Login

बावरे मन...भाग-36

बावरे मन..भाग 36 (बर माधवीताई स्नेहाला मग ओटी घाला...म्हणजे लग्नाचा महत्वाचा कार्यक्रम पुर्ण होई?

बावरे मन..भाग 36

(बर माधवीताई स्नेहाला मग ओटी घाला...म्हणजे लग्नाचा महत्वाचा कार्यक्रम पुर्ण होईल....

माधवीताई व मालतीताई स्नेहाला हळदी कुंकु लावतात व ओटी भरतात...यादया केल्या जातात...

चला झाल फायनल....यादया झाल की आपल्याकडे निम्म लग्न झाल अस म्हणतात....मिठाई वाटा आनंदराव.लग्न ठरल तुमच्या मुलाच....)

आता पुढे......

पहीला मुलाला व मुलीला पेढा दया एकमेकांना भरवायला सांगा....गुरुजी....

रेवा स्नेहाला पेढा देते व आशुला भरवायला सांगते....व आध्या आशुकडे पेढा देते व स्नेहाला भरवायला सांगते...

पेढा भरवल्यानंतर सगळे टाळया वाजवतात...आणि सुजय बाकीच्यांना मिठाई देतो.....सगळयांना देवुन झाल्यावर रेवाला दयायला येतो.....रेवा पेढा घेते.....

तु घेतलीस का मिठाई...रेवा

मला कोण देणार.......सुजय

अरे दयायला कशाला हवी तुझ्याच तर हातात आहे ना....रेवा हसत म्हणते..

अग हो.....पण दोन्ही हातात मिठाई आहे....खाणार कस....सुजय एवढस तोंड करुन बोलतो...

एवढच ना मग ती मिठाई माझ्याकडे दे आणि तु मिठाई खा ना.....रेवा

आध्याच लक्ष हयांच्याकडेच होत....त्याच बोलन कानावर पडल्यावर ती त्यांच्या जवळ येते....

रेवा त्यापेक्षा एक काम कर ना.....तो मिठाईचे बॉक्स तुझ्याकडे देणार मग तो मिठाई खाणार...सरळ तुच त्याला पेढा भरव ना........आध्या

आध्या अस बोलल्यावर सुजय डोळे मोठे करुन तिच्याकडे रागाने बघतो.....तु गप्प बस जरा आध्या पण डोळयानेच खुनवते....

अग रेवा दे ना....मी दिले असते पण माझ्या पण हातात सामान आहे ना....आध्या

रेवाकडे काहीच ऑपशन नसतो.....मग ती सुजय ला पेढा भरवते.....तीला थोड ऑक्वड वाटल पण आध्या एवढ फोर्स करत होती तीला नाही कस बोलणार ना...

रेवाने पेढा भरवल्यावर सुजय खुप खुश होतो.........

रेवा पेढा भरवुन स्नेहाजवळ जाते............आध्या थॅक्स यार......सुजय आनंदात आध्याला थॅक्स म्हणतो.....

बर चला सगळे जेवायला बसुया......माधवीताई  व मालतीताईनी खुप छान पध्दतीने जेवणाची तयारी केली होती.....अगदी मराठमोळया पध्दतीने.....डायनिंग टेबलवर बसण्यापेक्षा सरळ सगळे खाली बसणार होते.....केळीच्या पानावर......साधा भात त्यावर घातलेल वरण व त्यावर सोडलेली तुपाची धार......दोन तिन नमुनाच्या भाज्या, पुरी, मसाले भात....गोड म्हणुन....गुलाबजाम....खुप चविष्ठ जेवण बनवले होते..आणि केळीच्या पानाभोवती काढलेली सुंदरशी अशी रांगोळी.......खुप साग्रसंगित मराठी पध्दतीने सगळी तयारी केली होती....सगळया लेडीज सगळया जेन्ट्स लोकांना वाढणार होत्या......व नंतर सगळे जेन्टस सगळया लेडीज ना वाढायच ठरल.....मग सगळे जेन्स जेवायला बसले......

रेवा व स्नेहा सुध्दा सगळयांना आग्रहाने जेवायला वाढत होत्या......स्नेहा सुजय जवळ येते व ती गुलाबजाम वाढत होती.....

मिस स्नेहा नको बास मला....सुजय

सर एक घ्या ना स्नेहा आग्रह करत असते....त्या दोघांच मिस स्नेहा व सर ऐकुन माधवीताई त्या दोघांना.....बोलतात....

