बावरे मन...भाग-26

बावरे मन..भाग 26 (ओके सर चालेल............सर मी येवु.....रेवा हो चालेल...............खेडे गावाती कस्टमरची लिस्ट स्प?

बावरे मन..भाग 26

(ओके सर चालेल............सर मी येवु.....रेवा

हो चालेल...............खेडे गावाती कस्टमरची लिस्ट स्पेशल काढुन ठेव.......सुजय

ओके सर........रेवा

रेवा बाहेर येते व कस्टमरची लिस्ट काढु लागते..)

आता पुढे.....

सुजय शरदला कॉफी आणायला सांगतो.......थोडयावेळात शरद कॉफी घेवुन येतो......सर कॉफी..........

ठेव इथे.....शरद कॉफी ठेवुन जात असतो.......त्याला टेबलवरच्या फाईल्स विस्कटलेल्या दिसल्या तो ते व्यवस्थित करु लागला.........सुजय कॉफी घेत रेवाचा विचार करत असतो......आणि त्याच लक्ष समोर जात.....ही इथे कशी काय आत्ता तर बाहेर गेली होती...........सुजय उठुन तिच्या जवळ जातो.....ति थोडी खाली वाकते तर तिचे केस तिच्या चेहऱ्यावर येतात......काम करताना तिला ते केस डिस्टर्ब करत होते......सुजय गोड हसत हळुच ते केस मागे करतो......आणि तिचा हात हातात घेतो........

सर.....सर...........सरररररररररररररर........काय करताय.............शरद सरांना ओरडत असतो.......शरदच्या आवाजाने सुजय भानावर येतो.....बघतो तर शरदचा हात त्याने आपल्या हातात घेतलेला असतो..........ते बघुन पटकन तो त्याचे हात सोडतो व बाजुला होतो........

शरद तु इथे काय करतोयस........

सर ते फाईल व्यवस्थित ठेवत होतो..........शरद गोंधळलेल्या सुरात बोलतो....

बर...... झाल असेल तर जा तु.......सुजय

हो सर.....सर असे का करत होते मला......काय माहीत....शरद बडबडत बाहेर येतो....आणि आपल्या कामाला लागतो.......

सुजय वेडा झालायस का तु.....तु रेवाचा एवढा का विचार करतोयस.....त्या शरदला काय वाटल असेल......कसा हात पकडलेला मी त्याचा.....शट यार........ सुजय स्वत:च्या डोक्यावर हात मारतो व काम करु लागतो.......पण त्याच कामात लक्षच लागत नसत सतत रेवाचा चेहारा त्याच्या समोर येत असतो...........

*************

मे आय कम इन सर.........

एस कम इन......

सर ते उदया किती वाजता निघायच आपण........रेवाचा आवाज ऐकल्यावर सुजय वर बघतो.......

नाही नाही रेवा नसेल मला परत भास होत असेल तिचा.......अस म्हणुन तो परत कम्युटरकडे बघत बसतो........

रेवा थोडावेळ वाट बघते पण सुजयचा काहीच रिप्लाय येत नाही...........

सर…. सर........रेवा त्याच्या समोर चुटकी वाजवत बोलवते......

सर केव्हा पासुन बोलवतेय.......लक्षच नाहीये तुमच....एकटेच काय बडबडताय.........रेवा

अस बोलल्यावर सुजय भानावर येतो.......ही खरच आलेय........तो हळुच स्वत:ला चिमटा काढतो.......आ.......खरच आलेय ही..........सुजय

सर काय झालय.....तब्बेत बरी नाहीये का तुमची..........रेवा

नाही…… काही नाही मी आहे व्यवस्थित तु काय म्हणत होतीस.........सुजय

सर ते उदया किती वाजता निघायच विजीटला.......रेवा

10 वाजता निघुया मी तुला पिकअप करेन तुझ्या घरातुन.........ओके.....सुजय

बर चालेल.......सर मी येते........रेवा

हो.........सुजय............

*********

रेवा आई बाबाना सांगते की ती विजीटला खेडे गावात जाणार आहे.......त्यामुळे यायला वेळ होईल.....

बर चालेल.....व्यवस्थित जाऊन या......मालतीताई

हो ग आई......रेवा

कोण कोण जाणार आहात.........रमाकांतराव

मी आणि सर.........रेवा

सुजय येणार आहे होय मग काय काळजीच कारण नाही......व्यवस्थित जाऊन या......रमाकांतराव

हो बाबा.......रेवा

सुजय घरी पोहचतो व डायरेक्ट त्याच्या रुममध्ये जातो........

