बावरे मन...भाग-41

बावरे मन..भाग 41 (आशु व स्नेहा बोलत बसलेले असतात.....आशुच्या ओळखीच कोण तर आलेल म्हणुन तो त्याच्याशी

बावरे मन..भाग 41

(आशु व स्नेहा बोलत बसलेले असतात.....आशुच्या ओळखीच कोण तर आलेल म्हणुन तो त्याच्याशी बोलत होता.......स्नेहा बाजुलाच बसुन फक्त ऐकत होती....अचानक सुजयच्या मोबाईलवर मेसेज येतो व त्याचा मोबाईलची स्क्रिन फ्लॅश होते........आणि स्नेहाची नजर त्याच्या मोबाईलकडे जाते...आणि मोबाइलकडे पाहुन तिला आश्चर्यच वाटत.....ती फोन हातात घेते.......रेवाचा फोटो सुजयच्या स्क्रीन वर......तिचा फोटो सुजयने स्क्रिनला का ठेवला असेल......सुजयला रेवा आवडत तर नसेल..........?....असच असाव......हया दिवसात त्याच रेवा बरोबरच्या वागण्यात फरक तर पडला आहेच......पण रेवाला सुजय आवडत असेल का...........?.....उगाच तर्क वितर्क लावायला नको आधी सुजयशी बोलुन हे सगळ क्लीयर करुन घेते......स्नेहा)

आता पुढे.....

स्नेहा विचार करत होती तेवढयात समोरुन सुजय येताना तिला दिसतो...

सुजय गबडीने येवुन मोबाईल कुठे ठेवलाय ते शोधत असतो.....स्नेहाच लक्ष त्याच्याकडेच होत......तो काही तरी शोधतोय हे तिच्या लक्षात येत..........

बहुतेक मोबाईलच शोधतोय वाटत........सांगु का इथे आहे ते.......नाही नको जर त्याच्या कडुन जाणुन घ्यायच असेल....तर आत्ता नको सांगायला.....स्नेहा सगळ मनातल्या मनात बोलत होती......तेवढयात ती सुजयला त्याच्या रुमच्या दिशेने जाताना पाहते......स्नेहा हाच चान्स आहे... रुममध्ये तो एकटाच असेल आजुबाजुला कोणच नसेल तर त्याच्याशी व्यवस्थित बोलता येईल......स्नेहा हळुच पुटपुटत होती

अग काय झाल.....एकटीच काय बोलतेयस......आशु

आ........काही नाही.......आशुतोष मी जरा आलेच जाऊन..........स्नेहा

हो.......चालेल.......आशु

स्नेहा सुजयच्यामागे त्याच्या रुमच्या दिशेन जाते........ती सुजयच्या रुमच्या दरवाजा जवळ येते.......तर सुजय इकडे तिकडे शोधाशोध करत असतो.......

सुजय काय शोधतोयस.......मी काही मदत करु का......अस म्हणत स्नेहा त्याच्या रुममध्ये जाते.......

वहिनी तु इथे कशी काय...........सुजय

काही नाही आले होते इथेच तुला काही तरी शोधताना पाहील मग बघु म्हटल काय हवय तुला.....स्नेहा

अग काही विशेष नाही मी शोधेन.........सुजय अस म्हणत परत शोधाशोध करु लागतो.....स्नेहा थोडावेळ काही न बोलता तिथेच थांबते..........

हे शोधतोयस का.............स्नेहा मोबाईल समोर धरुन बोलते.............

स्नेहा अस बोल्यावर सुजय मागे वळुन पाहतो......तर स्नेहाच्या हातात त्याचा मोबाईल असतो.........स्नेहाच्या हातात मोबाईल बघुन सुजयला टेन्श्न येत.........वहिनीने रेवाचा फोटा पाहीला नसेल ना.......आणि ती माझ्याकडे अशी का पाहतेय............तिला कळलय का की मी.......सुजय मनातल्या मनात बोलत असतो.........

मोबाईलच शोधतोयस का......स्नेहाच्या वाक्याने सुजय भानावर येतो....

हा......म्हणजे ते......मी.......हो मोबाईलच शोधत होतो.....पण तुझ्याकडे कस काय......सुजय जरा टेन्शनमध्ये येतच बोलतो.....

अरे मग फोन करायचास ना कोणाच्यातरी मोबाईलवरुन......स्नेहा

कस फोन करणार जर कोणाकडे असला आणि त्याने रेवाचा फोटो पाहीला तर काय करु........सुजय मनात बोलत होता.....

कुठे हरवलास.......काय विचारतेय मी.......स्नेहा

अग असेल म्हटल इथेच.......स्नेहा

स्नेहा वाट पाहत होती सुजय काही तरी बोलेल.......पण सुजय काहीच बोलत नाही..........

वहिनी कोणाचा फोन आला होता का..........सुजय थोड घाबरतच विचारतो.......