सुजय स्नेहा आता तुम्ही बॅकेत नाही.....आणि सुजय मिस स्नेहा काय.......वहिनी आहे तुझी ती आता.....आणि स्नेहा तु पण त्याला सर नको म्हणु...ते सर वगेरे बॅकेत म्हणायच बर का.....माधवीताई मस्करी करत म्हणतात....

आई सवय आहे ग....आता इथुन पुढे वहिनी बोलत जाईन.....सुजय

हो आई मी पण सर नाही बोलणार.....पण काय म्हणु त्यांना....स्नेहा थोड विचार करत बोलते....

अग काय म्हणु काय तुझा दिर आहे तो.....दादा बोल किवा भाऊजी बोल...रेखाताई तिला समजावत बोलतात......

काकी दादा वगेरे काही नको नावानेच बोलवु देत...मी एवढा पण मोठा नाहीये....सुजय

अरे बाळ पण अस नाव कस घ्यायच......रेखाताई

काही होत नाही मला चालत.....सुजय

बर तुम्ही दोघांनी ठरवा......काय बोलायच ते..माधवीताई

थोडा वेळ परत आग्रह करुन जेवण वाढायच चालु होत...रेवा परत एकदा ‍सगळयांना गुलाबजाम देत होती.....वाढत ती सुजय जवळ येते......तो नको म्हणतो पण ती त्याच्या ताटात वाढुन बाजुला होते.....ते पाहुन सुजयला छान वाटल......हक्काने वाढतेय अस फिल झाल.......त्याने त्या आनंदात गुलाबजाम खाल्ला

स्नेहा व आशुची पण नजरा नजर चालु होती......आध्या त्यांना चिडवायचा चान्स मिळतोय का पाहत होतीच आणि तिला तो चान्स मिळाला.....अग वहिनी दादुला गुलाबजाम दे जा ना...तशी स्नेहा गोड लाजते.......

हो स्नेहा जा ना आशु दादाला दे जा रेवा सुध्दा तिला फोर्स करते.....खुप आग्रह करताना स्नेहा आशुला गुलाबजाम देते..अस करत थोडयावेळात सगळयांची जेवण आवरतात......

सगळ्या जेन्ट्सच जेवन झाल्यावर सगळया लेडीज जेवायला बसतात व जेन्ट्स वाढु लागतात.....तेव्हा सुध्दा चिडवाचिडवी सुरु असतेच........आशु स्नेहाला आग्रहाने वाढत होता ते पाहुन रेवा व आध्या आशुला व स्नेहाला चिडवत होते.....बराच वेळ आग्रह करुन वाढायच सुरु असत.........

सुजय सगळयांना गुलाबजाम वाढ जा ना.....आनंदरावर सुजयला सांगतात....सुजयलाही आता चान्स भेटला मघाशी नको असताना वाढलीस ना आता बग कसा वाढतो तुला...सुजय मनात बोलत वाढत असतो......वाढत वाढत तो रेवा जवळ येतो.....रेवा नको म्हणत असते.....पण सुजय मुद्दाम एक नव्हे तर दोन गुलाबजाम वाढुन जातो.........वाढुन जाताना तो हसत असतो........त्याला हसताना पाहुन रेवाला मघाशी आपण हयाला अस केल म्हणुन हयाने आपल्याला पण नको असताना वाढल....तशी रेवा सुध्दा हसायला लागली......

थोडयावेळात सगळयांची जेवण आटपतात...थोडा वेळ सगळे गप्पा मारत बसलेले असतात......

आशु स्नेहाला घर दाखव जा ना......माधवीताई

हो आई....आशुला सुध्दा तेच हव होत.....

रेवा सुजय जा तुम्ही पण.....रेवा तु पण पहिल्यांदाच आली आहेस ना.....जा ना घर पाहुन ये जा.......माधवीताई

हो काकु.......रेवा

सुजयला तर चान्सच भेटला.......चौघेजण जायला निघतात

ये आई मी पण जाते हयांच्या सोबत...मी एकटीच तुम्हा मोठयाच्यात बसुन काय करु...आध्या

बर जा......माधवीताई

सगळे घर बघायला जातात......आध्या आपली हौसेने वहिनी ही आई बाबाची रुम आहे अस म्हणुन दाखवते....

खुप छान आहे रुम..स्नेहा...

असच घर पहात आध्या आशुच्या रुम दाखायला येते.........वहिनी ही दादुची रुम आहे.......म्हणजे आता तुझीही होणार आहे..

आध्या तुझी रुम बोलल्यावर स्नेहा थोडी लाजते...

स्नेहा रुम बघुन घे आत्ताच काही बदल करायचा आहे का बग.....रेवा तिला चिडवत बोलते......