माधवीताईना जरा वेगळच वाटत......आज हा काही न बोलता डायरेक्ट आपल्या रुममध्ये कसा काय गेला...माधवीताई

अग दमला असेल.....कालच पिकनीकवरुन आलाय परत लगेच ऑफीस......आनंदराव

हो असच असेल.......आध्या सुजयला चहा नेहुन दे जा त्याच्या रुममध्ये....माधवीताई

हो आई..दे इकडे.....आध्या

आध्या चहा घेवुन सुजयच्या रुममध्ये येते.........दादया चहा घे......पण सुजयच लक्षच नसत.....आध्या त्याच्या जवळ जाते.....दादया हा घे चहा....चहाचा कप सुजयच्या समोर धरते.....तु..........तु इथे कशी काय.....आणि तु का चहा आणलास.....मी तुला चहा दयायला हवा......तु बस ना...घे ना तु चहा....

ये दादया काय चालच तुझ मी इथे कशी काय म्हणजे......काय बोलतोयस..........वेडा झालायस का.....आध्या

आध्याच्या आवाजाने सुजय भानावर येतो...त्याला वाटल रेवाच चहा घेवुन आली आहे..........

तु आहेस होय.....मला वाटल...........सुजय मध्येच थांबतो.आणि गालातल्या गालात एकटाच हसतो.....

तुला कोण वाटल.........आणि तु एवढ हसतोयस का........तुला कोण दिसत होत........दादया समथिग समथिंग..........आध्या

ए गप्प काहीही बोलु नकोस........माझ मी चहा घेतो जा तु.......सुजय मुद्दाम चिडण्याच नाटक करतो.....

बर बाबा जाते.......पण माझी वहिनी कोण आहे ते सांग हा नंतर............आध्या सुजयला चिडवते...

तु आता जातेस का की फटके देवु..........सुजय

जाते जाते....आध्या बाहेर जात बोलते.....

मला काय होतय यार.......सारखी सारखी रेवा का दिसतेय मला.......आता आध्या आली तर तीच्यात रेवा दिसली.....सकाळी तर काय शरदलाच रेवा केलो यार.......वेडा झालोय मी........

मी प्रेमात तर पडलो नाहीये ना रेवाच्या...........नाही नाही अस कस होईल.......काहीही विचार करतोय मी.....अस म्हणत तो चहाचा कप घेवुन चहा घेवु लागतो........

एक काम केल तर आध्याचा फॉम्युला वापरला तर......ती म्हणतेच ना डोळे बंद केले की ज्या व्यक्तीचा चेहरा समोर येतो ती आपल्यासाठी खास असते.......

करु का मी........?...करायला काय हरकत आहे ना......सुजय चहाचा कप खाली ठेवतो व डोळे बंद करतो........

आणि त्याच्या समोर पावसात भिजणारी रेवा समोर येते.......तसा सुजय पटकन डोळे उघडतो......

रेवाच दिसतेय मला........खरच मी प्रेमात पडलोय.......हो.....कारण ती नेहमी समोर असावी अस वाटत....तीच हसण मनाला वेड लावुन जात....तीचा तो निरागस चेहरा नेहमी दिसत रहावा अस वाटत....मग हयाला प्रेमच म्हणतात ना.........एस........ आय एम इन लव्ह........आय लव्ह हर..........आय लव्ह रेवा.............सुजय रुम मध्ये वेडयासारखा नाचत ओरडत असतो.......फिरत फिरत मागे वळुन बघतो तर आध्या हाताची घडी घालुन समोर उभी असते.........

तसा सुजय शांत होतो.....आणि काहीच झाल नाही असा आव आणतो चेहऱ्यावर.......तु परत का आलीस.......

ते आईने जेवायला बोलवल आहे तुला.......आध्या

बर मी येतो पाच मिनिटात........सुजय

बर......आध्या

हुश्श्श्श्शश्श्श्श्शश्श्.......काही ऐकल नाही वाटत हिने वाचलो.......अस म्हणत सुजय बेडवर बसतो.....

दादया मला वहिनी पसंद आहे.........आध्या परत थोड मागे येवुन बोलते......

सुजय दचकुन उभा राहतो........ए कोण वहिनी कोणाची वहिनी......काय बोलतेयस तु.......सुजयला काय बोलाव कळेनाच.......

बास बास मगाच पासुन जे तु बडबड करत होतास ना.....ते मी सगळ ऐकलय.......तुझी ही लपवालपवी बंद कर....माझ्या पासुन काहीच लपवु शकत नाहीस.......आध्या त्याला चिडवत बोलते....

मी सगळयांना जाऊन सांगते.....अस म्हणत आध्या खाली जात असते....सुजय तिचा हात धरुन मागे खेचतो........

***

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all