नाही का रे कोणाचा येणार होता का.....स्नेहा

नाही कोणाचा येणार नव्हता पण विचारलो असच.........सुजय

अस होय...........स्नेहा थोडा पॉज घेत..........अरे हा.........फोन नाही आला पण कोणाचा तरी मेसेज आला होता........स्नेहा आता तर सुजय काही तरी सांगेल या आशेने  बोलते.......

मेसेज.........?......तु पाहीला आहेस का मग.....सुजय स्नेहाने फोटो पाहीला असेल की नाही हा अंदाज घेत विचारतो....

मी मेसेज काय ओपन करुन काही पाहीला नाही......पण मेसेज आल्यावर फ्लॅश झाली ना स्क्रिन ते तेवढ पाहील......स्नेहा

आता सुजयला कन्फर्म झाल की स्नेहाने रेवाचा फोटो पाहीला आहे......म्हणुनच ती इतके प्रश्न विचारत आहे........पण आता मी तीला काय सांगु ती काय विचार करेल माझ्याबद्दल......ती रेवाला तर जाऊन काही बोलणार नाही ना.........सुजय आपला विचार करत असतो.....त्याला आता स्नेहाला काय सांगाव कळतच नसत..........

सुजय काय झाल कोणत्या विचारात हरवलास......स्नेहा

आता बोलल्याशिवाय काही निर्वा नाहीये......हे कळुन चुकल.......सुजय शब्दाची जळवाजुळव करुन बोलु लागला......वहिनी ते.........मी म्हणजे.....मी.....ते फोटो.....

फोटो काय सुजय..........रेवाच्या फोटोच म्हणतोयस का.....स्नेहा सुजयकडे रागीट लुक देत बघत बोलते........

वहिनी मी मुद्दाम नाही ग ठेवला तो फोटो..........सुजय

मग का ठेवलायस रेवाचा फोटो........स्नेहा

ते मी......म्हणजे.......सुजय डोळे बंद करतो व......एकदम बोलुन टाकतो......मला रेवा आवडते.........आय लव्ह हर..............सुजय

काय........?.....खरच...........स्नेहा आनंदात विचारते..........

सुजय स्नेहाचा आवाज ऐकुन डोळे उघडतो.......आणि तिचा हॅपीवाला चेहरा पाहुन त्याला काही कळेनाच.....

म्हणजे वहिनी तुला.........स्नेहाला खुप आनंद झालेला असतो.........खरच तुला रेवा आवडते......

हो आवडते........सुजय

आय एम सो हॅपी टु हिअर दॅट...........स्नेहा......

खरच वहिनी......म्हणजे........सुजयच वाक्य मध्येच थांबवत....हो मला खुप आनंद झालाय.........

खरच.........मी केवढा घाबरलो होतो.......आता तु काय म्हणतेयस की काय अस वाटत होत........

रेवाला सांगितला आहेस.......स्नेहा

नाही अजुन..........म्हणजे तिला मी आवडतो की नाही काय माहीत........सुजय एवढस तोंड करुन बोलतो...

अरे मग विचारना तिला......स्नेहा

अणि ती नाही म्हणाली तर..........सुजय

तुला माहीतेय का ती नाही बोलणार आहे..........स्नेहा

नाही तस काही नाही..........पण थोडी भिती वाटते ना ग........सुजय

तु पण ना..........ती होच म्हणेल बग.......तु विचार तर.........स्नेहा

म्हणजे तुला तिने काही सांगितल आहे काय...........सुजय

अरे नाही नाही..........म्हणजे काय झाल.......सकाळी राधिका आली ना.......तेव्हा ती तुला येवुन मिठी मारली ना........मग तुम्ही गेल्यानंतर मी तिला म्हणाले की छान आहे ना राधिका..........तर ती हळु आवाजात बोलली तिला वाटल मला ऐकायलाच आल नाही.............स्नेहा

काय बोलली..........सुजय उत्सुकतेने विचारतो.........

अरे हो थांब सांगते.........किती गडबङ...............ती म्हणत होती की...........हम....छान आहे पण एवढ चिकटायची काहीच गरज नव्हती.......

अस म्हणाली रेवा.........सुजय

होय.........स्नेहा

म्हणजे तिला मी आवडत असेल का.......सुजय

मी नक्की नाही सांगु शकत पण आवडत असशील.........स्नेहा

ते ऐकल्यावर सुजय खुप खुश होतो........

बर तु तिला केव्हा सांगणार आहेस...........स्नेहा

आत्ता नको थोडया दिवसांनी सांगेन.......जरा तुमच्या लग्नाच होवुन जाऊदे ना......सुजय

बर चालेल..........हे आणखी कोणाला माहीत आहे का..........स्नेहा

हो..........आध्याला माहीत आहे.......सुजय

मग काय आता तुझ खर नाही........तुला चिडवुन चिडवुन भंडावुन सोडेल.......स्नेहा हसत बोलते....

अस म्हणत दोघेही हसु लागतात........

बर चल...........मी खाली जाते.......नाहीतर सगळे शोधायला लागतील....कुठे गेली म्हणुन.......अस म्हणत स्नेहा जात असते पण तिच्या लक्षात येत की सुजयचा मोबाईल तिच्या हातातच आहे........