काय रे दादु वहिनीला रुम पण दाखवत नाहीयेस.......आध्या

सुजयच्या लक्षात येत की आपण असल्यामुळे त्याना मनमोकळे पणाने बोलता येत नाही.......

दादु तुम्ही रुम पहा आम्ही आलोच थोडयावेळात......सुजय आशुला डोळा मारत रेवा व आध्याला बाहेर घेवुन येतो.....

ये दादया बाहेर का आणलस तु.....मला वहिनीला रुम दाखावायची होती ना.......आध्या

वेडाबाई आपण असल्यामुळे त्या दोघांना निट बोलता येत नव्हत........कळल का......सुजय

ओ.....माझ्या लक्षातच नाही आल......आध्या

हमममम......सुजय

बर चल तुझी रुम दाखवुया रेवाला.........चालेल ना रेवा........आध्या

हो जाऊया ना.........रेवा

आध्या रेवाला सुजयची रुम दाखवायला घेवुन जाते........सुजयही त्यांच्या मागुन जातो......

रेवा ही बग दादयाची रुम कशी आहे...........आध्या

मस्त आहे..........रेवा

आवडली तुला...........आध्या एकदम बोलण्याच्या ओघात बोलुन जाते.......नंतर तिच्या लक्षात येत की आपण माती खाल्ली वाटत.......अग म्हणजे तुझ्या रुमसारखी छान आहे ना..........शब्दाची जुळवाजुळव करुन सुचेल ते कारण सांगुन मोकळी होते........

सुजय तिच्याकडे रागाने बघु लागतो........आता हा काय मला सोडणार नाही.........ती मनातल्या मनात विचार करु लागली.......आता आपण इथुन गेलेलच बर......नाही तर हा मला फटके मारेल........रेवा मी आलेच हा दोन मिनिटात........अस म्हणुन आध्या रुमच्या बाहेर जाते.......

सुजयलाही तेवढाच चान्स भेटला......मग सुजय आपली रुम आपल्या वस्तु त्याचा लॅपटॉप अशा सगळयाच गोष्टी दाखवु लागला.......

रेवाला सुजयची रुम आवडली होती..........रुम मस्त आहे की हयाची.....सगळया गोष्टी कशा जागच्या जागी आहेत........किती सुंदर ठेवली आहे याने रुम......मस्तच.........

सुजय रुम छान आहे तुझी..........सगळ जागच्या जागी आहे.........रेवा

आवडली तुला...........सुजय

हो आवडली...मस्तच आहे..........रेवा  सुध्दा रुम आवडली होती आणि नकळत आवडली बोलुन जाते........आवडली बोलल्यावर सुजय तिच्याकडे बघु लागतो

सुजयने पाहील्यावर.....ती लगेच सारवासारव करत..........म्हणजे.....छान आहे रुम......पुढे काय बोलाव तिला कळेना........सुजय आशु दादाला व स्नेहाला एकांत मिळावा म्हणुन तु आम्हाला रुमच्या बाहेर घेवुन आलास ना.........रेवा विषय बदलण्यासाठी बोलते.....

हो.........त्यांना आपल्या समोर बोलताना थोड ऑक्वड वाटत होत.....ते समजत होत.....म्हणुन बाहेर जाऊया म्हणालो......

हममम.....रेवा

****

स्नेहा व आशु त्यांची रुम पाहत होते.......त्यांना नेमक काय बोलाव कळत नव्हत.....दोघांनाही थोडा अवघडलेपणा होता........साहजीकच आहे......एका भेटीत अस मनमोकळेपणाने कस बोलणार ना....सुरवातीला थोडा आवघडलेपणा असणारच ना.......तसच त्यांच होत होत......स्नेहाला तर सगळच नविन होत घर घरातील माणस सगळच त्यामुळे तिला थोडा जास्तच अवघडलेपणा होता........अरेंज मॅरेज मध्ये मुलींची अशीच अवस्था असते......सुरवातीला कोणीच ओळखीच नसत सुरवातीला त्यांना ॲडजस्ट करण थोड अवघड जातच....पण मुलींच्यात ती ताकद असतेच ती अनोळखी घराला आपल घर माणुन त्याला स्वत:च घर समजतात....त्या घरातील माणसांना आपल्या आयुष्यातील एक भाग करुन घेतात.......स्नेहाचा अवघडलेपणा आशुचा लक्षात येत होता.....पण कोणी तरी बोलाव लागणार होतच ना.....त्याशिवाय काय त्यांच बोलण सुरु होणार होत.......शेवटी आशुच बोलायला सुरवात करतो.......

