्हत म्हणजे बोलायच म्हणुन बोलालास का.....स्नेहा

गप्प ना ग किती चिडवशील.....सुजय

मग चिडवणारच......मी का चिडवायचा चान्स सोडु......स्नेहा हसत म्हणते...

बर मुलांनो तुम्ही डान्सची प्रॅक्टीस करणार आहात ना.....मालतीताई

हो.......आता जाणारच आहोत.....सुजय

बर तुम्ही करा प्रॅक्टीस...तोपर्यत आम्ही जेवणाच बघतो.....हो ना माधवीताई....मालतीताई

हो चालेल......माधवीताई

चालेल काय.....तुम्हाला पण प्रॅक्टीस करायची आहे विसरलात का....रेवा

अग पण सगळेच  प्रॅक्टीस करत बसलो तर जेवण कोण बनवणार....त्यापेक्षा आत्ता तुम्ही प्रॅक्टीस करा जेवण बनवुन झाल की आम्ही करतो........चालेल ना........माधवीताई

हो चालेल.......आम्ही करतो जातो......रेवा

सगळे डान्सची प्रॅक्टीस करायला जातात........

सुजय पहिला तु आणि मी करुया.......राधिका....

अग आधी दादु आणि वहिनीचा डान्स बघु ना........सुजय

ते करत आहेत ना प्रॅक्टीस.....आपण केलीच नाहीये......प्लीज ना......राधिका

बर चल.......सुजयला रेवा समोर तिच्या सोबत डान्स करायचा नसतो पण ही ऐकत नाही म्हटल्यावर त्याच्याकडे काहीच ऑपशन नव्हता.....

मग दोघे प्रॅक्टीस करु लागले.....रेवा व आध्या त्यांचा डान्स पाहत होते.....राधिकाला थोडया स्टेप जमत नव्हत्या........

दी अस नाही जरा व्यवस्थित कर ना तु चुकत आहेस......आध्या

अग मला जमतच नाहीये स्टेप........राधिका.

रेवा तु सांग ना तीला कस करायच.........आध्या

तेवढयात स्नेहा पण प्रॅक्टीस करुन त्याच्याजवळ येते......हो ग रेवा दाखव ना तिला.......स्नेहा

बर.....रेवा राधिकाला एक एक स्टेप दाखवत होती......दाखवल्यावर राधिका करु लागली...पण इतक्यात तिचा फोन वाजतो.........गाईज मी आलेच महत्वाचा कॉल आहे.....राधिका

अरे यार ही येवु पर्यत थांबयाच का.......आध्या

रेवा एक काम कर ना.......तुला आता राधिकाचा बऱ्यापैकी डान्स माहीती आहे.....ती येवु पर्यत तु सुजयला कंपनी दे ना.......स्नेहा सुजयकडे पाहुन बोलते

अग पण......रेवा

पण बिन काही नाही जा ना कर जा अजुन आपल्याला बाकिचे डान्स पण करायचे आहेत...स्नेहा

बर.....रेवा तयार झाल्यावर सुजय खुप खुश होतो......म्युझिक सुरु होत आणि रेवा व सुजय डान्स करु लागतात......डान्स करताना दोघे इतके हरवुन गेले होते की.......म्युझिक संपल तरी त्या दोघांना भान नव्हत....ते तसाच डान्स करत होते.......

***

क्रमश:

पुढचा भाग 4/10/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all