अरे तुझा मोबाईल माझ्याकडेच राहीला........अस म्हणत ती मागे वळली.........हा घ्या तुमच्या राणीसाहेबाचा फोटो........अस म्हणत सुजयच्या हातात मोबाईल देते......तसा केसातुन हात फिरवत

सुजय लाजतो........

ओहो.... खडुसला लाजता पण येत......... अस बोलल्यानंतर स्नेहाच्या लक्षात येत की आपण खडुस बोलुन गेलो हे लक्षात आल्यावर ती आपली जीभ चावत सुजय काही तरी म्हणेल म्हणुन सुजय मी जाते.......अस म्हणत ती बाहेर जाऊ लागली......

पण सुजयच्या लक्षात येत...........ये वहिनी थांब.......तशी स्नेहा थांबते आणि मागे वळते..........तु काय म्हणालीस.....खडुस......?

तु खडुस का बोललीस.......सुजय

ते मी म्हणजे चुकुन गेल तोंडातुन.........स्नेहा

चुकुन नाही गेल.......सांग का बोललीस........सुजय

तुमच्या मॅडम बोलतात तुम्हाला..........स्नेहा

म्हणजे..........सुजय थोडा विचार करत विचारतो.......

म्हणजे...तु सुरवातीला ओरडायचास ना तिला.....मग तुला ती खडुस म्हणायची......पण आता आम्ही बोललो ना.........की म्हणते.........मी म्हणत होते तेवढा खडुस नाहीये ग तो..........अस म्हणत स्नेहा हसते...

अस म्हणत होती..........सुजयला ते ऐकुन छान वाटत......

बर चला मी जाते खाली........तु पण ये.......नाहीतर तुमच्या मॅडमांच्या विचारात इथेच बसुन रहाल.......स्नेहा त्याला चिडवत असते......

ये वहिनी आता तु पण चिडवायला लागलीस.........काय ग तु पण.......सुजय

बर जाते मी.........ये तु.......स्नेहा

स्नेहा गेल्यावर सुजय रेवाच्या विचारात हरवुन जातो.........आणि अचानक त्याच्या डोक्यात येत........की रेवा राधिका आल्यावर अस का बोलली असेल........बर जाऊदे नंतर बघु खाली जातो.......नाहीतर आता वहिनीला पण चान्स मिळेल मला चिडवायचा...

स्नेहा व तिची फॅमिली आता घरी जायची तयारी करु लागली........

रेवा येणार ना आमच्या सोबत..........स्नेहा

अग नको....परत येईन......आता जाते आई बाबांच्या सोबतच..........रेवा

कोण कुठे जात आहे........माधवीताई किचनमधुन येत बोलतात.........

आई ते रेवाला सोबत चल म्हणत होते.........पण नाही म्हणतेय काकुंच्या सोबत जाते म्हणतेय...स्नेहा

रेवा कुठेही जाणार नाहीये............माधवीताई

म्हणजे......आनंदराव

मालतीताई रमाकांतराव व रेवा आज इथेच थांबणार आहेत........माधवीताई

अहो माधवीताई नको.........काल थांबलो की आम्ही..........आता जातो घरी......मालतीताई

नाही तुम्ही कुठेही जाणार नाही......आज सगळे इथेच राहणार आहात.......आकाशला पण बोलवुन घ्या......माधवीताई

अहो माधवीताई आकाश सकळीच ऑफीसच्या कामानिमित्त बाहेर गेला आहे चार दिवस......मालतीताई

हा.... मग तर आता तुम्ही इथेच रहा........माधवीताई

अहो माधवीताई ऐका ना.........मालतीताई

काकु अहो नको मला पण उदया बॅकेत जायच आहे ना.......रेवा

मग तु सुजय सोबत जा ना.......आता मी काहीही ऐकणार नाहीये.........तुम्ही राहणार आहात..........अहो तुम्ही तर सांगा ना.........माधवीताई

रमाकांत.....वहिनी तुम्ही आज राहणार आहात..........आणि हे आता फायनल झाल.......आनंदराव

रेवा आई एवढ सांगतायत तर रहा ना.........स्नेहा सुजयकडे बघत त्याला चिडवत बोलते........

बर एवढे सगळेजण सांगताय तर तुमच मन मोडन बरोबर वाटत नाही.......राहतो आम्ही....मालतीताई

मालतीताई हो बोलल्यावर सुजय खुप खुश होतो

बर माधवीताई मालतीताई आम्ही निघतो आता...........रेखताई

आनंदराव रमाकांतराव चला निघतो आम्ही बाकीच पुढच कस ठरवायच ते फोनवर बोलुन ठरवु कधी भेटायच.......सुधिरराव

हो हो चालेल........आनंदराव........

स्नेहा सगळयांना नमस्कार करते.........आशु सुध्दा स्नेहाच्या आई बाबांना नमस्कार करतो.....व सगळे जायला निघतात........

***

क्रमश:

पुढचा भाग 16/9/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all