स्नेहा मला माहीतेय तुला थोड अवघडलेपणा असेल.......साहजीकच आहे.....सगळे अनोळखी आहेत......पण  मला जेवढ शक्य होईल तेवढ तुला हे घर आपल आहे अस फिल करेन.......आपल लग्न ठरल आहे म्हणजे आपण लगेच नवरा बायको सारख वागलच पाहीजे अस काही नाही.....तुझ्यासाठी हे सगळच नविन आहे.....त्यामुळे तुला हवा तितका वेळ तु घेवु शकतेस.....आपण आपल्या नात्याची सुरवात....मैत्रीने करु......म्हणजे सुरवातीचा जो अवघडलेपणा आहे तो नक्कीच कमी होईल......चालेल ना तुला.....

आशुचे हे विचार ऐकुन स्नेहाला खुप छान वाटल.....किती समजुतदार आहेत हे.....माझ्या मनातील भावना कशा समजुन घेतल्या हयांनी.......खरच खुप चांगले आहेत.....आशुतोष.....स्नेहा मनातल्या मनात विचार करत होती........पण आशु तिच्या उत्तराची वाट पाहत होता.....

स्नेहा काय झाल… चालेल ना तुला......आशु

हो चालेल........नात्याची सुरुवात जर मैत्रीने झाली तर आपल नात छान खुलेल.....आपला अवघडलेपणा कमी होईल... अनोळखी असलेली भावना कमी होईल.......तुम्हाला सुध्दा अवघडलेपणा आहे कळतय मला...पण तुम्ही तुमचा अवघडलेपणा बाजुला करुन माझा विचार केलात.....थॅक्स...

अग थॅक्स काय त्यात......ते माझ कर्तव्यच आहे.......आणि तु मला अहो जावो नको करुस नाव घेतलीस तर चालेल मला.....आशु

अहो पण घरी आई बाबांना आवडेल का.......स्नेहा

अग त्यांनाही काहीच प्रॉब्लेम नसेल.....हव तर मी बोलु का आई बाबांशी.....आशु

नाही नको......तुम्हाला आवडेल ना मी नाव घेतलेल....स्नेहा

हो आवडेल.........आशु तिला एक स्माईल देत बोलतो.....

बर मग मी नावाने बोलवेन तुम्हाला....स्नेहा थोडी लाजत बोलली......

लाजताना छान दिसतेस........आशु आपल्या केसात हात फिरवत बोलतो......

अस बोलल्यावर स्नेहा आणखीन लाजते ....

आध्या दोघांच्या रुममध्ये जाते व चला खाली बोलवत आहेत तुम्हाला........सगळे खाली येतात....

चला आता आम्ही निघतो....खुप वेळ झालाय.......सुधिरराव......

बाकीच खरेदीच वगेरे कशी कधी करायची हे आपण फोन वरुन ठरवु........रेखाताई

हो हो चालेल......माधवीताई

स्नेहा सगळयांना नमस्कार करते......

स्नेहा तुम्ही दोघे आत्ता पासुन थोड बोलत जा म्हणजे लग्नापर्यत चांगली ओळख होईल तुमची......थांब तुला आशुचा नंबर देते.....माधवीताई

अग आई.....नंबर कधीच एक्सजेन्ज झाले असतील..........आध्या स्नेहा व आशुला चिडवत बोलते.....

तशी स्नेहा गोड लाजते........

मी विसरलेच की आजकालच्या मुलांना काही सांगाव लागत नाही.....ती खुप फॉरवर्ड असतात......अस बोलल्यावर सगळे हसायला लागतात....

बर चला निघु का आम्ही......सुधिरराव

हो चालेल....भेटुया परत....आनंदराव

स्नेहा व तिची फॅमिली घरी जातात.........बर आनंद चला आम्ही पण निघतो....रमाकांतराव

थांबा ना आज इथे सकाळी जा म्हणे...... माधवीताई

 अहो नको माधवीताई सकाळी आणी मुलांच्या ऑफिसची तयारी करायची असते.....आता लग्नात यायच आहे की....मालतीताई

बर चालेल......लग्नात तर आठ दिवस आधी याव लागले.....माधवीताई

हो हो नक्की येवु.......चला आता निघते.....मालतीताई

रेवा सगळयांना नमस्कार करते व आध्या आशु व सुजयला बाय करते......सगळे जायला निघतात........

छान झाला ना आजचा कार्यक्रम......माधवीताई...

हो ना मस्त झाला...........सुजय रेवाच्या येण्यामुळे खुश होत बोलतो.....

***

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....